अण्णा हजारेंच्या आंदोलनाबाबत आजवर न झालेली गोष्ट म्हणजे त्यांच्या उपोषणाचा विरोधी पक्षाना नेहमीप्रमाणे मुद्दाच करता आलेला नाही. केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष म्हणजे भाजप आणि मित्र मंडळ.
मात्र अण्णांनी जे जनलोकपाल विधेयक मागितले आहे त्याबद्दल हा पक्ष सुरवातीला उत्सुक दिसला मात्र कुठे माशी शिंकली कोण जाणे अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे भाजपने अण्णांच्या आंदोलनाबाबत एकदम सावध भूमिका घ्यायला सुरवात केली.
एरवी काँग्रेसप्रणीत भ्रष्टाचाराबद्दल घणाघाती भाषणे करणारे नेते देखील अण्णांच्या आंदोलनाबद्दल काहीच भाष्य करीत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे
भाजपला खरेतर या आंदोलनाचा पूरेपूर लाभ उठवता आला असता. मात्र त्यांच्या नेतृत्वाने कर्नाटकात घेतलेल्या तळ्यातमळ्यात भूमिकेनंतर एकदम यू टर्न घेणे त्याना जमत नसेल किंवा नवे सशक्त नेतृत्व मिळत नसेल. काँग्रेस ला विरोध आहे मात्र अण्णांच्या लढ्याला सहानुभुती सुद्धा नाही अशी काहीशी भूमिका दिसून येत आहे. अर्थात भाजप सारख्या पक्षाची हीच शोकांतिका आहे. कोणतीही निश्चित भूमिका घ्यायची नाही हाच कदाचित त्यांचा जनादेश मिळवण्याच मध्यममार्ग असू शकेल.
अण्णांच्या लढ्यात एक सामाजिक संस्था म्हणून तसेच नेहमी साधन शुचितेचा आग्रह धरणार्या रास्व संघा चा देखील सहभाग अजिबात नसावा हे मात्र खरोखरीच एक आश्चर्य आहे.
संघ परीवारातील इतर संघटना आहेत की नाहीत इतके त्यांचे आस्तित्व क्षीण झाले आहे.
अण्णांच्या आंदोलनाने भारतात एक इतिहास घडवणार्या महत्वाच्या वळणावरच्या क्षण आणणार्या लढ्याला या सर्व संघटनानी जणू न दिसल्या सारखे केले आहे. त्यामुळे या संघटनाना सामाजिक प्रश्नांचे किती भान आहे हेच दिसून येते. राम मंदिर प्रश्नी रान उठवणार्या या सर्व संघटना भ्रष्टाचार या मुद्द्या बद्दल एकदम आळिमिळी गुपचिळी बाळगून आहेत.जणू या सर्व परीवाराला राजकीय सत्ता प्रणीत भ्रष्टाचाराबद्दल काहीच देणेघेणे नाही.
सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष या दोघानाही जनलोकपाल विधेयक नको आहे असाच समज यामुळे जनसामान्यांचा होत आहे.
आपल्या वागणूकीने दोघेही यावर शिक्कामोर्तब करीत आहेत
वाचने
7164
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
आश्चर्य काहीच नाही
माध्यमे त्यांची मते आपल्यावर
गडबड...
In reply to माध्यमे त्यांची मते आपल्यावर by विजुभाऊ
अहो त्याचा आणि याचा काहिही
In reply to गडबड... by विकास
अहं
In reply to अहो त्याचा आणि याचा काहिही by विजुभाऊ
भाजपाचे मला देखिल आश्चर्य वाटत आहे.
+१००
In reply to भाजपाचे मला देखिल आश्चर्य वाटत आहे. by वेताळ
समज नव्हे वस्तुस्थिती
काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष - काही इतिहास
>>२००१-२००३ वाजपेयी सरकारने
In reply to काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष - काही इतिहास by विकास
या संदर्भात
In reply to >>२००१-२००३ वाजपेयी सरकारने by नितिन थत्ते
या संदर्भात
In reply to >>२००१-२००३ वाजपेयी सरकारने by नितिन थत्ते
तर्क
In reply to या संदर्भात by विकास
असं नाही आहे
In reply to >>२००१-२००३ वाजपेयी सरकारने by नितिन थत्ते
माझ्या मते त्यावेळी वाजपेयी सरकार मधल्या काही मित्र
राम मंदिर प्रश्नी रान
एकूणातच आकडेवारी पहाता ज्या
लोकपालच जर भ्रष्टाचारी निघाला
उत्तर
In reply to लोकपालच जर भ्रष्टाचारी निघाला by pramanik
छान!!
In reply to लोकपालच जर भ्रष्टाचारी निघाला by pramanik
सत्ताधारी तसेच
खरेखोटे माहीत नाही...
या घटनेला सात वर्षे होऊन गेली
माझे ठाम मत
In reply to या घटनेला सात वर्षे होऊन गेली by विजुभाऊ
आंदोलन जे रामलीला मैदानावरती झाले त्याची एक आठवण.
मस्त लिहिता तुम्ही, प्रतिसाद
In reply to आंदोलन जे रामलीला मैदानावरती झाले त्याची एक आठवण. by shashu
अगदी योग्य वाक्य/उदाहरण वापरलेत तुम्ही.
In reply to मस्त लिहिता तुम्ही, प्रतिसाद by बिटाकाका