पुणेरी वाहतूक
चालणारा, दुचाकीस्वार, चार चाकी चालवणारा ह्यांचे स्वगत :
पुढे मागे करत करत रस्ता कसाबसा मी ओलांडला
"काय मेले गाडीवाले चालवतात" असा विचार मनास चाटून गेला
फूटपाथ वरून चालणं देखील झालंय भलतच मुश्किल
काही भरवसा नाही; त्यावरूनही ही लोकं गाड्या हाकतील
हे मोठे गाडीवाले करतात भलताच माज
असे रस्ते आडवून गाड्या चालवतात जणू काही ह्यांचच आहे राज
आम्हा गरिब दुचाकीस्वारांना अगदी कोपर्यात घालतात
पावसाळा असला तर विचारयलाच नको; सर्रास चिख्खल उडवून जातात
ह्या दुचाकीवाल्यांना चालवण्याची अजीबात नाही शिस्त
लेन न पाळणार्यांचा तर परवानाच केला पाहिजे जप्त
रस्यावर चालणारे तर बागेत असल्यासारखे फिरत असतात
कुठे कुठे आणि कसं लक्ष्य ठेवायचे हे प्रश्न आम्हास पडतात
कुणाला हक्क कधी द्यायचा हे कोडे तसेच राहणार?
प्रत्येकाने नियमाचे पालन केले तर हा प्रश्नंच नाही उरणार
तोपर्यंत ही कोंडी तशीच असणार; म्हणून मंत्र अगदी सोपा
आपलंच साधन पुढे रेटून आपापल्या स्थळी पोचा
लेखनविषय:
याद्या
2242
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
वाहतूकीत अडकलेल्यांची स्वगते
खरं आहे
In reply to वाहतूकीत अडकलेल्यांची स्वगते by मनीषा
आम्हा गरिब दुचाकीस्वारांना
छान कविता आहे
अमेरिकेतही "रस्त्यावर पहिला
In reply to छान कविता आहे by चेतन सुभाष गुगळे
पुण्याबद्दलच्या कोणत्याही
अशा कविता मी तिसरीत आसताना
हीडीस आणि हिणकस "प्रामाणीक"
In reply to अशा कविता मी तिसरीत आसताना by pramanik
''फूटपाथ वरून चालणं देखील
पुणेरी वाहतूक
साधं, सरळ आणि भावस्पर्शी