सुप्रसिद्ध छायाचित्रकार कै.गौतम राजाध्यक्ष यांच्या एका चित्रग्रंथ- प्रकाशनाबद्दलच्या या बातमीत खालील मजकूर दिलेला आहे:
....लतादीदींनी राजाध्यक्षांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मला छायाचित्रे काढण्याचा छंद होता. तेव्हा आपल्यासारखी छायाचित्रे कोणास काढता येत नाही, असा माझा समज होता. पण, राजाध्यक्ष यांनी काढलेली छायाचित्रे पाहून माझा चेहरा पडला आणि त्यानंतर पुढे मी छायाचित्रणासाठी कॅमेरा बाहेर काढलाच नाही, असे मनोगत व्यक्त केले ....
लतादीदींचे हे विधान मलातरी फार विस्मयजनक व बुचकळ्यात पाडणारे वाटते.
... आपण सर्वच फोटोग्राफी, चित्रकला, संगीत, कविता, लेखन, इ.इ. काहीतरी छंद जोपासत असतो, परंतु आपल्यापेक्षा श्रेष्ट दर्जाचे काम बघून आपला तो छंद कोणी सोडून देइल, असे वाटत नाही.
...मी स्वतः अनेक वर्षे चित्रे व फोटो काढत आलेलो आहे. उच्च दर्जाची चित्रे व फोटो बघण्यासाठी मी नेहमी आसुसलेला असतो, व असे काही बघायला मिळाले, की माझा उत्साह अनेक पटींनी वाढून मी आणखी जोमाने कामाला लागतो.
लतादीदींच्या गायनातील प्रविण्याबद्दल वादच नाही, फोटोग्राफीपण त्या उत्तम करत असतील, त्यांचेबद्दल पूर्ण आदरभाव असून त्यांच्या या विधानात आणखी काही सुप्त विधाने दडलेली आहेत की काय, असे मला वाटून गेले.
दीदींच्या भक्तांची क्षमा मागून मी ती विधाने खाली मांडतो आहे, इथे माझी भूमिका त्यांचा अवमान करण्याचा नसून मानवी मनातील सुप्त भावनांचा वेध घेणे, असा आहे.
१. मी अमूक एक काम उत्तम करतो असे मला वाटते.
२. माझ्यामते त्या क्षेत्रात मी सर्वश्रेष्ठ आहे.
३. ते काम माझ्यापेक्षाही आणखी कुणी जास्त चांगले केलेले बघून मी अस्वस्थ होतो. आपले सर्वश्रेष्ठ पद डळमळू लागले, असे मला वाटू लागते.
४. या अस्वस्थतेमुळे त्या व्यक्तीला खाली खेचावे, त्याच्या प्रगतीत अडसर घालावा, असे मला वाटू लागते.
५. परंतु असे करणे अनैतिक आहे, असेही मला वाटते. तरीही असे करण्याची माझी सुप्त इच्छा पूर्ण करणे जिथे अशक्य आहे, असे दिसून येते, तिथे मी स्वतःच ते काम करणे सोडून देतो.
६. कारण मी सर्वश्रेष्ठ आहे, हा माझा समज खोटा ठरलेला बघणे मी सहन करू शकत नाही.....
यावर तुमचे काय विचार आहेत, हे जाणून घ्यायचे आहे. कृपया लतादीदींबद्दलच्या माझ्या आदराविषयी संशय बाळगू नये.
हा मुद्दा मानसशास्त्राबद्दलचा आहे.
वाचने
16833
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमच्या कडे पण
पुलंना एकदा काही पत्रकार
In reply to आमच्या कडे पण by कुंदन
हो अगदी. फिडेल कास्ट्रो
In reply to पुलंना एकदा काही पत्रकार by विनीत संखे
मलापण!!
बाडगा जादा कडवा होता
In reply to मलापण!! by Nile
पण, राजाध्यक्ष यांनी काढलेली
खरच दिदींसारखी जाण + समज +
In reply to पण, राजाध्यक्ष यांनी काढलेली by परिकथेतील राजकुमार
डायरीया, वा वा यांनाही हे
In reply to खरच दिदींसारखी जाण + समज + by मृत्युन्जय
परा साहेब का होतकरू लेखकांचा
In reply to पण, राजाध्यक्ष यांनी काढलेली by परिकथेतील राजकुमार