✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

"बॉडीगार्ड"

स
स्पा यांनी
Sun, 09/04/2011 - 12:11  ·  लेख
लेख
आदरणीय सलमान जी खान यांचे wanted , दबंग, आणि रेडी हे चित्रपट माझ्यासारख्या अभागी माणसाने चित्रपटगृहात जाऊन न पहिल्याने जे पाप माझ्या डोक्यावर चढलेल होत, त्याच क्षालन करण्याची संधी परमेश्वराने मला "बॉडीगार्ड" च्या रूपाने दिली आहे, असे माझ्या हापिसातल्या मित्रांनी जेंव्हा मला समजावून सांगितले तेंव्हा मी सुद्धा भारावून जाऊन त्यांच्या बरोबर चित्रपट केंद्रात जाऊन चित्रपट बघण्यास तयार झालो, सलमान च्या डबल अश्या आमच्या टीम मधल्या तीन काकवा, सलमान च्या अर्धे असे माझे दोन मित्र, आणि पाव असा पापी मी, संध्याकाळी ६ च्या मुहूर्तावर १२० रुपयांची दक्षिणा देऊन जेंव्हा आतमध्ये पोचलो, तेंव्हा आतमध्ये उपस्थित असलेल्या जवळपास ६०% मुली पाहून सलमान चित्रपट मुलं सुद्धा थेटरात येऊन का पाहतात याचा अंदाज आला असो थेटरात नशीब नेहमीच साथ सोडत. सर्व सुंदर मुली आजूबाजूला विखुरलेल्या असताना, आमच्या बाजूला २ भरभक्कम गुजराती येऊन बसले, काकवा मागे बसल्या होत्या आणि आखिरकार ज्यासाठी १२० रुपये खर्च केले तो क्षण आला, चित्रपट सुरु झाला एक लहान ढापण्या मुलगा त्याच्या आईची डायरी वाचताना ट्रेन मध्ये दाखवलय (कूच कूच होता हे छाप), आता थोडा अंदाज आलाच तर चित्रपट आपल्याला भूतकाळात घेऊन जातो सरताज नावाचं (राज बब्बर) बड प्रस्थ जयसिंगपूर मध्ये दाखवलंय , त्याची वट एवढी असते कि म्हणे त्याचा बंगला हे त्या गावासाठी स्वतंत्र न्यायालय का काय ते असत. तर एक बाई भेकत त्याकडे येते, आणि म्हणते कि तिच्या मुलीला कोणी म्हात्रे ग्यांग ने पळवून नेल आहे, परदेशात विकण्यासाठी, आणि ते जहाज आजच मुंबईहून सुटणार आहे. मग बब्र्या (राज हो) दय्लोग मारतो आप पुलिस के पास क्यू नाही गयी, मग तिची बडबड.. पुलिस मिली हुई हे वेग्रे वेग्रे. आता गावापुरत ठीक आहे, पण याची वट मुंबईत पण चालते हे पाहून डोक बधीर व्हायला सुरुवात झाल. तिकडच्या टायगर नावाच्या सिक्युरिटी कंपनीला सरताज १० गार्डस मागवतो मुलींची सुटका करायला, मग अजून एक डायलॉग, त्याचा मालक म्हणतो.. सर इस काम के लिये तो तो सिर्फ एकही बॉडीगार्ड काफी हे. उसकी सिर्फ आंखे हि सामनेवाले कि प्यांट गिली कर देती हे असे म्हणून तो सलमान ला फोन लावतो, आणि आणि जिस बात का इंतजार था.. वो घडी आ गयी सलमान खान एका उडत्या गाण्यावर एन्ट्री मारतो . त्याच्या त्या अचकट विचकट स्टेप्स मागे बसलेल्या काकवा आणि समस्त इतर मुली चवीने वेन्जोय करत होत्या . वर कतरिना पण थोड्यावेळासाठी थोबाड दाखवून गेलीये , धधधडणारी लोकल आणि त्यात उभा असलेला सलमान ..... (ब्लुठूथ कानाला लावून .. हो कारण ते अख्या पिक्चर भर त्याच्या कानाला दाखवलंय ;) ) त्याच बॉस त्याला काय झालंय ते सांगतो आणि डॉक्कयार्ड ला जायला सांगतो , सलमान उर्फ लवली सिंग म्हणतो सर मी तो अभी उत्तर मे जा राहा हु, ये काम दक्षिण मे हे, आप किसी ओर को भेज दिजीये ना बॉस : नही ये सरताज जी का काम हे, इस बहाणे तुम्हे उनका कर्ज चुकता करनेका मोका मिल रहा हे ( मग आपल्याला कळत कि सलमान चा बाप हा सुद्धा सरताज चा बॉडीगार्ड असतो आणि कार अपघातात तो दगावतो, आणि सलमान च पालन पोषण सरताज करतो, म्हणजे त्याचा मालिक) हे एकदा कळल्यावर सलमान एकदम लोकल च्या बाहेर उडी मारतो, आणि चक्क ओवेऱ्हेड वायर ला पकडून गोल गिरकी खाऊन समोरून उलट्या दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेस वर चढतो.. बाब्बो .. परवाच एक फेसबुक वर असा स्टंट बघितला होता लोकल चे किडे, हा तर त्यांचा बाप निघाला, अभिमानाने डोळ्यात दाटलेलं पाणी फुसून मी पुढे काय होत बघायला सरसावलो , इकडे पब्लिक ने ठेतर शिट्या मारून डोक्यावर घेतलेलं होत :D पुढे तर तो त्या गाडीवरूनही उलटी उडी मारून फ्लाय ओवर वर चढतो. हे कस काय झाल याच कोड न सुटल्याने मेंदू ह्यांग होऊन रीस्टार्ट होत असतानाच , तो फ्लाय ओवर वरून परत एक उडी मारतो, आणि थेट जहाज्याचा बेसमेंट मधेच येतो. असा मुंबईत जहाजाला कनेक्ट होणारा फ्लाय ओवर कुठे आहे याचा शोध सध्या घेतोय ;) मग खाली आल्यावर गुंडांची जी धुलाई होते, ते केवळ बघण्यासारखी, अचाट मारामारी करून तो त्या मुलीना सोडवतो . इकडे सरताज खुश होऊन त्याला त्याच्या मुलीचा दिव्याचा (करीना कपूर ) "बॉडीगार्ड" म्हणून नेमतो, कारण त्याने आता म्हात्रे ग्यांग शी दुष्मनी घेतलेली असते . इकडे ती दिव्या लंडन हून MBA करायला इकडे आलेली असते. (खी: खी:) ब्वार्र ती काय करते आणि तिचं MBA पूर्ण होत का निदान ६ महिने तरी हे कळायला नंतर मार्गच नाहि. तिला असा "बॉडीगार्ड" नेमलेला अजिबात आवडत नाहि. त्याला काहीही करून पळवून लावायचाच, किंवा इतर कामात अडकवायचा म्हणून ती तिच्या फोन वरून त्याला "छाया" नावाने फोन करायला सुरुवात करते . तिचं नंबर "प्रायवेट नंबर" म्हणून दिसत असल्याने, यालाही कोण फोन करताय ते कळत नाहि. हळू हळू तो तिच्यात अडकतो. आणि दिव्यालाही जरा मोकळीक मिळते अशा एका वेळेस एका डिस्को मध्ये म्हात्रे चे गुंड परत हमला करतात, हा परत एकेकाला तोडतो. तेंव्हा दिव्याला कळत कि हा खरोखर आपल्या रक्षणालाच ठेवलेला आहे, आणि त्याची ताकद आणि साधेपणा पाहून त्याच्या प्रेमात पडते. हि गोष्ट ती आपल्या मैत्रिणीला सांगते. पण सरताजला हे कळले तर तो लवली चा जीव घेईल हि भीती असल्याने ती छाया म्हणूनच बोलत राहते . इकडे बार मध्ये म्हात्रेच्या एका भावाला लवली ने स्वर्गवासी केल्याने म्हात्रे ( आदित्य पांचोली ) भडकतो. आता बदला घ्यायचाच या भावनेने टिपिकल गुंडान प्रमाणे भर पावसात(?) तो भावाची चिता जळवताना (?) प्रतिज्ञा घेतो . इकडे छाया हीच करीना आहे , हे घरातल्या नोकराणीला कळत आणि ती करीनाच्या आईला सांगते , आई सरताज ला. सरताज भडकतो. तो बाहेरगावी असतो. इकडे करीनाच mba करून संपत वाटत , म्हणून ती ब्यागा भरून लंडन ला जायला निघते, आणि लवली ला सांगते कि मला स्टेशन ला भेट म्हणजे मी कोण आहे हे तुला कळेलच. पण सलमानच्या मोबिल वर सरताज चा फोन येतो हि फोन उचलते, पण काही बोलायच्या आधीच सरताज याला घाल घाल शिव्या घालून मोकळा होतो, आता हिला कळत कि बापाला सर्व कळलेलं आहे , आता काय करायचं ब्वा ? या विचारात असताना म्हात्रे परत सर्व शक्तीनिशी करीनावर तुटून पडतो , हि पळत पळत कुठल्या तरी खंडर मध्ये जाते.. आता तिथे आसपास राजस्थानी खंडर कुठून आलं असा क्षुद्र विचार माझ्या मनात डोकावून गेला पण असो, मागोमाग सलमान धावत तिला वाचवायला येतो, आता फुल फिल्मी सेट, खाली पाणी साचलंय. सलमान च्या डोळ्यात माती गेल्याने तो डोळे मिटूनच (?) सर्वांना झोडपून काढतोय परत घमासान, शेवटी फक्त मेन म्हात्रे आणि त्याचा साथीदार (महेश मांजेरकर) उरतात . मांजेरकर बाजूला करीनाला घेऊन उभा आणि तात्पुरत्या आंधळ्या सलमानला म्हणतो, एक मे तुम्म्पे एहसान करता हु, याहासे जाने देता हु (आता मगास पासून सलमान च्या जीवावर ५० जण उठलेले असताना , आता कीस खुशिमे हे एहसान असा प्रश्न पडलेला असताना, मला लगेच त्याच उत्तर मिळाल ) "मुझपर एक एहसान करना कि मुझपर कोई एहसान ना करना" .. इति सलमान (ओक्के हि टुकार पंच लाईन मारायची होती म्हणून आधीचा डायलॉग , मी पण ना.. मंदच आहे) इकडे पांचोली रागाने एक पाण्याचा पाईप तोडतो. आणि सलमान वर फुल प्रेशर ने पाणी मारतो, त्या पाण्यामुळे सलमान चा शर्ट हळू हळू ....................................... येस you are right !!!! ज्या क्षणासाठी समस्त स्त्री वर्गाने १२० ची पावती फाडली होती तो क्षण आला. सलमान च्या उघड्या अंगाच दर्शन. त्याच्या "6 packs abs " कॅमेरा नुसता गरा गरा ३६० अंशात फिरतोय, सलमान च्या डोळ्यातून अंगारे .. इकडे आनंदाने चीर्कून बेभान झालेल्या मुली, आणि आमच्या टीम मधल्या काकवा.. आणि हे सर्व हतबुद्ध पण पाहणारा मी ... !!!! असो.. तर यथावकाश शेवटचा म्हात्रे पण संपतो. हा करीनाला सोडवून बाहेर येतो, तर बाहेर सरताज परत याला चोप्तो, मग करीना मध्ये पडून सांगते कि ती मुलगी मी नव्हे याच प्रेम कोणी दुसरच आहे, याला स्टेशन वर जौंद्या मग सरताज सलमान ला सोडतो. हा धावत स्टेशन वर जातो, स्टेशन कुठलं तर "पुणे" वा वा पण सरताज त्याच्या मागे एक गुंड पाठवतो आणि सांगतो जर याला कुठली मुलगी दिसली नाहि तर खपवून टाक इकडे करीना धावत घरी येऊन तिच्या मैत्रिणीला सर्व सांगते , आणि सांगते कि तू आत्ताच्या आता स्टेशन ला जा आणि त्याला संग कि छाया म्हणजे मीच आहे. ती मैत्रीण सुसाट पळत स्टेशन गाठते, त्याने आधी छाया कोण हे बघितलेलं नसल्याने , त्याला वाटत तीच आहे, तो तिला मिठी मारतो, इकडे गुंड पण सर्व ओके म्हणून सरताज ला फोन लावतो.. पण पण... पुढे काय ??? हे तर तुम्हाला जाऊनच बघायला हव ;) पिक्चर मधली गाणी बरी आहेत सलमान त्याच्या युनिफोर्म मध्ये कडकच दिसतो करीना तर अहाहा .. आणि चक्क तिला अभिनयाची संधी दिलेली आहे, आणि तिने तिचं सोन केल आहे ती जब वे मेट नंतर याच्यात खूपच सुंदर दिसली आहे असो मी चित्रपटाला २ स्टार देईन . बाकी तुम्ही हुशार आहातच :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18975 वाचन

💬 प्रतिसाद (114)

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया खूपच आवडली. सलमान

अप्पा जोगळेकर
Sat, 09/10/2011 - 00:20 नवीन
प्रतिक्रिया खूपच आवडली. सलमान खान हे एक अजब रसायन आहे. +१००.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

क ड क !

परिकथेतील राजकुमार
Mon, 09/05/2011 - 12:38 नवीन
स्पा चे परिक्षण आणि समीर साहेबांची प्रतिक्रिया दोन्ही कडकच. रेडी नंतर सलमानचा हा अजून एक फसलेला रिमेक आहे. अर्थात कलेक्शनच्या बाबतीत दोन्ही चित्रपटांनी कदाचीत निर्मात्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असतील देखील, मात्र चाहत्यांच्या पदरात निश्चितच शून्य आले आहे. रेडी आणि बॉडीगार्ड पेक्षा मी कधीही वाँटेड आणि दबंगला जास्ती मार्क देईन.
  • Log in or register to post comments

ताजी बातमी

समीरसूर
Mon, 09/05/2011 - 15:36 नवीन
'बॉडीगार्ड'ने आजपर्यंत (०५-सप्टें-२०११) म्हणजे केवळ ५ दिवसात एकूण ११० कोटींच गल्ला गोळा केला आहे. बातमी इथे वाचा: http://timesofindia.indiatimes.com/entertainment/bollywood/box-office/Bodyguard-earns-Rs-100cr-beats-Dabanng/articleshow/9869256.cms कमाईचे सगळे विक्रम या चित्रपटाने मोडले. परा, तुम्ही म्हणताय ते खरे आहे. 'दबंग' खूप मनोरंजक आणि नीट रचलेला चित्रपट होता. पटकथा कुठेच फाटत नाही. भट्टी छान जमली होती. बाकी 'रेडी' आणि 'वाँटेड' मी पाहिले नाहीत. 'वाँटेड' टीव्हीवर पडीक असतो पण बघायची इच्छा होत नाही. 'दबंग' मी टीव्हीवर बर्‍याचदा पाहिला. सॉल्लिड मनोरंजन होते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मला खरच कळले नाही कि.. काय

स्पा
Mon, 09/05/2011 - 15:41 नवीन
मला खरच कळले नाही कि.. काय हिशोबाने बाडी गार्ड बनवलाय... जरा तरी डोक लावायचं कथाच आधी इतकी पुचाट होती कि , पटकथा, दिग्दर्शन हे विषय दूरच राहिले तरी सुधा इतकी कमाई... कठीण आहे . रेडी पेक्षा नक्कीच बरा आहे पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

खीक

परिकथेतील राजकुमार
Mon, 09/05/2011 - 15:54 नवीन
@ समीर साहेब :- वॉंटेड बघाच बघा. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर दबंगच्या यशात वाँटेडचा खूप मोठा हात आहे. शक्य झाले तर ४/५ दिवसात त्याचे परिक्षण नक्की टाकतो. @स्पा :- अरे दादा हा 'बनवलेला' नाहीये रे ;) सौथ चित्रपटाचे रिमेक बनवण्याची सध्या जी फॅशन + चलती आहे, त्यातलाच हा एक पदार्थ. आता ह्याला रिमेक म्हणावे का? तर नक्कीच नाही, हा रिमेक असल्याचा दावा सगळे करत असले तरी हा चित्रपट ओरिगिनल चित्रपटाची अत्यंत भ्रष्ट नक्कल म्हणता येईल. जी पूर्णपणे फसलेली आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अरे दादा हा 'बनवलेला' नाहीये

स्पा
Mon, 09/05/2011 - 15:59 नवीन
अरे दादा हा 'बनवलेला' नाहीये रे ,सौथ चित्रपटाचे रिमेक बनवण्याची सध्या जी फॅशन + चलती आहे, त्यातलाच हा एक पदार्थ. चायला हा पण सौथ वरून उचललाय का काय? कुठला रे कुठला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मल्याळी चित्रपटाचा रिमेक आहे

वाहीदा
Mon, 09/05/2011 - 17:41 नवीन
मल्याळममधील सिद्दीक याच दिग्दर्शकाच्या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. भारतिय पाच भाषेत याचा रिमेक आहे Bodyguard (Malayalam), Kaavalan (Tamil), Bodyguard (Hindi), Ganga (Telugu). BODYGUARD(Kannada)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

शक्य झाले तर ४/५ दिवसात

अप्पा जोगळेकर
Sat, 09/10/2011 - 00:15 नवीन
शक्य झाले तर ४/५ दिवसात त्याचे परिक्षण नक्की टाकतो. वाट बघत आहे. - 'वाँटेड' प्रेमी, राजवीर शेखावतचा फॅन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

डोकं लावून चित्रपट काढला असता तर चाललाच नसता

वाहीदा
Mon, 09/05/2011 - 16:09 नवीन
@ स्पा : डोकं लावून चित्रपट काढला असता तर चाललाच नसता अन तू पण वेडाच आहेस , डोके बाजूला काढून असे चित्रपट पहायचे असतात.. तू ना उगाच नसते कोडे मांडत बसतोस डोक बधीर व्हायला त्याचा वापर कशाला करायला गेलास ? पण मुलींच्या बाबतीत म्हटले तर आहेच सलमानची बॉडी बघण्यालायक तू का रे जळतोस ? आमच्या ऑफीसमध्ये पण समस्त महिलावर्ग सलमानवर फिदा, बोलेतो एकदम फुलटू फट्टाक ! :-) काही चित्रपट आम्ही फक्त सलमान / जॉन यांच्या सारख्यांना च पहायला जातो, श्टोरी बिरी गेली तेल लावत ;-) समीरसूर शी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

रिमेक?

स्मिता.
Mon, 09/05/2011 - 16:11 नवीन
हा काय कोणा दक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे??? मला तर त्या डायरी वाचनावरून 'कुछ कुछ होता है' चा रिमेक वाटला. बाय द वे... सलमानचा शर्ट काढायचा प्रसंगही काही किंचाळण्यासारखा नव्हता. त्यामानाने दबंगमधला प्रसंग भारी! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

फारच खमंग परीक्षण आहे!

नगरीनिरंजन
Mon, 09/05/2011 - 13:57 नवीन
फारच खमंग परीक्षण आहे! पिक्चर अर्थातच पाहण्यात येणार नाहीय. परा, फारएन्ड आणि समीरसूर यांच्या रांगेत स्पासाहेब जाऊन बसलेले आहेत.
  • Log in or register to post comments

झक्कास पंचनामा रे स्पावड्या.

गणपा
Mon, 09/05/2011 - 14:11 नवीन
झक्कास पंचनामा रे स्पावड्या. :) (टोरेंटवर पण वेळ आणि बँडविड्थ खर्चु नये तर. :))
  • Log in or register to post comments

मेले!

स्वैर परी
Mon, 09/05/2011 - 14:28 नवीन
मांजेरकर बाजूला करीनाला घेऊन उभा आणि तात्पुरत्या आंधळ्या सलमानला म्हणतो, एक मे तुम्म्पे एहसान करता हु, याहासे जाने देता हु (आता मगास पासून सलमान च्या जीवावर ५० जण उठलेले असताना , आता कीस खुशिमे हे एहसान असा प्रश्न पडलेला असताना, मला लगेच त्याच उत्तर मिळाल ) "मुझपर एक एहसान करना कि मुझपर कोई एहसान ना करना" .. इति सलमान (ओक्के हि टुकार पंच लाईन मारायची होती म्हणून आधीचा डायलॉग , मी पण ना.. मंदच आहे) इकडे पांचोली रागाने एक पाण्याचा पाईप तोडतो. आणि सलमान वर फुल प्रेशर ने पाणी मारतो, त्या पाण्यामुळे सलमान चा शर्ट हळू हळू ....................................... येस you are right !!!! ज्या क्षणासाठी समस्त स्त्री वर्गाने १२० ची पावती फाडली होती तो क्षण आला. सलमान च्या उघड्या अंगाच दर्शन. त्याच्या "6 packs abs " कॅमेरा नुसता गरा गरा ३६० अंशात फिरतोय, सलमान च्या डोळ्यातून अंगारे .. इकडे आनंदाने चीर्कून बेभान झालेल्या मुली, आणि आमच्या टीम मधल्या काकवा.. आणि हे सर्व हतबुद्ध पण पाहणारा मी ... !!!! असो.. मेले हे वाचता वाचता!!!
  • Log in or register to post comments

एकदम फाडु परिक्षण... मस्त

मदनबाण
Mon, 09/05/2011 - 14:30 नवीन
एकदम फाडु परिक्षण... ;) मस्त रे... :)
  • Log in or register to post comments

(No subject)

कवितानागेश
Mon, 09/05/2011 - 15:54 नवीन
:D
  • Log in or register to post comments

क ड क !!! मस्त रे

यकु
Mon, 09/05/2011 - 16:46 नवीन
क ड क !!! मस्त रे स्पा. प्रत्येक वाक्याला हसत होतो. मजा आली.
  • Log in or register to post comments

छान परीक्षण

राजेश घासकडवी
Mon, 09/05/2011 - 16:46 नवीन
:)
  • Log in or register to post comments

पुनरावृत्ती

यकु
Mon, 09/05/2011 - 16:48 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

बरे झाले अजुन पाहिला नाही आहे

विशाखा राऊत
Mon, 09/05/2011 - 18:32 नवीन
बरे झाले अजुन पाहिला नाही आहे
  • Log in or register to post comments

जबदस्त !!! आवडल बुवा तुझ लेखन

माझीही शॅम्पेन
Mon, 09/05/2011 - 23:37 नवीन
जबदस्त !!! आवडल बुवा तुझ लेखन !!!
  • Log in or register to post comments

चित्रपटओळख आवडली

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/06/2011 - 00:27 नवीन
स्पा काही माझ्या कंपूतला नाही पण त्याच्या धाग्यात जॉनचा उल्लेख आल्यानंतर प्रतिक्रिया द्यावीच लागणार. असो. तर बब्र्या हा शब्द बब्रुवान रुद्रकंठावार यांनी आधीच बुक केल्यामुळे राज बब्बर या नटासाठी इतर काही नाव शोधावे. शिवाय भूतकाळात सुरू झालेल्या सिनेमाचा शेवट कसा होतो हे न सांगितल्यामुळे स्पा यांचा एक मार्क कापला आहे. सलमानच्या फक्त सिक्स-पॅक-अ‍ॅबचाच उल्लेख आहे, त्याबद्दल एक मार्क, पण इतर काही उल्लेख नाही, उदा: सल्लूने पाय दाखवले आहेत का? त्याबद्दल स्पा यांचे दोन मार्क कापले आहेत. ब्लुठूथ, आणि प्रियालीने उल्लेख केलेले इतर मजेशीर शब्द वापरण्याबद्दल स्पा यांना एक बोनस मार्क देण्यात येत आहे. स्पा यांना बेरीज-वजाबाकी जमत असेल तर त्यांनी करावी नाहीतर मी त्यांना ६.२८/१० मार्क देत आहे ते मान्य करावे. मार्कवरून आठवलं, मार्क रॉबिन्सन हा गरीबांचा जॉन एक पिच्चरनंतर कुठे दिसला नाही.
  • Log in or register to post comments

स्पा यांना बेरीज-वजाबाकी जमत

स्पा
Tue, 09/06/2011 - 11:18 नवीन
स्पा यांना बेरीज-वजाबाकी जमत असेल तर त्यांनी करावी नाहीतर मी त्यांना ६.२८/१० मार्क देत आहे ते मान्य करावे. नशीब फर्स्ट क्लास मिळाला आम्ही तर ३.१४ /१० अपेक्षित केले होते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हम्म

सिद्धार्थ ४
Tue, 09/06/2011 - 05:23 नवीन
कोणी काही म्हणो आपण तर बाबा सल्लू मियाचे जबरदस्त फाण झालो आहे. तीजायला ४५ मध्ये हि अशी body ....काल च online बघितला. खिशातून काही पैसे काढून न बघितल्या मुळे आपल्याला तर picture जाम आवाडला . फुल टू tiempass आहे.
  • Log in or register to post comments

स्टेरॉईडचे इंजेक्शन घेत

शिल्पा ब
Tue, 09/06/2011 - 09:17 नवीन
स्टेरॉईडचे इंजेक्शन घेत राहीले तर तुमची सुद्धा बॉडी अशीच होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धार्थ ४

+१ सगळी स्टेरॉईड्सची करणी !!

सूड
Tue, 09/06/2011 - 09:48 नवीन
+१ सगळी स्टेरॉईड्सची करणी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

सगळी स्टेरॉईड्सची करणी

स्पा
Tue, 09/06/2011 - 10:03 नवीन
सगळी स्टेरॉईड्सची करणी !! स्टेरॉईड्सची करणी,नि उतारवयात मेंदूत पाणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

उतारवयात मेंदूत पाणी पाणी

वपाडाव
Mon, 09/12/2011 - 11:49 नवीन
उतारवयात मेंदूत पाणी
पाणी अजुन कुठे तरी भरतंय असं ऐकुन आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सगळी स्टेरॉईड्सची करणी

अप्पा जोगळेकर
Sat, 09/10/2011 - 00:11 नवीन
सगळी स्टेरॉईड्सची करणी !! एवढं सोप्प वाटलं काय ? स्टेरॉईड पचवण्यासाठी दुप्पट व्यायाम करावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

स्टेरॉईड्स..

मी-सौरभ
Sat, 09/10/2011 - 00:18 नवीन
या विषयावर स्पाभौं चे विचार ऐकण्यास उत्सुक आहोत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

exactly

सिद्धार्थ ४
Sat, 09/10/2011 - 04:17 नवीन
हेच म्हणतो. दुप्पट व्यायाम आणि तो सुधा daily
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

आपला 'कंपू' वाढला पाहिजे!

सुधीर काळे
Tue, 09/06/2011 - 09:18 नवीन
मराठी_माणूस, तिरशिंगराव माणूसघाणे आणि बोका, धन्यवाद! आपला 'कंपू' वाढला पाहिजे!
  • Log in or register to post comments

या

प्रचेतस
Tue, 09/06/2011 - 10:17 नवीन
या निमित्ताने मिपावर एक सलमानविरोधी कंपू तयार होतोय हे बघून आनंद वाटला. अवांतरः जाकार्ता पोस्ट आणि ई-सकाळ मध्ये सलमान विरोधी लेखाची आतुरतेने वाट पाहात आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

(No subject)

आत्मशून्य
Tue, 09/06/2011 - 11:29 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अजून एक

मी-सौरभ
Sat, 09/10/2011 - 00:20 नवीन
'डॉन' (कराची) मधल्या सल्लू विरोधी लेखाची लिंक ही येऊ शकते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मराठी_माणूस, तिरशिंगराव

स्पा
Tue, 09/06/2011 - 09:25 नवीन
मराठी_माणूस, तिरशिंगराव माणूसघाणे आणि बोका, धन्यवाद! आपला 'कंपू' वाढला पाहिजे! हाहाहा काका फोर्मात आहेत आज :D
  • Log in or register to post comments

अरेरेरे ! स्पाव्या अरे त्या

स्पंदना
Tue, 09/06/2011 - 12:22 नवीन
अरेरेरे ! स्पाव्या अरे त्या १२० मध्ये शिराज मध्ये पराठा की रे खायचे, हे अस अधिच बधिर अस्लेल डोक आणि कशाला बधिर करुन घ्याच ब्वा? असुदे असुदे ! निदान आजकाल पोरी काय पसंत करतात ते तरी ज्ञान झाल ना? चांगल्यात वाईट्....टंग ओफ स्लीप्...वाइट्टात चांगल .
  • Log in or register to post comments

@ अपर्णातै, '' शिराज मध्ये

५० फक्त
Fri, 09/09/2011 - 23:04 नवीन
@ अपर्णातै, '' शिराज मध्ये पराठा की रे खायचे'' हे शिराज कुठं आलं म्हणायचं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

तै

मी-सौरभ
Sat, 09/10/2011 - 00:22 नवीन
तुमच्या माहिती साठी... शिराज हे एका लाल वारुणीच नाव आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

ए१ लिहिलय्स रे स्पा!

इंटरनेटस्नेही
Tue, 09/06/2011 - 12:37 नवीन
उत्तम चित्रपट परी़क्षण! वाचताना मजा आली!
  • Log in or register to post comments

खूप छान

सविता००१
Tue, 09/06/2011 - 14:31 नवीन
खमंग परिक्षण. प्रत्येक वाक्याला हसत होते. जाम मजा आली. आता तर हा सिनेमा टी.व्ही. वरही नाही पहाणार.
  • Log in or register to post comments

अप्रतिम रे स्पा ... मस्त

गणेशा
Tue, 09/06/2011 - 17:12 नवीन
अप्रतिम रे स्पा ... मस्त परिक्षण
  • Log in or register to post comments

अप्रतिम रे स्पा ... मस्त

गणेशा
Tue, 09/06/2011 - 17:12 नवीन
अप्रतिम रे स्पा ... मस्त परिक्षण
  • Log in or register to post comments

उत्तम!

इंटरनेटस्नेही
Sat, 09/10/2011 - 03:33 नवीन
लेखन आवडले! अतिशय ओघवते आणि मजा मस्ती करत केलेले चित्रदर्शी वर्णन! - इंट्या.
  • Log in or register to post comments

येकदम कडक...

चिगो
Sat, 09/10/2011 - 13:02 नवीन
च्यायला स्पावड्या... अगदी अर्धा तास उकळलेल्या चहासारखं क ह ड क झालंय भौ ह्यो पंचनामा.. एकदम चिरफाड..
  • Log in or register to post comments

काय रे मेल्या.

पैसा
Sat, 09/10/2011 - 23:38 नवीन
आमच्या सल्लूवर जळतोस काय रे? असले सिनेमे डोकं बाजूला ठेवून बघायचे! सॉल्लिड मज्जा येते. तू काही म्हण, मी आज "सिंघम" बघतेय, आणि उद्या "बॉडीगार्ड" बघणार आहे. स्पायल्या, सगळंच काय सिरियसली घेतोस रे?
  • Log in or register to post comments

झकास!

नंदन
Mon, 09/12/2011 - 12:38 नवीन
मस्त परीक्षण रे, स्पावड्या!
  • Log in or register to post comments

ठांकू

स्पा
Mon, 09/12/2011 - 12:42 नवीन
सर्वांना मनापासून ठांकू :)
  • Log in or register to post comments

हे काय

प्रचेतस
Mon, 09/12/2011 - 12:44 नवीन
हे काय....! १०० व्ह्यायच्या आधीच ठ्यांकू ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

'दारू'चे अनेकवचन 'दारवा' असे करत असे

सुधीर काळे
Mon, 09/12/2011 - 13:22 नवीन
स्पा, आतापर्यंत मी 'दारू'चे अनेकवचन 'दारवा' असे करत असे. (म्हणजे आमच्या घरी पार्टी असते तेंव्हां दारूच्या बाटल्या ज्या टेबलावर ठेवल्या असतात तिकडे बोट करून 'दारवा तिथे ठेवल्या आहेत' असे सांगतो. त्याला 'पनघट' असेही नांव आहे!) पण 'काकू'चे 'काकवा' हे अनेकवचनी 'रूप' आजच वाचले!
  • Log in or register to post comments

वाचन कमी पडतंय काळेकाका!

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/14/2011 - 02:45 नवीन
थोडं वाचन वाढवा, इतर अनेक मजेदार शब्द समजतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा