तुम्हां सगळ्यांच्या प्रतिक्रिया छान आहेत.
मी बर्याच आधी मनोगत आणि मायबोली वर फक्त वाचक ह्या भुमिकेत बरेच दिवस रमलो. मराठी लेख, कविता, विडंबनं वाचून मजा यायची. बर्याचदा वाटायचं की आपणही काहीतरी लिहावं. पण काही सुचतच नव्हतं. एका मित्राने मिपावर सभासद हो असे सुचवले. तो म्हणाला की हे संकेतस्थळ इतर संकेतस्थळांपेक्षा active आहे. मी जेव्हा मिपाला भेट दिली तेव्हा मला खरोखरच ते आवडलं. मी सभासद होऊन मिपावर माझं पहिलं लिखाण प्रकाशित केलं आणि त्याला सर्व सभासदांचे छान प्रतिसाद मिळाले. नंतर मनोगत व मायबोलीवर देखील ते प्रकाशित केलं. मनोगतवरचा अनुभवदेखील सुखद होता. मायबोलीवर मात्र मला थोडसं वेगळं चित्र दिसलं. तिथल्या काही सभासदांनी लेखावर अभिप्राय देण्याऐवजी हा लेख कथा कसा काय होऊ शकतो? स्वतःचा अनुभव कथा म्हणून छापलेला दिसतोय, वगैरे वगैरे... अशा प्रतिक्रिया दिल्या. अर्थात तिथेही काही चांगले प्रतिसाद मिळाले... नाही असं नाही. पण काही सभासदांचा हेतू मात्र जाणूनबुजून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वाटला.
असो. मिपावर मला निश्चितच समाधान लाभते.
http://sucheltas.blogspot.com
३ दिवसा नन्तर आज मिपा ला लॉग इन झालो....
इथला आक्खा काथ्याकूट वाचुन झाला ....
एक शब्द डोक्यात शिरला नाही....
माफ करा नेमका लोच्या काय हाये?
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
प्रतिक्रिया
तुम्हां
३ दिवसा