Skip to main content

कवितेच्या झाडावर...

लेखक अशोक गोडबोले यांनी बुधवार, 09/07/2008 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेच्या झाडावर बसती शब्दांचे पक्षी पानोपानी कोरित जाती सात सुरांची नक्षी गणमात्रांच्या नाजूक वेली वेढीतात तिजला यमकांची चरणात पैंजणे छंद मधुर मेखला भव्य कल्पनाविलासापुढे नीलांबर ठेंगणे काव्यफुले फुलल्यावर लाजे पुनवेचे चांदणे सुधारसाशी पैज लाविती नवरस अभिमाने विश्वात्मक हा विशाल हृदये वसतो प्रेमाने षड्ज लावुनी मोर नाचती प्रीती गती संगम कोकिळकंठामधुनी निघतो नभचुंबी पंचम अचल स्वरांच्या तीरामधुनी वाहे स्वरसरिता कवितेची लागते किनारी नाव भावगीता --अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3732
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

शुद्ध,सात्त्विक,प्रसन्नचित्त कविता आवडली. (प्रसन्न)बेसनलाडू

सगळ्या ओळि आवडल्या (सुदंर उपमा) त्यात अचल स्वरांच्या तीरामधुनी वाहे स्वरसरिता कवितेची लागते किनारी नाव भावगीता खासच्... काव्यप्रेमी चेतन

वृत्तबद्ध, गेय आणि आनंददायी रचना आवडली! :) चतुरंग

खुप छान काव्य रचना झाली आहे. सगळीच कविता आवडली. :)

पुन्हा तुमच्या कविता येथे वाचायला मिळत आहेत, आनंद वाटतो.

गोडबोले मास्तर, सगळीच कविता सुंदर, परंतु कवितेच्या झाडावर बसती शब्दांचे पक्षी पानोपानी कोरित जाती सात सुरांची नक्षी या ओळी सर्वाधिक आवडल्या... तात्या. अवांतर - मिपाकरहो, सध्या पनवेलमधील रामदास-मारुती मंदिरात रोज सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळात गीतेच्या १२व्या अध्यायावर गोडबोले सरांचं प्रवचन सुरू आहे. अतिशय प्रासादिक भाषा, गीतेवर, संस्कृतवर अफाट प्तभूत्व, प्रवचनादरम्यान ज्ञानोबा तुकोबांचे असंख्य दाखले, साधी सोपी व्यावहारिक उदाहरणं, या सर्व गोष्टी सरांच्या प्रवचनात अगदी पुरेपूर असतात. अतिशय श्रवणीय प्रवचन. इच्छुकांनी अवश्य हजेरी लावावी... तात्या.