Skip to main content

स्वप्नांचा मागोवा

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 26/08/2011 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांचा मागोवा घेत मी निघालोय प्रवासाला ती सत्यात उतरवण्यासाठी. .. मोठं व्हायचंय मला अंधारावर मात करता येईल विचार आहेत डोक्यात बघू या, काय होतंय छोटासाच कंदील हातात योजने योजने दुरचा प्रवास दोनच पावलं दिसतात पण, ती पुढे टाकली कि रस्ता येतो आवाक्यात जवळची पुंजी थोडी त्यावरही करीन मात कष्ट करुन अजून मिळवीन आहे तेवढी ताकद मनगटात फिरताना जगाच्या बाजारात अनुभव खूप मिळेल काय चालते, चालंत नाही जागेवरतीच कळेल फुकटाच्या घबाडाचं मला काय पडलंय अनुभवाच्या शिदोरीतच माझं नशीब दडलंय
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1448
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

संपादक हि कविता चुकून "जनातलं मनातलं" मध्ये टंकली गेली आहे. कृपया ती योग्य जागी- " जे न देखे रवी " मध्ये टाकावी हि विनंती.

फारच छान कविता. फुकटाच्या घबाडाचं मला काय पडलंय अनुभवाच्या शिदोरीतच माझं नशीब दडलंय >> हे कडवं तर फारच छान!

फुकटाच्या घबाडाचं मला काय पडलंय अनुभवाच्या शिदोरीतच माझं नशीब दडलंय मस्त लिहिलंत...