Skip to main content

(माझे लेख दान केले)

लेखक निनाद यांनी शनिवार, 10/09/2011 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
गंगाधर मुटे यांची अस्तित्त्व दान केले ही सुंदर गझल पाहिली आणि आमच्या अस्तित्त्वाची आठवण झाली. मुटे साहेबांची क्षमा मागून... असणेच आज माझे, नसण्यासमान केले माझ्याच बायकोने माझे लेख दान केले मागेच विसरलेल्या एकाच आयडीने अकाऊंट आज माझे, डुआयमान केले हळवा नकोस होऊ, मित्र मला म्हणाले संतप्त बायकोनी, जरी उपटून कान नेले चंचूप्रवेश होता घरी हळुवार पावलांनी तो वास येता, बायकोनी त्रस्त दिनमान केले वाचाळ बायकोला वैतागलो पुरेसा सेक्रेटरीसह जाणारै, बुक विमान केले ठेचल्या शरिराला मी चाचपतो अजूनी सासर्‍याने हाडांना माझ्या चूर्णासमान केले भेटले ते लॉबीमध्ये, मी मूढ उभा रे! यंदा चतुर सेक्रेटरीने भाऊ बनवून नेले
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1578
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

पाहिल्या कडव्यात थिल्लरपणा वाढवण्यासाठी असणेच आज माझे, नसण्यासमान केले बायकोने माझे दाढीचे सामान दान केले हे जास्त योग्य वाटते.

__/\__

अरेरे, निनाद यांनासुद्धा बायको आणि दारू याच विषयात विडंबन करताना पाहून दु:ख झाले.

In reply to by नितिन थत्ते

मला हे विषय वर्ज्य असावेत असे नितिनरावांना का वाटते हे कळले नाही. दोन्हींचा माझ्याशी संबंध नाही असा गैरसमज झाला की काय आपला? असो, (आता ...! ) येथे वेगळया विषयावरचे विडंबनही वाचायला मिळेल. आशा आहे ते आवडेल. तरीही जाणकांना कल्पना असेल की चराचरात भरूनही उरणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे बायको, त्यामुळे त्यापासून सुटका नाही!