✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भूत कसे बनते? - सर्वपित्री पेश्शल!

प
प्रियाली यांनी
Sun, 09/25/2011 - 23:49  ·  लेख
लेख
सौ.अ.जि.१ पैसाताई यांना खालील लेख पुष्पगुच्छ देऊन समर्पित. सदर पुष्पगुच्छावर विक्रेत्याचा लोगो असेलच पण तरीही एक विशेष श्टीकर लावून तो पुष्पगुच्छ कोणत्या विक्रेत्याकडून खरेदी केला आहे ते कळवले आहे. पैसाताईंना हा लेख समर्पित करण्याचे कारण काही चाणाक्ष वाचकांनी जाणले असेलच पण ज्यांनी ते जाणले नसेल त्यांच्यासाठी पुढील खुलासा: पितृपक्ष सुना सुना गेला अशी खरड लिहून त्यांनी मला मसणातून उठवले. अर्थातच, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. या पार्श्वभूमीवर आमचे एक जालमित्र मध्यंतरी मला म्हणाले होते. “अगं हडळी, कधीतरी माणसांत ये.” तो अपमान आणि शल्य अद्याप माझ्या हृदयात सलते आहे. सदर व्यक्तीचा लोकांनी या लेखात जाहीर निषेध करावा अशी मी विनंती करते. सर्वपित्री जवळ येत असताना काहीच चमत्कारिक आणि भयंकर घडू नये अशी माझी इच्छा नव्हती पण हिंदू क्यालेंडरानुसार यावर्षी सर्वपित्रीने आमच्या लाडक्या हॅलोविनला कल्टी दिली, त्यातून नव्या प्रोजेक्टचे भूत मानेवर बसलेले त्यामुळे सर्वपित्री गुळमुळीत निघून जाते असेच वाटले होते पण पैसाताईंमुळे काहीतरी भयंकर धागा टाकण्याचा योग आला आहे. त्यातून गेली वर्ष-दोन वर्षे उगीच माझ्या मानगुटीवर चढून बसण्याचा प्रयत्न करणार्‍या घासुगुर्जींचा “दृष्ट कशी काढावी?” हा लेख औत्सुक्यापायी लिहिला आहे, समज गैरसमज जाणून घेण्यासाठी लिहिलेला आहे असा समज झाल्याने मी याच लेखाला माझे प्रेरणास्थान२ बनवले आहे. अवांतरः सहज आठवलं म्हणून आमच्या एका आयटमला आम्ही फ्यांटम म्हणत असू, दुसर्‍याला वेताळ तर तिसर्‍याला मुंजा.
लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही कधी कधी भुते बनतात. बाहेरची बाधा होणे, माणूस झपाटला जाणे असे प्रकार घडतात. इच्छा अतृप्त राहिलेला किंवा अनैसर्गिक मृत्यू आलेला मनुष्य भूत बनतो असे समजले जाते. माणसाचे भूत बनून त्याने त्रास देऊ नये म्हणून श्राद्ध करणे, दिवस करणे, शांती करणे इ. प्रकार केले जातात. हे सर्व ठीक पण ही चर्चा भूत कसे काढावे त्यावर नसून भूत कसे बनते त्यावर आहे. तुमच्या लहानपणापासून तुम्ही “मग तो व्यक्ती भूत बनला....” अशा टैपाच्या गोष्टी ऐकल्या असतील त्या इथे सांगा बघू. भूत नेमके कसे बनते? त्यासाठी कोणत्या वस्तू वापरतात? भूत कोणत्याही तिथीला बनता येते का? इतर कोणाला बनवता येत नसल्यास स्वतःच स्वतःला भूत बनता येते का? यामागचे शास्त्र काय आहे? हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय? माणसाप्रमाणेच घर, दुकान, प्राणी यांचेही भूत बनते का? कोकणातल्या लोकांना खास आवाहन आहे की त्यांनी खास कोकणी भुतांच्या गोष्टी थोडक्यात इथे सांगाव्या आणि मिपाकरांना उपकृत करावे. बिगर कोकणी लोकांनाही हे आवाहन लागू आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रतिसाद देताना तो भयंकर आणि चमत्कारिक आहे याची दखल घ्यावी. सुरुवात माझ्यापासून करते: आमची आजी (बाबांची आई) पक्की कोकणातली. लहानपणापासून तिने मला भुतांच्या गोष्टींचेच बाळकडू देऊन वाढवले. आमच्या आईला हा प्रकार पसंत नसे पण तिची काय बिशाद होती आजीसमोर शब्द काढण्याची. आजीने तिला तिथेच माणसांतून उठवली असती अर्थातच, तसं कधी घडले नाही. आजीच्या गावी एक कोळी होता. त्याचं नाव पाकुल्या. पाकुल्या तसा वयानुसार कमरेतून वाकला होता. मच्छीमारी सोडून किनार्‍यावर सुकवायला टाकलेल्या खारवलेल्या माशांची रखवाली करत असे. अशाच एका रात्री पौर्णिमा अली. त्या पुनवेच्या रात्री चंद्र आकाशात वर आला होता. समुद्राचं पाणी चांदीसारखं चमचमत होतं. रुपेरी वाळूने चंद्राला स्वत:त सामावून घेतल्याचा भास होत होता. किनार्‍यावर मंद वारा सुटला होता आणि त्याच रात्री रखवाली करणारा पाकुल्या अचानक खुडुक झाला. अजूनही कधीतरी पौर्णिमेच्या शांत रात्री समुद्रावर भटकायला गेलेल्या लोकांना पाकुल्या दिसतो. खारवायला टाकलेल्या माशांची रखवाली करत असतो. फक्त पाकुल्याचं अंग तो मेला त्या रात्री समुद्र आणि वाळू चमकत होती तसंच चांदीसारखं चमचमत असतं. लोक त्याला आता “पाकुल्या चकचक” म्हणतात. तात्पर्यः पौर्णिमेच्या रात्री समुद्रावर फिरायला जाऊ नये. गेलात तर चकचक हे उपनाम मानगुटीवर बसायची शक्यता आहे. तसेही पौर्णिमेला काय करावे याचा सल्ला युयुत्सुंकडून घ्यावा असे माझे स्पष्ट मत आहे. आता येऊ द्या – खवीस, हडळे, गिरे, हाकामारी, चकवा यांच्या कहाण्या ऐकण्यास उत्सुक. सर्वांना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा!! (हडळ नं. १) प्रियाली.
१ अ. जि. = अद्याप जिवंत २ हे विडंबन नाही. सदर लेखाचा प्रेरणा म्हणून वापर केला आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
58579 वाचन

💬 प्रतिसाद (137)

प्रतिक्रिया

प्र्.का.टा.आ

जाई.
Mon, 09/26/2011 - 20:07 नवीन
प्र्.का.टा.आ
  • Log in or register to post comments

ऐकलेले आहे

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 20:08 नवीन
वडखळ नाक्याची ही गोष्ट मी ऐकलेली आहे. सारस्वत बँकेतील काही अधिकारी एकदा गाडीने चालले होते. रस्त्यात त्यांना ही बाई गाडी थांबवा (लिफ्ट मागणे) असे सांगू लागली पण ड्रायव्हरला माहित होते त्याने लक्ष दिले नाही. तेव्हा एकजण त्या ड्रायव्हरशी हुज्जत घालू लागला की 'अरे इतक्या रात्री, निदान विचारायचं तरी तिला काय हवं ते? तिला मदत हवी असेल.' ड्रायव्हर म्हणाला, "साहेब हे प्रकरण तुम्हाला वाटतं तसं नाहीये. तिला नाही, आपल्यालाच मदतीची गरज आहे. बाहेर बघा." खिडकीबाहेर बाई गाडीच्या वेगात बाजूने चालत होती. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.

जागा आवडल्या.

Nile
Mon, 09/26/2011 - 21:00 नवीन
या सगळ्या ठिकाणी जायला आवडेल. भुतांना केव्हाचं भेटायचं आहे. तस्मात ज्या ज्या लोकांनी वरती कथा लिहलेल्या आहेत त्यांच्याकडे आम्ही लवकरच जाणार आहोत, तयार रहा. (डॉन्या आणि आड्या कडे सोडून!) ;-) जिवंत भुत, निळोबा.
  • Log in or register to post comments

कधी येतोस?

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 21:05 नवीन
तुझा गळा आवळायची चांगली संधी मिळाली. जिथे तिथे टिवटिवत असतो. येच आता. ;) भूत बनवायची आयती संधी चालून आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मदत

श्रावण मोडक
Mon, 09/26/2011 - 22:21 नवीन
तुला मदत लागणार नाहीच या कामासाठी. पण लागत असली तर कळव. काळा दोरा, बिब्बे, नारळाची करटी... शुभ कामात अडथळा येऊ नये यासाठी इथं मांत्रीकही सांगून ठेवला आहे. तो काय ते अंगारे-धुपारे करील. ;) पण काये, साला, आपला याच्यावर विश्वासच नाही. त्यामुळं संकटं येणार आणि तुझ्या हातून हे शुभकाम होणार नाही. तू एखाद्या भुतालाच गाठावंस. प्लॅन बी असलेला बरा. कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

थँक्सगिव्हिंग?

Nile
Mon, 09/26/2011 - 22:29 नवीन
हॅलोविनला सुटी नाही, पण थँक्सगिव्हिंगची तिकीटं पाठवून द्या. २३ ला संध्याकाळचं अन परतीचं २७ रात्रीचं चालेल. आणि हो, तुमच्या राक्षसी काकड्याच्या वेगवेगळ्या रेशिप्या हव्यात हां! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

मेल्या

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 22:34 नवीन
२३ ला संध्याकाळचं अन परतीचं २७ रात्रीचं चालेल.
मेल्या! तुला गळा दाबून मारेन आणि तुझं भूत बनतं का ते बघेन म्हणते आहे तर हा परतीचं तिकिट मागतोय. कशाला हवं ते? भुतं त्यांच्या मरणाच्या जागी अडकून बसतात असा प्रवाद आहे. तू आलास की राहा गपगुमान इथे. बेसमेंट चालेल का?
तुमच्या राक्षसी काकड्याच्या वेगवेगळ्या रेशिप्या हव्यात हां
घालेन हो. मरणार्‍याची शेवटची इच्छा पूर्ण करावी म्हणतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

साफ चूक!

Nile
Mon, 09/26/2011 - 22:41 नवीन
>>भुतं त्यांच्या मरणाच्या जागी अडकून बसतात असा प्रवाद आहे. हे चूक आहे, जिथं त्याचा जीव अडकतो तिथे अडकून बसतं असा आमचा अनूभव आहे. इथे बर्‍याच पोरींमध्ये माझा जीव अडकलेला आहे ना केव्हाचा, तेव्हा परत तर यावंच लागेल. त्यात मेलं तुमचं ते इष्ट कोष्ट, सारखं वादळं अन वारे.. तेव्हा माझ्या भूताला उडत येताना थंडी नाय वाजणार?? म्हणून परतीचं तिकिट पण हवं आहे. बाकी चार दिवस बेसमेंट चालेल! ;-) >>मरणार्‍याची शेवटची इच्छा पूर्ण करावी म्हणतात. असं आहे काय? मग माझ्या शेवटच्या इच्छांची यादीच घेऊन येतो, कसें?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

इष्ट कोष्ट?

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 22:47 नवीन
साहेब आम्ही इष्ट कोष्टात नाही. मिड वेष्टात असतो. इथे दूर दूर तक कोणी मनुष्यप्राणी नजरेस पडत नाही आणि एकदा इथे पोहोचलात की इथेच अडकून पडायला होते. तेव्हा पोरीबिरी विसरा. इथेच मिळाली एखादी नशीबाने तर बसा तिच्या मानगुटीवर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आधीच

श्रावण मोडक
Mon, 09/26/2011 - 23:43 नवीन
एकदा इथे पोहोचलात की इथेच अडकून पडायला होते. तेव्हा पोरीबिरी विसरा. इथेच मिळाली एखादी नशीबाने तर बसा तिच्या मानगुटीवर.
आधीच स्टॉकहोम सिंड्रम झाला दिसतो. पार बोंबललं सगळं एकूण असं दिसतंय... तरी मला एक मित्र सांगत होता, या प्रियालीचा भरवसा नाही. पाहता-पाहता बेपत्ता होत असते. इथं तर ती दलबदलू होणार असं दिसतंय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

४ पेग डाउन झालेले असताना

अप्पा जोगळेकर
Mon, 09/26/2011 - 20:13 नवीन
४ पेग डाउन झालेले असताना माझ्या एका मित्राने मला पुढील प्रमाणे कथा सांगितली. लग्न न होताच किंबहुना कौमार्यभंग न होताच जे मुलगे, पुरुष मरतात त्यांचा मुंज्या होतो. ज्याच्या मानगुटीवर बसायचे त्याच्या स्वप्नात मुंज्या येतो आणि डब्लू डब्लू एफ मधल्या अंडर टेकर सारखे फ्रीस्टाईल कुस्ती खेळण्याचे आव्हान देतो. हे आव्हान न स्वीकारताच मी पळून जाईन, त्याच्या हातापाया पडेन असा विचार करु नका. आव्हान स्वीकारावेच लागते. तुम्ही पळून जाऊ शकत नाही किंवा त्याला दयाही येत नाही. तो सिंघम बनून सरळ कमरेचा पट्टा काढून तुम्हाला फोडून काढतो. त्यापेक्षा आव्हान स्वीकारा. आणि त्याच्याशी कुस्ती खेळा. तुम्ही जरी हरलात तरी तो तुम्हाला जिवंत सोडून देईल. कारण तुम्ही त्याच्याशी लढण्याचे धैर्य दाखवले. जर जिंकलात तर तुमच्यावर खूश होऊन हातात सोन्याचं कडं घालेल.
  • Log in or register to post comments

ऑं??

Nile
Mon, 09/26/2011 - 20:33 नवीन
>>लग्न न होताच किंबहुना कौमार्यभंग न होताच जे मुलगे, पुरुष मरतात त्यांचा मुंज्या होतो. >>तो तुम्हाला जिवंत सोडून देईल आयच्या गावात दहीबटाटाशेवपुरी!! मेल्यावरही जगण्याची चिंता आहेच का!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

आयच्या गावात

अप्पा जोगळेकर
Wed, 09/28/2011 - 20:12 नवीन
आयच्या गावात दहीबटाटाशेवपुरी!! नविन वाक्प्रचाराबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

Henry VIII's चे तथाकथीत भूत !

मदनबाण
Mon, 09/26/2011 - 20:44 नवीन
Henry VIII's चे तथाकथीत भूत ! ;) http://www.youtube.com/watch?v=7sjzjyfPJqA&feature=related
  • Log in or register to post comments

अभिमान वाटला !!

सूड
Mon, 09/26/2011 - 21:22 नवीन
हा धागा बघून आज एक मुंज्या असल्याचा अभिमान वाटला !! नाहीतर आम्हा पारलौkick शक्तींची कोण दखल घेतं म्हणा.
  • Log in or register to post comments

अर्रर्र! असं आहे काय? तरीच

रेवती
Tue, 09/27/2011 - 01:12 नवीन
अर्रर्र! असं आहे काय? तरीच एकाही मुलीला तू पसंत पडत नाहीस. यापुढे सगळ्या दाखवण्याच्या/बघण्याच्या कार्यक्रमांना पाऊले झाकतील असे कपडे घालायचे. कफनीही चालेल्.;).......भगवी नको नाहीतर संन्यासच घ्यावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आज्जे,

सूड
Tue, 09/27/2011 - 09:36 नवीन
आज्जे, पुढल्या वेळपास्नं हडळींना बघायला जाऊ स्मशानात. म्हणजे ते कफनी वैगरेचं झंझट नको. *( आज्जी स्मशानात यायला घाबरते म्हणून असं म्हणायचं, ती माणसात आहे ना अजून !! म्हणजे काय आज सर्वपित्रीचं मला एकट्याला जाता यील. )*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

जा जा. एकटाच जा! मला काही हौस

रेवती
Tue, 09/27/2011 - 18:04 नवीन
जा जा. एकटाच जा! मला काही हौस नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

गोरेगाव पूर्वेत दोन बिल्डीग

जाई.
Mon, 09/26/2011 - 21:24 नवीन
गोरेगाव पूर्वेत दोन बिल्डीग झपाटलेल्या म्हणून प्रसिध्द होत्या तिथे बराच काळ कोणीच राहायला गेलं नव्हत त्यापैकी एक बिल्डीग पुर्ण बांधून तयार होती तर एकीच बांधकाम चालू होतं तेव्हा अचानक तिथे विचित्र भेसुर रडण्याचे आवाज येउ लागले बरेच दिवस हे चालू होत नंतर काही दिवसानी कामगारांच्या मृत्यूच्या घटना घडल्या भुताचे अनुभव येण्यास सुरुवात झाली यामुळे पहिल्या बिल्डीगच बुकिंग सुध्दा धोक्यात आल त्या बिल्डरवर काही आपत्ती आल्या आता कुठे तिथे माणस राहायला आलीत
  • Log in or register to post comments

मेघमल्हार का?

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 21:55 नवीन
या उंचच उंच एकसारख्या दिसणार्‍या बिल्डींग्ज माझ्या लहानपणापासून(? टीनेजपासून) तेथे आहेत. मी असेही ऐकले होते की एक म्हातारी बाई त्या बिल्डींगच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून जीव देताना दिसते. ;) असा प्रसंग अनेकदा घडताना अनेक लोकांनी पाहिले आहे. प्रत्यक्षात, बिल्डर्समधले वॉर असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.

होय आता सगळेजण असच

जाई.
Mon, 09/26/2011 - 22:04 नवीन
होय आता सगळेजण असच म्हणतात आतातर त्या आजूबाजूला खूप बिल्डीग तयार झाल्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

च्छ्या हल्ली भुतांनाही रहायची

गणपा
Wed, 09/28/2011 - 20:48 नवीन
च्छ्या हल्ली भुतांनाही रहायची जागा उरली नाही मुंबईत. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.

बिच्चारी भुतं

जाई.
Wed, 09/28/2011 - 21:10 नवीन
काळजी नको पण. मंत्री लवकर सोय करतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

तरी मी म्हणतच होतो यंदा

मेघवेडा
Mon, 09/26/2011 - 21:56 नवीन
तरी मी म्हणतच होतो यंदा मागल्या वर्षीसारखं सर्वपित्री पेश्शल काही दिसत कसं नाही?! निषेध व्यक्त करायच्या विचारानेच आलो तर समोर हा धागा! मस्तच हो हडळीण्बै! वडखळच्या भुताप्रमाणेच संगमेश्वरजवळ धामणीच्या घाटातली कथासुद्धा लै फ्येमस हां! रत्नांग्रीच्या दिवट्या परबाची तिथंल्या हडळीन घेतलेली विकेट लै गाजली होती.. अगदी रत्नांग्री टैम्सात बातमी होती! दिवट्या भुताखेतांवर विश्वास न ठेवणारा एक साधासरळ रिक्षाचालक. नुस्ता विश्वास नाही असं नव्हे तर तो भुताखेतांच्या नावानं बोंबा मारी! आपल्या बहिणीकडे सावर्ड्याला गेला होता तिथून तो परतत असताना धामणीच्या घाटात एका बाईनं त्याच्या रिक्षाला हात दाखवला. अपरात्रीची वेळ, तशात घाटात ती बाई एकटी.. काही आक्रीत नको घडायला म्हणून मदत करण्याच्या हेतून त्यानं त्या बाईला रिक्षात बसवलं. "एवढ्या अपरात्री तुम्ही या निर्मनुष्य ठिकाणी एकट्या कशा?" अशी चौकशी त्यानं केल्यावर "भूक लागली, घराकडे खायला काही नाही, जवळपास काही सोय नाही, पुढे घाट उतरल्या उतरल्या उजवीकडे एक ढाबावजा हॉटेल आहे तिथं काहीतरी खावं म्हणून बाहेर पडले" हे तिनं दिलेलं विक्षिप्त उत्तर त्याला पटलं नाही. त्याला शंका आलीच की काहीतरी गडबड नक्की दिसते म्हणून त्यानं आणखी चौकशी करण्यास सुरूवात केली. तेंव्हा त्याला कळलं की त्या बाईचा नवरा या जगात नसून आणि एकुलता एक मुलगा होता त्याला वेडाचे झटके येत असल्याने ती त्याला घरातच डांबून ठेवते. हे उत्तर ऐकून दिवट्या आणखीच भंजाळला. त्यानं विचारलं "बाई तुमचा नवरा गेला आहे तर तुम्ही हे कुंकू, मंगळसूत्र वगैरे का घातलंय?" तर त्यावर त्याला उत्तर मिळालं. "अरे मी फार नशिबवान रे बाबा, गंगा भागीरथी होण्यापूर्वीच मृत्यू लाभला मला! मघाशी तुझ्या रिक्षेत बसले ना त्या तिथंच घाटमाथ्यावर त्या रिक्षावाल्यानं माझ्यावर बलात्कार करून माझा गळा चिरला होता!" हे ऐकून दिवट्या ताडकन उडालाच. भुताखेतांवर विश्वास नसला असं म्हणत असला तरी लहानपणापासून त्यानं ऐकलेल्या सार्‍याच्या सार्‍या भुतांच्या गोष्टींची त्याला एकदम आठवण आली.. मागं वळून पाहण्याचं धाडस होत नव्हतं.. गाडी थांबवायला म्हणून ब्रेकवर पाय देतो तर ब्रेक लागेल तर शप्पथ.. मागून जोरदार हसण्याचा आवाज आला आणि "ब्रेक लागणार नाही!" असे शब्द ऐकू आले! दिवट्याला घाम फुटला.. मागं वळून बघतो तर काय! मघाशी व्यवस्थित दिसणार्‍या त्या बाईचे केस वार्‍यावर उडत होते, कुंकू लल्लाटभर पसरलं होतं, तोंडातून रक्त येत होतं आणि गळ्यावर एक मोठीच्या मोठी चीर होती.. आणि ती जोरजोरात हसत होती.. तळेकांटे गावच्या लोकांना सकाळी घाटपायथ्याशी वडावर आपटलेली एक रिक्षा दिसली नि त्यात दोन प्रेतं सापडली. पुरूषाच्या पाकिटात मिळालेल्या लायसन्सवरून त्याचा पत्ता लागला पण त्याच्यासोबत ती विवाहित बाई कोण होती ते आजपर्यंत कुणालाच कळलेलं नाही..! "दिवट्याचं सावर्ड्याला काहीतरी लफडं होतं, उगाच नाही बहिणीच्या घरी सारखा फेर्‍या मारायचा" अशी वावडी उठली.. अलिकडे धामणीच्या घाटात एक सावळासा उंचपुरा तरूण रात्री बेरात्री एकटाच हिंडत असतो म्हणे..
  • Log in or register to post comments

तू अवतीर्ण कसा झाला नाहीस

प्रियाली
Mon, 09/26/2011 - 22:02 नवीन
तू अवतीर्ण कसा झाला नाहीस याचीच काळजी लागली होती. आलास भूत पावले! आता पुढली कथा ऐक. आमच्या नातेवाईकांपैकी एकजण फ्रान्सला असे. तो एका मित्राकडे पार्टीला गेला होता. परतताना रात्र झाली. पेयपान झाले असले तरी साहेब चांगले शुद्धीत होते. रात्री ते गाडीतून आपल्या गावी यायला निघाले. रस्त्यात त्यांना अचानक काहीसं वेगळं वाटायला लागलं. रस्ता हळूहळू अरुंद होतो आहे असे वाटायला लागलं. दिवसा ते याच रस्त्यावरून मित्राकडे गेले होते आणि रस्ता व्यवस्थित होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चांगली वाढलेली झुडपं होती. ती हळूहळू गाडीच्या जवळ यायला लागली. इतकी जवळ की गाडीलाच खेटली आहेत. तेव्हा यांना काहीतरी वेगळं आहे असा भास झाला. त्यांनी गाडीचा स्पीड वाढवला तसा रस्ता आणखीच अरुंद व्हायला लागला. आता झुडपं गाडीवर घासायला लागली होती. यांची जाम गाळण उडाली होती. पण ते गाडी हाकत राहिले. अचानक एके ठिकाणी त्यांना जाणवलं की ते अपेक्षित वळणं, रस्ते न ओलांडता अचानक स्वतःच्या एरियात पोहोचले आहेत. त्यांनी सरळ घरात धाव घेतली. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना रात्री झालेल्या प्रकारावर विश्वास बसेना. पण त्यांनी बाहेर जाऊन गाडी पाहिली तर तिच्यावर चर्रे उमटले होते. मग मित्राला फोन लावला आणि झालेला प्रकार सांगितला. मित्राने शांतपणे उत्तर दिले,"अरे! असे पूर्वीही काही लोकांना अनुभव आले आहेत." हा होता चकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

तळेकांटे गावच्या लोकांना

अनामिक
Wed, 09/28/2011 - 19:20 नवीन
तळेकांटे गावच्या लोकांना सकाळी घाटपायथ्याशी वडावर आपटलेली एक रिक्षा दिसली नि त्यात दोन प्रेतं सापडली. प्रेतं? मग झाला प्रकार गावकर्‍यांना कुणी सांगीतला? त्या मेलेल्या तरूणाच्या भूतानं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

सोप्पय

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/30/2011 - 06:56 नवीन
सोप्पय! रत्नांग्री टाईम्सनं. (हिरवी हडळ) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

डरना मना है

प्रियाली
Fri, 09/30/2011 - 14:30 नवीन
अशा गोष्टी कोणी सांगितल्या असं अजिबात विचारायचं नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

अजुन माझ्यावर एकही कमेंट कशी

प्रीत-मोहर
Mon, 09/26/2011 - 22:08 नवीन
अजुन माझ्यावर एकही कमेंट कशी काय नाही? हा माझा घोर अपमान आहे... (पुण्यातली मानाची पहिली हडळ) प्रीमो
  • Log in or register to post comments

सन्मान

श्रावण मोडक
Mon, 09/26/2011 - 22:26 नवीन
आज सर्वात आधी आठवण झाली ती पणजी आणि पर्वरीतल्या २ फेमस भुतांची. (इथे मिपाकरांनी पैसा आणि प्रीतमोहर यांची आठवण काढू नये.)
इति पैसा. तुला वाचता येत नाही, म्हणून दिलं इथं. पैसानं हा सन्मान केला तेव्हा तू बहुदा इकडं-तिकडं वटवटत फिरत असावीस. माणसाच्या जन्मातही असंच केलंस. तो ब्रह्मदेव अक्कल वाटत होता तेव्हाही बोंबलत फिरत बसलीस. आताही तेच. जित्याच्या खोडी... असं उगाचच म्हणतात हे सिद्ध केलंस. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

श्रामोअण्णा.. पैसा मावशी तशी

प्रीत-मोहर
Tue, 09/27/2011 - 10:20 नवीन
श्रामोअण्णा.. पैसा मावशी तशी माका विसराची नाय ह्या माका ठाउकच होता. माझ्या डोळ्यावर काकडीची कापा असलेल्यान तो प्रतिसाद माका दिसाक नाय तर तुमी तेचो एवढो मोठो पर्वत केलो? अता पैसाताय आनी मी एकाच जमातीत असल्या कारणान आमी समजान घेतो म्हणान सांगा.. आगलावे खयच्याकडले.. आणि माका टोमणे मारुची, घालुन्-पाडुन बोलुची एक्कय संधी सोडशात तर श्रामोवेताळ पुणेकर कस्ले तुमी? हेच्यासाठी वेगळां बिल वसुल करतलंय .. बिल मगे व्यनि करतंय ... फुडल्या फाउटी मी तुमच्ज्याफ्य्ड्यात टपाकलंय की बिल देवची तयारी ठेवा.. क्काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ही सुध्दा फेमस गोष्ट आहे

जाई.
Mon, 09/26/2011 - 22:32 नवीन
ही सुध्दा फेमस गोष्ट आहे मुंबैतील. एका शेअर रिक्षात एक स्री आणि दोन पुरुष बसले. ईच्छित स्थळी पोचल्यावर त्या स्रीने प्रथम पैसे दिले सुटे पैसे देताना पैसे रिक्षावाल्याच्या पायापाशी पडले. तो ते उचलायला गेल्यावर त्याला त्या स्रीचे पाय उलटे असल्याचे दिसले. वर बघेस्तोवर ती बाई गायब झाली. दोघा प्रवाशांना हे सांगितल्यावर त्यांनी मान उडवली आणि म्हटल की "त्यात काय एवढ आमचे पण पाय उलटे आहेत की हे बघ". ते बघताच तो रिक्षावाला कार्डियक अरेस्टने मृत्यू पावला.
  • Log in or register to post comments

@---भूत कसे बनते? भूत

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/27/2011 - 01:01 नवीन
@---भूत कसे बनते? भूत बनविण्याची पाक-क्रुती:- साहीत्य- एक जोडी धार्मिक वातावरणात वाढलेले-पती/पत्नी, त्यांचं तसच १ श्रद्धाळू अपत्य (वय तीन वर्षापेक्षा जास्त नसावं, नाहीतर रेसीपी संपंन्न होण्यात काही बुद्धीवादी तसेच विवेकी अडचणी येतात), रहाण्यासाठी कोणत्याही देश/प्रदेशातले एक घर, आणी जगातला कुठलाही देश( देश जितका धार्मिक असेल,तितकी पाक-क्रुती दमदार व जोमदार होते) क्रुती--- प्रथम भारता सारखा १ धर्म:श्रद्ध देश घ्यावा, तो परंपरेनी लडबडीत होइपर्यंत भारुन/माखुन घ्यावा,मग त्यात एका सुशिक्षीत,उच्चविद्याविभुषीत कींवा अशिक्षीत कींवा कश्याही...थोडक्यात ---धार्मिक असलेल्या पती/पत्नींना आणून सोडावे. त्यांना त्यांच्या या अपत्यास शक्यतोवर यथेच्छ धार्मिक संस्कार करण्यास सांगावे, मुल जर का निबर मिळालेलं असेल तर, मधुन मधुन त्याच्यावर 'ऐकत नाहीस आई बाबांचं?...थांब तुला भूत्याकडे देते' असे मंत्र मारावे,यानी पोर चांगलं मऊ पडत,आणी रेसीपी योग्य वळणावर पोहोचते...पोर फारच निबर असेल आणी धर्मश्रद्धेच्या रश्यात बुडत नसेल तर,वरतून एक जाड छडी घेऊन त्याला ''फार अक्कल वाढलीये तुझी,म्हणे आत्मा कुठ्रे असतो?'' असं वरुन खोबरं पेरत खाली टेंबाव...मग त्याला एक श्रद्धेची उकळी येऊ द्यावी... आणी जगात फिरण्यासाठी डीशमधे काढावं... इथे मुलाच्या डोक्यातलं भूत निम्म तयार होतं.. मग हा मुलगा थोडं जरी काही झालं तरी एकदम फॉर्मात येऊन घाबरेल..'माझ्यावर भूत बसलय' अश्या कथा सांगुन शाळेला दांड्या मारेल... झालं... इथुन पुढे त्याच्यावर श्रद्धेचं झाकण टाकून त्याला निवत ठेवलं की त्याच्यातलं भूत तय्यार ... टीप-स्वतःला आणी नंतर इतरांना फसविण्यासाठी... हे भूत अगदी हुकमी एक्यासारखं तयार राहातं, त्याला नासण्या,अंबण्या विटण्याचं भय फक्त जागरुक प्रशासन,सुशिक्षीत समाजमन या पासूनच असतं ... तेंव्हा ही पाक-क्रुती एकदा तयार का झाली,की सहसा हज्जारो वर्ष खराब होत नाही,अगदी बिनधोक टिकते...
  • Log in or register to post comments

+१

इंटरनेटस्नेही
Tue, 09/27/2011 - 02:31 नवीन
पराग दिवेकरजी यांच्याशी सहमत. भूत हे मानण्यार्‍याच्या मनात असतं.. मी तर कोकणातला (मालवण/कट्टा) असुन सुद्धा भुतांच्या कथा केवळ ऐकल्या आहेत. गावची आजी.. आजोबा यांनी लहानपणी मी गावी जात असे तेव्हा मी टळटळत्या दुपारी घराबहेर जाऊन दंगा करु नये / रात्री लवकर झोपावे / जेवण (विशेषतः न आवडण्यार्‍या भाज्या गपचुप गिळ्याव्यात) यासाठी काही भुतांच्या गोष्टी सांगुन पाहिल्या. मात्र मी त्यांना क्रॉस एक्झामिन केल्यावर, सत्य बाहेर पडत असे की, त्यांनी देखील कधी ही भुतं प्रत्यक्षात पाहिलेली नाहीत; त्यांनाही या आधीच्या पिढीतील मंडळींनी सांगितलेल्या गोष्टी आहेत या. मला भुतांचा कधीच अनुभव नाही आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मला भुतांचा कधीच अनुभव नाही

वपाडाव
Fri, 09/30/2011 - 10:17 नवीन
मला भुतांचा कधीच अनुभव नाही आला.
पन तु जन्माला आल्यावर हा अनुभव तुझ्या घरच्या मंडळीना आला असेलच अशी खात्री आहे.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

तुमच्या या वाक्यावरुन,

सूड
Fri, 09/30/2011 - 19:25 नवीन
वपाडाव तुमच्या या वाक्यावरुन भूतांनी तुमच्या घरासमोर धरणं का धरु नये ?? हे विधान भूतांचा अपमान करणारं आहे. उद्या खळ्ळ फट्याक झाल्यास जबाबदारी तुमची राहील हे लक्षात घ्या. :D स्वाक्षरीतलं वाक्य खरोखरीच म्हणावं लागेल, बघा ब्वॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

हे विधान

प्रियाली
Fri, 09/30/2011 - 19:41 नवीन
हे विधान भूतांचा अपमान करणारं आहे.
वपाडाव यांचे विधान नक्की कोणाचा अपमान करणारे नाही असे तुम्हाला वाटते? (काही उदा. माणसांचा, प्राण्यांचा, भुतांचा वगैरे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तेही खरंच म्हणा !!

सूड
Sat, 10/01/2011 - 08:39 नवीन
तेही खरंच म्हणा !! भूतांचा उल्लेख आला म्हणून मी बोल्लो. बाकी माणूस, प्राणी वैगरेंना प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तसं सांगावं ब्वॉ काय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

प्रथम भारता सारखा १

मृत्युन्जय
Tue, 09/27/2011 - 10:39 नवीन
प्रथम भारता सारखा १ धर्म:श्रद्ध देश घ्यावा, तो परंपरेनी लडबडीत होइपर्यंत भारुन/माखुन घ्यावा काही लोकांना स्वत:ला उपेक्षेने मारायची सवय असते. मी भारी, माझा देशा भारी, संस्कृती तर लै भारी आणी बाकी सगळे छाटछूट या वेडाने पछाडलेले काही लोक असतात आणि न्यूनगंडाने पछाडलेले पण काही लोक असतात की ज्यांना आपण, आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती सतत दुय्यम, खालच्या दर्जाची, अडाणी लोकांनी भरलेली वाटत असते. पहिल्या दोषाने ग्रासलेले लोक तरीदेखील परवडले पण हे दुसर्‍या प्रकारातले लोक इतके नैराश्याने ग्रासलेले असतात की अगदी नकोसे होते. याच धाग्यावर निम्म्या कथा परदेशातल्या दिसतील. एवढ्या प्रसिद्ध की विकीवर त्याची नोंद व्हावी. अंधश्रद्धेच्या बाबतीत भारतातील लोक ग्रासलेले असतील तर जगभरातले लोक अगदी स्वर्गभूमी अमेरिकेतले लोकदेखील अंधश्रद्धेने ग्रासलेले आढळतील. १३ तारखेबद्दल एवढे असंख्य गैरसमज आढळतील की त्या विषयावर पी एच डी करता येइल. फारेनातल्या ९९% हाटेलांमध्ये १३ नंबरचा मजला आढळणार नाही. त्याच बड्या हॉटेल चेन्स ने भारतात देखील ही प्रथा रुजवली. घरात कुर्‍हाड ठेवु नये, १३ तारखेला मोठी खरेदी करु नये, टचवूड, गळाला लागलेला पहिला मासा फेकुन देणे असली हजार उदाहरणे फारिनर्स बद्दल देता येतील. भारतात पण याच प्रकारातली उदाहरणे सापडतील. थोडक्यात सांगायचे तर अंधश्रद्धाना देश आणि धर्माचे वावडे नसते. सगळ्याच देशांत, सगळ्याच धर्मात अंधश्रद्धा सापडतात. त्या दूर करणे इष्टच पण केवळ स्वकीयच अंधश्रद्ध आहेत असा फुकाचा समज करुन घेणे कधीही अयोग्यच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आणि न्यूनगंडाने पछाडलेले पण

मराठी_माणूस
Tue, 09/27/2011 - 10:56 नवीन
आणि न्यूनगंडाने पछाडलेले पण काही लोक असतात की ज्यांना आपण, आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती सतत दुय्यम, खालच्या दर्जाची, अडाणी लोकांनी भरलेली वाटत असते. पहिल्या दोषाने ग्रासलेले लोक तरीदेखील परवडले पण हे दुसर्‍या प्रकारातले लोक इतके नैराश्याने ग्रासलेले असतात की अगदी नकोसे होते. अगदी बरोबर. (अवांतर: एक बरे की ते लोक शक्यतो (येन केन प्रकारेन) हरीत पत्रे मिळवुन तिकडेच (लांब, ) रहातात. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मृत्युन्जय भौ ... आंम्ही भारतराष्ट्र-वादी आहोत........

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/27/2011 - 18:22 नवीन
आणि न्यूनगंडाने पछाडलेले पण काही लोक असतात की ज्यांना आपण, आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती सतत दुय्यम, खालच्या दर्जाची, अडाणी लोकांनी भरलेली वाटत असते. पहिल्या दोषाने ग्रासलेले लोक तरीदेखील परवडले पण हे दुसर्‍या प्रकारातले लोक इतके नैराश्याने ग्रासलेले असतात की अगदी नकोसे होते. गैरसमज...गैरसमज...गैरसमज ...मृत्युन्जय भौ ... आंम्ही भारतराष्ट्र-वादी आहोत... त्यामुळे आंम्हाला आमच्या देशाची चिंता पहिली आहे...''सगळ्या जगातल्याच अंधःश्रद्धा काढत बसा,,,मग त्यातच भारताच्याही निघुन जातील'' अश्या स्वरुपाचं तुंम्ही मनाशी मांडलेलं फसवं ग्रुहीतक आंम्हाला अजिबात उपयोगी पडणारं नाही... शिवाय प्रत्येक भारतीय नागरीकाला विज्ञाननिष्ठ द्रुष्टीकोन बाळंगणं हे भारतीय घटनेनी दिलेलं कर्तव्य आहे... ते आपण समाजमनात वावरत असताना तर पहिल्यांदा बाजावायला हवं ना..? मग पहिल्यांदा केला आपल्याच घराच्या सफाइचा प्रयत्न तर त्यात न्यून-गंड येण्यासारखं काय आहे बर? शेजाय्रांच्या घरातला कचरा काढण्याचं व्रत मिळण्यासाठी,मला माझ्या घराच्या सफाइचा कार्यक्रम पहिल्यांदा हाती घ्यायला हवा ना? नाहीतर जागाचा काढायला जातो कचरा,आणी माझ्याच उंबरठ्यात पाचोरा... असं व्हायच नै का?... आणी आंम्ही हे असं लिहितो हा नैराश्याचा आजार वगैरे नसुन ''वस्तुस्थितीची खडखडीत जाणीव'' आहे...हे समजुन घ्या... या उप्परही तुमच म्हणण ''फक्त भारतालाच टार्गेट करायचं नाही'' असं असेल..तर तुमचा माझा रस्ता वेगळा आहे,इतकच मी म्हणेन... पुढील प्रवासासाठी तुंम्हाला शुभेच्छा... अलविदा... अवांतर-@-आणि न्यूनगंडाने पछाडलेले पण काही लोक असतात की ज्यांना आपण, आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती सतत दुय्यम, खालच्या दर्जाची, अडाणी लोकांनी भरलेली वाटत असते... या वाक्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही... जे लोक स्वतःच्याच जगात जगतात,त्यांना भारतात रहायला यायची सवड कशी काय होणार?...मला न्यूनगंड आहे की नाही ते नंतर पहाता येइल, पण आपण जी भारतीय जनमानस आधुनीक मनाचं झाल्याची पडद्या आडुन तरफदारी करताय ती पाहुन आपल्याला संस्क्रुतीचा अतिगंड आहे असं मला निश्चित पणानी वाटतं,,,आणी हल्ली तर अंधारयुगाचा उदोउदो करणाय्रा निरनिराळ्या धार्मिक संस्था/संघटना निघालेल्या असताना... या सद्यःकालीन परिस्थितीकडे संपूर्ण डोळेझाक करुन जगणं आंम्हाला तरी शक्य नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मला आपल्या संस्कृतीचे ढोलही

मृत्युन्जय
Wed, 09/28/2011 - 11:52 नवीन
मला आपल्या संस्कृतीचे ढोलही बडवायला आवडत नाही आणि तिच्या नावाने गळेदेखील काढायला आवडत नाहीत. इतर कुठल्याही देशाप्रमाणे भारतात आणि भारतीय संस्कृतीत काही कमतरता असतील. त्या दूरही केल्या पाहिजेत पण प्रत्येकवेळेस त्याबद्दल गळे काढण्यात मला इंटरेस्ट नाही. माझा देश जगात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी मी माझ्यापरीने योगदान देत राहिल. "भारतासारखा देश" असा हेटाळणीपुर्वक उल्लेख करण्यापेक्षा जास्त चांगले काम आपल्याला नक्कीच करता येइल याची मला जाणीव आहे. आता हा अतिगंड असेल तर मला त्याचा अभिमान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आता हा अतिगंड असेल तर मला

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/28/2011 - 16:36 नवीन
आता हा अतिगंड असेल तर मला त्याचा अभिमान आहे. आपल्या अभिमानास आमच्या शुभेच्छा... राम राम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

(No subject)

पुष्करिणी
Tue, 09/27/2011 - 01:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

एक तर बरेच दिवसांनी दिसतियेस

रेवती
Tue, 09/27/2011 - 01:34 नवीन
एक तर बरेच दिवसांनी दिसतियेस मिपावर्....तीही या वेषात/रुपात! नक्की काय समजायचं आम्ही!;) की दिसतियेस यावरच समाधान मानायचं?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

अ‍ॅलर्जी का?

Nile
Tue, 09/27/2011 - 01:43 नवीन
अ‍ॅलर्जी चांगलीच मानवलीए हो पुष्करिणी काकू! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

दॄष्ट लावायच काम नाही

पुष्करिणी
Tue, 09/27/2011 - 01:47 नवीन
दॄष्ट लावायच काम नाही नायल्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

भुताखेताचा धागा आवडला. सर्व

मोहनराव
Tue, 09/27/2011 - 15:12 नवीन
भुताखेताचा धागा आवडला. सर्व भुतखेतमंड्ळीना या नवीन भुताचा प्रणाम!! आमचे काही अनुभव (ऐकलेले) १) आमच्या गावाकडे अश्या भरपुर कथा एकायला मिळतात. गावाकड्चा ओढा, पड्की विहीर, मळा हि भुतांची रहायची आवडीची ठिकाणे. माझा दादा एकदा पावसाळ्यात त्याच्या मित्रांसोबत रात्री शेतांमधे खेकडे पकडायला गेला होता आणी त्यांच्याबरोबर तो चकवा का काय तो प्रकार घडला. रात्रभर ही मंडळी घरी न आल्याने काही घरातले लोक शोधायला म्हणुन बाहेर पड्ले. प्रत्येकजण कुठेतरी मुर्छीत होउन पड्ला होता. पायातल्या चपला इकडेतीकडे पडुन हरवल्या होत्या. त्यांना रात्री काय घडले ते काहीच आठवत नव्हते. पड्की विहीरीच्या तर खुप कथा आहेत. २) माझे आजोबा ट्रक ड्रायवर होते. रात्री एकदा ट्रक चालवत असताना त्यांना एक उंचापुरा म्हातारा लिफ्ट मागताना दिसला. त्यांनी गाडी थांबवली नाही. थोड्या वेळाने बघतात तर काय.... तो म्हातारा गाडीच्या वेगाने धावत येत होता. वेग वाढवला तरीही तो गाडीच्या बरोबर पळ्त होता. दुसर्या दिवशी गावात विचारले असता कळाले कि काही वर्षापुर्वी तिथे एका म्हातार्याचा ट्रकखाली येउन मोठा अपघात झाला होता. अजुन आठवेल तशी भर घालुच!!! :)
  • Log in or register to post comments

नाईट आउट

नितिन थत्ते
Tue, 09/27/2011 - 15:49 नवीन
>>रात्रभर ही मंडळी घरी न आल्याने काही घरातले लोक शोधायला म्हणुन बाहेर पड्ले. प्रत्येकजण कुठेतरी मुर्छीत होउन पड्ला होता. पायातल्या चपला इकडेतीकडे पडुन हरवल्या होत्या. त्यांना रात्री काय घडले ते काहीच आठवत नव्हते. आमच्या ओळखीतल्या काही 'तारुण्यात पदार्पण केलेल्या' मुलांबद्दल अशा कथा ऐकू येत तेव्हा आमचे वडील अर्थपूर्ण हसत असत असे आठवते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

ओह्ह

परिकथेतील राजकुमार
Tue, 09/27/2011 - 15:53 नवीन
थत्ते चांचाच्या तारुण्य पदार्पणाच्यावेळी घडलेली कथा वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा