उपोषण, कायदेभंग, सरकार इत्यादी
एक संभाषणः
"अरे संध्याकाळी काय करतोयस?"
"काहि विषेश नाही."
"मग, चल येतोयस का?"
"कुठे?"
"अरे इतके लोक निदर्शनं करताहेत तुलाही वाटतं की नाहि हे सरकार चुकीचं वागतंय. तिथे जाऊ निषेध व्यक्त करू. हे बघ मी घोषणा लिहिलेले शर्टपण आणले आहेत"
"अरे पण का? बहुसंख्यांनी सरकारला ५ वर्षे निवडले आहे. जर त्यांचा कारभार नाहि आवडला तर त्यांना मी मत देणार नाही"
"अरे ५ वर्षे थांबलास तर उपयोग नाहि. सरकारने आता हा निर्णय घेतला तर तो पुन्हा फिरवणे फार कठीण आहे. जनमत आत्ताच तयार करून ही कृती न होणंच श्रेयस्कर आहे. शिवाय आपल्या नेत्याने निवडलेला मार्ग अहिंसक आहे. सामान्य जनतेला वेठीस न धरता हे आंदोलन चालु आहे. महिला, लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, तरुणाई सारे एकत्र आले आहेत. आपला नेता उपोषणाला बसला आहे. सरकारने मागण्या मान्य करेपर्यंत तो उपोषण करणार आहे. शिवाय सविनय कायदेभंग करून जेल भरणेही चालु आहे. कुठेही हिंसा मात्र नाहि. अगदी पोलिसांनाही सहकार्य केले जात आहे"
" अरे पण हे तर सरकारला वेठीला धरणे झाले. हे बघ उपोषण, सविनय कायदेभंग वगैरे गोष्टी स्वातंत्र्यलढ्याची हत्यारे आहेत. आपणच निवडून दिलेल्या सरकारविरूद्ध त्याचा वापर का व्हावा? खरं तर हा धोका डॉ. आंबेडकरांनी फार आधीच ओळखला होता. २५ नोव्हेंबर १९४९ च्या घटनासमितीच्या भाषणात ते काय म्हणतात ते बघः
If we wish to maintain democracy not merely in form, but also in fact, what must we do? The first thing in my judgement we must do is to hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives. It means we must abandon the bloody methods of revolution. It means that we must abandon the method of civil disobedience, non-cooperation and satyagraha. When there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives, there was a great deal of justification for unconstitutional methods. But where constitutional methods are open, there can be no justification for these unconstitutional methods. These methods are nothing but the Grammar of Anarchy and the sooner they are abandoned, the better for us.
पण त्यावेळी हे मत दुर्लक्षिले गेले. लोकांना वाटले की आंबेडकर गांधीजीं विरुद्धचा राग काढत आहेत. ते काही प्रमाणात असेलही मात्र त्यांचे मत दुर्लक्षिता येणार नाही"
" अरे पण जेव्हा डॉ. आंबेडकर हे म्हणत होते तेव्हा त्यांची अपेक्षा होती की सरकार जनमताची कदर ठेवेल. शिवाय सरकार चुकते आहे असे जनतेला वाटते आहे हे सरकारला कसे कळावे? आंबेडकरांची अपेक्षा होती की जनतेची मते त्यांचे प्रतिनिधी, विरोधी पक्ष सरकारपर्यंत पोहोचवतील, संसदेत मांडतील. मात्र जर निवडून आलेले प्रतिनिधी जनतेच्या मतांऐवजी केवळ पक्षाला सोयीची मते संसदेत मांडू लागले तर जनतेला थेट आवाज उठवणे अपेक्षित नाही का? महात्मा गांधी स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतःला जनतेच्या बाजुने समजायचे. त्यांच्यामते 'माझे काम सरकारचे मला व जनतेला चुकिच्या वाटणार्या निर्णयांविरुद्ध आवज उठवणे आहे. सत्याचा आग्रह धरणे आहे. त्यांचा निर्णय जनतेच्या मता विरुद्ध असुनही जनहिताचा आहे अशी सरकारची खात्री असेल तर त्यांनी माझ्या दबावाला बळी पडता कामा नये'. इथे सरकार बळी पडतेय म्हणजे सरकारच आपल्या निर्णयामुळे जनहित साधले जाईल याच्याशी ठाम नाही"
" निवडणूकांवर आधारीत लोकशाही मधे जनमताला डावलता येत नाही. त्यामुळे अश्या मार्गांचा अवलंब करून केवळ लोकांमधे चेतना जागवता येते. मात्र त्याविरुद्धचा आवाज दडपला जातो. आता तुमच्या मागण्या 'जसाच्यातशा' मान्य नसणार्यांना या जनक्षोभामुळे आपले मत मांडताना संकोच वाटु लागला आहे. माझ्यामते विरोध जरूर नोंदवावा मात्र 'माझे तेच बरोबर आणि ते झालेच पाहिजे' या ब्लॅकमेलला जनाधार देऊन त्याचे 'व्हाईटमेल' करणे बंद केले पाहिजे. हे बघ उपोषण ही माणसाची सगळ्यात नैसर्गिक कृती आहे. अगदी लहानमुला विरुद्ध आईवडीलांनी काहि निर्णय घेतला तर मी आज जेवणार नाही असे सांगते. मात्र प्रत्येक वेळी आईवडील त्याची मागणी मान्य करतातच असे नाही. त्यालाहि ते कालांतराने उमजते व आईवडीलही पुढे तत्सम निर्णय घेताना त्याचा संभाव्य निषेध लक्षात घेऊनच निर्णय घेतात"
"माझ्या मते मात्र सरकारवर दबाव घालणे नव्हे तर तथाकथित ब्लॅकमेल करणे गरजेचे आहे. जेव्हा विरोधी पक्ष त्यांचे काम व्यवस्थित करत नाहीये तेव्हा जनतेला त्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी कमी मार्ग उरतात. त्यातील बरेचसे हिंसक अथवा सामान्यांना वेठीस धरणारे आहे. मग केवळ उपोषण, सचिनय कायदेभंग असे काहि मार्ग जनतेकडे उरतात ज्या द्वारे जनता सरकारशी थेट संवाद साधु शकते."
"असो. तु जा. माझे मत तुझ्यासारखे नसले तरी तुला अडवण्यातही फारसा अर्थ नाही. let's agree to disagree"
"ओके. जशी तुझी इच्छा. बाय"
===============================================================================
वरील संभाषण तुम्ही वाचलेत. याबद्दल तुम्हाला काय वाटते? चर्चा पुढील प्रश्नांवर करता येईल अर्थात समांतर-अवांतर, पुरवण्या-मतभेद, अधिकची माहिती यांचे स्वागत आहेच
१. उपोषण, सविनय कायदेभंग वगैरे मार्ग संसदीय लोकशाहीमधे अवलंबणे कितपत (किती प्रमाणात) योग्य वाटतात?
अश्या पद्धती तुम्हाला ब्लॅकमेलिंग आहेत असे वाटते का?
२. अश्यावेळी सरकारला आंदोलकांची भुमिका मान्य नसल्यास सरकारने काय करावे असे वाटते?
३. संसदीय लोकशाहीत संसदेत जनतेचा आवाज उठत नसेल तर जनतेने कोणत्या मार्गाने आपला निषेध नोंदवावा असे वाटते?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
विनंती
रुग्णाची प्रक्रुती दिवसेंदीवस
चांगला लेख
रोख
एक शंका
मत मांडावे
ठीक. मग...
काहिसा असहमत
+१
.
सहमत
जर आपल्या पंतप्रधानांनी
.
सहमत आहे
लोकशाहीवरील विश्वास वाढवला पाहिजे.
वाचत आहे.
अतिशय छान पद्धतीने मांडलेला
सहमत
मंडळ आभारी आहे
चर्चा वाचते आहे. ऋ,
+१
मत
सरकार म्हणतं असे आंदोलन
अतिशय उत्तम धागा
एक उपप्रश्न
डॉ. आंबेडकरांची लोकशाही आणि आजची परिस्थिती
काही उत्तरे
जनाधार असणे शक्य वाटत नाही
घटनाबाह्य, संसद विरोधी,
सरकार आणि प्रशासन अश्या
या
उत्तम चर्चाप्रस्ताव
अतिशय समतोल प्रतिसाद.
एक बारीक मुद्दा
प्रश्नासंदर्भात
.
इंटरेस्टिंग...
चाचण्या + जुने उदाहरण
""अरे पण का? बहुसंख्यांनी
रोचक उत्सफुर्त चर्चा ! फिरभी कौन आज़ाद हुआ .......?
असे वेठीला धरणे अगदी अगदी चूक
चांगला मार्ग
माझ्या मते
एक सुचना
- सुचना टंकीत स्वरूपात असाव्यात
- सुचना 'डबल स्पेसिंग' वापरून टंकलेल्या असाव्यात (वर्डमधे पेज लेऑअट --> स्पेसिंग मधे डबल स्पेसिंग द्यावे)
- सुचनांच्या दोन प्रती वरील पत्त्यावर १५ दिवसांच्या आत (४ सप्टेंबर २०११) पोहोचल्या पाहिजेत
- संसदीय स्थायी समितीपुढे जर तोंडी पद्धतीनेही सुचना समजवायच्या असतील तर तसे स्पष्टपणे नमुद करावे म्हणजे स्थायी समिती गरज वाचाल्यास तुमचे म्हणणे ऐकण्यास तुम्हाला नवी दिल्लीला बोलवेल.
माझ्यामते संसदीय स्थायी समितीला आपली मते कळविणे गरजेचे आहे. स्थायी समिती ही विविध पक्षांच्या खासदारांनी बनलेली असते. या समितीपुढे आपली मते ठेवल्यानंतर समिती मसुद्यात योग्य वाटतील ते बदल घडवून आणु सहते. जर सर्व सुचना, आक्षेप वगैरे वाचुन समितीला मुळ मसुद्याच्या ढाच्यामधेच तृटी आढळल्यास ती मसुदा रद्द (रिजेक्ट) करू शकते. मात्र या सार्यासाठी तुमच्या सुचना समितीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मी माझ्या सुचना कालच पोस्टाने पाठवल्या आहेत. असे विनंतीवजा आवाहन करतो की ज्यांना लोकपाल विधेयक २०११ मधे तृटी वाटत असतील किंवा जे काहि मत असेल त्यांनी त्यांच्या सुचना/ आक्षेप/सुचवण्या वगैरे समितीला जरूर पाठवून (निदान) आपले कर्तव्य पार पाडावे.अपडेट आणि टिवटिव
ऋषिकेश म्हणतायेत त्याप्रमाणे
चांगली कल्पना
जाहिरात