✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"बॉडीगार्ड"

स
स्पा यांनी
Sun, 09/04/2011 - 12:11  ·  लेख
लेख
आदरणीय सलमान जी खान यांचे wanted , दबंग, आणि रेडी हे चित्रपट माझ्यासारख्या अभागी माणसाने चित्रपटगृहात जाऊन न पहिल्याने जे पाप माझ्या डोक्यावर चढलेल होत, त्याच क्षालन करण्याची संधी परमेश्वराने मला "बॉडीगार्ड" च्या रूपाने दिली आहे, असे माझ्या हापिसातल्या मित्रांनी जेंव्हा मला समजावून सांगितले तेंव्हा मी सुद्धा भारावून जाऊन त्यांच्या बरोबर चित्रपट केंद्रात जाऊन चित्रपट बघण्यास तयार झालो, सलमान च्या डबल अश्या आमच्या टीम मधल्या तीन काकवा, सलमान च्या अर्धे असे माझे दोन मित्र, आणि पाव असा पापी मी, संध्याकाळी ६ च्या मुहूर्तावर १२० रुपयांची दक्षिणा देऊन जेंव्हा आतमध्ये पोचलो, तेंव्हा आतमध्ये उपस्थित असलेल्या जवळपास ६०% मुली पाहून सलमान चित्रपट मुलं सुद्धा थेटरात येऊन का पाहतात याचा अंदाज आला असो थेटरात नशीब नेहमीच साथ सोडत. सर्व सुंदर मुली आजूबाजूला विखुरलेल्या असताना, आमच्या बाजूला २ भरभक्कम गुजराती येऊन बसले, काकवा मागे बसल्या होत्या आणि आखिरकार ज्यासाठी १२० रुपये खर्च केले तो क्षण आला, चित्रपट सुरु झाला एक लहान ढापण्या मुलगा त्याच्या आईची डायरी वाचताना ट्रेन मध्ये दाखवलय (कूच कूच होता हे छाप), आता थोडा अंदाज आलाच तर चित्रपट आपल्याला भूतकाळात घेऊन जातो सरताज नावाचं (राज बब्बर) बड प्रस्थ जयसिंगपूर मध्ये दाखवलंय , त्याची वट एवढी असते कि म्हणे त्याचा बंगला हे त्या गावासाठी स्वतंत्र न्यायालय का काय ते असत. तर एक बाई भेकत त्याकडे येते, आणि म्हणते कि तिच्या मुलीला कोणी म्हात्रे ग्यांग ने पळवून नेल आहे, परदेशात विकण्यासाठी, आणि ते जहाज आजच मुंबईहून सुटणार आहे. मग बब्र्या (राज हो) दय्लोग मारतो आप पुलिस के पास क्यू नाही गयी, मग तिची बडबड.. पुलिस मिली हुई हे वेग्रे वेग्रे. आता गावापुरत ठीक आहे, पण याची वट मुंबईत पण चालते हे पाहून डोक बधीर व्हायला सुरुवात झाल. तिकडच्या टायगर नावाच्या सिक्युरिटी कंपनीला सरताज १० गार्डस मागवतो मुलींची सुटका करायला, मग अजून एक डायलॉग, त्याचा मालक म्हणतो.. सर इस काम के लिये तो तो सिर्फ एकही बॉडीगार्ड काफी हे. उसकी सिर्फ आंखे हि सामनेवाले कि प्यांट गिली कर देती हे असे म्हणून तो सलमान ला फोन लावतो, आणि आणि जिस बात का इंतजार था.. वो घडी आ गयी सलमान खान एका उडत्या गाण्यावर एन्ट्री मारतो . त्याच्या त्या अचकट विचकट स्टेप्स मागे बसलेल्या काकवा आणि समस्त इतर मुली चवीने वेन्जोय करत होत्या . वर कतरिना पण थोड्यावेळासाठी थोबाड दाखवून गेलीये , धधधडणारी लोकल आणि त्यात उभा असलेला सलमान ..... (ब्लुठूथ कानाला लावून .. हो कारण ते अख्या पिक्चर भर त्याच्या कानाला दाखवलंय ;) ) त्याच बॉस त्याला काय झालंय ते सांगतो आणि डॉक्कयार्ड ला जायला सांगतो , सलमान उर्फ लवली सिंग म्हणतो सर मी तो अभी उत्तर मे जा राहा हु, ये काम दक्षिण मे हे, आप किसी ओर को भेज दिजीये ना बॉस : नही ये सरताज जी का काम हे, इस बहाणे तुम्हे उनका कर्ज चुकता करनेका मोका मिल रहा हे ( मग आपल्याला कळत कि सलमान चा बाप हा सुद्धा सरताज चा बॉडीगार्ड असतो आणि कार अपघातात तो दगावतो, आणि सलमान च पालन पोषण सरताज करतो, म्हणजे त्याचा मालिक) हे एकदा कळल्यावर सलमान एकदम लोकल च्या बाहेर उडी मारतो, आणि चक्क ओवेऱ्हेड वायर ला पकडून गोल गिरकी खाऊन समोरून उलट्या दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेस वर चढतो.. बाब्बो .. परवाच एक फेसबुक वर असा स्टंट बघितला होता लोकल चे किडे, हा तर त्यांचा बाप निघाला, अभिमानाने डोळ्यात दाटलेलं पाणी फुसून मी पुढे काय होत बघायला सरसावलो , इकडे पब्लिक ने ठेतर शिट्या मारून डोक्यावर घेतलेलं होत :D पुढे तर तो त्या गाडीवरूनही उलटी उडी मारून फ्लाय ओवर वर चढतो. हे कस काय झाल याच कोड न सुटल्याने मेंदू ह्यांग होऊन रीस्टार्ट होत असतानाच , तो फ्लाय ओवर वरून परत एक उडी मारतो, आणि थेट जहाज्याचा बेसमेंट मधेच येतो. असा मुंबईत जहाजाला कनेक्ट होणारा फ्लाय ओवर कुठे आहे याचा शोध सध्या घेतोय ;) मग खाली आल्यावर गुंडांची जी धुलाई होते, ते केवळ बघण्यासारखी, अचाट मारामारी करून तो त्या मुलीना सोडवतो . इकडे सरताज खुश होऊन त्याला त्याच्या मुलीचा दिव्याचा (करीना कपूर ) "बॉडीगार्ड" म्हणून नेमतो, कारण त्याने आता म्हात्रे ग्यांग शी दुष्मनी घेतलेली असते . इकडे ती दिव्या लंडन हून MBA करायला इकडे आलेली असते. (खी: खी:) ब्वार्र ती काय करते आणि तिचं MBA पूर्ण होत का निदान ६ महिने तरी हे कळायला नंतर मार्गच नाहि. तिला असा "बॉडीगार्ड" नेमलेला अजिबात आवडत नाहि. त्याला काहीही करून पळवून लावायचाच, किंवा इतर कामात अडकवायचा म्हणून ती तिच्या फोन वरून त्याला "छाया" नावाने फोन करायला सुरुवात करते . तिचं नंबर "प्रायवेट नंबर" म्हणून दिसत असल्याने, यालाही कोण फोन करताय ते कळत नाहि. हळू हळू तो तिच्यात अडकतो. आणि दिव्यालाही जरा मोकळीक मिळते अशा एका वेळेस एका डिस्को मध्ये म्हात्रे चे गुंड परत हमला करतात, हा परत एकेकाला तोडतो. तेंव्हा दिव्याला कळत कि हा खरोखर आपल्या रक्षणालाच ठेवलेला आहे, आणि त्याची ताकद आणि साधेपणा पाहून त्याच्या प्रेमात पडते. हि गोष्ट ती आपल्या मैत्रिणीला सांगते. पण सरताजला हे कळले तर तो लवली चा जीव घेईल हि भीती असल्याने ती छाया म्हणूनच बोलत राहते . इकडे बार मध्ये म्हात्रेच्या एका भावाला लवली ने स्वर्गवासी केल्याने म्हात्रे ( आदित्य पांचोली ) भडकतो. आता बदला घ्यायचाच या भावनेने टिपिकल गुंडान प्रमाणे भर पावसात(?) तो भावाची चिता जळवताना (?) प्रतिज्ञा घेतो . इकडे छाया हीच करीना आहे , हे घरातल्या नोकराणीला कळत आणि ती करीनाच्या आईला सांगते , आई सरताज ला. सरताज भडकतो. तो बाहेरगावी असतो. इकडे करीनाच mba करून संपत वाटत , म्हणून ती ब्यागा भरून लंडन ला जायला निघते, आणि लवली ला सांगते कि मला स्टेशन ला भेट म्हणजे मी कोण आहे हे तुला कळेलच. पण सलमानच्या मोबिल वर सरताज चा फोन येतो हि फोन उचलते, पण काही बोलायच्या आधीच सरताज याला घाल घाल शिव्या घालून मोकळा होतो, आता हिला कळत कि बापाला सर्व कळलेलं आहे , आता काय करायचं ब्वा ? या विचारात असताना म्हात्रे परत सर्व शक्तीनिशी करीनावर तुटून पडतो , हि पळत पळत कुठल्या तरी खंडर मध्ये जाते.. आता तिथे आसपास राजस्थानी खंडर कुठून आलं असा क्षुद्र विचार माझ्या मनात डोकावून गेला पण असो, मागोमाग सलमान धावत तिला वाचवायला येतो, आता फुल फिल्मी सेट, खाली पाणी साचलंय. सलमान च्या डोळ्यात माती गेल्याने तो डोळे मिटूनच (?) सर्वांना झोडपून काढतोय परत घमासान, शेवटी फक्त मेन म्हात्रे आणि त्याचा साथीदार (महेश मांजेरकर) उरतात . मांजेरकर बाजूला करीनाला घेऊन उभा आणि तात्पुरत्या आंधळ्या सलमानला म्हणतो, एक मे तुम्म्पे एहसान करता हु, याहासे जाने देता हु (आता मगास पासून सलमान च्या जीवावर ५० जण उठलेले असताना , आता कीस खुशिमे हे एहसान असा प्रश्न पडलेला असताना, मला लगेच त्याच उत्तर मिळाल ) "मुझपर एक एहसान करना कि मुझपर कोई एहसान ना करना" .. इति सलमान (ओक्के हि टुकार पंच लाईन मारायची होती म्हणून आधीचा डायलॉग , मी पण ना.. मंदच आहे) इकडे पांचोली रागाने एक पाण्याचा पाईप तोडतो. आणि सलमान वर फुल प्रेशर ने पाणी मारतो, त्या पाण्यामुळे सलमान चा शर्ट हळू हळू ....................................... येस you are right !!!! ज्या क्षणासाठी समस्त स्त्री वर्गाने १२० ची पावती फाडली होती तो क्षण आला. सलमान च्या उघड्या अंगाच दर्शन. त्याच्या "6 packs abs " कॅमेरा नुसता गरा गरा ३६० अंशात फिरतोय, सलमान च्या डोळ्यातून अंगारे .. इकडे आनंदाने चीर्कून बेभान झालेल्या मुली, आणि आमच्या टीम मधल्या काकवा.. आणि हे सर्व हतबुद्ध पण पाहणारा मी ... !!!! असो.. तर यथावकाश शेवटचा म्हात्रे पण संपतो. हा करीनाला सोडवून बाहेर येतो, तर बाहेर सरताज परत याला चोप्तो, मग करीना मध्ये पडून सांगते कि ती मुलगी मी नव्हे याच प्रेम कोणी दुसरच आहे, याला स्टेशन वर जौंद्या मग सरताज सलमान ला सोडतो. हा धावत स्टेशन वर जातो, स्टेशन कुठलं तर "पुणे" वा वा पण सरताज त्याच्या मागे एक गुंड पाठवतो आणि सांगतो जर याला कुठली मुलगी दिसली नाहि तर खपवून टाक इकडे करीना धावत घरी येऊन तिच्या मैत्रिणीला सर्व सांगते , आणि सांगते कि तू आत्ताच्या आता स्टेशन ला जा आणि त्याला संग कि छाया म्हणजे मीच आहे. ती मैत्रीण सुसाट पळत स्टेशन गाठते, त्याने आधी छाया कोण हे बघितलेलं नसल्याने , त्याला वाटत तीच आहे, तो तिला मिठी मारतो, इकडे गुंड पण सर्व ओके म्हणून सरताज ला फोन लावतो.. पण पण... पुढे काय ??? हे तर तुम्हाला जाऊनच बघायला हव ;) पिक्चर मधली गाणी बरी आहेत सलमान त्याच्या युनिफोर्म मध्ये कडकच दिसतो करीना तर अहाहा .. आणि चक्क तिला अभिनयाची संधी दिलेली आहे, आणि तिने तिचं सोन केल आहे ती जब वे मेट नंतर याच्यात खूपच सुंदर दिसली आहे असो मी चित्रपटाला २ स्टार देईन . बाकी तुम्ही हुशार आहातच :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18975 वाचन

💬 प्रतिसाद (114)

प्रतिक्रिया

आवडले परीक्षण

कुंदन
Sun, 09/04/2011 - 12:34 नवीन
आवडले परीक्षण. टी व्ही वर येईल तेंव्हा बघितला जाईल.
  • Log in or register to post comments

बघायचा मुड नव्हताच, आता हे

सुहास झेले
Sun, 09/04/2011 - 12:36 नवीन
बघायचा मुड नव्हताच, आता हे परीक्षण वाचून तर चुकूनही नाही... मस्त लिहिलंय !! :) :)
  • Log in or register to post comments

सलमानचे पिक्चर तसेही लई भारी

अन्या दातार
Sun, 09/04/2011 - 13:02 नवीन
सलमानचे पिक्चर तसेही लई भारी म्हणावे असे नसतातच. कधीतरी अगदीच काही बघायला नसलं की बघतो. हा पण त्याच पठडीतला. टीव्हीवर गाजावाजा करत येईलच लग्गेच तेंव्हा बघितला तर बघु म्हणे ;)
  • Log in or register to post comments

मेल्या, तब्येतीला झेपतील असेच

बिपिन कार्यकर्ते
Sun, 09/04/2011 - 13:12 नवीन
मेल्या, तब्येतीला झेपतील असेच सिनेमे बघत जा रे... तुला लेका नुसत्या मारामारीच्या सीनमुळेही दुखापत व्हायची! मग कोण जबाबदार? ऑं? आणि हतबुद्ध वैग्रे नाही व्हायचं हां! मुलींना का मन नसतं? त्यांना का भावना नसतात? त्या का माणूस नाहीत? तुझी अशी मतं पाशवी ग्यांगला कळली तर सलमान काय करेल अशी धुलाई करतील तुझी!
  • Log in or register to post comments

"मेल्या, तब्येतीला झेपतील

शैलेन्द्र
Sun, 09/04/2011 - 21:14 नवीन
"मेल्या, तब्येतीला झेपतील असेच सिनेमे बघत जा रे... तुला लेका नुसत्या मारामारीच्या सीनमुळेही दुखापत व्हायची! " +१११ बाकी लेख मस्त झालाच आहे.. हे वे सा न ल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

"मेल्या, तब्येतीला झेपतील

शैलेन्द्र
Sun, 09/04/2011 - 21:15 नवीन
"मेल्या, तब्येतीला झेपतील असेच सिनेमे बघत जा रे... तुला लेका नुसत्या मारामारीच्या सीनमुळेही दुखापत व्हायची! " +१११ बाकी लेख मस्त झालाच आहे.. हे वे सा न ल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

नुसतं

तिमा
Sun, 09/04/2011 - 13:19 नवीन
उसकी सिर्फ आंखे हि सामनेवाले कि प्यांट गिली कर देती हे नुसतं परीक्षण वाचूनच आमची पँट पाणावली !
  • Log in or register to post comments

कॅमेरा नुसता गरा गरा ३६०

आत्मशून्य
Sun, 09/04/2011 - 13:23 नवीन
कॅमेरा नुसता गरा गरा ३६० अंशात फिरतोय, सलमान च्या डोळ्यातून अंगारे .. इकडे आनंदाने चीर्कून बेभान झालेल्या मुली, आणि आमच्या टीम मधल्या काकवा.. आणि हे सर्व हतबुद्ध पण पाहणारा मी ... !!!!
अत्यंत ज्वलंत चित्रण.. तूमच्या लेखणीमधे दम हाय.. बाकी चित्रपटाविषयी काही बोलण्यासारख नसल्याने......
  • Log in or register to post comments

>>आतमध्ये उपस्थित असलेल्या

अमोल खरे
Sun, 09/04/2011 - 13:25 नवीन
>>आतमध्ये उपस्थित असलेल्या जवळपास ६०% मुली पाहून सलमान चित्रपट मुलं सुद्धा थेटरात येऊन का पाहतात याचा अंदाज आला इकडे आनंदाने चीर्कून बेभान झालेल्या मुली, आणि आमच्या टीम मधल्या काकवा.. आणि हे सर्व हतबुद्ध पण पाहणारा मी ... !!!! >> हॅहॅहॅहॅहॅ....... कडक लिहिलायस. जळजळ पोहोचली. :) आपण दोघे इनो घेऊया.
  • Log in or register to post comments

मेलो...!

प्रशांत
Sun, 09/04/2011 - 13:30 नवीन
आदरणीय सलमान जी खान ........................................मेलो
  • Log in or register to post comments

आदरणीय सलमान जी खान मेलो नाही

अन्या दातार
Sun, 09/04/2011 - 13:41 नवीन
आदरणीय सलमान जी खान मेलो नाही पण हादरलो नक्कीच. त्यामुळे आदरणीय च्या ऐवजी हादरणीय असे वाचले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

हादरणीय साठी १०००+

विनीत संखे
Sun, 09/04/2011 - 15:48 नवीन
हादरणीय साठी १०००+ :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

आदरणीय सलमान जी खान यांचे

प्रचेतस
Sun, 09/04/2011 - 15:52 नवीन
आदरणीय सलमान जी खान यांचे
सलमानजी खान साहेब असा उल्लेख न केल्याबद्दल श्री. स्पा यांचा जाहीर निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनीत संखे

तुमचे परिक्षण आवडले. कालच हा

Mrunalini
Sun, 09/04/2011 - 15:43 नवीन
तुमचे परिक्षण आवडले. :) कालच हा चित्रपट online बघितला.अत्यंत आनंद झाला की १ रुपया पण खर्च झाला नाही. मला समजत नाही, आपल्या कडे काय विचार करुन लोक ह्या movie ला सुपरहिट करतात.
  • Log in or register to post comments

क ड क

प्रचेतस
Sun, 09/04/2011 - 15:50 नवीन
लैच कडक परीक्षण स्पावड्या. वाक्या वाक्यागणिक हसत होतो. पिच्चर आता टीव्हीवर आल्यावरच बघितल्या जाईल. रेडी सारखा भयाण चित्रपट पाहण्यासाठी अस्मादिकांनी १८० रू घालवले होते त्याची कटू आठवण या निमित्ताने झाली. :(
  • Log in or register to post comments

मी २२० रुपडे टाकून पिक्चर पाहिला..

मी-सौरभ
Sun, 09/04/2011 - 16:53 नवीन
त्यात पण १ तास फोन वर हापिसातल्यानी वैताग आणला होता.. पण पिच्चर पक्का सलमानटाईप होता :)
  • Log in or register to post comments

रजनी अण्णांची पोकळी

प्रियाली
Sun, 09/04/2011 - 17:02 नवीन
रजनी अण्णाची पोकळी कोण भरून काढेल हा प्रश्न सल्लूने पुढल्या १० वर्षांपर्यंत तरी सोडवला आहे.
कॅमेरा नुसता गरा गरा ३६० अंशात फिरतोय, सलमान च्या डोळ्यातून अंगारे .. इकडे आनंदाने चीर्कून बेभान झालेल्या मुली, आणि आमच्या टीम मधल्या काकवा.. आणि हे सर्व हतबुद्ध पण पाहणारा मी ... !!!!
छे! छे! अजून चिंगम नाही पाहिला, त्यावर हा आणखी एक. कहर हो! ;) बाकी, परीक्षण आवडले. ठेतर, दय्लोग, बब्र्या वगैरे शब्द तर खासच.
  • Log in or register to post comments

मस्त परीक्षण... एकदम

धन्या
Sun, 09/04/2011 - 17:06 नवीन
मस्त परीक्षण... एकदम रीयालिष्टीक, पुर्वग्रहवेग्रे बाजूला ठेवून केलेले असे... असो... हापिसातला कुणीतरी नाईट शिप्टमध्ये पाहायला म्हणून आणेलच... मग आम्ही पेन्ड्रायिववर कॉपी करुन नेउ घरी...
  • Log in or register to post comments

आमाला याची थेटरप्रिंट

पाषाणभेद
Sat, 09/10/2011 - 06:07 नवीन
आमाला याची थेटरप्रिंट मिळाल्येली हाय. उद्यापरवा निवांत बगू. बा़की आमाला रडारड, सामाजीक आशय, कलात्मक आसले पिच्चर आजाबात आवडत न्हाय. त्यामुळं हाबी आवडलंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

परीक्षण लिहिण्याची स्टाईल

अप्पा जोगळेकर
Sun, 09/04/2011 - 17:31 नवीन
परीक्षण लिहिण्याची स्टाईल आवडली. बाकी पिक्चर एकदम भारीच. एकदम पैसे वसूल. रजनीकांतच करिअर उतरणीला लागणार असं वाटतय. फाईटिंग सिकवेन्स ट्रान्सपोर्टर सारखे वाटले.
  • Log in or register to post comments

झकास लेखन

सोत्रि
Sun, 09/04/2011 - 19:36 नवीन
लेखन झक्कास! पण स्पावड्या, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवसाचे कलेक्श्न झाले 20 कोटी (त्याला तुझ्या 120 रुपड्यांचा हात्भार लागला आहे) त्यामुळे 'सलमान जी खान' यांच्या शिनेमाच्या कलेक्शन वर तु दिलेल्या "2 स्टार" परिक्षणाने काहीही फरक पड्णार नाही :lol: - (सलमान जी खान ह्यांच्या 6 पॅकचा चाहता) सोकाजी
  • Log in or register to post comments

हा हा हा

स्मिता.
Mon, 09/05/2011 - 13:26 नवीन
परिक्षण आवडले रे स्पा! तेच वाचून लग्गेच पिच्चर डाउनलोड करून बघितला. तो ओव्हरहेड वायरला धरून उडी मारायचा सिन बघून वेड्यासारखी हसले. तसेच तो करिनाच्या क्लासरूममधला सिन सांगायचा होता रे... तो पण भारी आहे. बाकी शेवटाकडे जाताना चित्रपट चढत्या क्रमाने रटाळ होत गेला. आपल्याकडे असले टुकार चित्रपट सुपरहिट्ट का होतात हे काही कळलं नाही. याच्यापेक्षा मला सिंघम बरा वाटला होता.
  • Log in or register to post comments

मस्तच

जाई.
Sun, 09/04/2011 - 20:31 नवीन
धमाल परीक्षण आहे. आता पिक्चर डाउनलोड करुनच बघितला पाहिजे. भले मैत्रिँणीचा आग्रह मोडावा लागला तरी चालेल. मेरे पैसे बचाकर मुझपे एहसान कर दिया.
  • Log in or register to post comments

''आदरणीय सलमान जी खान'',

५० फक्त
Sun, 09/04/2011 - 22:30 नवीन
''आदरणीय सलमान जी खान'', स्पावड्या तुला सलमान, जी (स्त्रीलिंगी अर्थाने) खान, असं काही लिहायचं होतं का ? असो, असा ही हा चित्रपट अंडरवेअरच्या जाहिरातीसाठी वापरला जात असल्याने पाहण्याचा काही संबंधच नव्हता, आणि आता तर छे नकोच, उगा कशाला रिस्क घ्या नसत्या. स्पावड्या चित्रपट परिक्षणं करायला लागलेला पाहुन बरं वाटलं, भेळ ते चित्रपट परिक्षण व्ह्याया सज्जनगड, चांगला प्रवास आहे सगळा., ब-याच वेगवेगळ्या क्षेत्रात गळ टाकुन ठेवलेले दिसत आहेत. लागेलच एखादी मासोळी गळाला. असो, आपण टाकाउ धाग्याचे बाजार उठवता हे माहित आहे, पण आता तुमच्या बॅटच्या पट्टित टाकाउ पिक्चर पण आले काय, ?
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो...

किसन शिंदे
Mon, 09/05/2011 - 09:03 नवीन
स्पावड्याची चौफेर फटकेबाजी चाललीय... मस्त लिहलयं चित्रपट परिक्षण... बघायची तशीही इच्छा नव्हतीच आणी आता तर कोणी फुकट जरी घेऊन गेलं तरी पण बघणार नाही. अवांतर: शाळा कधी येतोय कुणास ठाऊक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

शाळा कधी येतोय कुणास

सुहास झेले
Mon, 09/05/2011 - 10:30 नवीन
शाळा कधी येतोय कुणास ठाऊक?
ऑक्टोबरमध्ये .... :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

नक्की ऑक्टोबर का?

धमाल मुलगा
Wed, 09/14/2011 - 14:07 नवीन
गेल्या वर्षी मी प्रोमो पाहिला तेव्हा मे महिन्यात प्रदर्शित होईल असे वाचले होते राव! तेव्हापासून वाट पाहतोच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

आवडलेल्या पुस्तकांवरचे

नगरीनिरंजन
Wed, 09/14/2011 - 14:11 नवीन
आवडलेल्या पुस्तकांवरचे चित्रपट पाहू नयेत असा आमचा फुकट प्रेमाचा सल्ला घेऊन त्यावर विचार करावा ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

खरंय भौ!

धमाल मुलगा
Wed, 09/14/2011 - 14:24 नवीन
पण च्यायला, ते प्रोमो पाहून तरी असं वाटतंय की गंडणार नाही. सिनेमातली क्यारेक्टरं, पुस्तकातल्या क्यारेक्टरांशी खूपच साधर्म्य दाखवणारी वाटली. शिवाय सत्तरीतलं वातावरणही उभं करण्यात बरंच यश आलेलं दिसतंय. म्हणून उत्सुकता हों! नायतर पुस्तकांवर बेतलेल्या सिनेमांचे बरेचसे अनुभव एकुणातच अपेक्षाभंग करणारे ठरले आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

+१०० टु ननि, पुस्तकात लेखक

५० फक्त
गुरुवार, 09/15/2011 - 08:08 नवीन
+१०० टु ननि, पुस्तकात लेखक लिहुन जे चित्र उभं करतो ते पडद्यावर उभं करणं फार अवघड असावं किंवा दोन वेगवेगळ्या पद्धती असल्यानं हा फरक असावा. अशा बाबतीतला माझा एकच अनुभव आहे तो, दा विंची, आधी पुस्तक वाचलेलं नंतर चित्रपट पाहायला गेलो आणि अर्ध्यातुनच निघुन आलो. बाकी, शाळाच्या प्रोमो मध्ये अम्रुता खानविलकर काय जबरा दाखवलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मीसुद्धा हा चित्रपट काल

प्रीत-मोहर
Sun, 09/04/2011 - 22:43 नवीन
मीसुद्धा हा चित्रपट काल ऑनलाईन पाहिला. स्पा परिक्षण मस्तच :) ह्यावर श्री. श्री. श्री. आदिमहाराज जोशी ह्यांची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक -प्रीमो
  • Log in or register to post comments

काल रात्रीच हा शिनेमा थेट्रात

रेवती
Sun, 09/04/2011 - 23:14 नवीन
काल रात्रीच हा शिनेमा थेट्रात जाऊन पाहिला आणि नवरा परिक्षण लिहिणार होता........तू लिहिलस ते बरं झालं. त्याचं काम कमी झालं. आत्ता वेळ नाहिये नंतर जमल्यास मोठा प्रतिसाद लिहीन. तेरी मेरी हे गाणं ठेक्यामुळे आवडलं. दोन तीन दिवसात विसरायला होणार आहे.
  • Log in or register to post comments

साठ टक्क्यांचं थोडं ओघवतं वर्णन

सूड
Sun, 09/04/2011 - 23:48 नवीन
>>तेंव्हा आतमध्ये उपस्थित असलेल्या जवळपास ६०% मुली पाहून सलमान चित्रपट मुलं सुद्धा थेटरात येऊन का पाहतात याचा अंदाज आला या साठ टक्क्यांचं थोडं ओघवतं वर्णन आलं असतं तर परीक्षणाला निरीक्षण पूरक ठरून चार चाँद का काय म्हणतात ते लागले असते. ( 'आखिरकार' आम्हाला पण हिंदी वाक्प्रयोग करता येऊ लागले तर !! येथे स्वतःचीच पाठ थोपटल्याचा स्मायली कल्पावा. ) ;) स्पाकाका तुमचे धागे शतकी होतातच, हाही होईल. त्यामुळे विनाकारण शुभेच्छा वैगरे देत नाही.
  • Log in or register to post comments

>>स्पाकाका तुमचे धागे शतकी

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 09/06/2011 - 15:19 नवीन
>>स्पाकाका तुमचे धागे शतकी होतातच, हाही होईल. त्यामुळे विनाकारण शुभेच्छा वैगरे देत नाही. शुभेच्छा नको रे, एक नजररक्षा यंत्र दे. त्याला त्याची गरज आहे. ;-) बाकी, लेख मस्तच रे. एकदम झकास....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पण

मी-सौरभ
Sat, 09/10/2011 - 00:16 नवीन
>>शुभेच्छा नको रे, एक नजररक्षा यंत्र दे. त्याला त्याची गरज आहे. ते यंत्र फार जड नाही ना ह्याची खात्री करून घ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

पुरुषप्रधान संस्कृतीत असे अन्याय होतच राहणार

चित्रगुप्त
Mon, 09/05/2011 - 03:55 नवीन
छान. .........................ज्या क्षणासाठी समस्त स्त्री वर्गाने १२० ची पावती फाडली होती तो क्षण आला. सलमान च्या उघड्या अंगाच दर्शन. त्याच्या "6 packs abs " ....... इकडे आनंदाने चीर्कून बेभान झालेल्या मुली, आणि आमच्या टीम मधल्या काकवा...... अरे व्वा ... ..... पण त्या करीनाला असले काही का सुचू नये ? जिथे तिथे पुरुषांनीच का बाजी मारायची ? स्त्रियांना का मन नसते, तन नसते? .... पुरुषप्रधान संस्कृतीत असे अन्याय होतच राहणार, असे खेदाने म्हणावे लागते, दुसरे काय?
  • Log in or register to post comments

सहमत..सहमत ...सहमत!!!

धमाल मुलगा
Wed, 09/14/2011 - 14:06 नवीन
अशा वेळी मात्र सोयीस्कररित्या समान हक्क, पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन बरोबरीनं वागणं वगैरे विसरलं जातं नै का हो ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अतीशय 'प्रसन्न' परीक्षण केले आहेस. वाचायला जाम मजा आली.

सुधीर काळे
Mon, 09/05/2011 - 09:38 नवीन
स्पा, अतीशय 'प्रसन्न' परीक्षण केले आहेस. वाचायला जाम मजा आली. असेच लिहीत जा. या सिनेमाबद्दल नव्हे पण सलमानबद्दलची एक मनातली मळमळ लिहितो. कदाचित् तुम्हा तरुण मंडळींना आवडणार नाहीं. सलमान हा गुन्हेगार आहे, त्याला एका खटल्यात (चिंकारा मारल्याबद्दल) तुरुंगवासाची शिक्षासुद्धा झालेली आहे. आता अपीलावर तो मुक्त आहे (म्हणे). त्या अपीलाचे काय झाले, ते सुनावणीला कां येत नाहीं याबद्दल कांहींच माहीत नाहीं. (असल्यास द्यावी) त्याशिवाय तो गाडी चालवत असताना त्याने फूटपाथवर झोपलेल्या कांहीं लोकांना जिवे मारले आहे. शेजारी त्याचा 'बॉडीगार्ड' म्हणून दिलेला एक पोलीसही बसला होता. तो साक्षीदारही (eye witness) आहे. त्या खटल्याचेही पुढे काय झाले हे कळले नाहीं. या खेरीज त्याच्या अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या अनेक बातम्याही वाचण्यात आल्या आहेत. इंटरनेटवर याबद्दल खूपच माहिती आहे. कायद्याच्या प्रक्रियेबद्दल आपल्या मनात कांहींही असो, पण आपण बोलू शकत नाहीं. पण या सर्व केसेस संपेपर्यंत आपण त्याचे सिनेमे पहाणे बंद करू शकतो (जसे मी केले आहे!) कारण असे न केल्यास या गुन्हेगारांना काय फरक पडतो? पहा, जसे पटेल तसे प्रत्येकाने करावे.
  • Log in or register to post comments

त्याशिवाय तो गाडी चालवत

मराठी_माणूस
Mon, 09/05/2011 - 14:36 नवीन
त्याशिवाय तो गाडी चालवत असताना त्याने फूटपाथवर झोपलेल्या कांहीं लोकांना जिवे मारले आहे. शेजारी त्याचा 'बॉडीगार्ड' म्हणून दिलेला एक पोलीसही बसला होता. तो साक्षीदारही (eye witness) आहे. त्या खटल्याचेही पुढे काय झाले हे कळले नाहीं. ह्या पोलिसाने त्याच्याविरोधि साक्ष दिलि होति. मधे पेपर मधे असे वाचले होते कि तो काही दिवस सातार्‍याला होता मग परत मुंबईमधे आला, त्या दिवसात तो भ्रमिष्टा सारखा वागत होता , नंतर त्याचा अंत अत्यंत दारुण स्थितीत झाला. त्याच्या अशा स्थीतीला हा खटला कारणीभुत होता. बाकी तुमच्या वरच्या प्रतीक्रीयेशी पुर्ण सहमत . त्याचा सिनेमा न बघणे असे काही होणार नाही , तेव्हढी संवेदनशीलता आता कुठे आहे. त्याचे उघडे होणे आणि लोकांचे किंचाळणे चालुच राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

सहमत

तिमा
Mon, 09/05/2011 - 16:25 नवीन
सुधीर काळ्यांशी सहमत. माझ्या काळ्या यादीत तर संजय दत्त या गुन्हेगाराचे पण नांव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

सहमत

बोका
Mon, 09/05/2011 - 20:42 नवीन
काळे आणि तिरशींगरावांशी सहमत. मी सलमान व संजय दत्त या दोघांचे चित्रपट टि. व्ही. वर सुध्दा पहात नाही. मिपावरील परीक्षणे मात्र वाचतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

ओ मंडळी...

धन्या
Mon, 09/05/2011 - 21:34 नवीन
सलमान खान जी साहेबांबद्दल काहीही बोलू नका. झालं गेलं गंगेला मिळालं. आता ते एकदम संत वगैरे झाले आहेत. तुम्ही बीईंग ह्युमन टी शर्ट कँपेनबद्दल वाचत नाही काय? की ही मळमळ सलमान खान जी साहेबांनी ह्युमन टी शर्ट कँपेन सुरु करताना जे चित्रतारकांना मंचावर बोलावले त्याबद्दल आहे? तसे असेल तर चालू दया तुमचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका

आपल्याला बुवा सल्लुभाई

वपाडाव
Tue, 09/06/2011 - 16:25 नवीन
आपल्याला बुवा सल्लुभाई आडौतो.... त्याची दर्यादिली आडौते.... माणुस म्हणुन तो खुप छान आहे... पण साला त्याला GF तिकवुन नाय ठेवता येत.... पण पिच्चर लैच ************* दर्जाचा होता.... सल्लुभाई आम्ही पाहतो म्हणुन काहीही दाखवणार काय? (******च्या जागी जेवढ्या शिव्या माहिती असतील त्या द्याव्यात)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हा चित्रपट अगदी बघणारच होतो

गवि
Mon, 09/05/2011 - 09:47 नवीन
हा चित्रपट अगदी बघणारच होतो (दुसरा कोणता बरा शो त्यावेळी नसल्याने) पण ऐनवेळी माझ्या आतल्या आवाजाने मला वाचवलं. मी बेत रद्द केला. स्पावड्याने माझ्या आतल्या आवाजावर शिक्कामोर्तब केलं आहे.. धन्यवाद..
  • Log in or register to post comments

म्हणजे तुमचा

चतुरंग
Mon, 09/05/2011 - 10:08 नवीन
'आतला आवाजच' तुमचा गार्ड आहे म्हणा की! ;) (बाहेरचा आवाज) रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

'आतला आवाज' लई कामाचा असतोय्!

सुधीर काळे
Mon, 09/05/2011 - 10:52 नवीन
'आतला आवाज' लई कामाचा असतोय्!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सलमान हा माझा नावडता बुवा

रेवती
Mon, 09/05/2011 - 10:19 नवीन
सलमान हा माझा नावडता बुवा आहे. या चित्रपटाला मी कधीही गेले नसते पण सुट्टीला आलेल्या सतरा वर्षाच्या पुतण्याने "काकू जाऊया की." म्हटल्याने सगळेजण गेलो. यामध्ये एक्सपेक्टेड असलेली गोष्टी म्हणजे सलमानने शर्ट न घालणे. करिनाचा अभिनय गेल्या दोनेक वर्षात चांगला वाटायची शक्यता निर्माण झाली आहे. चांगली दिसलीच आहे पण मध्येच थकलेली वाटली. कथेला शेवटी चांगला ट्वीस्ट आहे. तेरी मेरी, मेरी तेरी प्रेमकहानी हे गाणं पडद्यावर वाजत असताना माझ्या पुढच्या रांगेतील पाच सहा लोकांनी टाळ्यांनी चांगला ताल धरला होता. करीनाचे कमी कपडे पाहून त्यांनी शिट्ट्या मारल्या म्हणून माझा मुलगा जरा कन्फ्युज झाला.;) शिनेमाला इंग्रजी सबटायटल्स असल्याने मुलाला सांभाषण बर्‍यापैकी समजत होते. त्यात पँट गीली असा काहीतरी डायलॉग आल्यावर खी खी करून हसत होता. शेवटच्या मारामारीत रिमोट कंट्रोल हेलिकॉप्टरचा प्रकार आवडला. हिरव्या देशात थेट्रात गर्दी करून पब्लिक सिनेमे पाहतं हे निदान आम्हाला तरी माहीत नव्हतं ते पहायला मिळाल्याने आश्चर्य वाटल्या गेलं आहे.
  • Log in or register to post comments

सहाजिक आहे...

धमाल मुलगा
Wed, 09/14/2011 - 14:04 नवीन
करिनाचा अभिनय गेल्या दोनेक वर्षात चांगला वाटायची शक्यता निर्माण झाली आहे. चांगली दिसलीच आहे पण मध्येच थकलेली वाटली.
न जमणारी गोष्ट करण्याचा फार प्रयत्न केला की एकदम थकायला होतंच. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हा हा हा खरं आहे.

रेवती
Wed, 09/14/2011 - 19:56 नवीन
हा हा हा खरं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कडक परीक्षण!

समीरसूर
Mon, 09/05/2011 - 10:29 नवीन
स्पासाहेब, एकदम कडक परीक्षण!!! वाचूनच चित्रपट बघण्याचा आनंद मिळाला. तसाही थिएटरात जाऊन हा चित्रपट बघणारच नव्हतो; आता तर नाहीच नाही. :-) बाकी लेकीबाळींना सलमान खूप आवडतो हे मात्र खरे आहे. अशाच आनंदाने चेकाळून किंचाळणार्‍या पोरी मी 'दोस्ताना' नामक मानवी भावभावनांचा आलेख समर्थपणे दाखवणार्‍या चित्रपटादरम्यान पाहिल्या होत्या. जॉन अब्राहम जेव्हा समुद्रकिनार्‍यावर उघड्याबंब अवस्थेत आपली चड्डी थोडी खाली-वर करतो तेव्हाचा गोंधळ अवर्णनीय होता. जॉन अब्राहमचे चित्रपट चालत नाहीत परंतु तो मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे असे कळते. सलमानची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. 'बॉडीगार्ड'ने म्हणे प्रदर्शित दिवसाच्या उत्पन्नाचे सगळे विक्रम मोडले आहेत. पुण्यात सकाळी सात वाजताचे सगळे खेळ हाऊसफुल्ल होते. एकूण १६ कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने पहिल्या १-२ दिवसात कमावला. एकूण १२०-१२५ कोटींचा गल्ला या चित्रपटामुळे जमेल असा तज्ञांचा अंदाज आहे. म्हणजे आतापर्यंतचे चित्रपटाच्या बॉक्सऑफीस उत्पन्नाचे सगळे विक्रम हा चित्रपट मोडीत काढेल असे दिसते. बाकी टीव्ही राईट्स, म्युझिक राईट्स, रिंगटोन्स, कॉलरट्युन्स, पेड चॅनल राईट्स, ईत्यादी माध्यमांतून किती पैसा गोळा होईल याचा अंदाज सुद्धा करवत नाही. हा सलमान म्हणे एका चित्रपटाचे ५० कोटी इतके मानधन घेतो. शुद्ध व्यावसायिक दृष्टीकोनातून विचार केल्यास त्याने इतके पैसे का घेऊ नये असा प्रश्न पडतो. आज त्याच्या नावावर चित्रपट चालतात. निर्माते, दिग्दर्शक, नट-नट्या, तंत्रज्ञ, थिएटरचालक, मालक, वितरक, म्युझिक कंपन्या, ईत्यादी सगळ्यांना सलमानच्या चित्रपटांमुळे दणकून फायदा होतो. आज या चलतीचा फायदा करून घेणे हे एक व्यावसायिक म्हणून खचितच उचित ठरते. शिवाय अप्रत्यक्षपणे कितीतरी लोकांना त्याच्या चित्रपटाच्या यशाचा फायदा होतो. एकपडदा चित्रपटगृहात हाऊसफुल्लचे बोर्ड लागतात तेव्हा त्या चित्रपटगृहातल्या कर्मचार्‍यांच्या रोजगारावर काहीकाळापुरती का असेना पण कुर्‍हाड कोसळणे टळते. अप्रत्यक्षपणे कितीतरी लोकांना पैशाच्या स्वरूपात मदत होते. सलमान खान हे एक अजब रसायन आहे. एक सच्च्या हृदयाचा पण अनेक ठिकाणी चुकलेला, सरळसोट वागणारा, कुठेही आणि कधीही अभिजातपणाचा, बुद्धीमानतेचा अभिनिवेश न बाळगणारा असा दिलदार सलमान त्याने निर्माण करून ठेवलाय जो हिंदी चित्रपटांच्या तथाकथित नायकांच्या प्रतिमेशी खूप जास्त प्रमाणात साम्य दाखवतो. सत्तर-ऐंशीच्या दशकातले नायक अन्यायग्रस्त असत म्हणून ते वाईट मार्गाला लागत परंतु त्यांच्या आतला सच्चा माणूस ते मरू देत नसत. अमिताभचा 'दीवार'मधला गुन्हेगार नायक, 'शोले'मधले वीरू-जय अशी जी नायकांची भावूक, गुन्हेगार पण त्याचबरोबर सहृदय माणूस म्हणून प्रतिमा हिंदी चित्रपटांनी पोसलेली आहे तिच प्रतिमा सलमानने जाणते किंवा अजाणतेपणी धारण केलेली आहे. सामान्य जनता अशा नायकांना डोक्यावर चढवते. शिवाय त्याची टणक बॉडी, पडद्यावरचा त्याचा करिष्मा या गोष्टींमुळे त्याच्या प्रतिमेला पोषक अशी दुसरी अन्यायाला झोडपून काढणारी प्रतिमा निर्माण झालेली आहे. सलमानचे आजचे यश त्याच्या या दुहेरी प्रतिमेत दडले आहे असे मला वाटते. अमिताभला या प्रतिमेचा फायदा झाला (रेल्वे स्थानकावर आलेला, हरलेला अमिताभ, नंतर प्रकाश मेहरांनी बोलावून घेतले; ही गोष्ट खूप प्रसिद्ध झाली. नंतर रेखासोबतचे अयशस्वी प्रकरण, कुलीचा जीवावर बेतणारा अपघात, ईत्यादी). संजय दत्तला या प्रतिमेचा फायदा झाला (ड्रग्ज, एके ४७, तुरुंगातले दिवस, कोर्टकचेर्‍या ईत्यादी) आणि 'खलनायक', 'वास्तव'चा काळ त्याने गाजवला. शाहरूख खानचे आजकालचे चित्रपट त्यामानाने इतके चालत नाहीत. 'डॉन', 'रब ने बना दी जोडी' किंवा 'माय नेम इज खान' या चित्रपटांना असे दणदणीत यश मिळाले नाही. त्याला आपली सलमानसारखी प्रतिमा निर्माण करणे जमले नाही. फर्ड्या इंग्रजीमध्ये बोलणारा, सतत उच्चभ्रू वर्तुळात वावरणारा, चोप्रा, जोहर कँपातला मनोहारी प्रणयकथांमध्ये रमणारा शाहरूख या बाबतीत कमी पडला. सलमानच्या यशापुढे 'आरए १' ची दाळ कितपत शिजेल ही एक शंकाच आहे. माझ्या अंदाजाने 'आरए १' चित्रपट एकतर साफ कोसळेल किंवा अगदीच जेमतेम चालेल. तसेही त्याचे काही चित्रपट मारून-मुटकून हिट कॅटेगरीत ढकलल्याची उदाहरणे बरीच आहेत. असो. समीर
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा