प्रिय राजेश घासू आण्णा यांसी,
जय मिपाराष्ट्र!
एका विशेष नात्याने ही पत्रवजा विनंती आपणास करीत आहे. मिपाकारणात एकमेकांवर टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. समज आणि गैरसमजाच्या वावटळी उठत असतात. तुम्ही काय आणि आम्ही काय... त्यातून सुटलेलो नाही. काही असले तरी आपल्या संपादकांबद्दल असूया व कवितेच्या पाककृती विषयक लेखाविषयी आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आले आहे.
सध्या आपण मिपाच्या मर्कटलीला मैदानावर एकूणच पिडीत लोकांसाठी स्लटवॉक नामक जबरदस्त युद्ध पुकारले आहे. मर्कटलीला मैदान म्हणजे कंपूबाजी आणि खोपच्यात घेऊन टीका करणार्यांच्याविरोधी लढ्याचे कुरूक्षेत्र बनले आहे. स्लटवॉक मार्गाने छेडलेल्या युद्धास मिपा-भरातील जनतेचा पाठिंबा मिळत आहे. जनजागृतीची एक लाटच उसळली असून, वातावरण घासूआण्णा मय झाले आहे.
आपल्या स्लटवॉक धाग्याचा पहिलाच दिवस सुरू झाला आहे व त्यावर ७० च्यावर प्रतिसाद आल्याच्या बातमीने आम्हाला चिंता वाटू लागली आहे. एका महान कार्यासाठी आपण मिपा पणास लावण्याची घोषणा केली आहे, पण ही लढाई आपल्या संपादकांवर बेतू नये व ज्यांच्या विरोधात आपण युद्धाला उतरलात त्या दुश्मनांचे त्यात फावू नये यासाठी आम्ही ही कळकळीची नम्र विनंती करत आहोत. आपल्या स्लटवॉकने मिपाकर जागा झालाच आहे व संकेतस्थळही हलले आहे. तेव्हा आता ढासळत्या सर्व्हरकडे पाहून स्लटवॉक सोडा ! स्लटवॉक सोडले तरी कंपूबाजी सुरूच राहील. आपल्या धाग्याच्या शंभरी नंतर आपले सहकारी ३_१४ विक्षिप्त बाई, परा'दिया, थत्ते'चाचा वगैरे मंडळींना संपादकांच्या तोंडी द्या व स्लटवॉक चालू राहू द्या.
मिपात अंतर जालिय स्वैराचार आणि कंपूबाजीने टोक गाठले आहे व सामान्य जनता त्रस्त आहे. आपणांस आठवत असेलच, साधारण १ वर्ष २७ आठवड्यापूर्वी आपण मिपाचे सदस्य म्हणून वस्तीस आलात. शर्ट म्हणून 'जगताना' मिपावर तुम्ही कविताही लिहिली. तेव्हाही सर्व कवितांचे विडंबन करण्याचा परवाना आपणांस संपादकांनी दिला होता आणि आपण त्यावेळी मिपामिपा खेळताना म्हणाला होतात कि, 'आनंदी आयुष्याच्या पाककृती - मिपा कट्टा'. केवळ तेच हे जीवन आनंदी करण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणताही हिम्मत नाही. आम्ही वरचेवर कवितेच्या, लेखाच्या पाककृती पाडू. मग यश निश्चितच! ' असा विश्वासही आपण तेव्हा व्यक्त केला होता, पण दुअर्दैवाने त्याच दरम्यान मिपावर सर्वर नामक आपत्ती कोसळल्या व आपला साचा तुटला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत व तुमचाही लढा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हेसुद्धा एक महान योद्धेच होते. समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना दिलेला एक मंत्र असा की धुरेने युद्धासी जाणे, ही तो नव्हे राजकारणे. हा मंत्र सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. शेवटी पुन्हा एकदा आपणांस मिपाराष्ट्राच्या नात्याने विनंती करते आहे की, स्लटवॉक आपण थांबवावे, मात्र लढा सुरूच ठेवावा. आपल्या आंदोलनाचा व या लढ्याचा आंतरजालिय फायदा-तोटा काय हे हिशेब आम्ही करत नाही व आमचा तो स्वभाव नाही. पुढील स्लटवॉकसाठी आपले प्राण महत्त्वाचे. आई मिसळादेवी आपणास उदंड पाव (वॉकसाठी) देवो, हीच प्रार्थना !
जय संपादक ! जय मिपाराष्ट्र ! कांदे कातरम !
आपली नम्र
(प्राजक्ता)
संपादक
(प्रेरणा "हा" धागा आणि शिवसेनाप्रमुखांचे आण्णांना पत्र यातील मजकूर)
वाचने
4659
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण घासूगुर्जी स्वतः छुपे
मस्त मस्त लेख, प्राजुताई! लेख
गुर्जी आणि त्यांचे सहकारी
सहमत
In reply to गुर्जी आणि त्यांचे सहकारी by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरेरे, परा ३_१४ विक्षिप्त
In reply to सहमत by परिकथेतील राजकुमार
पण ही लढाई आपल्या संपादकांवर
कमाल आहे नाही? ..
"आपण संपादक आहोत हे
परत तीच बोंब. एकदा डीक्लेर
ऑ ?
In reply to परत तीच बोंब. एकदा डीक्लेर by इरसाल
वैश्विक सत्य
??
In reply to वैश्विक सत्य by नितिन थत्ते
बरोबर
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
मग सध्याचा काउंट काय आहे म्हणे
In reply to बरोबर by नितिन थत्ते
वश?
In reply to मग सध्याचा काउंट काय आहे म्हणे by सहज
संपादकहो
In reply to वश? by श्रावण मोडक
सेक्सिस्ट विधान
In reply to वैश्विक सत्य by नितिन थत्ते
कुठे?
In reply to सेक्सिस्ट विधान by राजेश घासकडवी
हे राळेगण सिद्धी नेक्सिकोच्या
संपादकांना मार्गदर्शन करता येईल का?