✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अशी गुमसुम आवडतेस मला

ध — धनंजय, Sun, 07/06/2008 - 01:32

प्रतिक्रिया द्या
9504 वाचन

💬 प्रतिसाद (10)
म
मनिष Sun, 07/06/2008 - 09:33 नवीन

जियो! :)

धनंजय........सुरेखच जमलाय! इंग्लिश अनुवादापेक्षा तुझ मराठी अनुवाद फारच सकस.
गुमसुम अशी आवडतेस मला, ... जणू नसतेसच इथे दूर, दुखरी, जणू काही ... मरण पावलीस असे दिसते
'जणू मरण पावलीस' अशा प्रतिमा मराठी काव्यात सहसा आढळत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 07/06/2008 - 09:48 नवीन

प्रतिक्रिया

धनंजय यांनी काही लिहीले असले की आवर्जून वाचणे होतेच. बहुदा ते वाचणे म्हणजे वेळ सार्थकी लागणे असते. या कवितेच्या बाबतीत काही नेहमीची जादू घडली नाही. मी इंग्रजी कविता वाचली. तिचाच मला स्पर्श झाला नाही. त्यामुळे मराठी अनुवादात मन रमले नाही याबद्दल मला आश्चर्य वाटले नाही... इट्स् अ हिट् ऑर अ मिस्. यावेळच्या कवितेशी सूर जुळले नाहीत; तरी आगामी कवितांची वाट पाहीनच.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 07/06/2008 - 18:03 नवीन

स्पॅनिशमधील लय

हीच कविता आलटून पालटून स्पॅनिशमध्ये/मराठीमध्ये कडवी वाचून. Get this widget | Track details | eSnips Social DNA
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 07/07/2008 - 18:11 नवीन

तरल

खूपच तरल कविता. सर्व ओळी चित्रदर्शी वाटल्या. प्रत्येकाच्या मनात ही कविता वाचून उभे राहणारे चित्र वेगळेच असणार यात काही आश्चर्य नाही. पण सहज मनात आले म्हणून पिकासोच्या काही चित्रांचा शोध घेतला असता या कवितेजवळ जाणारे एक चित्र सापडल्यासारखे वाटले.. http://picasso.tamu.edu/picasso/ImgViewer?imageURL=./graphics/1903/opp03-047.jpg कवितावाचनही आवडले. दोन्ही कविता आणि अनुवाद ऐकल्यानंतर अनुवादात मूळ स्पॅनिशचा तोल सांभाळण्याची खूपच काळजी घेतली असल्याचे जाणवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
न
नंदन Mon, 07/07/2008 - 18:58 नवीन

सहमत

चित्रदर्शी ओळी, पिकासोचे चित्र, कवितावाचनात सांभाळलेली मूळ स्पॅनिशची लय -- याबाबत चित्रा यांच्याशी सहमत. मात्र 'वळ्यासारख्या सुगम अशा' ह्या उपमेचा अर्थ नीटसा समजला नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
ध
धनंजय Tue, 07/08/2008 - 02:15 नवीन

चित्र अगदी चपखल

"ब्ल्यू मूड" मध्ये, पण तरीही शांत, अशी वाटते आहे पिकासोच्या चित्रामधील मुलगी. धन्यवाद, चित्रा! "वळ्यासारखी सुगम" इथे "वळ्यासारखी साधी" असे भाषांतर करावे की नाही हा प्रश्न मला पडला होता. इतर दागिन्यांसारखे वळे नक्षीदार गुंतागुंतीचे नाही, साधे आहे. म्हणावे तर त्याचा आकार मनात भरण्यास सुगम आहे. तशी "तू"ची नि:शब्दता गुंतागुंतीची नाही. समजण्यास सुगम आहे. त्या वेळी वाटले की "साधी" शब्दात "मामूली"ची झाक येत होती. पण आता वाटते "वळ्यासारखी साधी" अशीच शब्दांची निवड करायला हवी होती. शिवाय "सुगम" मध्ये लय सांभाळता येत होती आणि त्यामुळे कदाचित तोच शब्द अर्थपूर्ण आहे, असे मी स्वतःला पटवून घेतले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
सुवर्णमयी Tue, 07/08/2008 - 16:54 नवीन

सहमत

चित्राशी बरेच अंशी सहमत. प्रयोग आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
व
विकास Tue, 07/08/2008 - 02:56 नवीन

दो लफ्जों की है

सुंदर काव्ये (स्पॅनिश आणि मराठी). वर दोन्ही भाषेत ऐकताना एकदम "द ग्रेट गँबलर" मधील "दो लफ्जों की है एक कहानी" या अजून एका सुंदर गाण्याची आठवण झाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
विसोबा खेचर Sun, 07/06/2008 - 17:41 नवीन

सुंदर..

कविता सुंदर आहे.. रात्रीसारखी शांत आहेस, ... नक्षत्रांनी भरगच्च नि:शब्द जणू चांदण्याही - ... दूरही तशा, सहजही तशा. या ओळी सर्वाधिक आवडल्या. तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Mon, 07/07/2008 - 18:47 नवीन

वाहवा.

वाहवा. मराठी आणि स्पॅनीश मधे ऐकून खूप मजा आली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा