Skip to main content

....

....

Published on 27/08/2011 - 04:59 प्रकाशित मुखपृष्ठ
...
लेखनप्रकार

याद्या 7147
प्रतिक्रिया 33

कथेच्या चौकटीत बसवण्यासाठी मूळ कथानकात किंचित बदल....
सगळ्यात भयंकर हे आहे. "सामाजिक प्रतिष्ठेचं काय" नाहीतर "लोकं काय म्हणतील" यासाठी लोकं काय थराला जातील, कोणाला काय भोगावं लागेल सांगता येत नाही. घराच्या चार भिंतीआड लोकं कसे वागतात हे बाहेरून बघून समजत नाही ते असं. शिक्षण, स्वतःचे निर्णय स्वतः घेणं, स्वत:च्या पायावर उभं असणं याला पर्याय नाही; मुलींनाही नाही. शालीनता, लज्जा वगैरे गुणांचे संस्कार करण्यापेक्षा पालकांनी मुलींना आत्मनिर्भर करण्याची जास्त गरज आहे. माझ्या ओळखीतलं एक जोडपं होतं. होतंच म्हणावं, कागदोपत्री घटस्फोट होऊ घातला आहे. ती शिकलेली, कमावती असल्यामुळे निदान असं ओझंतरी तिला आयुष्यभर बाळगावं लागणार नाही. तरीही त्याच्या आणि त्याच्या घरच्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांपायी तिलाही काय भोगावं लागलं असेल याची मी फक्त कल्पनाच करू शकते.

कसली दर्दनाक कथा. एकतर उगाच माणसाने अविवाहीत वगैरे राहु नये... आणि राहायचच असेल तर कुटुंबासोबत राहु नये... अर्धवटराव

पहिल्याच भागात अंदाज आलेला नाथकाका प्रकाश / रश्मीचा बाप असावा असा अंदाज होता, तो चुकला. अरुंधतीचं पात्र पण उगाचच गरीब घरची गरीब गाय रंगवलं आहे, या पातळीवरचा अन्याय या कारणासाठी सहन करणं पटत नाही. जेंव्हा घरात येताक्षणी प्रत्यक्ष सासुनं शेजा-यांकडे रात्री बेरात्री जायची परवानगी दिली असताना, आणि घरात एक लग्नाची मुलगी असताना, तिच्यासमोर, म्हणजे प्रत्यक्ष समोर नसला तरी हा प्रकार घडु देणे कोणत्याही सभ्य घरात होणार नाही. प्रत्यक्ष घडलेली असेल तर अत्यंत वाईट अन अत्यंत दुर्मिळ घटना. कल्पनाविलास असेल तर त्यापेक्षाही वाईट.

In reply to by ५० फक्त

ही रंगवलेली पात्रे काल्पनिक नसून प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. ती जशी आहे तशी मांडली आहे. अरुंधतीसारखी गरीब मुलगी पकडून आणणे हे त्या कुटुंबाला हवी असलेली गोष्ट होती. प्रत्यक्षात अरुंधती स्वभावाने गरीब नव्हती पण परिस्थितीमुळे तिची मुस्कटदाबी होत गेली. संवादात आवश्यक नाट्य भरण्यासाठी किंचित फरक आहेत तेवढेच.
पहिल्याच भागात अंदाज आलेला नाथकाका प्रकाश / रश्मीचा बाप असावा असा अंदाज होता, तो चुकला.
आमच्या सोसायटीत अशी शंका घेणारेही काही होते. :(

In reply to by प्रियाली

आधि म्हणल्याप्रमाणे, खरोखरच अतिशय वाईट घटनाक्रम, आणि यातुन झालेला मुलाचा जन्म तर त्या स्त्रिला आयुष्यबर भ़ळभळत्या जखमेसारखा वागवावा लागणार, एकच चांगला धागा म्हणजे तो मुलगा होता, जर मुलगी असती तर तिचं जीवन अजुनच खोल गर्तेत गेलं असतं.

मला शेवटपर्यंत ही पण भूतकथा असेल असे वाटले होते. असो हे तर लग्न झाल्यावर, पण ज्यांच्या घरातच जोसेफनाथ फ्रित्झल असतो त्या बिचार्‍यांची तर अजुनच .. :-(

कथेचं नाव आणि नाथकाका हे पात्राचं नाव वाचताच कळलं. पण खर्‍या आयुष्यात अशा गोष्टी लवकर कळत नाहीत हे दुर्दैवच. चार भींतिंच्या आत अशा कित्येक अरुंधती कणाकणाने झिजून मरत असतील. अशीच पण त्या स्त्रीच्या दृष्टीकोनातून लिहीलेली एक कथा वाचल्याचे स्मरते. लेखकाचे नाव आठवत नाही. जयवंत दळवी असावेत बहुधा.

चांगली कथा. तै चांगली कथा लिहु शकतात हे एक वैश्विक सत्य आहे.

सामान्य मध्यमवर्गीय माणसांची एक खासियत असते. पुढाकार घेऊन केलेलं काम जेव्हा अंगाशी येऊ लागतं तेव्हा हळूहळू एक एकजण त्यातून अंग काढून घेऊ लागतो. चर्र झालं काळजातं....... अवघड आहे सगळंचं...!!

कथा अगदीच प्रेडिक्टेबल वाटली. अगदी असंच उदाहरण (रत्नागिरीचंच) माझ्या ओळखीचं आहे. पण तिथे एकदा मूल झाल्यावर आजोबांनी सूनबाईला हात लावला नाही. तिथे त्या मुलीचा नवरा षंढ नसून पूर्ण मतिमंद आहे. प्रियाली,तुझ्या लहानपणी रत्नागिरीतल्या शेट्ट्यांच्या घरातल्या सूनेचे नाव 'अरुंधती' असणे हीच मला अनप्रेडिक्टेबल गोष्ट वाटतेय. अर्थात तू तिचं नाव बदललेयस म्हणा. :)

In reply to by साती

असल्याने नाथ...! हे असले नाथ जागोजागी असतात. कथेची प्रेडिक्टेबिलीटी हेच कथेचे यश असावे का? वास्तवाशी कथेची नाळ जुळत असेल तर - आणि ती जुळती आहेही - ही कथा अपुरी वाटते. वास्तवाला धरून कथा अजून पूर्ण केली जावी. अरुंधतीची एक लढाई संपली असेल, हारजितीशिवाय. युद्ध सुरू असेलच - जगण्याचं! अरुंधतीचं पुढं काय झालं? ती नायिका ठरली, की समाजातील या स्थितीची आणखी एक बळी?

In reply to by साती

प्रेडिक्टीबिलिटी आणि अनप्रेडिक्टिबिलिटी हा कथेचा पैलू नाही. हा एक अनुभव आहे आणि तो मांडला आहे. सामान्यांना चार भिंतीत येणारे अनुभवही सामान्य असतात, त्या मानाने हे थोडेफार असामान्य आहे इतकेच. वास्तविक अनुभवांमध्ये नाट्याची कमतरता असू शकते. येथे नाट्यनिर्मितीचा हेतूही नाही. नावीन्य दाखवायचाही नाही, असे अनुभव काही नवे नाहीत. गेली शेकडो वर्षे ते सुरू आहेत. अगदी एकत्र कुटुंबातही तरुण विधवा सुनेवर सासर्‍यांनी किंवा दिरांनी केलेले अत्याचार ऐकू येतात. कथेचा एक पैलू मात्र असा आहे की ज्यावर आपण विश्वास ठेवतो त्याच्या चुका जाणवत असतानाही त्याकडे न पाहता झापडे ओढून घेतो. तरीही, जेव्हा अति झाले तेव्हा सोसायटीतील लोकांनी एकत्र येऊन तोडगा शोधायचा प्रयत्न केला हे बरे झाले. आपण बेल वाजवायची की नाही वाजवायची या संभ्रमातच अनेक लोक गप्प राहतात आणि होणारा गुन्हा पाहत राहतात. या कथेचे पुढे काय झाले असे अनेकांनी विचारले आहे ते बहुधा उपसंहार म्हणून वेगळ्या भागात किंवा प्रतिसादात टाकेन.

खोट्या सामाजिक प्रतिष्टेसाटी लोक काहीही करण्यास धजावतात....बिचारी 'अरुंधती'. // ...सामान्य मध्यमवर्गीय माणसांची एक खासियत असते. पुढाकार घेऊन केलेलं काम जेव्हा अंगाशी येऊ लागतं तेव्हा हळूहळू एक एकजण त्यातून अंग काढून घेऊ लागतो. // --१००% खरे खरच अवघड आहे !!!

कथा वास्तवदर्शी, अगदि साध्या भाषेत लिहिली आहे. आणि:- १. अशा बातम्या अनेकदा मी "लोकमत" मध्ये वाचल्यात. सहसा सामान्यजन हे मुखपृष्ठ, खेल्-पृष्ठ,पेज्-थ्री आणि पुरवणी ह्या बाहेरही वृत्तपत्र असते हे विसरतात. त्यामुळे ह्या घटना दुर्मिळ वाटु शकतात. २.पोलिस टाइम्स मध्येही अनेकदा अशाच बातम्या असतात. ३.माझ्या एका परिचितात असा भयंकर किस्सा ऐकलाय. मुळात अशी एखादी गोष्ट हजारात एकासाठी जरी घडत असेल तर ती तितकीशी(वाटते तेव्हढी) दुर्मिळ नसते. लाखोंमध्ये किंवा करोडोंमध्ये एक घडल्यास त्याला दुर्मिळ म्हणता यावे. पुण्यातीलच नामवंत सॉफ्टवेअर कंपनीतील परिचितांमध्ये असा किस्सा ऐकलाय. ह्याहून भयंकर गोष्टी ऐकल्यात. मला वाटतं की कित्येकदा अशा घटना घडतात, पण लोकलज्जेस्तव बाहेर येत नाहित. पांघरुणाखाली घाण असली की आपल्याला उगीच बाहेर राहुन स्वच्छतेचा भास होतो इतकच.

सत्य हे कल्पनेपेक्षा भयंकर असतं हेच खरं. एका सामाजिक कार्यकर्तीकडून एक कहाणी ऐकली होती. तिथे एका बापाने स्वत:च्या अजाण मुलीवर अत्याचार केला होता. ही कहाणी त्याच प्रकारची.... परिस्थितीची बळी ठरलेल्या या "अरुंधतीला" जगण्यासाठी बळ गोळा करावंच लागेल...

In reply to by पैसा

सत्य कल्पनेपेक्षा भयंकर असते. +१. गोष्ट प्रेडिक्टेबल आहे हे खरे. असे एक कुटुंब पाहिले होते, त्यामुळे अधिकच प्रेडिक्टेबल वाटली. पुरुषांना लाभणारी समाजातील प्रतिष्ठा ही मुले पैदा करण्याशी जोडली गेली आहे. अशी समजूत झाल्याने लोक अनिष्ट मार्गांनीही पोरे पैदा करून सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करतात असे दिसते. अरुंधतीचे घर तरी स्वतःचे असे राहिले का? कठीण वाटते. जोवर स्त्री-पुरुष स्वतःच्या कर्तॄत्वाने स्वतः दोन पैसे कमवत नाहीत तोवर असल्या भितीमधून बाहेर पडणार नाहीत. प्रकाश - नाथकाकांवर अवलंबून दिसतो. अप्पा नाथकाकांवर अवलंबून दिसतात. अरुंधती पैशासाठी या कुटुंबावर अवलंबून आहे त्यापेक्षाही प्रकाशचे अवलंबून असणे वाईट आहे. सुरुवात तशी झाली आहे. उद्या प्रकाशने घर वेगळे करून अरुंधतीला तिथे ठेवले तरी आर्थिक नाड्या कोणाच्या हाती असणार आहेत? कथेत जे आहे त्यापेक्षा कथेत जे नाही ते अधिक गुंतागुंतीचे आहे.

वास्तवदर्शी कथा आवडली. आपल्याकडे षंढ किंवा 'गे' मुलाचे जाणून बुजून खोट्या प्रतिष्ठेपायी लग्न करुन देण्याचा प्रकार सर्रास चालतो. मुलीचे आई-बाप खंबीर असले तर ठीक नाहितर ......... आमच्या ओळखीच्या एका मुलीची अशीच फसवणूक झाली. सुदैवाने मुलगी शिकलेली, स्वतःच्या पायावर उभी होती. पाठीवर दोन बहिणी असूनही तिचे आई-वडिल तिच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले. आता ती मुलगी नव्या संसारात सुखी आहे.

In reply to by स्वाती२

मी या कथेबद्दल कालच कोणाला तरी म्हटलं की तो मुलगा गे असावा का काय अशी मला आता शंका येते. तो काळ मात्र असा होता की या संकल्पनांबद्दल फारशी माहितीच लोकांना नव्हती. आता मुलींना अशा त्रासदायक संबंधांतून वेगळे करणे आई-वडिलांना जड जात नाही आणि मुलीही नवे मार्ग शोधू शकतात हे चांगलेच आहे.

In reply to by स्वाती२

अगदी...माझ्याही ओळखीत असे एक कुटुंब आहे. त्या मुलीला वडील नाहीत अन लग्न झाल्यावर मुलगा गे आहे हे समजले पण पाठी एक बहिण लग्नाची असल्याने ती त्याही परिस्थितीत राहायला अन जुळवून घ्यायला तयार होती. अत्याचार करत नव्हते पण मानसिक त्रास हाही एक अत्याचारच आहे. शेवटी इतर नातेवाईकांनी मध्यस्थी करून घटस्फोट झाला अन आता नवीन संसार छान चालू आहे. या सगळ्यांपेक्षा एक मला विचित्र वाटणारी गोष्ट म्हणणे या मुली, त्यांची आई वगैरे चांगले शिकलेल्या अन नोकरी करणाऱ्या असून ती का जुळवून घेणार होती देव जाणे. काय वाट्टेल ते झाले तरी स्वतः मनाने खंबीर असलेच पाहिजे नाहीतर शिकून घेतले पाहिजे. परीस्थीती बदलत असते हे लक्षात ठेवायला हवे. या अरुंधतीची कथा अगदी दुर्दैवी आहे. नवराच जर इतरांवर अवलंबून असेल तर मग कुठे आधार शोधणार?

भयानक आहे हे सगळं. अदिती यांच्या मताशी सहमत आहे. मुलीनी आत्मनिर्भर व्हायलाच हव. निदान पुढे तरी त्या स्वतच्या पायावर उभ्या राहू शकतात. इथे लाँ करताना आलेला अनुभव नमुद करावसा वाटतो. अशीच एक केस होती. त्यात त्या मुलाच्या लैगिक गरजा वेगळ्या असताना सुध्दा खोट्या प्रतिष्ठेपायी त्याचे लग्न लावून देण्यात आले. त्या मुलीच्या हे लक्षात आल्यानंतर सासरच्यानी टाळाटाळ केली पण ती मुलगी खमकी निघाली व शेवटी त्यांचा घटस्फोट झाला. वरच्या कथेत जस सोसायटीतल लोक समजुन घेणारे निघाले तसे मात्र ईथे झाले नाही. उलट या कारणामुळे घटस्फोट झाला हे कळताच ती मुलगी "तशीच" आहे, हिलाच जमल नसेल संसार करायला म्हणून ही कारणे ते इथे लिहिता येणार नाही अशा कमेटस असे प्रकार सुरु झाले. शेवटी डिप्रेशनमध्ये गेल्यावर मानपसोचार तज्ञ्ज्ञाची पायरी चढावी लागली. ऊपचार घेतल्यावर तिची स्थिती सुधारली खरी पण तिने सिँगापूरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अशावेळी तिचे कुटुंबिय तसेच तिचे शिक्षण तिच्या मदतीला आल्यामुळे ती यातुन सावरु शकली.

In reply to by जाई.

लोकांना काय महत्व द्यायचेय. काही झाले तर मदतीला येतात का? बोलले तर बोलू द्या. खूपच वैताग झाला तर सरळ दुसर्या जागी राहायला जावे. त्या मुलीने खमकेपणा दाखवला हि अगदी कौतुकाची गोष्ट आहे.

In reply to by जाई.

मानसिक दबावामुळे पिडीतांना मानसिक उपचारांची गरज पडू शकते याची कल्पनाच आपल्याकडे काही काळापूर्वी रुजली नव्हती. आजही अमेरिकेत लोक ज्या सहजपणे आम्ही थेरपीसाठी जातो असे सांगू शकतात तसे आपल्याकडे सांगता येत नसावे. तरीही, पूर्वीपेक्षा परिस्थिती बदलली आहे आणि बदलते आहे हे आशादायक आहे.

अतिशय भयंकर अनुभव आहे. (प्रियाली यांनी सुरुवातीपासून याला सत्य अनुभव म्हटलेले असूनही अनेकांनी याला कथा का म्हटले याचे आश्चर्य वाटले.) दुसर्‍या भागात एकंदर परिस्थितीचा अंदाज आलाच होता. पण जर सगळ्यांनाच हा अंदाज आला होता तर ही घटना वाटते तितकी दुर्मिळ नसावी. असे अनुभव बहुतेकांनी आधीही ऐकले असावेत. अश्या घटनांचे प्रमाण कमी होण्याकरता "शिक्षण, स्वतःचे निर्णय स्वतः घेणं, स्वत:च्या पायावर उभं असणं याला पर्याय नाही; मुलींनाही नाही. शालीनता, लज्जा वगैरे गुणांचे संस्कार करण्यापेक्षा पालकांनी मुलींना आत्मनिर्भर करण्याची जास्त गरज आहे." या अदितीच्या मताशी १०००% सहमत.

In reply to by स्मिता.

>>अनेकांनी याला कथा का म्हटले याचे आश्चर्य वाटले अहो सत्यकथा ही कथाच असते. जी कथन केली ती कथा. >>शिक्षण, स्वतःचे निर्णय स्वतः घेणं, स्वत:च्या पायावर उभं असणं याला पर्याय नाही; मुलींनाही नाही. शालीनता, लज्जा वगैरे गुणांचे संस्कार करण्यापेक्षा पालकांनी मुलींना आत्मनिर्भर करण्याची जास्त गरज आहे ह्म्फ.....अपरिपक्व

In reply to by नगरीनिरंजन

.. शालीनता, लज्जा वगैरे गुणांचे संस्कार ..
ही संस्कृती काय? असूही शकते म्हणा, कुसंस्कारांचीही का असेना संस्कृती असूच शकते.

In reply to by नगरीनिरंजन

>>अहो सत्यकथा ही कथाच असते. जी कथन केली ती कथा मान्य. अनेकांनी केवळ 'कथा' असा उल्लेख केल्याने माझा गैरसमज झाला असावा. >>>शिक्षण, स्वतःचे निर्णय स्वतः घेणं, स्वत:च्या पायावर उभं असणं याला पर्याय नाही; मुलींनाही नाही. शालीनता, लज्जा वगैरे >>>गुणांचे संस्कार करण्यापेक्षा पालकांनी मुलींना आत्मनिर्भर करण्याची जास्त गरज आहे >>ह्म्फ.....अपरिपक्व तुम्ही दिलेला संदर्भाचा धागा (किंवा तेवढीच प्रतिक्रिया) येथे कितपत लागू होते याची कल्पना नाही. माझ्या मते शालीनता, लज्जा, वगैरे संस्कारांच्या अगोदर आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वासाच्या संस्कारांची मुलींना जास्त गरज आहे. अन्यथा शालीनतेच्या नावावर स्त्रीवर अन्यायच होत असतो. पण याचा अर्थ लज्जा, इ. इ. संस्कार करूच नये असे नाही. अवांतरः गरिब घरातल्या (त्यामुळे बहुतेक वेळा कमी शिक्षण असलेल्या) मुलीला हुंडा न घेता सून करून आणून तिला जवळपास गुलामसदृष्य वागणूक देणारे बरेच ऐकिवात आहेत. एखाद्या गरिब घरातल्या मुलीला सून करून घेवून आपण तिच्यावर व तिच्या कुटुंबावर अनेकोनेक उपकार केले आहेत आणि आता त्या मुलीशी कसेही वागण्याचा आपल्याला हक्क आहे ही मानसिकता अतिशय संतापजनक आहे.

अतिशय विदारक करणारी घटना... या धाग्याचे नाव "असूरी नाथ ..." असेही चालू शकेल मला... गरिबा घरच्या मुलींचे शोषण ही एक समाजाला लागलेली किड आहे ... प्रत्येकाला अशी एखादी तरी घटना ठाऊक आहे, किंवा त्यांच्या आसपास घडली आहे ...घडते आहे ... यापैकी किती लोकांनी राजेकाकांसारखी सक्रिय भूमिका घेतली आणि किती जण तासकरांच्या भूमिकेत राहीले .... हा प्रश्न महत्वाचा आहे. -- जातीवंत भटका ..

सुन्न झालो हे तिन्ही भाग वाचुन.... - ( स्पीचलेस) सोकाजी