Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on गुरुवार, 09/15/2011 - 02:37
समुद्रमंथनातून १४ रत्ने बाहेर आली. कौस्तुभ मणी, पारीजातक, कामधेनु गाय, अमृत , ध्न्वंतरी, वीष, चंद्र वगैरे वगैरे. पैकी लक्ष्मी ही देवी सुद्धा या १४ रत्नांतच गणली जाते. ती प्रकट झाल्यानंतर तिने विष्णूस वरमाला घालण्याआधी च्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे. कोमला सुलक्षणा शुभा, कमनिय लावण्या चंचला क्षीराब्धीतुनी प्रकटे रमा. पद्महस्ता पद्मसंभवा, क्षीराब्धीतनया चंद्रवदना जिचा अनुज असे चंद्रमा, अवघड होणे ही स्थिरा, वर शोधा अनुरूप तिजला. चंचल चंद्र जिचा भाऊ आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमा, शेवटी विष्णूच्या चरणांशी स्थिर झाली, लीन झाली.

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 09/15/2011 - 02:42

Permalink

छान आहे. एखादे संस्कृत

छान आहे. एखादे संस्कृत सुभाषिताचा मराठी अनुवाद वाचतो आहे अशी अनुभुती आली.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 09/15/2011 - 02:44

In reply to छान आहे. एखादे संस्कृत by पाषाणभेद

Permalink

धन्यवाद पाभे. "पद्महस्ता

धन्यवाद पाभे. "पद्महस्ता पद्मसंभवा, क्षीराब्धीतनया चंद्रवदना" ही विशेषणे लक्ष्मी अष्तोत्तरशतनामावली वगैरे मधून उचलली आहेत :(
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on गुरुवार, 09/15/2011 - 09:11

In reply to छान आहे. एखादे संस्कृत by पाषाणभेद

Permalink

+१

असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 09/15/2011 - 02:44

Permalink

आमचे होजे पल्याडचे काका

आज आमचे होजे पल्याडचे काका असते तर >>ती प्रकट झाल्यानंतर तिने विष्णूस वरमाला घालण्याआधी "लकी बास्टर्ड", असे म्हणाले असते. त्यांच्या आठवणीने ड्वाले पानावले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश१११ on गुरुवार, 09/15/2011 - 02:57

Permalink

शुची ताई - वा ..!!खूपच सुरेख

शुची ताई - वा ..!!खूपच सुरेख निव्वळ ....!! कोमला सुलक्षणा शुभा, कमनिय लावण्या चंचला क्षीराब्धीतुनी प्रकटे रमा. ..
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 09/15/2011 - 05:28

Permalink

सुरेख !

अरे वा शुची ? किती छान लिहिल आहेस. कोमला सुलक्षणा शुभा, कमनिय लावण्या चंचला क्षीराब्धीतुनी प्रकटे रमा. अगदी सह्ज ताल येतो वाचता वाचता. सुंदर ! पद्महस्ता पद्मसंभवा, क्षीराब्धीतनया चंद्रवदना पद्म या शब्दाची द्विरुक्ती सुंदर ! पण क्षीराब्धीतनया नंतर छोटासा पॉज घ्यावासा वाटतोय, अन मग चंद्र्वदना, मला वाटतय लावण्या नंतर पण एक पॉज चालेल जिचा अनुज असे चंद्रमा, अवघड होणे ही स्थिरा, वर शोधा अनुरूप तिजला सुरेख ग ! सुरेख ! चारच ओळी पण सुरेख !
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 09/15/2011 - 05:39

Permalink

चार ओळी आवडल्या. कविता पूर्ण

चार ओळी आवडल्या. कविता पूर्ण केली असतीत तर छान झाली असती.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 09/15/2011 - 15:18

Permalink

रचनेचा प्रयत्न बराच चांगला

रचनेचा प्रयत्न बराच चांगला आहे,,,पण हीचे व्रुत्त काय समजावे,की अनाव्रुत्त समजावे...पण अनाव्रुत्तही म्हणता येत नाही... :-( राहुन राहुन काही तरी राहिल्यासारखे वाटते...
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on गुरुवार, 09/15/2011 - 17:18

Permalink

छान

कविता छान आहे. आवडली. स्तोत्रासारखी आहे. मला वृत्त वगैरे कळत नाही, त्यामुळे ही कशी म्हणायचे कळले नाही. हल्ली फ्याशन आहे त्याप्रमाणे कवितेची श्राव्य फाईल (ऑडिओ) टाकू शकशील का?
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 09/15/2011 - 17:47

In reply to छान by चित्रा

Permalink

चित्रा अगं ऑडीओ फाईल कशी

चित्रा अगं ऑडीओ फाईल कशी करायची माहीत नाही. अर्थात ते मी अदिती ला विचारू शकते. पण त्यात नेमका हवाबदलामुळे, घसा बसला आहे :( पण प्रयत्न करते.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 09/15/2011 - 22:30

In reply to चित्रा अगं ऑडीओ फाईल कशी by शुचि

Permalink

पुरूषप्रधान!

ऑडीओ फाईल बनवण्यासाठी, अर्थात रेकॉर्डींगसाठी मी ऑडेसिटी नावाचं सॉफ्टवर वापरते. तुझ्या मोबाईलमधे सोय असल्यास त्यातही रेकॉर्डींग करता येईल. या फाईल्स इ-स्निप्स इ ठिकाणी अपलोड करून इथे दुवा देता येईल. मूळ कवितेबद्दलः इतर १३ रत्न, म्हणजे वस्तूंबरोबर लक्ष्मी आली आणि विष्णूच्या पायाशी बसली ही पुरूषप्रधान कल्पना मला टाकाऊ वाटते. त्यामुळे कवितेचा आस्वाद वगैरे घेणं मला जमणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 09/15/2011 - 22:38

In reply to पुरूषप्रधान! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

माहीतीबद्दल धन्यवाद अदिती. मी

माहीतीबद्दल धन्यवाद अदिती. मी एम पी ३ टाकून एम्बेडेड दुवा दिला होता सकाळी पण आवाज खूप बारीक असल्याने गाणे ऐकू आले नाही. मग काढून टाकला.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 09/16/2011 - 03:37

In reply to माहीतीबद्दल धन्यवाद अदिती. मी by शुचि

Permalink

तुझ्या मायक्रोफोनची सेटींग्ज

तुझ्या मायक्रोफोनची सेटींग्ज पहा. माझा मायक्रोफोन अगदी तोंडाजवळ धरला तरच चांगलं रेकॉर्डींग होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Fri, 09/16/2011 - 03:22

In reply to पुरूषप्रधान! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

पुरुषप्रधान

अदिती कविता आजच्या काळात माझ्या उपयोगाची नाही असे म्हणाली तर मला समजू शकते. बाकी समुद्रमंथन काय पण बरणीतले ताकही हल्लीच्या पोरी घुसळत नाहीत असे वाटते :-) पण खुद्द कवितेत लक्ष्मी नवर्‍याच्या पायाशी बसली असा उल्लेख नाही असे वाटते. लक्ष्मी: स्थिरा न भवति असे म्हणतात. तसा उल्लेख इथे दिसतो आहे. शिवाय एखादी बाई तिच्या नवर्‍याच्या पायाशी किंवा डोक्यावर किंवा इतर कुठे बसण्यात धन्यता मानत असली आणि त्याला चालत असले तर तो त्या मियाबिवीचा प्रश्न आहे. नाही का? :)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 09/16/2011 - 05:00

In reply to पुरुषप्रधान by चित्रा

Permalink

+१

एखादी बाई तिच्या नवर्‍याच्या पायाशी किंवा डोक्यावर किंवा इतर कुठे बसण्यात धन्यता मानत असली आणि त्याला चालत असले तर तो त्या मियाबिवीचा प्रश्न आहे. नाही का?
होय, अर्थात मी त्यांच्यात नाक खुपसायला जाणार नाही. फक्त ही मूल्य मला टाकाऊ वाटतात एवढंच.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sat, 09/17/2011 - 00:15

In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

ते जावूंद्या. विष्णू आला आणि

ते जावूंद्या. विष्णू आला आणि लक्ष्मीच्या पायाशी बसला ही कल्पना कशी वाटते? अवांतर: केरळात नायर समाज तसेच पुर्वेकडे खाशी-गारो या जमातीत कुटूंबात स्त्रीयांचे वर्चस्व असते. मातृसत्ताक कुटूंबपद्धती आहे तेथे. घरातले सर्व निर्णय मुख्य स्त्रीच घेते.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 09/17/2011 - 02:53

In reply to ते जावूंद्या. विष्णू आला आणि by पाषाणभेद

Permalink

विष्णू आला आणि लक्ष्मीच्या

विष्णू आला आणि लक्ष्मीच्या पायाशी बसला ही कल्पना कशी वाटते?
टाकाऊ.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 09/17/2011 - 11:35

In reply to पुरूषप्रधान! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

मूळ कवितेबद्दलः इतर १३ रत्न,

मूळ कवितेबद्दलः इतर १३ रत्न, म्हणजे वस्तूंबरोबर लक्ष्मी आली आणि विष्णूच्या पायाशी बसली ही पुरूषप्रधान कल्पना मला टाकाऊ वाटते.
विष्णुच्या जागी जॉन असता तर एकवेळे चालले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sat, 09/17/2011 - 11:45

In reply to पुरूषप्रधान! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अच्छा

रेकॉर्डींगसाठी मी ऑडेसिटी नावाचं सॉफ्टवर वापरते.
काही रेकॉर्डिंग्ज ऐकली होती. लोक हे का करतात, असा प्रश्न पडला होता. सॉफ्टवेअरच्या नावातच त्याचं उत्तर दडलं आहे हे तेव्हा माहिती नव्हतं. आता कळलं. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 09/15/2011 - 19:23

Permalink

चांगली आहे कविता. आवांतर :

चांगली आहे कविता. आवांतर : चंद्रवदना म्हणजे... चंद्र जीचा अनूज आहे असा अर्थ नसावा. चंद्रासारखा जिचा चेहरा आहे ती.. असा अर्थ असावा. आणि चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ होता हे मला माहिती नव्ह्तं. कारण शंख हा लक्ष्मीचा भाऊ होता असं वाचण्यात आलं होतं माझ्या. बाबासाहेब पुरंदरे लिखित, 'राजा शिवछत्रपती' या महाग्रंथात, सुद्धा एका संदर्भात 'अमुक अमुक हा लक्ष्मी चा भाउ होता... म्हणजे शंख..." असा उपहासात्मक उल्लेख आठवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 09/15/2011 - 20:19

In reply to चांगली आहे कविता. आवांतर : by प्राजु

Permalink

प्राजु लक्ष्मीला चंद्रसहोदरी

प्राजु लक्ष्मीला चंद्रसहोदरी म्हटले जाते कारण दोघे क्षीरसागरामधून बाहेर आहे. हे स्तोत्र ऐक - आदिलक्ष्मी सुमनसवन्दित सुन्दरि माधवि चन्द्र सहोदरि हेममये l मुनिगणमण्डित मोक्षप्रदायिनि मञ्जुळभाषिणि वेदनुते ll पङ्कज वासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते l जयजय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि सदा पालय माम् ll
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 09/15/2011 - 20:02

Permalink

..

प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत राजवाडे on Fri, 09/16/2011 - 08:17

Permalink

नादमय आहे.

आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 09/16/2011 - 08:41

Permalink

सहीच

सहीच
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Sat, 09/17/2011 - 00:53

Permalink

धागा वाचायचा राहिला होता.

धागा वाचायचा राहिला होता. चांगली कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sat, 09/17/2011 - 03:10

Permalink

कविता तर आवडलीच, शिवाय

कविता तर आवडलीच, शिवाय लक्ष्मी अष्तोत्तरशतनामावली वाचायलाही आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमन मॅन on Sat, 09/17/2011 - 10:12

Permalink

सुरेखच! कॉमॅ

सुरेखच! कॉमॅ
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5322 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com