मिसळपाववरील कवितांची रसग्रहणं # माझं हे सारं सामान गं सखू...
घासू गुरुजींनी सुरु केलेल्या कविता रसग्रहणाच्या उपक्रमाने प्रभावीत होवून आपणही तिथे एखाद फुल सोडाव असं बरेच दिवस वाटत होत, पण योग्य फुल गवसत नव्हत, इतक्यात मिपाचे ताज्या दमाचे, नव्या रक्ताचे तरुण ताठर कवी श्री धनाजीराव वाकडे यांची माझं हे सारं सामान गं सखू... ही कविता वाचनात आली आणी योग्य फुलं गवसल्याचा आनंद झाला.
खरतर ही कविता इतकी रसरशीत आहे, की मधमाशीच्या मकरंद गोळा करण्याच्या कौशल्याऐवजी लहान व्रात्य मुलाच्या बर्फगोल्यातून रस ओढायच्या कौशल्याचीच येथे गरज पडावी.. कवितेतील रस कुठे अर्थाच्या आड, आत लपलेला नसून थेट वाचकाच्या चेहरयावर स्मित उसळवतो व योग्य ठिकाणी गुदगुल्या करत वाचकाला काव्यानुभावाच्या एका वेगळ्याच उंचीवर नेतो. मुख्य म्हणजे या कवितेत वेगळं काहीतरी सांगण्याचा, वेगळ्या प्रकारचा प्रयत्न अजिबात नाही.. जे आहे ते असं आहे.. जसं घडल तसं सांगितलं.. तिच्यात एक उत्तम कविता होण्याची उघड क्षमता आहे. ही कविता निश्चितच छान असली तरी मला उत्तम किंवा उत्कृष्ट वाटली नाही. पण माझी उत्कृष्ट कवितांचा मानदंड म्हणजे "दादांची गाणी" व "तुकयाची वाणी" वगैरे असल्यामुळे त्यात काही विशेष नाही.
कवितेच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे ही कविता कवीचे सामान व सखुची पिशवी यांच्याविषयी आहे. व सामानाच्या असलेल्या पिशवीच्या संबंधाविषयी आहे. आता सामान कस आणी पिशवी कोणती? असा प्रश्न उपस्थित होणं सहाजिकच आहे. कवीने फक्त मोघम उल्लेख करून नक्की काय याचा निर्णय वाचकावर सोडलेला आहे. त्यामुळे रूपकांना एक लवचिकता येते. हे या कवितेचं एक मोठं शक्तीस्थान आहे.
"बाजाराला निघालो मी घाई घाई, पिशवीची आठवण राहीलीच नाही
सामान माझं सारं आहे थोडं खाली, तू जराशी वाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?"
इथे बाजार या शब्दाला व्यापक अर्थ आहे हे जाणवल्यावाचून रहात नाही. इथल सामान म्हणजे काही फक्त वस्तू नव्हे तर मानवी भावनांच्या असोशिशी, तरुण मनाच्या भावनांशी एकरूप होणारे काहीतरी आहे हे वाचकाला पहिल्या झटक्यातच कळते, बर सामान खूप सारं आहे, आणी ते खूप असल्याने हातातून खाली सरकलंय, त्याला सामावून घ्यायला पिशवी हवी पण पिशवी मात्र कवी घरीच विसरलाय.. आता घरी विसरलाय हा झाला बहाणा.. खरतर कवीकडे पिशवीच नाही, बर हक्काची पिशवी विकत घ्यावी तर ती अंगावर पडते, व काही दिवसात तिचे गोणपाट होते. त्यामुळे कवीने एक शक्कल काढलीय, कवी बाजाराला जातो, आणी एखादी सखू हेरून तिची पिशवी वापरू पाहतो. त्यातही झालय असं की सामान खाली असल्याने व कवीची उंची बहुदा कमी पडत असल्याने सखुला खाली वाकायची गळ कवी घालतोय.... जड झालेले सामान, कवीची व सखुची उंची, बाजाराचा परिसर.. सगळा प्रसंग अवघ्या एका ओळीत डोळ्यासमोर उभे करायचे कवीचे कसब येथे जाणवते. त्यापुढे कवी वेळ वाया न घालवता सरळ मागणी करतो, कि सामान पिशवीत टाकशील काय?
पुढच्या कडव्यात कवी म्हणतो..
"तालुक्याच्या बाजाराला लागलाय सेल, केली खरेदी मी बराच वेळ
माझं सामान झालंय बरंच मोठं, पिशवी जराशी फाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?"
इथे कवीची "हाव" ही मानवी भावना दिसते.. कवीकडे बहुदा अनलिमिटेड नेट अक्सेस असावा. त्यावर कवीने बराच वेळ शोधाशोध करून बाजारातल्या वस्तू पाहिल्या असाव्यात. काही विकत घेतल्याही असाव्यात. हे सगळ करताना आपल्याकडे पिशवी नाही हे खरतर कवीला ठावूक होत , पण कवी हा मोह टाळू शकला नाही. त्यामुळे या बाजारू गोष्टींनी कवीचे सामान मोठेच होत गेले. खरतर हे सामान हाताने मेनेज करता येते, पण कवीच्या कोणा धनाजी नावाच्या मित्राने कवीला काही आयुर्वेदिक सल्ला दिला असावा.. त्यामुळे कवी आपले सामान फक्त पिशवीतच ठेवू इच्छितो. आता सामान मोठ झाल्याने पिशवी फाकावी लागणार हे आलंच, अन तीच विनंती कवी सखुला करतोय.. खरतर या विनंतीवर सखुची प्रतिक्रिया काय असेल त्याचा अंदाज येत नाही कारण सामान मोठ आहे हे कवीने आपल्या दृष्टीने केलेले मूल्यमापन आहे. पण सखुला कदाचित त्यात फार काही वाटणार नाही.. खासकरून जर सखुला बाजाराची सवय असेल तर ती कवीच्या मागणीवर मनातूनच हसेल पण तरीही कवीच्या मानसिक सामाधानासाठी सखू कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. कवितेत थोडक्या शब्दात बराच काही सांगायचा गुण इथे जाणवतो.
"वाण सामान आणि ताजा भाजीपाला, मासोळीचाही मी बाजारहाट केला
ताजा, कडक बोंबील माझा, तुझ्या पापलेटनी झाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?"
इथे कवी विश्लेशानिक झालाय.. त्याच्या प्रतिभेला खरा बहार येतो तो इथे.. आपल्याकडे बोंबील आहे हे सांगण्यासाठी कवी बाकी चार गोष्टींचा फाफटपसारा मांडतोय. कवीने घेतलेले थोडेसे काव्यात्म स्वातंत्र्याही येथे जाणवते, म्हणजे, ताजा बोंबील कडक नसतो हे काय कवीला माहीत नाही काय, पण कवीने स्वातंत्र्य घेत बोम्बलाला एकाच वेळी रसरशीत आणी कडक केलंय, त्याच कारणही लगेचच्या ओळीत कळते, पापलेट .. होय पापलेट.. सखूच्या पिशवीतल्या पापालेताचा मोह कवीला पडलाय.. कमीतकमी आपल्याला नाहीतर आपल्या बोम्बलाला तरी सखूने पापालेटाने झाकावे अशी इच्छा कवी व्यक्त करतोय. कदाचित ताज्या बोम्बलाचा रसरशीतपणा बाहेरच्या काहिलीत कमी होवू नये अशीही कवीची इच्छा असावी.
"सांगत असतो धन्या तो मला, पिशवी नेत जा रे नेहमी बाजाराला
वापरू नये कधी हात सामानाला, आतापुरतं तू झाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?"
वरती उल्लेख केलेला कवीचा आयुर्वेदिक मित्र धन्या याचा कवीने इथे उल्लेख केलाय.. आता हा धन्या खरच आहे की हाताला त्रास न देता पिशवी वापरण्याचा हा बहाणा आहे यावर कवितेत काही माहिती नाही.. वाचकांनी स्वता:च काय तो अंदाज बांधावा. पण कवीचा आर्जवी स्वभाव इथे परत दिसतो, कवी पिशवी नसल्याबद्दल हळ्हळ व्यक्त करून सखुची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतो , तसंच, ही तात्पुरती सोय असून सखूने ते सामान आपलंच समजू नये हेही आडून आडून सुचवू पाहतो. त्यासाठी नसलेल्या पिशवीची ग्वाही देतो.. कवीचा बेरकेपणा इथे अधोरेखित होतो..
येथे या रूपकाचं उघड वर्णन न करण्याचा फायदा जाणवतो. (मात्र म्हणूनच मधल्या ओळीतला हात हा शब्द सामानाला जोडून येत असल्यामुळे ही लवचिकता कमी होते असं मला वाटलं)
मला वाटलं ते मी लिहिलं. वाचकांनी आपल्याला वेगळा अर्थ जाणवला असला तर सांगावं. काही सौंदर्यस्थळं निसटून गेली असतील तर त्यांचा उल्लेख करावा. कवितेत किंवा रसग्रहणात काही त्रुटी असतील तर त्यावर टिप्पणी करावी. कवीने आपली भूमिका मांडावी. आपण सगळेच यातून काही शिकू..
क ह र =)) =)) =)) =)) =)) साफ
निवांत वाचतो.. जागा
क ड क
जबराट परिक्षण...काल कविता
=)) =)) =)) =)) कडक!!!
जंक्शन!
फुटलो...
प्र.का.टा.आ.
@--- फुटलो... --- क्काय
क्काय धनाजीराव..बसला की नाय
@-लिहिताना कुठे थांबायचं हे
आंम्हीतर मोकळे रिते होउन
@-भटजीबुवा, आहाला माहिती आहे
वा वा वा
है शाबास!
नाईलराव, तुम्हीही कधीतरी
लवकरच...
आँ
गुर्जी आपल्या सामानातून
फुटलो.. खपलो... !!
गुर्जी व ध वा यांचा कच्चा माल
आयुर्वेदिक मित्र धन्या
या आयुर्वेदीक धन्याला, आधुनीक
सुरूवात अतिदवणीय झाली
अशा द्विअर्थी संवाद असणार्या
"द्विअर्थी " व "गावठी" या
कवितेचा अर्थ शोधु नये असे
शिल्पातै, फक्त "अशा द्विअर्थी
गुर्जींनी काही शब्द तेच
शिल्पा काकूला वेगवेगळ्या
"गुर्जींनी काही शब्द तेच
प्रत्येक भाषेत तेच ते शब्द
माझ मत असं आहे की कवितेला
ते सारं ठीक आहे हो...
मी कवितेत ज्या प्रकारे शब्द
"मला येत नाही नैतर मीच लिहिलं
कवितेत ज्या प्रकारे शब्द
गुरुदेव आणि गाववाले
आम्हाला जे अर्थ लागले त्याने
आम्हाला जे अर्थ लागले त्याने
छे छे छे.. कवीने असे चिडणे
लोकांना नीट अर्थ लागत नसेल तर
अशाने त्याचे मन कठोर होते आनी
बुडा$$$ली, बुडा$$$ली,
असहमत.
तुम्ही म्हनताय, हे साधं सरळ
"द्विअर्थी आहे तर आहे.
द्विअर्थी
कसं आहे, की, काळ वेळ बघुन
बाळ रडत असताना असे विनोद