Skip to main content

जनलोकपाल आणि मिपासंपादक

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 24/08/2011 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेले काही दिवस मिपा, टीव्ही, वर्तमानपत्रे बघावे तिकडे अण्णा आणि जनलोकपाल ह्यावर खडाजंगी वाचायला मिळत आहे. आपल्याला त्यातले जास्ती काही कळत नाही पण एकूणच आर्थिक, सामाजिक भ्रष्टाचाराला खीळ बसावी , सामान्य लोकांना न्याय मिळावा, अकार्यक्षम अधिकारी तसेच बाबू लोकांना चाप बसावा ह्यासाठी काहीतरी कायदा बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत येवढेच आम्हाला कळले. मग मनात असे आले की, सामान्य मिपाकरांचे प्रतिसादाच्या प्रतिसाद खाणार्‍या, कधी कधी तर अख्खे धागेच घशात घालणार्‍या संपादकांना जनलोकपालच्या कक्षेत आणता येईल काय ? त्यासाठी काय करावे लागेल ? अनिवासी संपादकांना ह्यातून सूट मिळण्याची शक्यता आहे का ? तसे असल्यास ते सध्या ज्या देशात आहेत त्या देशाशी एखादा करार (गुन्हेगार हस्तांतरा सारखा) करून त्यांना ह्या न्याय कक्षेत आणता येईल काय ? संपादक मंडळ ह्या आयडीवर गुन्हा दाखल झाल्यास त्याचे उत्तरदायित्व नक्की किती व कोणत्या संपादकांवर लादता येईल ? आणि मुख्य म्हणजे कोणी मिपाकर ह्यासाठी उपोषण करेल काय ?

वाचने 35396
प्रतिक्रिया 170

प्रतिक्रिया

In reply to by चेतन सुभाष गुगळे

काय ते सारखं सारखं जॉन जॉन चालवलं आहे. अहो तो चार दिन की चांदनी आहे. हे असले स्टेरॉईड खावून बॉडी बनविणारे खुप जण आले नि गेले.
पिंपरी-चिंचवडला आणखी पाणी का हवं आहे हे आत्ता समजलं. एवढी आग लागल्यावर पाण्याचा वापर जास्त होणारच.
आपला देव आनंद पाहा. कसा चिरतरूण आहे.
आपला? देव आनंद आपला कधीपासून झाला? तुम्हाला हवा असेल तर तुम्हीच ठेवा स्वतःकडे.
अभिजात सौंदर्याकडे पाहा. तकलादू गोष्टींचा नाद सोडून द्या.
छ्या, मी कशाला सौंदर्याकडे पाहू? माझी आवड वेगळी आहे. इश्श, तुम्हाला बरं माहित जॉनचं सौंदर्य तकलादू आहे ते! तुम्हाला बर्‍या बाई, आतल्या बातम्या असतात. अय्या, मग सध्या त्याचं कोणाबरोबर अफेअर सुरू आहे ते सांगा ना प्लीज.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आपला? देव आनंद आपला कधीपासून झाला? तुम्हाला हवा असेल तर तुम्हीच ठेवा स्वतःकडे>> हे वाचलं, http://www.loksatta.com/lokprabha/20090227/metkut.htm यातलं शेवटचं वाक्य "देव करो आणि आपल्या देव आनंदवर अशी पाळी कधीही न येवो" वाचून देव आपला असल्याचं वैश्विक सत्य जाणवलं, पटलं म्हणून असं लिहीलं असो. तुम्हाला बरं माहित जॉनचं सौंदर्य तकलादू आहे ते! तुम्हाला बर्‍या बाई, आतल्या बातम्या असतात>> तो सिगारेटी फुकत असतो ते कुणापासून लपून राह्यलंय. व्यसनी माणसाचा र्‍हास होतंच असतो तेव्हा हे सौंदर्य तकलादू च ठरणार. मग सध्या त्याचं कोणाबरोबर अफेअर सुरू आहे ते सांगा ना प्लीज.>> कोण घरंदाज महिला अफेअर करेल, सरळ लग्नच नाही का करणार? आणि अफेअर करायचं तरी जॉनबरोबर? अशा महिलेची अभिरूची काय पातळीची तेही समजतंच की. अशा महिलांची माहिती मी तरी ठेवत नाही.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

तो सिगारेटी फुकत असतो ते कुणापासून लपून राह्यलंय.
भलते सलते आरोप खपवुन घेतले जाणार नाहीत.... तो निरोगी, निर्व्यसनी आहे.... अजय देवगन किंवा शारुख म्हणा खुश्शाल हवं तर....
अशा महिलांची माहिती मी तरी ठेवत नाही.
मग काय ठेवता ?
म्हंजे कश्या महिलांची माहिती ठेवता असे म्हणावयाचे आहे.... अवांतर :: आपल्या लग्नाला किती वर्ष झाले आहेत ? (हा प्रश्न वैयक्तिक नाही....)

In reply to by वपाडाव

अवांतर :: आपल्या लग्नाला किती वर्ष झाले आहेत ? (हा प्रश्न वैयक्तिक नाही....) >> हा प्रश्न वैयक्तिक नव्हे तर मग सार्वजनिक आहे काय? असल्यास प्रथम या प्रश्नाचे स्वत:च्या संदर्भात उत्तर द्या. तसेच मला हा प्रश्न विचारण्याचे प्रयोजन ही स्पष्ट करा

In reply to by चेतन सुभाष गुगळे

यातलं शेवटचं वाक्य "देव करो आणि आपल्या देव आनंदवर अशी पाळी कधीही न येवो" वाचून देव आपला असल्याचं वैश्विक सत्य जाणवलं, पटलं म्हणून असं लिहीलं
शी! कणेकरांनी काहीही लिहीलं म्हणून मी काय ते "वैश्विक सत्य" म्हणावं काय? कणेकरांना इंग्लिश पिक्चरमधलं इंग्लिश समजत नाही (त्यांच्याच कोणत्यातरी कार्यक्रमात त्यांनी असले बालिश विनोद केलेले आहेत), 'योनी-मनीच्या गुजगोष्टी' हे नाटक त्यांना सहन होत नाही असल्या लोकांच्या रूचीला काय वैश्विक सत्य म्हणायचं? कणेकरांच्या लेखाचा उत्तम प्रतिवाद या नाटकाच्या भाषांतरकार, दिग्दर्शिका वंदना खरे, यांनी उत्तम पद्धतीने केलेला आहे. तर हे म्हणे "वैश्विक सत्य"! आणि हो, माझ्यापेक्षा दीड-दोन पिढ्या मोठ्या असणार्‍या कणेकरांना देव आनंद वाटत असेल 'आपला', मला का वाटावा? वयाचं अंतर सोडा, माझ्या वयाच्याच माझ्या मैत्रिणीला शाहरूख खान वाटतो 'आपला', मला नाही वाटत! लोकांची अभिरूची माझ्यावर लादणारे कोण तुम्ही?
तो सिगारेटी फुकत असतो ते कुणापासून लपून राह्यलंय.
हे आणि हे वाचा.
व्यसनी माणसाचा र्‍हास होतंच असतो तेव्हा हे सौंदर्य तकलादू च ठरणार.
अहो व्यसनच कशाला? मूर्खपणा आणि/किंवा वयामुळेही सौंदर्य तकलादू ठरतं. आता (तुमचा आणि कणेकरांचा) देव आनंद नाही का बुद्रुक म्हातारा दिसत? तेव्हा जॉनबद्दल असं वाटलं की नवीन धरायचा किंवा कॉलिन फर्थसारखा मस्त पिकायला लागलेला चार्मिंग माणूस पकडायचा.
कोण घरंदाज महिला अफेअर करेल, सरळ लग्नच नाही का करणार?
का बुवा? तुमची आणि माझी अभिरूची वेगळी आहे, तसंच तुमच्या आणि त्या घरंदाज महिलेच्या, उदा. बिपाशा बासू, आयुष्याबद्दलच्या कल्पनाही वेगळ्या असतील. तुम्ही तुमची नीतीमत्ता काय "वैश्विक सत्य" म्हणत तिच्यावरही लादणार का काय?
आणि अफेअर करायचं तरी जॉनबरोबर? अशा महिलेची अभिरूची काय पातळीची तेही समजतंच की. अशा महिलांची माहिती मी तरी ठेवत नाही.
तुम्हाला आतली माहिती बरीच आहे असा तुम्ही दावा करता म्हणून विचारलं. नसेल माहित तर नाही माहित म्हणा की! कोणा अनोळखी स्त्रीबद्दल माहिती नसताना तिच्याबद्दल का उगाच राळ उडवताय? (जसं काय या स्त्रीला मराठी आंतरजालावरच्या १५-२० हजारपैकी एक आयडी 'चेतन सुभाष गुगळे' काय म्हणतो याने तिला काही फरकच पडणारे! पण सभ्य-सुसंस्कृतपणा नावाचीही काही चीज असते.) गुगळे, तुम्ही कोणत्या विश्वात रहाता हो? नाही, तुमच्या विश्वातली "वैश्विक सत्य", माझ्या जगात क्षणभर(च) विनोदी वाटण्याएवढी 'महान' का आहेत? बाकी शिव्या, त्यांचे उगम, त्यांचे अर्थ, त्यांचा वापर या विषयावर पंगाशेट मस्त मुद्दे मांडत आहेत तेव्हा मी त्यांच्याशी बोलेन. त्यात मला जास्त मजा येते आहे. ते उगाच मला आणि इतर कोणाला "वैश्विक सत्य" आणि नीतीमत्तेचे धडे देत नाहीत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्हाला आतली माहिती बरीच आहे असा तुम्ही दावा करता >> असा दावा मी कधीच केला नाही. मोठे व्हा आणि विश्वाचा पसारा किती ते शिका आधी! >> हा सल्ला न मागता तुम्ही कशाला देताय? माझ्या मोठेपणाविषयी मी इथे जास्त काही लिहीत पण तुम्हाला जर कधी त्याविषयी माहिती झालंच तर तुम्ही तुमचे शब्द मागे घ्याल याची खात्री देतो. (माहिती करून घ्यायचीच असेल तर फक्त गुगलच्या सर्च विंडोत मराठीत "चेतन गुगळे" आणि "चेतन सुभाष गुगळे" हे शब्द टाकून मिळणारे सर्व सर्च रिझल्ट्स पाहावेत आणि नसेल पाहायचे तर नका पाहू पण मग मला "मोठे व्हा" असा सल्ला तरी देऊ नका.) विश्वाच्या पसार्‍याविषयी देखील मला पुरेशी माहिती आहे. गुगळे, तुम्ही कोणत्या विश्वात रहाता हो? >> विश्व एकच आहे. वेगवेगळं असू शकत नाही.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

असा दावा मी कधीच केला नाही.
मग जॉनचे स्टेरॉईड घेणे आणि धूम्रपान कुठून कळलं हो तुम्हाला? लब्बॉड!
विश्व एकच आहे. वेगवेगळं असू शकत नाही.
असं कसं, तुम्ही भागवत पुराण वाचलेलं नाहीत? त्यातला १०.८७.४१ भाग वाचा, त्यात अनेक विश्वांचा उल्लेख आहे. असं मल्टीव्हर्सचं विकीपान म्हणतं. आणि, तुम्हाला मल्टीव्हर्स वगैरे काही, काही माहित नाही का? कुठल्या विश्वात रहाता हो तुम्ही गुगळे? का हे "वैश्विक सत्य"ही आता तुम्ही कणेकर किंवा इतर कोणी मराठी लेखकाचा हवाला देऊन माझ्यावर लादणार?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"वैश्विक सत्य"ही आता तुम्ही कणेकर किंवा इतर कोणी मराठी लेखकाचा हवाला देऊन माझ्यावर लादणार? >> मी कशाला लादणार? वेगळ्या विश्वातले सदस्य एकमेकांशी संवाद साधतात का? आपण इथे एकमेकांशी संवाद साधतोय म्हणजे एकाच विश्वातले असणार ना? काही सल्ले हे समोरच्याला आवडत नाहीच. तुम्ही मला मोठे व्हा असा सल्ला दिला ज्याचा छुपा अर्थ मी मोठा नाही असा होतो. मी तुम्हाला एक सल्ला देतो पाहा आवडतोय का? सभ्य आणि सुसंस्कृत व्हा.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

वेगळ्या विश्वातले सदस्य एकमेकांशी संवाद साधतात का? आपण इथे एकमेकांशी संवाद साधतोय म्हणजे एकाच विश्वातले असणार ना?
गोलपोस्ट बदलू नका. विश्व अनेक असू शकतात यावरून आपण बोलत होतो. आणि हे समजल्यावर तुमचं विश्व मोठं झालं ना, झालं किनई? वेगळ्या विश्वात असणं आणि मोठं होणं हे ही तसंच, लाक्षाणिक आहे; आणि इनो घेणंही!* कोण म्हणे मी सभ्य आणि सुसंस्कृत नाहीये? है कोई माई का लाल (किंवा लाली?) ;-) तुमच्या विश्वातल्या वैश्विक सत्यांप्रमाणे मी नसेनही सभ्य आणि सुसंस्कृत. बट हू केअर्स? आपल्याला तर बुवा मोठं होणंच महत्त्वाचं वाटतं! *आमचा आगामी धागा: मिसळपाव सभासत्त्वासाठी येऊ घातलेल्या सी.ई.टी.च्या तयारीसाठी 'दवनीत' मार्गदर्शक

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या मते तुम्ही सभ्य व सुसंस्कृत नाहीच मूळी (कारण तुम्ही स्वत:च मांडलेल्या शब्दाचा शब्दकोशातील सर्वात अश्लील अर्थ तुम्हाला अभिप्रेत असतो. असं अश्लील विशेषण ज्या पुरूषाला बहाल करता त्या पुरूषाच्या छायाचित्रावर या धागाकर्त्याचा चेहरा आरोपित करायला सांगता). अर्थातच माझ्या कल्पनेतल्या या शब्दांच्या व्याख्या / लक्षणे तुम्हाला मान्य नाहीत. त्याचप्रमाणे तुमच्या मते मी जरी मोठा नसलो तरी त्या शब्दाच्या तुम्ही ठरविलेल्या व्याख्या / लक्षणे मलाही मान्य नाहीत. विश्व अनेक असू शकतात यावरून आपण बोलत होतो. >> मी हे बोलतच नव्हतो. तुम्ही मला कोणत्या विश्वात राहता असं विचारल्यावर मी एकाहून अधिक विश्व असू शकत नाही एवढंच सांगितलं होतं. जे सर्वव्यापी आहे तेच विश्व (universe) या माझ्या मतावर अजुनही ठामच आहे. तुम्ही दिलेले दाखले / संदर्भ यातली मते / कल्पना मला मान्य नाहीत. यावर चर्चा काय करणार?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

एकाहून अधिक विश्व असू शकत नाही एवढंच सांगितलं होतं.
मॅक्स तेगमार्कचं हे आणि हे लिखाण पहा, वाचा, समजून घ्या आणि मग आपण विश्वाबद्दल बोलू. ठीके?
तुम्ही दिलेले दाखले / संदर्भ यातली मते / कल्पना मला मान्य नाहीत. यावर चर्चा काय करणार?
  • जगातल्या अनेक सैद्धांतिक खगोलशास्त्राभ्यसकांनी विश्वविषयक मांडलेली किंवा अभ्यासून मान्य केलेली मतं तुम्हाला मान्य नाहीत हा माझा प्रॉब्लेम नाही.
  • कुठल्यातरी बाजारू वाक्यांना (उदा: स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते) तुम्ही "वैश्विक सत्य" मानता हाही माझा प्रॉब्लेम नाही.
  • माझा मित्र पराचा चेहेरा कुठे आरोपित करायचा ही आमची मैत्रीखात्यातली मस्करी जर तुम्हाला समजत नसेल तर हाही माझा प्रॉब्लेम नाही.
  • जॉन अब्राहमचं वस्तूकरण करणारे फोटो मी मिसळपाववर का डकवले आहेत हे ही तुम्हाला माहित नसेल तर हाही माझा प्रॉब्लेम नाही.
बाकी रहाता राहिलं सभ्य-सुसंस्कृत असणं, तर आपण लहान असण्याची जाणीव असणं हेच मला सभ्य-सुसंस्कृत असण्यातली मोठी गोष्ट वाटते. ही जाणीव मला आहे म्हणून मी मोठं होण्याची शक्यता आहे. कोणी शिव्या दिल्या म्हणूनच असंस्कृत होत नाही आणि बोलताना दोनचार ओव्या तोंडावर आल्या म्हणूनच सुसंस्कृत होत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जाणीव मला आहे म्हणून मी मोठं होण्याची शक्यता आहे.>> आमच्या तुम्हाला शुभेच्छा! मॅक्स तेगमार्कचं हे आणि हे लिखाण पहा, वाचा, समजून घ्या आणि मग आपण विश्वाबद्दल बोलू. ठीके? >> कशाला बोलु किंवा टंकू? तुम्हाला शाळेत शिकवलंच गधा मजदूरी तत्वावर हा माझा प्रॉब्लेम नाहीय. तुम्ही ज्या चा ज्याचा वेगळं विश्व म्हणून उल्लेख करतंय ते सारं एका संचात बांधलं की एकच एक विश्व होतं असं वैश्विक सत्य आहे (जे अर्थातच तुम्हाला मान्य नसणार). युनिव्हर्सल सेट अर्थात वैश्विक संचात सारं काही कव्हर होतं हा साधा सोपा सिद्धांत तुम्हाला मान्य नाहीय का? हे जर मान्य नसेल तर चर्चेला अर्थ नाही आणि मान्य असेल तर मग विश्व एकच उरतं. तरी चर्चा करायचीच असेल तर तुम्ही मोठ्या झाल्यावर करू (तशी शक्यता तुम्हाला वाटते असं तुम्हीच म्हणताय). सभ्य सुसंस्कृत तर तुम्ही तुमच्या निकषानुसार आहातच, आमचे निकष तुमच्यावर लादत नाहीच.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

तेगमार्कचे पेपर्स वाचलेत का? विश्वाबद्दल चर्चा करायची तर आधी अभ्यास करा. मग आपण बोलू. अभ्यासाशिवाय उगाच मेगाबाईट्स कशाला खर्च करायचे? बाकी शुभेच्छा कोणीही दिलेल्या मला चालतात. फुकट ते पौष्टीक आणि मुळापासून. ठेंकू.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तेगमार्कचे पेपर्स वाचलेत का? विश्वाबद्दल चर्चा करायची तर आधी अभ्यास करा. मग आपण बोलू. अभ्यासाशिवाय उगाच मेगाबाईट्स कशाला खर्च करायचे? >> चर्चेची मला आवश्यकता वाटत नाही कारण तुम्ही युनिवर्सल सेट विषयी बोलायला तयार नाही तर मी ते तेगमार्कचे पेपर कशाला वाचू? तुम्ही म्हणता तशी एकाहून अधिक विश्व असली जरी समजा, तर त्या विश्वांचा एकत्रित उल्लेख केल्यावर जे होईल त्याला तुम्ही काही तरी नाव देणारच ना? कदाचित महाविश्व किंवा असलंच काहीतरी द्याल. आम्ही त्यालाच तर विश्व म्हणतो. आणि म्हणूनच आमच्या मते विश्व एकच आहे (तुम्ही म्हणताय ती सगळी विश्वं एकत्रित रीत्या संबोधताना होणारं). तरीही तुम्हाला खरंच अतिशय गंभीरपणे या विषयावर चर्चा करायची असेल तर या धाग्यावर नको. त्याकरिता स्वतंत्र धागा काढा / खरड वही / व्यक्तिगत निरोप / इमेल यापैकी कुठलाही (तुमच्या सोयीचा) पर्याय वापरा. मी कुठल्या ही पर्यायाला प्रतिसाद देईल . अगदी मनापासून आणि गंभीरपणे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

तुम्हाला चर्चेची आवश्यकता वाटत नाही, तुम्ही संशोधन समजून घेणार नाही तर तुमच्याशी मी काय डोंबल चर्चा करू? कधीमधी मी ही मोठी होतेच की! चर्चा करायचीच तर सरळ तेगमार्कशीच करेन की! तो ही त्याचा इमेल अड्रेस देतो. चर्चा करायची ('वैश्विक सत्य' सांगायची नव्हे!) तयारी असेल तर आधी संशोधन वाचा, ते सगळं समजून घ्या आणि नंतर बोला. नाहीतर हुडूत्त!

In reply to by चेतन सुभाष गुगळे

खरंच हो गुगळे स्वत:च्या मोठेपणाविषयी फार काही न लिहीता गुगलायचा जो काही अनमोल सल्ला तुम्ही दिलात तो कुतुहलापोटी आम्ही वापरुन पाह्यला. त्यात आम्हाला हे आणि हे सापडले. अवांतरः हे लिहीताना कोल्हापूरी दादांचा स्वतःचा मोठेपणा न सांगण्याचा स्वभाव आठवल्यावाचून राह्यले नाही. गुगळे तुमचं मोठेपण आम्हा लोकांना कळेल तोच सुदिन !!

परण्णाच्या उपोषणाचं स्थळ कोणतं? पराण्णा, जरा सांभाळून र्‍हावा बरं. इथलं पब्लिक "तुमच्या पाठीशी आहे" असं म्हणत पाठीमागून ढकलून देईल हळूच!

भारतीय संघातील खेळाडुंसारखे अनेक धाग्यांच्या दांड्या गुल होत असताना पराण्णा द्रवीडने एकाच दिवसात शतक ठोकले आहे. या शतकी वाटचालीत त्याला साथ देणा-या धम्या लक्ष्मण, सोकाजी मिश्रा यांचे सुद्धा हबिणंदन

In reply to by चिंतामणी

पराण्णा द्रवीडने एकाच दिवसात शतक ठोकले आहे >> एका दिवसात कसलं? फक्त आठ तासातच. हाच वेग कायम ठेवला तर लवकरच दीडशतकाच्या उंबरठ्यावर पोचलेल्या त्या प्रियालीच्या पुरुषालाही मागे टाकेल.

प्रिय पराण्णा, आपणांस आठवत असेलच , २० ऑगस्ट २०११ रोजी आपण मला फाउंटन या प्यार्टीस्थानी भेटलात. धागे स्वाहाकाराच्या च्या मुद्यावरून आपल्या दोघांत चर्चाही झाली. तेव्हाही सर्व धाग्यांत व्यापून राहिलेला भ्रष्टाचार मोडून काढण्याचे वचन मी आपणास दिले होते आणि आपणही त्यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाला होतात की , शिवीसेनाप्रमूख हाच आता आशेचा किरण आहे. केवळ तेच हा सर्वव्यापी धागामार मोडून काढण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणातही हिंमत नाही. आम्ही समन्वयाने एकत्र काम करू. मग यश निश्चीतच ! असा विश्वासही आपण तेव्हा व्यक्त केला होता , पण दुर्दैवाने त्याचदरम्यान आमच्यावर काही कौटुंबिक आपत्ती कोसळल्या व आपल्यातला संपर्क तुटला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत व तुमचाही लढा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. आपला, शिविसेनाप्रमूख अर्धासाहेब ठाकरे.

In reply to by अर्धवट

पण एक सुधारणा सुचवते हो अर्धवटशेट. ... दुर्दैवाने त्याचदरम्यान आमच्या संगणकावर काही विषाणूजनक आपत्ती कोसळल्या व आपल्यातला संपर्क तुटला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत व तुमचाही लढा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे.

माझा वैयक्तिक पातळीवर पराच्या जनलोकपाला पाठिंबा आहे. आमच्या पक्षाच्या अध्यक्षांशी मी कालच चर्चा केली. संपादक मंडळा समोर हा विषय मी स्वता:चा कॅपेकिटी ( शब्दः साभार) मधे काढणार आहे.

In reply to by निखिल देशपांडे

माझा वैयक्तिक पातळीवर पराच्या जनलोकपाला पाठिंबा आहे. आमच्या पक्षाच्या अध्यक्षांशी मी कालच चर्चा केली.
वैयक्तिक? समजलं. पण लगेच पुढं पक्षाच्या अध्यक्षांशी चर्चा. म्हणजे तुम्ही पक्के कॉंग्रेसी. अध्यक्ष का अध्यक्षा, तेवढंच सांगा. ;)

In reply to by श्रावण मोडक

अध्यक्ष का अध्यक्षा, तेवढंच सांगा.
तुम्हाला काय करायचं आहे हो, पक्षाध्यक्ष स्त्री आहेत का पुरूष आहेत याचं? तुमचा पुरूषी-तुच्छतावाद आता जरा बाजूला ठेवा आणि भानावर येऊन प्राप्त परिस्थितीचं रिपोर्टींग करा की!

काय झाले? पराण्णांचे उपोषण (कां कुपोषण?) संपले की नाही? सध्या त्यांचे बी. पी. किती आहे? आणि पल्स रेट?

आम्चेकड मै प्रा हुं! आस छापलेले रुमाल, टोपी, बनीयान, शर्ट, हात्मोजे, लंगोट, आंडरवेर, पायजमे, पायमोजे सर्व आकारात भेटतील. एकाव एक फ्री. पत्ता: समाधान देशी दारुचे दुकान, साडेसतरा नळी हडपसर.

अण्णांच्या आंदोलनामुळे एका जुन्या अनुत्तरीत प्रश्नाचं उत्तर मिळालं. गांधीजी गांधी टोपी का घालत नसत? हाच तो प्रश्न. "मै अण्णा हजारे हूं" असं लिहीलेली टोप्पी अण्णा तरी कुठे घालतात. थोडक्यात आपल्या नावाची टोपी आपणच घालु नये. दुसर्‍यांना घालावी हेच ते वैश्विक सत्य (हा शब्दप्रयोग काहींना झोंबण्याची शक्यता आहे).