गौतम राजाध्यक्षांना श्रद्धांजली.
त्यांनी काढलेले फोटो लगेच वेगळे कळायचे. दिवाळी अंकांवर अनेकदा त्यांचे चंदेरी दुनियेत घेऊन गेल्याचे फोटो असत. का कोण जाणे कलाकार त्यात मोकळे वाटत असत. लता मंगेशकर आणि आशा भोसले तसेच माधुरी दिक्षित यांचे त्यांनी काढलेले फोटो अजूनही आठवतात. त्यांनी फोटो कसे काढले याचे वर्णनही ते करायचे ते वाचायला आवडे.
त्यांनी काढलेले फोटो ग्लॅमरच्या दुनियेतही साधेपणा जपणारे असत. कलाकार त्यांच्या फोटोत जास्त मोकळे वाटतात.
चित्राताईशी सहमत. तसे लवकरच्या वयातच गेले असे वाटते. ६० वर्षे म्हणजे काही फार नाही.
श्री. गौतम राजाध्यक्षांचा अकाली मृत्यू फारच धक्कादायक दु:खद घटना आहे. छायाचित्रकला, साहित्य, संगित अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी ठसा उमटविला आहे. त्यांच्या 'फेसेस' ह्या इंग्रजी पुस्तकाची 'चेहेरे' हि मराठी प्रत संग्रही ठेवावी अशी आहे.
त्यांनी त्याच्या आयुष्यात काही छायाचित्रकारांना तयार केले आहे. (मला वाटतं श्री. अतुल कसबेकर त्यांच्या हाताखालीच शिकले.) ते सर्व छायाचित्रकार त्यांचा वारसा पुढे नेतील अशी आशा करूया.
चंदेरी दुनियेतल्या अनेक कलाकारांची कारकिर्द त्यांच्या जादुई फोटोग्राफीच्या सहाय्याने घडली. एका चॅनेलच्या इंटरव्युमध्ये मुलाखतकारचा एक प्रश्न आणी त्यावरचे त्यांचे उत्तर हे त्यांचे फोटोग्राफीमधले सखोल ज्ञान दर्शवणारे होते आणी माझ्याही कायम स्मरणात राहणारे..
मुलाखतकार : "फोटोग्राफीच्या तुमच्या व्याख्या काय आहेत? किंवा खरा फोटोग्राफर कोणाला म्हणू शकाल."
गौतम राजाध्यक्ष : "असं आहे कि, आकाशात सुर्य एकच आहे आणी त्याचा नेमका उपयोग ज्याला करता आला तो खरा फोटोग्राफर."
भावपुर्ण श्रध्दांजली..!
भावपुर्ण श्रध्दांजली..!
(अवांतरः त्यांच्या निधनाला ज्या पध्द्तीचे कव्हरेज माध्यमांनी दिले त्यामधे त्यांच्या कलेचा भाग कीती आणि त्यांच्या उच्चभ्रु वर्तुळातील वावर, सेलिब्रिटी लोकांचा सहवास , ह्याचा भाग किती)
जबरदस्त प्रतिभा आणि छाया प्रकाशावर जादुई नियंत्रण असलेला एक कलाकार अचानकपणे गेला.
पुण्यात त्यांच्या फोटोंचं प्रदर्शन भरलं होतं फर्ग्युसन च्या मैदानावर. शेवटच्या दिवसापर्यंत दर्शकांच्या रांगा संपत नव्हत्या.. हजारो लोकांनी कितीतरी मांडवाबाहेर थांबून आणि मग किमान एक तास आत असंख्य फोटोंच्या निखळ सौंदर्याचा ... ती व्यक्ती अगदी जिवंत वाटावी असे भाव आणि छाया कॅमेर्यात पकडण्याच्या या मनुष्याच्या विलक्षण हातोटीचा अनुभव घेतला होता.
माधुरी, सचिन, गावसकर, अमिताभ, रेखा, आशा भोसले या त्यांच्या विशेष आवडत्या व्यक्तींशिवाय इतर शेकडो फोटो पहायला मिळाले होते. पण प्रदर्शनाच्या शेवटी हेमा मालिनी आणि स्मिता पाटील यांचे प्रत्येकी एकच कृष्णधवल फोटो हे संपूर्ण प्रदर्शनातल्या कलाकारीला मात देतील इतके अप्रतिम होते..
कुठलाही आजार आणि त्रास नसताना हा मनस्वी मनुष्य अचानक निघून गेला आणि पुढच्या असंख्य भाव प्रतिमा लोकांपर्यंत यायच्या राहून गेल्या...
विनम्र श्रद्धांजली.....
प्रतिक्रिया
अरेरे, एक चांगला छायाचित्रकार
वाईट झाले
हम्म!
रंगीतपेक्षा मला त्यांनी काढलेले कृष्णधवल फोटोच जास्त आवडायचे
एक प्रतिभावंत हरपला... आमची
त्यांनी काढलेले फोटो
श्रद्धांजली
विनम्र श्रद्धांजली
धक्कादायक दु:खद घटना...
एक चांगला फोटोग्राफर, आणि एक
चंदेरी दुनियेतल्या अनेक
भावपुर्ण
प्रतिभावान
लता