Skip to main content

साजूक तूप - अर्थ

लेखक लई भारी यांनी सोमवार, 19/09/2011 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस हा प्रश्न डोक्यात होता. विचारावा की नाही हा संभ्रम होता कारण कदाचित खूपच बाळबोध वाटेल :) असो. 'साजूक तूप' असा शब्द आपण वापरतो. त्याचा नक्की अर्थ काय? माझ्या माहितीनुसार घरी लोणी कढवून तयार केलेल्या तुपाला साजूक म्हणतात. मग ह्याच्या पेक्षा वेगळा काही तुपाचा प्रकार आहे का? 'रवाळ' हे मला वाटते कणीदार तूपाचे विशेषण आहे, जे उत्तम तूप बनल्याची पावती असावी बहुधा. :) त्याचा साजूकशी काही संबंध आहे का?

वाचने 17421
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

"मग ह्याच्या पेक्षा वेगळा काही तुपाचा प्रकार आहे का?" उत्तर : वनस्पती तुप! (हे तुप साजुक तुपा पेक्षा स्वस्तं असतं, पण अरोग्याला अपायकारक. भारतात बरेच लोक ह्या तुपाचा वापर करतात (माझ्या माहिती प्रमाणे महाराष्ट्रात जास्तच वापर होतो). साजुक तुप परवड्त नसल्यास वा साजुक तुपात भेसळ करायची असल्यास ह्या तुपाचा वापर हमखास केला जातो). वनस्पती तुप कसं बनतं ह्याच्या अधिक माहितीसाठी : http://www.mecpro.com/vanaspati-ghee-detailed-introduction.html#manufac…

साजुक तुप म्हनजे ताजे,नुकतेच बनवलेले तुप. माझ्या घरी एक मराठि शब्द कोश आहे,त्यात वाचले होते...

In reply to by झुळूक

होय शब्दकोशात तसा अर्थ आहे खरा. संस्कृत सद्यस्क वरून आलेलं साजुक म्हणजे ताजं, नुक्तं, अर्थात जे शिळं नाही ते. नाजुक मुलीचं वर्णन अ‍ॅडिशनली 'ती ताज्या फुलासारखी टवटवीतही आहे' असं करायचं होतं असेल म्हणून नाजुक-साजुक असा जोडशब्द वापरला गेला असेल. सुंदर मुलींना पाहून कोणालाही काहीही सुचू शकतं. किंबहुना सुचावंच. लोणकढी बाबत एक गोष्ट ऐकली आहे. पूर्वी फिरते विक्रेते दारावर तूप विकायला आणीत. त्याची भलावण करताना ते किती चांगलं आहे, खान्देशी,बेळगावी किंवा कोइम्बतूरी अशा चांगल्या लोण्यापासूनच कढवलेलं असं खरंखुरं लोणकढंच कसं आहे वगैरे थापा मारत. प्रत्यक्षात ते भेसळीचं असे आणि एखाद्याने त्यांच्या बोलण्याला भुलून ते घेतलंच तर तो नक्की पस्तावे. त्यावरून लोणकढी थाप हा शब्द आला असावा.

साजुक तुप म्हनजे ताजे,नुकतेच बनवलेले तुप. ताज्या, नुकत्याच बनविलेल्या 'वनस्पति तुपास' साजूक तुप म्हणावे काय?

In reply to by प्रभाकर पेठकर

जावईबापू. कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढाल" आठवलं! बरं. मग "ताजे, गाईच्या दुधाच्या लोण्यापासून बनवलेलं तूप" हि व्याख्या चालेल का? BTW, ताजं = नुकतंच बनवलेलं त्यामुळे ती द्विरूक्ती टाळली.

In reply to by अविनाशकुलकर्णी

१. विड्याचे पान का कढवावे? २. विड्याचे पान कढवायची कृती काय? ३. विड्याचे पान कढवल्याने विड्याच्या चवीत काय फरक पडतो? ४. विड्याचे पान नक्की कोणत्या तुपात टाकल्याने तूप रवाळ होते? लोणकढे की वनस्पती तूप?

पूर्वी तूप झाल्यावर ते बरण्यांमध्ये भरून ठेवले जाई. रोज वापराच्या चांदीच्या तपेलीतही काढले जाई. सोन्यासारखा रंग आणि रवाळपणा असलेल्या तुपाला उगीच धसफस करणे, सतत गरम करून गार करणे याने कणी मोडत असे म्हणून नाजूकपणे हाताळावे लागे. त्यावरून नाजूक साजुक असा शब्द आला असेल काय असे वाटले.

In reply to by रेवती

नाजूकपणे हाताळावे लागे. त्यावरून नाजूक साजुक असा शब्द आला असेल काय असे वाटले. मग त्याला नाजूक तूप म्हणाले नसते का