अप्रतिम हैद्राबाद !
गेल्या आठवड्यात हैदराबाद ( आंध्रपद्रेश) येथे जाण्याचा योग शेवटी जुळून आलाच. :) गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून जाण्याचा बेत होता. आता रमजानचा मुहूर्त पाहून ही भेट शक्य झाली. या धावत्या भेटीचा हा धावता वृत्तांत.
हैदराबाद ! - हैदराबाद असं केवळ ऐकून होतो. वाचून होतो. बहामनी साम्राज्याचे पाच तुकडे होऊन पाच नवीन शाह्या (शाही चे अनेकवचन) तयार झाल्या होत्या त्यात आपल्या जास्त ओळखीचे म्हणजे विजापूर, अहमदनगर (निजाम), बिदर, बेरार (वर्हाड) आणि गोवळकोंडा (कुतुबशहा) असे होते.
यातील गोळवकोंडा म्हणजे आताचे हैदराबाद. अर्थात गोवळकोंड्याचा किल्ला आजही आहे आणि तो शहराच्या पश्चिमेस आहे. हा गोवळकोंडा म्हणजे आपल्या लक्षात येईल की येथील कुतुबशहाने शिवाजी महाराजांना आपल्या राज्यात राजअतिथी म्हणून आमंत्रीत केले होते. तो हा गोवळकोंडा. पुढे पेशवाईच्या काळात येथील निजामशहा आणि पेशवे यांच्यातील लढाया गाजलेल्या आहेतच.
तर अश्या हैदराबादला जायचे ठरवले आणि सर्वात आधी संपर्क केला तो आपल्या विसुनानांना. विसुनांनांशी या आधी पुण्याला भेट झाली होती. आणि नाना संपर्कात होतेच. त्यांनी पहिला प्रश्न केला की किती दिवसांसाठी येताय? मी म्हटलो दोन दिवस, तर नाना म्हणाले की अहो दोन दिवसांत काय बघणार? किमान आठ दिवसांसाठी या म्हणजे हैदराबाद अगदी तब्येतीने बघता येईल. तरीसुध्दा ही दोन दिवसांची भेट ठरवली. पुढे कधीतरी आरामात जाऊया. सध्या हा रमजानचा मुहूर्त जायला नको असं म्हणून आम्ही निघालो.
सकाळी सिकंदराबाद रेल्वेस्टेशनवर उतरल्यावर विसुनाना घ्यायला आले. तेथून काचीगुड्याला आम्हाला हॉटेलवर आलो. आम्ही तिघे मित्रं होतो त्यामुळे तयार व्हायला आरामात साडे नऊ वाजले. त्यानंतर आम्ही सकाळी सकाळी स्वाती लंच होम मध्ये नास्ता केला. आणि तयार झालो हैदराबाद भ्रमंतीसाठी...
नाना आल्यावर सर्वात आधी जायचं ठरलं हैदराबादच्या आयटी केंद्र असलेल्या सायबराबाद भागात. हैदराबादच्या बंजारा हील, ज्युबली हील अश्या भागातून आम्ही सायबराबाद मधील ऑरबिट मॉल मध्ये गेलो. खूप मोठा मॉल होता. वेगवेगळ्या दालनांतून भटकत थोडा वेळ घालवला. एव्हाना हैदराबादच्या दोन मिपाकरांशी फोनवर बोलून झालं.
भटकत असताना भूक लागल्याची जाणीव झाल्यावर मग बाहेर पडलो. हैदराबादच्या टॉलीचौकी येथील हैदराबाद हाउस येथे जाऊन खास हैदराबादी मटण बिर्याणी मागवली.
खरं सांगतो बिर्याणीचा स्वाद एवढा अप्रतिम होता की बस..! सोबत मिर्ची का सालान तर अप्रतिमच. अख्खी बिर्याणी संपवून आम्ही बाहेर पडलो तो चक्कं ०२:३० वाजता अंधार पडेल एवढे ढग जमा झाले होते. तरी सुद्धा आम्ही कुतूबशाही टोंब पर्यंत गेलो मात्र एवढ्या जोरात पाऊस सुरू झाला की आत जाता आलं नाही. याच प्रकारे पुढे गोवळकोंड्याला गेलो तेथे सुद्धा खूप पाऊस सुरू होता. शेवटी आम्ही गावात परत आलो. गोवळकोंडा बघायचा राहिलाच.
गावात आलो ते हैदराबाद आणि सिकंदराबादच्या मध्ये असलेल्या टँकबॅन्ड नावाच्या तलावावर. "टँन्कबॅन्ड ला हुसेन सागर म्हणणारा आजच हैदराबाद मध्ये आलाय असं समजावं" - इति विसुनाना :)
अतिशय मोठा तलाव हा याच्या एका बाजूला इटस्ट्रिट आहे.
त्याबाजूने येऊन झकास पावसानंतरच्या वातावरणात आम्ही कॉफी घेतली आणि बोटीने तलावाच्या मध्यातील भगवान बौद्धांच्या मूर्तीकडे निघालो.
आंध्रप्रदेशातील नागार्जुन हे बौध्दमताचे मोठे विद्वान होते आणि अमरावती (आंध्र) भागात बौध्दमताचा खूप प्रभाव होता आदी माहिती विसुनानांनी पुरवली.
येथून परत हॉटेलवर आलो थोडा आराम करून तयार झालो. आणि हैदराबादच्या मुख्य आकर्षण म्हणजे चारमिनारसाठी निघालो. जाता जाता हैदराबादची प्रसिद्ध कराची बेकरीमध्ये थांबलो. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटांमधून आपल्या हवी तेवढीच निवडण्याचे कठीण काम आम्ही थोड्या वेळात पार पाडले आणि निघालो.
अफजल गंज समोर निघालो तोच जुन्या शहराचा रंग दिसायला लागला. संथ झालेलं ट्रॅफिक पुढे तर बंदच व्हायला आलं. सर्वत्र रोशनाई आणि खरेदी विक्रीच्या दुकानांची जत्रा लागलेली होती. त्या गडबडीत सुद्धा विसुनाना ही मदिना बिल्डिंग आदी सांगत होतेच. ह्या झगमगत्या हैदराबादचे काही फोटो खाली देत आहे.
गर्दीतून वाट काढत काढत शेवटी आम्ही चारमिनार दिसेल एवढ्या जवळ गेलो मात्र एवढी प्रचंड गर्दी होती की त्यातून नानांची गाडी पुढे जाणार कधी हा प्रश्न पडला. शेवटी कसेबसे आम्ही रस्त्यावर आलो आणि रमजानच्या वातावरणात सहभागी झालो.
आम्ही जाई पर्यंत चारमिनार बंद झाला होता आणि चारमिनारच्या भोवतालचा बाजार ऐन भरात आला होता. निजामाच्या दवाखान्यातून मक्का मस्जीदचे फोटो घेतले
आणि पायी चालतच पिस्ता हाउस नावाच्या खास हैदराबादी हलीमच्या दुकानाकडे निघालो.
हलीम हा अतिशय चवदार असा खास रमजान महिण्याचा रोजा (उपवास) सोडण्यासाठी बनवलेला पदार्थ आहे. मटण, खास मसाले ,अर्धे भरडे गहू , वेगवेगळ्या डाळी आणि भरपूर तूप असा सर्व एकत्र करुन मंद आचेवर ते दिवस भर शिजवल्या जाते आणि शेवटी भरपुर तुपासोबत वाढले जाते. अश्या अप्रतिम चवीच्या हलीम साठी आम्ही पिस्ता हाउस येथे आलो.
हलीम झाल्यावर कुर्बाणीका मिठा ( जर्दाळूची मिठाई) खाऊन मग परतीच्या वाटेवर निघालो. झगमगत्या बाजारात बांगड्या वगैरे घेण्यासाठी दुकांनांत डोकावलो मात्र थोड्याच वेळात हा आपला प्रांत नाही हे लक्षात येऊन काढता पाय घेतला.
एव्हाना रात्रीचे ११:०० वाजले होते तेथून हैद्राबादमधील कुर्ता खरेदी करण्यासाठी प्रसिध्द खुराणा दुकानात आम्ही गेलो. रमाजान सुरू असल्यामुळे दुकान एकदम भरात होते. तसेही खुराणा हा हैदराबाद मधील एक ब्रांड मानल्या जातो अशी माहिती विसुनानांनी पुरवली.छानसा कुर्ता घेऊन मग आमी पहाटे १ वाजता हॉटेलवर परतलो. अतिशय जड पोटाने (हलीम) आणि जड डोळ्यांनी (झोप) आम्ही आडवे झालो.
सकाळी नास्ता घरी येऊन करा असा सौ. नाईक वहिनींचा आदेश झाला. आम्ही तिघेही तयार झालो आणि नानांच्या घरी पोहोचलो. गरमागरम वडे, शिरा असा झकास नास्ता झाला आणि चहा घेत असतांना बेत ठरला तो सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी बघायचा. महाराष्ट्रातील श्री श्रीधर पाटील (IPS) हे अकादमीत असल्यामुळे लागलीच तिकडे जायचे ठरले.
भारतातील सर्वात वरिष्ठ अश्या पोलीस अधिकार्यांना प्रशिक्षण देण्याचं काम ही अकादमी करते. त्यामु़ळे अंतर्गत सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या युध्द आणि डावपेच आदी कलांत अधिकार्यांना येथे प्रशिक्षीत केल्या जाते. आधुनिक शस्त्रे, जंगल युध्द , दंगल हाताळणी आदी.
हा शहरी भागातील परिस्थीती हाताळण्यासाठी प्रशिक्षण भाग (अर्बन वॉरफेअर)
या अकादमीत मोठं जंगल सुद्धा आहे त्यातील मोर वगैरे अकादमीचा आवारात वावरत असतात.
वेगवेगळ्या राज्यांनी आपल्या राज्याच्या नावाने येथे विश्रामगृह बांधलेली आहेत. अकादमीच्या मध्ये एक टेकडी आहे. त्याच्या टोकावर राजस्थान हाउस आहे. तेथून शहराचा देखावा छान दिसतो. डावी कडे पि.व्ही. नरसिंहराव उड्डानपुल दिसतो तर उजवी कडे फलकनुमा पॅलेस.
शेवटी येथून आम्ही पॅरेडाईज बिर्याणी कडे निघालो. तिन मजली पॅरेडाईज पाहून मजा आली. तसंही पॅरेडाईज नावाशी पुण्यापासूनचा स्नेह आहे ;)
येथे खास हैदराबादी चिकन बिर्याणी मागवली. नुकतीच नवी तेग फोडून आणलेली बिर्याणी अशी खुमासदार होती की नेमकं काय सांगावं? अतिशय उत्तम शिजलेली. हवा तेवढा मसाला बिर्याणीला सर्वत्र पोहोचलेला. अप्रतिम सगळंच अप्रतिम. या सर्व गडबडीत बिर्याणी संपल्यावर लक्षात आलं की आपण या बिर्याणीचा फोटो घेतलाच नाही :)
एकदम भरल्यापोटी आम्ही परत विसुनानांच्या घरी आलो. मस्त कॉफी घेत गप्पा केल्या. विसुनानांची २री मध्ये जाणारी गोड मुलगी आहे. एवढी छान बोलते आणि गाते सुद्धा छान. तिने तेलगु गितं आणि ती नुकतीच कर्नाटीक संगीत शिकत होती त्यातील गाणी म्हणून दाखवली. थोड्या वेळाने आम्ही शेरटॉन नावाच्या हॉटेल मध्ये गेलो. हॉटेलचा मालक माझा सहकार्याच्या ओळखीचा होता. त्यामुळे पाहुणे आल्यागत स्वागत झालं आणि अद्याप बिर्याणी तळाला बसलेली सुद्धा नव्हती तर खास हलीम समोर आलं. चवदार हलीमवर ताव मारताना हॉटेल मालकाने येथील हलीम, बिर्याणी, बासमती तांदूळ आदी बाबत माहिती दिली.
आता पुरेसा अंधार झाला होता आणि निघायची वेळ जवळ आली होती. मात्र हैद्राबादला येऊन ओस्मानीया विद्यापीठाला न जाऊन कसं भागेल? स्वतंत्र तेलंगणा आंदोलणाची बिजं येथेच रोवल्या गेलेली आहेत आणि सध्या भारतात माओवाद्यांची काही शिर्ष नेते सुद्धा याच विद्यापीठातून आलेली आहेत. त्यामुळे धावता का होईना विद्यापीठातून एक चक्कर मारायला निघालो. अंधारामुळे जास्त बघता आलं नाही.
परत नक्की येईन असं ठरवत आम्ही परतलो.
विसुनाना रात्री आम्हाला परत सिकंदराबाद रेल्वेस्टेशनवर सोडायला आले. गाडी आली आम्ही चढलो आणि गेल्या ३६ तासांची ही धावती भेट आठवत झोपी गेलो.
हैदराबाद पहिल्यांदाच बघत होतो. एवढं काही बघायचं आणि गावाबद्दल काहीच कल्पना नाही. असं असतांना सुध्दा, या हैदराबादच्या भेटीतून एवढं काही बघता आलं. हैदराबादच्या खास जागा आणि खास डेलीकसी चाखता आली याचं सर्व श्रेयं विसुनानांना जातं. संपुर्णवेळ ते आमच्या सोबत होते. एवढी धावपळ आणि सतत कुठेतरी भटकत असताना त्या त्या ठिकाणाबाबत माहिती देत. आणि काही जागी तर आग्रहाने घेऊन जाऊन त्यांनी हैदराबाद दाखवले आहे. आता कराची बेकरीचे बिस्कीटं खाताना आणि आज ईदीच्या दिवशी हैदराबादी कुर्ता घालून मिरवताना विसुनानांची आठवण येते. त्यांच्यामुळे ही भेट अविस्मरणीय झाली. धन्यवाद विसुनाना. :)
याद्या
17268
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
हॅ हॅ हॅ.. उनू क्या बोल्ते
क्या मिंया
हौ ना मियाँ..
In reply to क्या मिंया by आनंदयात्री
हैद्राबदची सचित्र सफर आवडली.
वा वा वा!!
गोकुळ चाट
In reply to वा वा वा!! by चतुरंग
मस्त. बाकी तुम्ही
हैद्राबाद नवाब्ज नावाचा
In reply to मस्त. बाकी तुम्ही by शिल्पा ब
मग काय समजलात बिका!
In reply to हैद्राबाद नवाब्ज नावाचा by बिपिन कार्यकर्ते
लाखेच्या बांगड्या
In reply to मस्त. बाकी तुम्ही by शिल्पा ब
बघ रे भौ नीलकांत! मी काय
In reply to लाखेच्या बांगड्या by चित्रा
छान छान.
हलीम
छान लेख. फोटो आवडले. अपेक्षा
रिपोर्ट वाचनाने जुन्या आठवणी
प्रवासवर्णन आवडले. काही शहरे
मस्त
माताय ऐन रमझान मध्ये
हेच म्हणतो.
In reply to माताय ऐन रमझान मध्ये by गणपा
नीलकांत! वेळ कमी पडल्याने खूप काही मिस केलंत.
:)
In reply to नीलकांत! वेळ कमी पडल्याने खूप काही मिस केलंत. by योगप्रभू
मस्त लेख
In reply to :) by नीलकांत
मस्त
प्रवासवर्णन
जबर
In reply to प्रवासवर्णन by सन्जोप राव
नीलकांत, छान लिहिले आहेस,
छान
छान
केवळ अप्रतिम हैद्राबाद
ह्म्म..
In reply to केवळ अप्रतिम हैद्राबाद by मैत्र
धम्या, मैत्रसुद्धा नीलकांतप्रमाणे "त्यातला" नाही का??
In reply to ह्म्म.. by धमाल मुलगा
नाही
In reply to धम्या, मैत्रसुद्धा नीलकांतप्रमाणे "त्यातला" नाही का?? by चिंतामणी
गोकुळ चाट ते पुन्हा चालू झालं
In reply to केवळ अप्रतिम हैद्राबाद by मैत्र
बावर्ची
In reply to केवळ अप्रतिम हैद्राबाद by मैत्र
नीलकांत, काय हे.अहो आज
हैदराबाद
छान
नील्स... बिर्याणीचे फटू पाहून
झकास.
सुंदर लेखन...
झक्कास. पण हैद्राबादेत जाउन
पॉशच !
मस्त रे नीलकांत!!
बर्याच दा वरुन (आकाशातुन
हैदराबाद मुसा नदीच्या काठावर आहे..
In reply to बर्याच दा वरुन (आकाशातुन by स्पंदना
खूप सुंदर लेख
हो हो
In reply to खूप सुंदर लेख by समीरसूर
छान
वा.... मजा आली...धावत्या
'पुनरागमनायच'
कुर्बाणीका मिठा ( जर्दाळूची
धन्यवाद
हैदराबाद म्हटले की, आपण लै
भारतातील सर्वात वरिष्ठ अश्या
भन्नाट हैदराबाद भटकंती ! फोटो
डोळे भरले.
माझा फेवरीट धागा वर आलाय!
हैदराबाद हे एकदा तरी
तुम्ही गचीबावली परिसरात होतात
In reply to हैदराबाद हे एकदा तरी by सतिश गावडे
होय. तरीही मुख्य शहर आणि
In reply to तुम्ही गचीबावली परिसरात होतात by प्रचेतस
सालारजंगमधलं व्हेल्ड रिबेका
In reply to होय. तरीही मुख्य शहर आणि by सतिश गावडे