Skip to main content

बंदुक

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 13/09/2011 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी ही हसलो त्यांना ज्यांनी मला वाचवले प्रेताशिवाय सर्वांना स्मशानात पोहचवले एकटा जसा तो उठला मुर्ख म्हणोनी हिणविले संख्येच्या या निकषाने विद्वान किती बसविले प्रेतासम हे जगणे जगतो मी तिरडीवर नियतीचा कैसा घोट पडतो जसा नरडीवर मैत्री मी निभावुन मैत्र जमवले पक्के अपयशावरही माझ्या मित्रांचे होते शिक्के देताना निरोप तुजला तु अंधुन अंधुक होते वक्षात देऊनी गोळी ती आठवण बंदुक होते
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1472
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मैत्री मी निभावुन मैत्र जमवले पक्के अपयशावरही माझ्या मित्रांचे होते शिक्के
अतिशय सुंदर गजल!!

कवितेच्या खाली 'मिपावरील दोन आयडींना समर्पित' असे लिहून टाका म्हणजे कविता सुप्पर डूप्पर हिट ;)

सर्वांचे खुप खुप आभार!!! परा, अरे कुठल्या दोन आय डी बद्द्ल म्हणतोय!!!