Skip to main content

बुखारीचे विखारी निखारे!

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 25/08/2011 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.dawn.com/2011/08/22/top-indian-cleric-warns-muslims-off-anna… नुकतेच जामा मशिदीच्या इमामाने अण्णा हजारेविरुद्ध गरळ ओकले. त्यातला राजकीय भागही विचार करण्यासारखा आहे. अण्णांनी मुस्लिमांकरता काही केले नाही असा ह्या माणसाचा कांगावा आहे. पण अजून एक विकृत मुद्दा म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी काही लोकांनी "वंदे मातरम" च्या घोषणा दिल्या म्हणून मुस्लिमांनी ह्या आंदोलनापासून दूर रहावे असा सल्ला हजरतसाहेबांनी दिला आहे. काही तुरळक मुस्लिमांनी ह्या विचारांना विरोध केला आहे खरा. पण वंदे मातरम ह्या गाण्याचे इतके अधःपतन? इथे मिसळपाववरही अलीकडे काही पुरोगामी लोकांकडून ह्या वंदे मातरमविरुद्ध गरळ ओकले गेले होते. पण हे फारच झाले. वंदे मातरम म्हणणे म्हणजे मुस्लिम विरोध? इतके क्रांतिकारक, आंदोलनकर्ते वंदे मातरम हा मंत्र पवित्र मानायचे. कित्येक लोक तो म्हणत आनंदाने फासावर चढले. अगदी पु.लंच्या सिनेमात वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम असे गाणे होते ते पु.ल., माडगूळकर सगळे मुस्लिम विरोधी? फार काय ५० वर्षापूर्वी काँग्रेसमधेही वंदे मातरम आदरणीय समजले जात होते. कायद्यानेही ह्या गाण्याला निदान राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आहे तो मुस्लिम विरोध म्हणून का? ह्या विधानाविरुद्ध समस्त पक्षांनी टीकेचे मोहोळ उठवायला हवे होते. पण तसे काही दिसत नाही. इफ्तार पार्ट्यांचे जेवण जरा जास्त झाले असावे. पण असा पायंडा पडणे घातक आहे. वंदे मातरम ही काही हिंदुत्ववाद्याची मक्तेदारी नाही. ह्या देशाचा अभिमान वाटावा अशा इतिहासाचा भाग आहे.

वाचने 5112
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

सध्या इफ्तार पार्टीत आहे. जमल्यास नंतर प्रतिक्रिया देऊच.

हे इमामभाऊ भारतातलेच ना? त्यांची जन्मभू, कर्मभू, पितृभू (निदान कुठली तरी भू) भारतच... अरे म्हणजे ते हिंदूच नाही का? मला कळत नाही, हे हिंदू लोक आपापसात का भांडत बसतात ते.

In reply to by राजेश घासकडवी

हे इदी अमीन मनुष्ययोनितलेच ना? त्यान्चे जन्मदाते, जन्मदात्री (आणि सगळ्या बायकाही) माणसेच ... अरे म्हणजे तेही एक माणूसच नव्हते का? मला कळत नाही, ही माणसेच इतर माणसाना खाउ कशी शकतात ते.

In reply to by राजेश घासकडवी

हे इमामभाऊ भारतातलेच ना? त्यांची जन्मभू, कर्मभू, पितृभू (निदान कुठली तरी भू) भारतच... अरे म्हणजे ते हिंदूच नाही का? मला कळत नाही, हे हिंदू लोक आपापसात का भांडत बसतात ते.
:)

In reply to by राजेश घासकडवी

घासकडवीकाका माणसातलेच ना? मग ते भू भू भू असा कुत्र्यासारखा आवाज का काढत आहेत? :-) असो. इमाम भेटला तर आपले भूभू विचार त्याच्या पचनी पडतात की बघा.

In reply to by हुप्प्या

म्हणून तर ते शाही इमामांना भेटायला जाताना गायत्रीमंत्राचे बुभु:कार ('ॐ भूर्भुवः स्वाहा...') करीतच जाणार आहेत, असे ऐकले होते. (काय हो घासकडवीकाका?) (बादवे ते वरिजनल पितृभू, कर्मभू, पुण्यभू वगैरे भू-भू-भू करणारे कोण हो?)

In reply to by पंगा

असे आवाज काढले की लहान मुलं खूष होतात आणि आपलं ऐकतात. शिवाय कविता म्हटल्यासारखंच वाटतं, ते ही लहान मुलांना आवडतं. लहान मुलांना समजावण्यासाठी घासकडवीकाका असं करत असावेत. बाकी भाईकाकांचे बुभृत् शब्द चालवण्यावरून काय विनोद आहेत ते विसरले आता!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>बाकी भाईकाकांचे बुभृत् शब्द चालवण्यावरून काय विनोद आहेत ते विसरले आता! तुला भूभृत् म्हणायचे आहे. तू भाईकाका वाचले आहेस की नुसते ऐकले आहेत ?? नाही तुझे वाचन अदरवाईज बऱ्यापैकी आहे असे वाटले होते मला ;-) असो, भूभृत् म्हणजे राजा, संस्कृत शिकताना पुढच्या वर्गात हा शब्द चालवून दाखवा लागतो. (पहिले ३ शब्द राम/देव, माला आणि वन असतात :-) ) सुरुवातीला स्वरांत शब्द असतात, पुढे व्यंजनान्त असतात. त्यातला एक भूभृत्. पुलंच्या एका पुस्तकात एका पात्राला दुसरे पात्र हा शब्द चालवून दाखवायला सांगते. आणि ते नीट करता न आल्याने "डोंबा, भू भू काय करतो कुत्र्यासारखा?" असे काहीसे म्हणते. शेवटी पहिले पात्र तो भूभृत मोडक्या खटाऱ्यासारखा चालवतो. (असे वाचल्याचे स्मरते.)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पात्र?? i=1; while(i2) {
तू भाईकाका वाचले आहेस की नुसते ऐकले आहेत ?? नाही तुझे वाचन अदरवाईज बऱ्यापैकी आहे असे वाटले होते मला
पुलंच्या एका पुस्तकात एका पात्राला दुसरे पात्र हा शब्द चालवून दाखवायला सांगते.
तुम्ही भाईकाका वाचले आहेत की... i=i+1; } घाटी लोकांनी कोडींग मधल्या चुका काढू नयेत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भाईकाकांनी वापरलेल्या अर्ध्या श्लोकाचे वरिजिनल हे घ्या : रामो हरि: करी भूभृत् भानु: कर्ता च चन्द्रमा:। तस्थिवान् भगवान् आत्मा दशैते पुंस् नायका:।।

आता या नंतर रामदास आठवले का मायावती?

इस्लाम मधे अल्ला सोडून कोणालाही देव मानण्यास परवानगी नाही. मग जर इतर कोणताही देव नाही तर त्याला नमस्कार कोठून करणार? मग वंदे मातरम् म्हणणे इस्लामविरोधी आहे अशा बुखारी साहेबांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. असो. आमचा विरोध असेल तर या बुखारी साहेबांनी आणि त्यांच्या अनुयायांनी आमच्या देशात राहण्यालाच आहे. :) मध्यंतरी आम्ही sterilize असा काहितरी शब्द ऐकला होता.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आम्हाला ओसरी देणारे मा. पुपे ह्यांच्या शब्दाशब्दाशी सहमत आहे. अवांतर :- डॉन मधला लेख असल्याने सुकांच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आम्हाला ओसरी देणारे मा. पुपे ह्यांच्या शब्दाशब्दाशी सहमत आहे. तुम्ही स्पार्टन आहात हे वारंवार अधोरेखेत कशाला करताय? जातीवाचक कुठचे...... ;)

असं पण सत्ताधारी पक्ष आणि "इमाम" ह्यांच्यात पहिल्यापासून सख्य आहे.इतिहासातही ह्याच सत्ताधार्यांनी कितीतरी वेळा मान तुकवलेली आहेच.कदाचित असले वक्तव्य करावयासाठी बंद लखोटा गेला असावा हि शंका नाकारता येत नाही.

इस्लाम मधे अल्ला सोडून कोणालाही देव मानण्यास परवानगी नाही. पेशवे काका हे विधान थोडे व्यवस्थित कथन करायचे झाले तर ज्या काळात तो धर्म निर्माण झाला त्या काळात गुलामांची विक्री वगैरे व्यवसाय जोरात होते. लोक सुलतान वगैरेंच्या जुलुमाखाली पिचले जात होते. तसेच धर्माच्या / ऋढी परंपरांच्या नावाखाली गरीब नाडले जात होते त्या काळी जर कोणी अल्ला हाच एकमेव श्रेष्ठ आहे त्याच्या शिवाय इतर कोणीही मोठे नाही. तुम्ही फक्त देवासमोत नत्मस्तक व्हा बाकी इतर सर्व तुमच्या सारखेच आहेत ते तुमच्या पेक्षा मोठे नाहीत त्यांच्या समोर झुकू नक . सर्वसामान्य मानवाला धाडसी बनवणारा असा संदेश दिला तर ते गैर आहे असे नाही. मात्र त्याचा सोयीस्कर वेगळाच अर्थ लावणे हे घृणास्पद कृत्य आहे. श्री कृष्णानेदेखील गीतेत "मामेकं भजे" असा संदेश दिलेला आहे. ( कट्टर वैष्णव लोक इतर कोणत्याच देवळात जात नाहीत..... अगदी सत्यनारायणाचा प्रसाद देखील अव्हेरतात)

In reply to by विजुभाऊ

पुपेंनी जे विधान्/कारण दिले तेच कारण इमाम बुखारी यांनी दिले आहे. जिथे हे इमाम लोकच वेगळा अर्थ लावतात तिथे सामान्यांचे काय??

In reply to by विजुभाऊ

आता सुलतान वगैरे इतिहासजमा झाले. गुलामांची विक्री बेकायदा ठरवली गेली. लोकांना जनताजनार्दन बनवले गेले. तर मग बदलत्या काळाची पावले ओळखून आपले धार्मिक तत्त्वज्ञान बदलायचे का होते तेच १४०० वर्षापूर्वीचे कलेवर कवटाळून बसायचे?

In reply to by विजुभाऊ

मान्य. त्याचा सोयीस्कर वेगळाच अर्थ लावणे हे घृणास्पद कृत्य आहे. आमच्या देवाला न मानणाऱ्या किंवा मूर्तीपूजा करणाऱ्यांना ठार मारा असा सोयीस्कर अर्थ लावणारे आणि त्याप्रमाणे कृती करणारे काही आहेत ते निश्चितपणे घृणास्पदच आहे. मी म्हणतो असा ठार मारायचा विचार करणेही घृणास्पदच आहे. पण मी केवळ देवापुढेच झुकेन आणि इतर कोणालाही नमस्कार करणार नाही असा विचार असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काही आहे असे वाटत नाही.तेव्हा वंदे मातरमला या कारणासाठी विरोध करणे हे देशद्रोही कृत्य म्हणून का गणले जाते हेच समजत नाही. आता या धाग्याचा लेखक याला "वंदे मातरमविरूध्द गरळ ओकणे" म्हणत असेल तर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष. बाकी क्रांतिकारकांना "वंदे मातरम" पवित्र वाटायचे या कारणासाठी ते सगळ्यांना पवित्र वाटलेच पाहिजे असे अजिबात नाही.आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांमध्ये डाव्या विचारसरणीचे अनेक क्रांतिकारक होते.त्यांना डावे विचार आदरणीय आणि अनुकरणीय (पवित्र वाटत होते की नाही ते माहित नाही) वाटत होते म्हणून तेच विचार सगळ्यांना तितकेच आदरणीय वाटावेत असे थोडीच आहे? पु.लंच्या सिनेमात "वेदमंत्राहूनही वंद्य आम्हा वंदे मातरम" असे म्हटले असेलही.पण मुस्लिम समाजाला ते वेदमंत्रच वंद्य वाटत नसतील तर पुढचे सगळे विधानच गैरलागू होते. तेव्हा ज्या न्यायाने वंदे मातरम म्हणणे म्हणजे मुस्लिम विरोध नाही त्याच न्यायाने वंदे मातरमला वरील कारणामुळे विरोध करणे हा देशद्रोहही समजणे योग्य नाही.

In reply to by क्लिंटन

त्याचा सोयीस्कर वेगळाच अर्थ लावणे हे घृणास्पद कृत्य आहे....मी म्हणतो असा ठार मारायचा विचार करणेही घृणास्पदच आहे. सहमत. आपण हे असे जो कोणी वागत असेल त्या व्यक्तीबद्दल बोलत असाल अशी खात्री आहे. जर सिलेक्टीव्ह असेल तर अर्थातच त्या सिलेक्टीव्ह असण्याबद्दल आक्षेप आहे. वंदे मातरमला या कारणासाठी विरोध करणे हे देशद्रोही कृत्य म्हणून का गणले जाते हेच समजत नाही. देशद्रोही आहे का नाही हा आता मुद्दा नसेलही आणि मला तो वाटत नाही. पण ज्या मूळ चर्चाविषयासंदर्भात हे चालले आहे, त्यात दिलेल्या डॉन मधील दुव्यात बुखारी म्हणाले आहेत, "Bukhari also objected to the campaign’s use of the slogan “Vande Mataram”(Hail to the Motherland) to rally its supporters, saying it was blasphemous for Muslims." आता यातून दोन मुद्दे येतातः जर केवळ मुसलमानांनी म्हणून नये असे असणे आणि मुसलमानांना ब्लासफेमी वाटणे याचा अर्थ (ब्लासफेमीच्या अर्थाने) मुसलमान धर्माच्या आणि म्हणून मुसलमानांच्याविरुद्ध आहे असे म्हणणे. मात्र दोन्ही मध्ये त्यांच्या लेखी गैरमुसलमानी व्यक्तींनी देखील म्हणण्यास त्यांचा विरोध आहे, धर्मद्रोही कृत्य म्हणून आणि तेही सेक्यूलर देशाचे नागरीक असताना. तसे जर कोणी सामाजीक चळवळीत म्हणले तर त्यात देखील ते धार्मिक फूट पाडतात. इथे जेंव्हा कोणी चुकीच्या भाषेत लिहीते तेंव्हा होणारा परीणाम आणि बुखारींसारखी धार्मिक नेतृत्व करणारी व्यक्ती जेंव्हा असे बोलते तेंव्हा त्याचा होणार परीणाम यात माझ्या दृष्टीने जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणून केवळ हा मुद्दा, "बाकी क्रांतिकारकांना "वंदे मातरम" पवित्र वाटायचे या कारणासाठी ते सगळ्यांना पवित्र वाटलेच पाहिजे असे अजिबात नाही." इतकाच नसून एखाद्या सामाजीक/राजकीय चळवळीच्या नेतृत्वाने पवित्र म्हणण्यापेक्षा देशप्रेमाने वंदेमातरम म्हणले तर त्याला अपवित्र म्हणत त्या चळवळीची योग्यायोग्यता ठरवण्यात आणि आपल्या अनुयायांमधे अजून चुकीचे विचार पसरवण्याबद्दल आहे. दुर्दैवाने धाग्यात बुखारींच्या या मतांबद्दल चर्चा न होता, केवळ हिंदूंना टपल्या मारणे आणि मुसलमान धर्म कधी निघाला वगैरेचा इतिहास सांगणे असे म्हणत दुर्लक्ष केले गेले आहे. याला काय म्हणायचे ते माहीत नाही. पण माझ्या लेखी असे कोणी करू नये, ते देखील निषेधार्ह आहे. या संदर्भात येथे देखील अगदी पॉलीटीकली करेक्टनेस (पीसी) म्हणून म्हणा अथवा इतिहासाने लावलेली सवय म्हणून म्हणा), जर चांगलेच देयचे असेल तर देखील देता येऊ शकते. केवळ पीसी म्हणून नाही तर सकारात्मक देण्यासाठी म्हणून हे देत आहे: बुखारींच्या या भडक आणि विखारी भाषेनंतर इंडीयन उलेमा बोर्डाने त्यांना दिलेला पाठींबा बघण्यासारखा आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा खालील प्रमाणे:
The move comes days after Imam Syed Bukhari of Delhi’s Jama Masjid blasted Anna’s campaign for using slogans like Vande Mataram and Bharat Mata Ki Jai. Although the clerics who had gathered said they were not comfortable with the slogans, they said the need of the hour was to unite against corruption. Soon, the crowd began chanting “Anna ke char bhai, Hindu, Muslim, Sikh, Isai.” Allama Bunai Hasani, general secretary of the All India Ulema Board, said issues like chants and slogans raised by crusaders of the movement should not be hyped as a bigger issue was at stake. “Islam does not permit worshiping either the mother or the land, but that is not the issue. The main issue is to ensure that the Jan Lokpal Bill is passed. We must not deviate from that. We must remember that this fight goes beyond religion and boundaries and all Indians must unite,” he said.
आणि इतकेच अपेक्षित असते.

In reply to by विकास

It is high time now Shahi Bukhari should vacate his chair.And start reading Sayed Khatab ‘s book "Democracy in Islam", which itself is a challenge to extremist like him. जब शहा(बादशहा) ही नहीं रहे तो शाही इमाम की क्या जरुरत ? जब कभी यह लोग अपनी ही करतूतोंके बारेमें, तनहाईयोंमें सोचेंगे ... अगर उनका जमीर जिंदा होगा तो अपनी ही नजरोंमें जरुर गिर जायेंगे पता नहीं कयामत के रोज खुदा को क्या मुंह दिखायेंगे ? आवाम को गुमराह करने की वजह क्या बताएंगे ?

In reply to by वाहीदा

जब शहा(बादशहा) ही नहीं रहे तो शाही इमाम की क्या जरुरत ?
सही है! ये हुई ना बात!. जबतक ये लोग बैठे है कौम की उन्नती कभी नही होगी...

In reply to by क्लिंटन

पण मी केवळ देवापुढेच झुकेन आणि इतर कोणालाही नमस्कार करणार नाही असा विचार असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काही आहे असे वाटत नाही.तेव्हा वंदे मातरमला या कारणासाठी विरोध करणे हे देशद्रोही कृत्य म्हणून का गणले जाते हेच समजत नाही. आता या धाग्याचा लेखक याला "वंदे मातरमविरूध्द गरळ ओकणे" म्हणत असेल तर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष. नाही नाही सरद सद्गृहस्थ आणि त्यांचे अनुयायी खरोखर अशा मताचे असते तर आदरच होता. म्हणजे "यतिमन मम मानी तया एकल्या नॄपाला" वगैरे वगैरे निर्भयपणाचे , निस्पृहतेचे विचार कायम असते तर ठीक होते. हेच बुखारि साहेब दर जुम्म्याला जामा मशिदीत गरळ ओकत असतात. आता जेव्हा आंदोलनाच्या बाबतीतली भूमिका कशी हा प्रश्न येतो तेव्हा अशा बाष्कळ गोष्टी बोलून आंदोलनाला विरोध जर कोणी करत असेल तर तो देशद्रोहच आहे. आपल्या सारख्या विचारी माणसाकडून सदर प्रश्नाची अपेक्षा नव्हती.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

"यतिमन मम मानी तया एकल्या नॄपाला"
जरा माझ्यासारख्याला समजेल अशा भाषेत लिहिलेत तर बरे होईल :)
बुखारि साहेब दर जुम्म्याला जामा मशिदीत गरळ ओकत असतात.
अशी गरळ ओकणे अजिबात समर्थनीय नाही. निदान मी तरी त्याचे समर्थन कधीच करत नाही आणि त्याबद्दल त्याला शिक्षा होत नाही याचेही मला वाईटच वाटते.
आता जेव्हा आंदोलनाच्या बाबतीतली भूमिका कशी हा प्रश्न येतो तेव्हा अशा बाष्कळ गोष्टी बोलून आंदोलनाला विरोध जर कोणी करत असेल तर तो देशद्रोहच आहे.
आंदोलनाला विरोध म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन असा अर्थ का घेतला जातो?नेमका हाच मुद्दा मी इतर काही प्रतिसादांमध्ये मांडलेला आहे.पण त्याचे अजून कोणी उत्तर दिलेले नाही. माझी अण्णांच्या आंदोलनावरची भूमिका म्हणजे "विरोध" पेक्षा "पाठिंबा नाही" अशी आहे. आणि याची कारणे मी इतरत्र लिहिली आहेत (मिपावरील इतर चर्चांमध्ये) दुसरी गोष्ट म्हणजे बाष्कळ गोष्टी नक्की कशाला म्हणायचे ही प्रत्येकाची पर्सनल गोष्ट झाली. म्हणजेच अगदी वंदे मातरम म्हटले गेले तरी ते चळवळीपासून दूर राहण्यासाठी सबळ कारण आहे का हे वंदे मातरमला वरील कारणाने समर्थन नसलेल्यांनी ठरवायचे. तेव्हा आंदोलनाला विरोध म्हणजे भ्रष्टाचाराचे समर्थन आणि देशद्रोह हे मला अनाकलनिय वाटते. असो.
आपल्या सारख्या विचारी माणसाकडून सदर प्रश्नाची अपेक्षा नव्हती.
आता प्रत्यक्ष पेशव्यांकडून सर्टिफिकेट मिळाल्यावर आणखी काय हवे?

In reply to by विजुभाऊ

विजुभाउंचे स्पष्टीकरण वाचत असताना एक प्रश्न पडला. "इस्लाम मधे अल्ला सोडून कोणालाही देव मानण्यास परवानगी नाही. " ह्या वाक्याचे यथोचीत स्पष्टीकरण त्यांना द्यावेसे वाटले, जेणेकरून आउट ऑफ कॉन्टेक्स्ट घेतले जाणार नाही. पण ते असे त्यांच्या इतर "लाडक्या" विषयांच्या बाबतीत करताना दिसत नाहीत. तिथे मात्र आउत ऑफ कॉन्टेक्स्ट चालते. असो. चालूंद्यात.

In reply to by विकास

सहमत्त आहे. आणि हापचड्डीवाल्या रा स्व संघाबाबतीत तर हा औट ऑफ कॉन्टेक्स्ट प्रकार विषेशत्वाने दिसतो. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पुपेंशी एकंदरीत सहमतच. फक्त "हापचड्डीवाल्या" पेक्षा "चड्डीवाल्या" हे ­जास्त अचूक ठरेल. ;)

अण्णांनी मुस्लिमांकरता काही केले नाही असा ह्या माणसाचा कांगावा आहे. आजच आमिर खान ने अण्णांच्या व्यासपिठावर येउन त्यांना समर्थन दिले आहे आणि त्यांचे उपोषण सोडण्यासाठी विनंती केली. बुखारीच्या वायफळ बडबडीला कोण भीक घालणार ? ;)

हे वृत्त मी सर्वप्रथम टाइम्समध्ये वाचले. कांहीं तासातच त्या बातमीला ५००+ प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातल्या बहुसंख्य मुस्ल्लिमांच्या होत्या व सार्‍यांनी एक जात इमामसाहेबांची निर्भत्सना केलेली होती. त्या प्रतिक्रिया वाचून असे वाटले कीं जुन्या पिढीचे माहीत नाहीं, पण नवी पिढी तरी धर्मगुरूंच्या तितकी मागे नाहीं. मला त्या बातमीचा राग '१' आला असेल तर प्रतिक्रिया वाचून झालेली खुषी '१०' होती व भारताचा भविष्यकाल उज्ज्वल आहे याची खात्री पटली. आज अण्णांच्या आंदोलनातही मुस्लिम व इतर अल्पसांख्यांकही भरपूर आहेत हीही बाब महत्वाची वाटते. मला वाटते कीं मुस्लिमांच्या स्त्रिया जसजशा जास्त शिकू लागतील तसतशी ही परिस्थिती सुधारत जाईल. (जिच्या हाती पाळण्याची दोरी वगैरे वगैरे) आता एक नवा विषय! "वंदे मातरम्" हे पूर्ण गाणे किती लोकांनी वाचले/ऐकले आहे? आपण ऐकतो ते फक्त पहिले कडवे, उरलेली कडवी किती लोकांनी ऐकली आहेत? एकदा गूगलवरून डाउनलोड करा आणि वाचा. मग पुढचे बोलू!