Skip to main content

शाबासकी आणि निर्भत्सना

सुधीर काळे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
शाबासकी आणि निर्भत्सना! (कामरान शफी या स्तंभलेखकाने लिहिलेला हा लेख काराचीहून प्रसिद्ध होणार्‍या 'डॉन' या वृत्तपत्रात २३ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाला. तो मला खूप आवडला म्हणून तो लेख मी शफीसाहेबांची आणि 'डॉन'ची रीतसर परवानगी घेऊन इथे अनुवादित केलेला आहे. शफीसाहेबांना या लेखाला आलेल्या आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल खूप उत्सुकता आहे.) गेल्या आठवड्यात एका भाषणात नवाज शरीफ यांनी धीटपणे भारताशी शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या धोरणाचे जोरदार समर्थन केले त्यासाठी त्यांची खरंच मनापासून प्रशंसा केली पाहिजे. हे भाषण त्यांनी लाहोर येथे योजिलेल्या ‘Building bridges in the subcontinent’ या विषयावरील एका परिसंवादात केले. दुसर्‍या बाजूला झोंबणार्‍या मुलाखती घेण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या एका स्त्री-वार्ताहराने एका खासगी चित्रवाणीच्या वाहिनीवरून एका लाल टोपी वापरणार्‍या गृहस्थाची मुलाखत घेतली. (कांहीं कारणास्तव शफीसाहेबांनी या तिघांची नांवे घेतलेली नाहींत) पाकिस्तान आहे तसाच रहावा असे वाटणार्‍या लष्करशहांचे समर्थन करणार्‍या या पाहुण्याची करावी तितकी निर्भत्सना कमीच पडेल. (या लेखात सर्व ठिकाणी लष्करशहांसाठी मूळ लेखकाने Deep State हे शब्द वापरलेले आहेत) या मुलाखतीत हा परिसंवाद योजणार्‍या "South Asian Free Media Association (Safma)" या संस्थेवर सामान्यत: आणि भारताच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे करण्याचे समर्थन करणार्‍या नवाज शरीफ यांच्यावर विशेष करून यथेच्छ तोंडसुख घेण्यात आले. मुलाखत घेणार्‍या वार्ताहरबाईंनी फक्त माजी पंतप्रधानांचेच चारित्र्यहनन केले असे नाहीं तर आजच्या राष्ट्राध्यक्षांवरही तोंडसुख घेतले कारण कांहीं वर्षांपूर्वी राष्ट्राध्यक्ष झाल्याबरोबर त्यांनीसुद्धा "भारत हा आपल्या देशाला असलेला मुख्य धोका नसून आपले खरे शत्रू देशांतर्गतच आहेत" असे उद्गार काढले होते. भारताशी शांती प्रस्थापित करण्याची सूचना म्हणजे देशद्रोह आहे असे केले गेलेले प्रतिपादन (कारण तसे म्हणणे "द्विराष्ट्रवादा"विरुद्ध होते) आणि आतापर्यंतच्या पाकिस्तानी लष्करशहांनी पाकिस्तानच्या सर्वात महत्वाच्या शेजारी राष्ट्राशी असलेल्या संबंधाबद्दल केलेल्या भाष्यांच्याही विरुद्ध होते. हे दोन मुद्दे कुणालाही संताप आणणारेच होते. कामरान शफी यांनी ते भाषण पूर्णपणे ऐकले आणि ते त्यांना अतीशय आस्थापूर्ण, प्रामाणिक आणि अस्सल देशी विनोदाने नटलेले वाटले. ते ऐकून या परिसंवादात भाग घेणारे भारतीय सदस्य एकदम खुष झाले. शरीफ यांनी स्वत: अटल बिहारी वाजपेयींना लाहोरला बोलावून मीनार-इ-पाकिस्तान येथे दोन्ही देशांत शांतीपूर्ण आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत व त्यांच्यात समेट व्हावा म्हणून एक मैत्रीपूर्ण भाषण केले होते. दुर्दैवाने त्यावेळी त्यांच्याच लष्करप्रमुखाने गुपचुपपणे कारगिलचे अविचारी आणि अक्कलशून्य दुस्साहस सुरू करून सलोखा करायला आणि शांतिपर्व सुरू करायला आलेल्या वाजपेयींच्या पाठीत सुरा खुपसला होता. नवाज हे चांगले जाणतात कीं दोन्ही देशांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पाकिस्तानला किंवा भारताला शांतीशिवाय आणि परस्पर मैत्रीशिवाय दुसरा पर्यायच नाहीं. या सर्व दृष्टीकोनातून या ठिकाणी नवाजसाहेबांनी हे भाषण देणे औचित्यपूर्णच होते. खरे तर असे भाषण करण्याचा हक्क फक्त नवाज शरीफनाच आहे कारण कारगिलच्या युद्धात भारत बेसावध पकडला गेला त्याबाबतीत भारत सरकारने अनेक चौकशी-समित्यांतर्फे सखोल अभ्यास करविला पण पाकिस्तानात मात्र "हा हल्ला कां केला गेला" याबद्दल तसेच त्यात झालेल्या पराभवाबद्दल एकही अधिकृत चौकशी करविण्यात आलेली नाहीं. असे असताना त्या स्त्री-वार्ताहराने किंवा तिने ज्या व्यक्तीची मुलाखत घेतली त्यांने इतके आकांडतांडव करण्याची गरजच काय होती? भारत आणि पाकिस्तान शेजारी राष्ट्रे आहेत व त्यांनी एकमेकांना सांभाळून घेतले पाहिजे असे म्हणण्यात नवाज शरीफ यांनी काय चूक केली? आपला धर्म आणि संस्कृतीही आपल्याला हेच तर शिकवतात! भारतीय आणि पाकिस्तानी लोकांच्या संस्कृतीत खूप साम्य आहे, त्यांच्या खायच्या-प्यायच्या संवयीसुद्धा बर्‍याच सारख्या आहेत, या देशांच्यामधील सीमा म्हणजे केवळ जमीनीवरची एक रेषा आहे, भारताने आणि पाकिस्तानने युद्धात वापरायच्या शस्त्रास्त्रांबाबत स्पर्धा न करता ती उद्योग, व्यवसाय व व्यापार या क्षेत्रात करावी असे म्हणण्यातही त्यांचे काय चुकले? "रब-उल-अलिमीन"चा अर्थ सर्व मनुष्यजातीचा देव असा असून सर्व मुसलमानांच देव (रब-उल-मुस्लिमीन) असा नाहींय् हे त्यांचे म्हणणेही बरोबरच आहे. त्या मुलाखतीतील सार्‍या टीकेचा गदारोळ अगदी घृणास्पद असला तरी त्यातला भारतीय आणि पाकिस्तानी खाण्याच्या आवडींच्या साम्यावरील टिप्पणीतील "भारतीयांना जे पूजनीय आहे (गोमाता) तिचेच मांस पाकिस्तानी खातात हा उल्लेख" तर पोट ढवळून काढणारा होता. या लोकांनी भारताला बर्‍याच वर्षात भेट दिलेली नसावी आणि भारतीय हिंदूंशी त्यांचा अलीकडे संबंध आलेला नसावा असे दिसते कारण खाण्यात असलेले इतर साम्य त्यांच्या लक्षात आलेले दिसत नाहीं. मग शफींच्या मनात प्रश्न आला कीं या मुलाखत घेणार्‍या वार्ताहरबाईंनी किंवा त्यांच्या आक्रस्ताळी पाहुण्याने जे सांगितले ते त्यांचे स्वत:चे मत होते कीं ते त्यांच्या "बोलवित्या धन्या"ची-लष्करशहांची-री ओढत होते? या लष्करशहांना भारत हा नेहमीच सर्वात जास्त कट्टर शत्रू वाटत आला आहे आणि पाकिस्तानचे भारताशी शांतीपूर्ण संबंध कधीही स्थापले जाऊ नयेत असेही त्यांना वाटत असते. त्यामुळे जो कुणी या विरुद्ध बोलेल, म्हणजे शांतीपूर्ण संबंध स्थापले पाहिजेत असे म्हणेल, त्याला देशद्रोह्याचे लेबल लावले जाते. येवढेच नव्हे तर या लाल टोपीवाल्या पाहुण्याने आणि अन्वयार्थाने त्या चित्रवाणी वाहिनीने सर्व सावधगिरीचे संकेत बाजूला सारून जाहीर केले कीं SAFMA ही संस्था ’रॉ’ या भारतीय गुप्तहेर संघटनेच्या पैशावर चालते! यावर शफीसाहेब विचारतात कीं नागरिकांनी या लष्करशहांना वारंवार बजावले आहे कीं प्रत्येक घटनेमागे रॉ, मोसाद किंवा CIA आहे असे म्हणणार्‍या आपल्या पित्त्यांना आवरा. या पार्श्वभूमीवर SAFMA वरील हे आरोप म्हणजे परमावधीच झाली असे शफीसाहेबांना वाटते. पाकिस्तानातील ५१ सन्मानित आणि ज्येष्ठ वार्ताहरांनी (आणि वार्ताहरांची संख्या वाढतच चालली आहे) या आरोपाचा निर्भत्सना केली यात नवल ते काय? SAFMAने तर या वाहिनीविरुद्ध, त्या स्त्री-वार्ताहर आणि तिच्या चमूविरुद्ध आणि यांना माहिती पुरविणार्‍या अभ्यासकाविरुद्ध (Analyst) कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिलेली आहे. या खोट्या आरोपांची निर्भत्सना करणार्‍या वार्ताहरांच्या यादीत शफीसाहेब आपलेही नांव घालू इच्छितात. पण केवळ या चमूवर कायदेशीर कारवाई करणे पुरेसे नाहीं तर या कठपुतळ्यांना नाचविणार्‍या त्यांच्यामागच्या लष्करशहांविरुद्ध कारवाई करून त्यांचा चेहरा उघडा करायला हवा असे शफीसाहेबांचे मत आहे.. कारण गैर मार्गाने हडप केल्या गेलेल्या सरकारी पैशावर पोसल्या जाणार्‍या बर्‍याच "कठपुतळ्या" अशी कृष्णकृत्ये करण्यात सामील आहेत. तिरस्कार किंवा हाडवैर निर्माण होईल असे-तेही खास करून भारताविरुद्ध, अमेरिकेविरुद्ध व अर्थातच इस्रायलविरुद्ध असले कार्यक्रम सार्‍या जगासाठी प्रक्षेपित करणे-हेही या कृष्णकृत्यात येते. इंटरनेटवर अशा तर्‍हेची खूप संस्थळे आहेत. हे सर्व झाल्यावर शफीसाहेब शेवटी म्हणतात कीं सर्व (बिगरलष्करी) राजकारण्य़ांनी एकजुटीने राहिले पाहिजे व कृष्णकृत्ये करणार्‍या अशा संस्थांशी एकत्र लढले पाहिजे. नाहींतर एकेकाला गाठून सर्वांचा ही कृष्णशक्ती सर्व सावांचा विनाश करेल. हा लेख श्री कामरान शफी यांनी लिहिलेला आहे व तो डॉन या वृत्तपत्रात २३ ऑगस्टला सर्वप्रथम प्रकाशित झाला. शफीसाहेबांच्या अनुमतीने याचे भाषांतर मी केलेले आहे. मूळ लेख वाचा या दुव्यावर: http://www.dawn.com/2011/08/23/kudos-and-condemnation.html
अर्धवटराव

काळे काका, शफी साहेबांना सांगा... म्हणावं पाकिस्तानशी मैत्री जरि नाहि तरि शांतीपूर्ण संबंध ठेवायला भारताची नेहमीच ईच्छा असते... पण दुर्दैवाने तशी अपेक्षा पुर्वीही नव्हती आणि नजिक भविष्यात तर अजीबात नाहि. पुर्वीतरी पाकिस्तान अमेरिका नावाच्या व्यापार्‍याचा हस्तक होता... आता तर तो ड्रॅगनचा, आमच्या उघड शत्रुचा प्यादा झालाय. तेंव्हा संघर्ष अटळ आहे. त्यात भारताचे जे काहि फायदे-नुकसान व्हायचे ते होईलच.. पण पाकिस्तानचे केवळ नुकसानच होणार आहे... त्याला इलाज नाहि. अर्धवटराव
01/09/2011 - 23:07 Permalink
रणजित चितळे

पाकिस्तान हा एक रोग लागलेला देश आहे. माझ्या दृष्टिने त्याच्याशी मैत्री वगैरे कधी स्वप्नात सुद्धा येणार नाही. कारण भारताशी वैर ह्या एकाच कारणाने तो देश भारता पासून अलग झाला आहे. ते वैर तुटले तर त्याचे अस्तित्वच रहाणार नाही.
02/09/2011 - 10:22 Permalink
बिपिन कार्यकर्ते

In reply to by सुधीर काळे

ती बाई म्हणजे मेहेर बोखारी. पाकिस्तानी टिव्ही क्षेत्रातील एक अतिउजव्या विचारांची टॉकशो होस्ट. तिला झैद हमिदनेच पुढे आणले आहे. तो कार्यक्रम इथे बघा. ****** अजून हे एक बघा! पाकिस्तानातील आघाडीच्या लिबरल व्यक्ती : मारवी सरमद ... त्यांची वेबसाईट... http://www.marvisirmed.com/ आणि ते दुसरे लाल टोपीवाले सद्गृहस्थ म्हणजे झैद हमीद... लय भारी विनोद करतात ते. त्यांच्याबद्दल इथे बघा... http://www.google.com/search?q=zaid+hamid&rls=com.microsoft:en-us:IE-SearchBox&ie=UTF-8&oe=UTF-8&sourceid=ie7&rlz=1I7SKPT_en डॉ. शाहिद मसुद यांच्या ज्या टॉकशो मधे घमासान झाले त्याची फीत येथे बघता येईल. या कार्यक्रमानंतर पाकिस्तानातील भडकपंथीयांनी एकंदरीतच मारवी यांना जो काही त्रास दिला / शिव्या दिल्या / धमक्या दिल्या त्या त्यांच्या @marvisirmed या ट्विटर अकाउंटवर बघता येईल. बाई धीराची खरी. भारतातही उजवे आणि डावे / लिबरल वगैरे वाद आहेत आणि अगदी खोलवर आहेत. पण भारतात अजून तरी उजव्यांना विरोध करणार्‍यांना जीव मुठीत घेऊन फिरावे लागत नाहीये. पण आज मारवी सरमद यांच्या जीवाला असलेला धोका खूपच रिअ‍ॅलिस्टिक आहे. @ सुधीर काळे : तुम्हाला दिलेला ट्विटरबद्दलचा सल्ला लवकर अंमलात आणा. तुमची आवड बघता तिथे तुम्हाला खूप संदर्भ आणि माहिती मिळतील. :)
03/09/2011 - 19:48 Permalink
सुधीर काळे

In reply to by बिपिन कार्यकर्ते

वाsssssव! बिकाशेठ! धन्यवाद. सारे नीट वाचायला-पहायला ३-४ दिवस लागतील!
03/09/2011 - 20:56 Permalink
सुधीर काळे

अर्धवटरावजी आणि चितळेसाहेब, आंग्लभाषेतले एक विधान मला फार आवडते. ते म्हणजे "I don't hate in plural"! एकादी व्यक्ती न आवडणे हे एकवचनी तर एकादा देश न आवडणे हे अनेकवचनी असेच मी समजतो. पहिल्यापासून पाकिस्तान सरकार व पाकिस्तानी जनतेत मी कटाक्षाने गल्लत करण्याचे टाळतो. पण गेल्या कांहीं वर्षांपासून पाकिस्तानी जनतेच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होत आहे हे ज्यांनी डॉन अनेक वर्षें वाचले आहे त्यांच्या नक्कीच लक्षात येईल. आणि या बदलाला डोळे उघडे ठेवून, वहावत न जाता उत्तेजन देणे आपल्या हिताचे आहे असेही मला वाटते. या लेखात शफीसाहेब म्हणतात तसे ५१ सन्मानीय वार्ताहरांनी या मुलाखतीचा जर निषेध केला असेल तर हा आकडा लहान नाहीं. अलीकडे या वृत्तपत्रांत लष्कर व ISI वर इतकी टीका होत आहे कीं त्याच्यावर माझा तरी विश्वासच बसत नाहीं. पण या घटना नक्कीच उत्तेजन देण्यासारख्या आहेत. पाकिस्तान चीनबरोबर दोस्ती करतो पण ती बर्‍याचदा अमेरिकेला मत्सर वाटावा म्हणून असते असे मला वाटते. मागे मी एकदा शफीसाहेबांना लिहिले होते कीं तुम्ही इंग्लिश वृत्तपत्रांत लिहिता त्याचा काय उपयोग आहे? तुम्ही उर्दू वृत्तपत्रांत लिहायला हवे. त्याला त्यांनी मोकळेपणाने मला लिहिले होते कीं माझ्यासारख्या लेखकांना उर्दू वृत्तपत्रांत फारसे वाचक मिळत नाहींत पण डॉनच्या वाचकातही अद्याप बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक आहेत त्यामुळे इथे असे लिहिणेसुद्धा जरूरीचे आणि उपयुक्त आहे. म्हणून मुशर्रफसारख्या व्यक्तीवर मी मनसोक्त टीका करतो पण त्याच वेळी हा जो पाकिस्तानी समाजात बदल होत आहे तिकडेही मी आशेने पहातो. डॉनमध्ये लिहिणारी 'हुमा युसुफ' या नावाची एक स्तंभलेखिका आहे तिच्याशीही माझा मधून-मधून ई-मेलद्वारा संपर्क असतो. तिने लिहिलेले एक विधान मी खाली उद्धृत करत आहे: We were also pleased by Mr. Sharif's statement to boost Indo-Pak ties. I think there is a very slow (almost imperceptible) change in the mind of the establishment on these issues, and we can only hope for the best. ओसामा बिन लादेन मुशर्रफच्या काळापासून राजरोसपणे पाकिस्तानात अबताबादच्या cantonmentमध्ये सरकारच्या नकळत रहात होते यावर पाकिस्तानी लोकच विश्वास ठेवायला तयार नाहींत. त्यांच्या मृत्यूनंतर तर परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. थोडक्यात dogmatic पद्धतीने विचार न करता डोळे उघडे ठेवून आपले धोरण आपण लवचिक ठेवावे असे मला वाटते.
02/09/2011 - 13:44 Permalink
वाहीदा

तौर है दुनिया का उसी तौर से बोलो। बहरों का इलाका है, जरा जोर से बोलो। मुंबई, दिल्ली में हम बोला करें अमन की बोली। यारों तुम भी कभी लाहौर से बोलो। - राहत इंदौरी इंसान में हैवान , यहां भी है वहां भी .. अल्लाह निगेहबान, यहां भी है वहां भी .. खूंखार दरिन्दो के , फ़क़त नाम हैं अलग .. शहरों में बियाबान , यहां भी है वहां भी.. रहमान की कुदरत हो या भगवान की मूरत हर खेल का मैदान यहां भी है वहां भी हिन्दू भी मज़े में हैं मुसलमां भी मज़े में लेकीन इन्सान परेशान यहां भी है वहां भी :-( उठता हैं दिल-ओ-जान से धुंवा दोनोही तरफ़ ये "मीर" का दिवाना यहां भी हैं, है वहां भी कुछ चेहरे हैं भोले-भोले, कुछ चेहरे जैसे बम के गोले दहशत का सामान वहां भी है, दहशत का सामान यहां भी है... तकसीम हुए दिल, बिछा दी सरहद अपनी हीं ज़द में बना दी इक हद कुछ नादान वहां भी है, कुछ नादान यहां भी है..... - निदा फ़ाज़ली
02/09/2011 - 17:40 Permalink
अर्धवटराव

In reply to by वाहीदा

यहां भी वहां भी म्हणता म्हणता दोन्ही पारड्यांना एकच माप लावल्या गेलय हे खटकलच... दहशत का सामान इथे तयार होणे हे तिथल्या दहशत का सामान ची ऑब्विअस रिअ‍ॅक्शन आहे... कटु असलं तरी ते अपरिहार्य वास्तव आहे. (इथला-तिथला) अर्धवटराव
03/09/2011 - 04:18 Permalink
वाहीदा

In reply to by अर्धवटराव

पण शेवटी दहशतीला दहशतीने उत्तर दिल्याने प्रश्न सुटणार आहेत का ? जर युध्द करयाचेच असेल तर दुश्मनांच्या मनावर करा , दुश्मनोंके दिलोंको जितकर फतेह हासिल करना ज्यादा बेहतर हैं ! न वो दुश्मन रहेंगें ना हमें दहशतगर्दिमें जीना पडेगा ! आम्ही भूगोल बदलू शकत नाही पण नविन इतिहास तर निर्माण करु शकतो ना ? वही वही नफरतभरी तारीख (इतिहास) पढते पढते तंग आगये Let's create new history !
03/09/2011 - 11:41 Permalink
रामदास

In reply to by वाहीदा

खरं आहे. एकानी गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरु मारू नये. एकानी गाय मारली म्हणून दुसर्‍याने गायच मारावी.
03/09/2011 - 19:08 Permalink

स्वारी बॉस आम्ही तुमच्याशी असहमत आहोत आम्ही त्या माणसाशी बदला घेणार ज्याने गाय मारली पण दहशतवादाने नव्हे becoz it's not gona lead us anywhere ..Two wrongs never Ever gona become one right. There are better ways to deal with it ! अशी आमची प्रामाणिक धारणा आहे
03/09/2011 - 22:27 Permalink
अर्धवटराव

In reply to by वाहीदा

>>पण शेवटी दहशतीला दहशतीने उत्तर दिल्याने प्रश्न सुटणार आहेत का ? -- नाहि. पण याचे २ फायदे आहेत; १) समोरचा पुन्हा हाथ उगारताना दहावेळा विचार करेल, त्यादरम्यान त्याचे विचार बदलण्याची आपल्याला संधी मिळेल २) दहशतीचा मार्ग योग्य नाहि या विचारसरणीच्या त्याच्या कंपु मधल्या लोकांना पाठबळ मिळेल. घरके चिरागसे रोशनी होगी, बाहरसे नहि >>जर युध्द करयाचेच असेल तर दुश्मनांच्या मनावर करा -- अलबत. पण त्याकरता दुश्मनाच्या मनावरचा रक्तपिपासु कैफ उतरवणे जरुरी आहे. >>दुश्मनोंके दिलोंको जितकर फतेह हासिल करना ज्यादा बेहतर हैं ! -- अजीबात नाहि. म्हणजे इथे "ज्यादा-कम" चा देखील डाऊट नसावा. केवल दिल कि फतेहही सच्ची... >>न वो दुश्मन रहेंगें ना हमें दहशतगर्दिमें जीना पडेगा ! -- आमेन >> आम्ही भूगोल बदलू शकत नाही पण नविन इतिहास तर निर्माण करु शकतो ना ? -- हो तर. किंबहुना त्याकरताच सर्व खटाटोप चाललाय >>वही वही नफरतभरी तारीख (इतिहास) पढते पढते तंग आगये -- मै समझ सकता हुं. हि मानव इतीहासाची शोकांतिका विधात्याने कुठल्या मूडमध्ये लिहीली कोण जाणे. एकमेकांच्या जखमांवर फुंकर घालणे आपल्या हाती आहे... ते काम नेमाने करावे... >> Let's create new history ! --शुअर. कोशीश करनेवाले कि हार नहि होती... असं काहिसं म्हणातात
04/09/2011 - 04:34 Permalink
वाहीदा

In reply to by अर्धवटराव

आप मानो या ना मानो , कोशीश करनेवाले कि हार नहि होती , और होने भी वाली नहीं आप जितनी चाहें उतनी नफरतें पालों हम उसका हिस्सा कभीभी नहीं बनना चाहते . आम्हाला तरी आमच्या मनात कोणाही विषयी तिरस्कार पाळायचा नाही मग तो कोणीही असो, अन कुठल्या ही देशाचा नागरिक असो अन कुठल्याही धर्माचा पालनकरणारा असो . तिरस्काराचे उत्तर तिरस्कार कधीच होऊ शकत नाही . धन्यवाद !
04/09/2011 - 20:49 Permalink

त्यांनी लाथा मारायच्या मग आम्ही ही लाथा मारायच्या, मग सुरु आहेच मारामारी अन या मारामारी मध्ये कित्येक निरपराधांचे जीव जायचे. मासुमोंका संगीन कत्ल ! और वोह भी बेवजह ? क्यूं किसलिए :-( अब तो हरगीज नहीं, बर्दाश करने की हदें खत्म हो चुकी हैं . ओबामाला ओसामाला मारायचे होते तर त्याने सरळ जाऊन त्याला मारले उगाच बुश सारखे निरपराध लोकांचे बळी घेत नाही बसला तो ... बुश की तरह इराक को बेचिराख कर दो , अफ़गानिस्तन को खदेड दो ऐसे ओबामाने नहीं किया . सीधा जाकर उस शख्स का सफ़ाया कर डाला जो उनका दुश्मन था. बस बहोत हो गया यह खुनी खेल आता हि दुश्मनी संपवायलाच हवी, नाही पहावत आता किसमें कितना हैं दम. खुदा हमको ऐसी खुदाई ना दे, के अपने सिवा कुछ दिखाई ना दे खतावार समझेगी दुनिया तुझे, के इतनी ज़ियादा सफाई ना दे . हंसो न आज इतना के इस शोर में सदा सिसकियों की सुनाई ना दे. अभी तो बदन में लहू है बहुत कलम छीन ले रोशनाई ना दे खुदा नाम है ऐसे अहेसास का रहे सामने और दिखायी ना दे - डॉ बशीर बद्र खुदाई = स्वार्थीपणा खतावार = अपराधी सफ़ाई = स्पष्टीकरण हंसो न इतना = हसू नका इतके सिसकियां = हुंदके सदा = आवाज शोर = गोंगाट लहू = रक्त कलम = लेखणी कलम छीन ले रोशनाई ना दे = लेखणी हिसकावून घेतली अन त्यामुळे येणारा प्रकाश गायब होईल अहेसास = जाणिव
06/09/2011 - 13:28 Permalink

अन्या दातार यांच्या खास फर्माइशमुळे कठीण उर्दूशब्दांचे अर्थ देत आहे, ज्यामुळे वरिल शेर समजण्यास इतरांनाही मदत होईल तौर - पध्दत बहरे - ऐकू न येणारे अमन : शांती हैवान : पशू - जानवर खूंखार दरिन्दे : हिंस्र श्वापद , Beast अल्लाह निगेहबान : परमेश्वराची तिक्ष्ण कृपा दृष्टी बियाबान: जंगल दिल-ओ-जान / दिलेजार: व्यथित हृदय तकसीम : Distribute सरहद : देशाची सीमारेखा ज़द : जिद्द , हट्ट हद : Limit नादान : नासमझ
03/09/2011 - 18:57 Permalink
सुधीर काळे

वा वाहीदा! राहत इंदौरी आणि निदा फाजली यांचे काय सुंदर शेर तू निवडलेस! अक्षर अन् अक्षर खरे आहे. शाबास!
02/09/2011 - 20:49 Permalink
कलंत्री

भारत आणि पाकिस्तानातील संबधात असलेल्या अंधारलेल्या वातावरणात अश्या प्रकाशाची गरज आहे. भारत आणि पाकिस्तानातील विभाजन अतिशय अतार्किक आणि अनैसर्गिक असे आहे. भविष्यातील एखादा चंद्रगुप्त अथवा शिवाजी हे सर्व भेद नष्ट करेल असा आशावाद मला वाटतो.
03/09/2011 - 19:27 Permalink
ऋषिकेश

मुळ लेख वाचला होता. लेखकाचा सामोपचाराचा/ समजंसपणाचा सूर अभिनंदनीय आहे, स्पृहणीय आहे भाषांतरही चांगले जमले आहे. फक्त "दोन-देश-सिद्धांता" ऐवजी 'द्विराष्ट्रवाद' हा अधिक प्रचलित शब्द वापरल्यास योग्य वाटते
05/09/2011 - 17:00 Permalink
सुधीर काळे

द्विराष्ट्रवाद हा खरंच छान प्रतिशब्द आहे. मला सुचलाच नाहीं. लगेच हा बदल मूळ लेखात केलेला आहे. सुचविल्याबद्दल धन्यवाद!
05/09/2011 - 19:57 Permalink
सुधीर काळे

मला खरडवहीत एका मिपाकराकडून एक प्रश्न विचारण्यात आला कीं मी पाकिस्तानी वृत्तपत्रे कां वाचतो! मी या सहसभासदाला दिलेले उत्तर इथे उद्धृत करत आहे: "Know thy enemy" या तत्वावर हे महत्वाचे आहे. दुसरे असे कीं Never hate in plural! प्रत्येक देशाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. आज इंटरनेटच्या मेहेरबानीमुळे पाकिस्तानी वृत्तपत्रे वाचता येतात व त्यातले स्तंभलेखकांचे लेख, वाचकांचा पत्रव्यवहार आपल्याला वारा कुठल्या दिशेने वहात आहे हे सांगतो. तुम्हीही वाचत जा असे मला आवर्जून सांगावे असे वाटते.
05/09/2011 - 20:26 Permalink
सुधीर काळे

बिपिन, एका दृष्टीने तुझा मुद्दा बरोबर आहे, पण मागील अनुभव पाहून थोडी काळजी वाटते. दोस्ती तर होणारच आहे पण ती पूर्ण होईपर्यंत जरा सावध राहावे म्हणून मी तो शब्द वापरला आहे! मला तर दिवसेंदिवस भारताबद्दल आदरयुक्त awe दिसतोय् पाकिस्तानी लोकांत. मी माझ्या Express Tribune वरील कित्येक प्रतिसादात लिहितो कीं पाकिस्तानला भारत हा एकच genuine मित्र उरला आहे. काका
05/09/2011 - 20:42 Permalink
सुधीर काळे

आजच्या 'डॉन'मध्ये भारत-पाक सरहद्दीचा अवकाशातून काढलेला एक सुंदर फोटो आला आहे तो इथे डकवत आहे. त्या फोटोखाली हा वृत्तांत आहे: THE India-Pakistan border appears as an orange line in this photograph taken by the crew on the International Space Station on Aug 21 and released on Sept 4. The fence between the two countries is floodlit for surveillance purposes. Srinagar (left), Islamabad (bottom-centre), Lahore (centre near the border line) and New Delhi (top) can be seen as brighter spots. सर्वांना हा फोटो पहायला आवडेल अशी आशा आहे!
06/09/2011 - 09:29 Permalink
विनीत संखे

In reply to by सुधीर काळे

डॉन वृत्तपत्र म्हणते... "Gracefully, Pakistan has no contribution to erecting these hideous floodlights across the border. They were put by the Indian government." आणि पुढे हेही म्हणते ... "In 2003, the Indian government sanctioned a proposal to fence and illuminate the border to prevent smuggling and arms trafficking." म्हणजे "ग्रेसफूल" पाकिस्तान शस्त्रास्त्रांची तस्करी भारतात सीमापारहून करते. वाह मिया वाह!
06/09/2011 - 10:45 Permalink
सुनील

नुकतेच विकिलीक्सने जाहीर केले आहे की, मनमोहन सिंग आणि मुशर्रफ यांच्यात काश्मिर समस्या सोडवण्यासाठी नॉन्-टेरिटोरियल तोडग्याबाबत एकमत झाले होते. काळेकाकांनी त्याविषयी काही लिहावे, अशी विनंती.
06/09/2011 - 11:12 Permalink
सुधीर काळे

In reply to by सुनील

सुनील, मीही हे वृत्त वाचले पण तेवढेच. (खरे तर मियाँ मुशर्रफने तर एक-दोन वर्षांपूर्वीच अशी बढाई मारली होती!) पण याहून जास्त कांहीं तपशील कळला नाहीं. तुझ्याकडे असला तर पुरव. बघेन कांहीं स्फूर्ती येते काय! विकीलीक्सने तर स्विस बँकेतील गडगंज चोरीच्या धनाबद्दलही माहिती दिली आहे. त्यावरही कुण्या "जूना अने जाणीता" माणसाने लिहायला हवे. मी लिहिले तर लई काव-काव होईल! असे पाहिल्यास आज 'पिग्विजय सिंग' यांची नवी (पण जरा पटण्यासारखी) मुक्ताफळेही वाचनात आली. तू वाचलीस काय? (व्यनि'वर दुवा पाठविला आहे.) काका
06/09/2011 - 12:06 Permalink