मनमोहन सरकारने काही महिन्यांपूर्वी लोकपाल विधेयक बनविण्याचे मान्य केले
त्या समितीमधे सरकारमधील काही मंत्री आणि काही इतर व्यक्ती समाविष्ट होत्या
या सार्या खटाटोपाचा गाभा हा होता की पंतप्रधानांसकट सर्व उच्चपदावरील व्यक्ती कायद्याच्या कक्षेत याव्यात
विधेयकाचा मसूदा ठरविण्यासाठीच्या बैठकांना सुरुवात झाली, बैठकींचे व्हिडीओचित्रण व्हावे
ते जनतेला पाहता यावे अशीही काही सदस्यांची इच्छा होती.
पण ही मागणी अजिबात मान्य झाली, पारदर्शकतेला सुरुवातीलाच नकार देण्यात आला
नंतरच्या काळातही सरकारची विधेयक आणण्याची इच्छा कुठे दिसेना
अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांच्या बदनामीची मोहीम सरकारमधीलच काही लोक राबवू लागले
या विधेयकाची टंगलटवाळी करण्यात कपिल सिब्बल धन्यता मानू लागले
दिग्विजयसिंगसारख्या ज्येष्ठ नेत्यांची बयानबाजी चालू झाली
आमच्या देशातील लोकशाही टिकून रहावी यासाठी प्रयत्न करणार्या कार्यकर्त्यांना नाऊमेद, बदनाम केले जाऊ लागले
नवीन माहिती अशी की लोकपालाच्या कक्षेत पंतप्रधान येणारच नाहीत
(काही जणांनी त्यामुळेच लोकपाल की जोकपाल असे म्हटले आहे )
म्हणजे या सार्या आंदोलनाला सरकारने वाटाण्याच्या अक्षताच लावल्या आहेत.
जेव्हा 2G, कॉमनवेल्थ गेम यासारखे घोटाळे बाहेर येत आहेत अशावेळी
या सार्यावर कायद्याचा अंकुश असण्याची फार गरज आहे
पण पुन्हा एकदा सरकार जिंकले जनता हारली आहे
वाचने
2784
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजुन १६ ऑगस्ट यायचे आहे. एक मोठे आंदोलन उंबरठ्यावर आहे...
पुण्यातील पुतळा हटवण्याचे आंदोलन झाले तेंव्हा अण्णा कुठे होते?
जबरी शालजोडीतले मारले आहेत ह्या काँग्रेसवाल्याना!
In reply to पुण्यातील पुतळा हटवण्याचे आंदोलन झाले तेंव्हा अण्णा कुठे होते? by कापूसकोन्ड्या
सर्व आंदोलने अण्णांनीच केली पाहिजे हि अपे़क्षाच चुकिची आहे.
लोकपाल बिल विषयीची माहिती फ॑क्त ९.४२ मिनिटाचा व्हिडियो
आजच हा लेख वाचला. आधीच असलेले
व्हिडियो पहा, फक्त एकदाच ह्या देशासाठी...
In reply to आजच हा लेख वाचला. आधीच असलेले by नगरीनिरंजन
-१
+१/-१
In reply to -१ by नितिन थत्ते
सरकार हरलं (अल्पमतातील) आणि
In reply to +१/-१ by समंजस