एक रस्ता , आणि माणसं.
खुप माणसं, कळपासारखी. एवढ़ी माणसं असुनही रस्त्यावर फारसा गोंधळ नाही. आपापले सामान घेउन जो तो चालतोय ... फक्त चालतोय.
रस्त्याला थोडा उतार आहे , रस्ताही रुंद, मग चालणंही सोप्प झालयं. गर्दीलाही उत्साह आलाय, उतारबघुन.
काहीजण जात्याच मजबुत आहेत, मग त्यांचा वेग अजुन वाढतो ... त्यांच्या नकळत.
त्यांना समजत नाही की बाकीचे का हळू चालतायेत. स्वतःशीच हसत चालत रहातात, दुसर्यावर.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला सापाच्या आकाराचे चर... नागमोडी पण समांतर.
चर मोठे गूढ़. आतले काही दिसत नाही अन अंदाजही येत नाही.
काहींना त्या आकाराची भिती वाटतीय तर काहींना ते आहेत याचीच जाणिव नाही.
पण दोघेही त्याच्यापासुन अंतर ठेउन आहेत.
चराच्या पलीकडे मात्र गर्द दाट झाडी अन हिरवळ आहे, गर्दीला त्याची सोबतच बरी वाटतेय.
गर्दी चालत रहाते, काहींचे डोळे पेंगतायत डोळ्यावर झापड आलीय पण गर्दी त्याला थांबू देत नाही, मागून धक्के बसतात.. त्याला चालावचं लागतं.
धक्क्यानंतर तोही खोट्या उत्साहाने चालू लागतो. बाजुच्यांच्या चेहर्यावर हास्य.
अशातच एकाला धाप लागते, डोळ्यांना समोर आकाश दिसतय. श्वास घेण्यासाठी छाती तोंडापर्यंत येतेय. धडधड अचानक वाढ़ते अन... थांबते.
त्याला आता पुढे रस्ता दिसत नाही, अंधार दिसतोय. त्याचा रस्ता तिथेच संपला.
बाजुचा मोठ्या प्रेमाने त्याला उचलतो खांद्यावर घेतो आणि रस्त्याच्या कडेला ठेवतो. गर्दीतला एक त्याचे सामान घेउन पुढे होतो.
गर्दी चालत रहाते... अखंडित... अबाधित.
अचानक... मागुन एक शिळ ऐकू येते, आर्त, तरसलेली.
गर्दी घाबरते... पुन्हा एक??? या वेळी कोण आणि का?
नजर मागे,
या वेळीही तो तसाच आहे, दोन्ही हात रिकामे, झोळी रिकामी, थोडासा भांबावलेला. या वेळीही त्याची नजर काहीतरि शोधत आहे.
तोंडाने शीळ घालत त्या काळ्याकुट्ट चरापाशी एकाटाच घुटमळतो आहे.
अरे, याला दुर सारा .. काहीतरी करा.
याला भिती दाखवा, कशाचिही... गर्दीची... दानवाची... नाहीच ऐकला तर .. देवाची...
पण याला रस्त्यावर आणा.
त्याला मात्र कसलीच जाणिव नाही, तो तिथेच काहीतरि शोधतोय... नव्हे तो चुकुन इथे आलाय. तो बाहेरचा रस्ता शोधतोय.
पण गर्दीला याचा त्रास होतोय, त्यांना तो असह्य झालाय.
गर्दीतून एक पुढे होतो आणि ... आपल्या खांद्यावरच ओझं त्याच्या खांद्यावर टाकुन बाजुला होतो.
त्याची चिडचिड होते, तो वैतागतो पण तो आता हलूच शकत नाही. त्याच्याही हातात सामान आलयं.
मग तो ही रस्त्यावर येतो आणि चालू लागतो.
गर्दीच्या चेहर्यावर हास्य.
मग तो ही हसतो ... केविलवाणे...
वाचने
7963
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे काय होतं?
काही समजलं नाही..
माझं दुर्दैव!!!
In reply to काही समजलं नाही.. by प्राजु
एक शेर
In reply to माझं दुर्दैव!!! by छोट्या
बाऊंसर ..
ग्रेसाळ
नक्की...
In reply to ग्रेसाळ by बेसनलाडू
एक नवीन साहित्यानुभव
??
:) :)
In reply to ?? by चतुरंग
??
In reply to :) :) by बेसनलाडू
Deja Vu?
शेवट सोडुन...
In reply to Deja Vu? by अरुण मनोहर
एक छान रुपक...
You got it!!!
In reply to एक छान रुपक... by Rainman
कळतय पण वळत नाही
माहीत नाही...
In reply to कळतय पण वळत नाही by खुशालचेंडू
छान लिहीलयं
दोनदा वाचाल्यावर समजलं :)
एक प्रश्न
बाकी सगळे निमित्तमात्र
In reply to एक प्रश्न by अभिरत भिरभि-या
वा!
खर काय आहे ???
अतिशय अवघड
In reply to खर काय आहे ??? by पारिजातक
छोट्या