गुर्जिएफचा छोटासा किस्सा
खरं म्हणजे एवढं छोटं लिहायला नको. मी खूप किस्से टाकणार होतो - पण चपखल आढळले नाहीत. तुमच्याकडेही अशा झक्की लोकांचे किस्से असतील तर या धाग्यावर टाका. अनेक लेख वाचून जे हाती पडेल ते कदाचित एखाद्या छोट्याशा प्रसंगातुनही चमकू शकतं.
गुर्जिएफ : http://en.wikipedia.org/wiki/George_Gurdjieff
गुर्जिएफकडे एक पत्रकार आला. तो त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला आला होता! गुर्जिएफ चहा घेत होता, त्यानं त्या पत्रकारालाही जवळ बसवून घेतलं. अन जवळच बसलेल्या एका शिष्येला गुर्जिएफ म्हणाला की, ‘आज काय वार आहे?’ त्याची शिष्या म्हणाली की, ‘आज रविवार आहे’. गुर्जिएफनं जोरात टेबलावर मूठ आपटली अन म्हणाला, ‘रविवार असणं कसं शक्य आहे? कालच तर शनिवार होता!’ त्या पत्रकारानं ते ऐकलं आणि त्याचे धाबे दणाणले की हा माणूस असा कसा आहे! अन गुर्जिएफ इतका चिडला होता की त्यानं टेबलावर मूठ आपटली अन म्हटलं की, ‘आज रविवार कसा असू शकेल! तू कुणाला फसवते आहेस! तू काय समजलीस! कालच शनिवार होता अन आज रविवारही आला?’
तो पत्रकार उठून उभा राहिला. तो म्हणाला, ‘नमस्कार! मी जातो.’ जेव्हा तो निघून गेला, तेव्हा गुर्जीएफचं हसणं पाहाण्याजोगं होतं! गुर्जीएफ हसला! तो म्हणाला की, ‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’
![]() |

प्रतिक्रिया
झक्की किस्से नाहीत पण ....
हा छोटासा किस्सा छानच आहे पण
मोठ्यांचे छोटे किस्से..
सॉक्रेटिस
वरील किस्सा
निषेध
किस्सा कुणी बनवला याचा थोडा
किस्सा कुणी बनवला याचा थोडा
किश्श्याचा शेवट कळला नाही
हॅ हॅ
‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात
शिष्या..
किसन "‘या मूर्खाबरोबर वेळ
अशा शिष्या आम्हाला का मिळत
पत्रकारासोबत वेळ वाया
गुर्जीएफ नावाचा एक थोर माणूस
+१ सहमत
अतिशय भयानक !!!! ओ जरा
हॅहॅहॅ... हे बाकी जबराय
>> कोण गुर्जीएफ? फार मोठा
किस्सा आवड्ला नाही हे नमूद
किस्स्यामध्ये आवडण्यासारखं
असो.
ररा.. सगळे किस्से आवडले!!!!
गुर्जीएफ नावाचा एक थोर माणूस होऊन गेला.
सर.