✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हवेतल्या गोष्टी - १

अ
अर्धवट यांनी
Tue, 08/16/2011 - 09:02  ·  लेख
लेख
सकाळी सकाळी मस्त पांघरुणात गुरफटून झोपावं, उन्हं वर येईपर्यंत. बायकोनं मस्त चहाचा कप हातात आणून द्यावा.. पण हे काही घडत नाही. साला नोकरीच अशी आहे की घरी येऊन बॅग टेकतो न टेकतो तोच पुढचं तिकीट मेलबॉक्स मधे येऊन पडतं. खूप जीवावर येतं आपल्या माणसांना सोडून पुन्हा घराबाहेर पडायचं. पायाला काय भिंगरी लागलीये कळत नाही. दर दोन दिवसांनी एक फ्लाईट पकडायची आणि सारखं पळत रहायचं, दमायला परवानगीच नाही. थांबता येणार नाही असं नाही, कारण माझा कुणीच पाठलाग वगैरे करत नाहीये. मीच कशाचातरी पाठलाग करतोय. कसला कुणास ठाऊक. सहज म्हणून मोजलं तर मी गेली ६-७ वर्षं सतत प्रवास करतोय, महिन्यातून १५ ते २५ दिवस. सतत आणि अखंड भटकंती. आजवर अनेक रात्री एअरपोर्टवर आणि लाउंजमधे काढल्यात. कधी फ्लाईट लेट आहे म्हणून, कधी रद्द झाली म्हणून. कधी कनेक्टींग फ्लाईट लगेच नाहीये म्हणून. आता प्रत्येक विमानतळावरचा लाउंज हेच घर वाटायला लागलंय. पुणे, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद आणि कोलकोता ह्या विमानतळावरचा कोपरान् कोपरा पाठ झालाय. एवढंच कशाला, विमानकंपन्यांचं वेळापत्रक, कुठल्या विमानात कुठला सीटनंबर इमर्जन्सी विंडोशेजारी येतो. कुठच्या एअरलाईनचं बोर्डिंग गेट कुठलं, असला बारीकसारीक तपशीलही तोंडपाठ झालाय. ह्या कटकटीच्या कार्यक्रमात एकमेव आसरा म्हणजे हातात एखादं जाडसं पुस्तक, आणि लाउंजमधली आरामखुर्ची. त्यातही कवितासंग्रह असेल तर क्या केहने... पुस्तक नसेल तर आयपॉडवर कुमारजी किंवा अभिषेकीबुवा. काय तंद्री लागते म्हणून सांगू. पण कधी कधी याचाही कंटाळा येतो. मग इअरफोन नुसता कानात अडकवून ठेवायचा, आणि आजूबाजूची गम्मत पहात बसायचं. कानात इअरफोन लावून, शून्यात डोळे लावल्याचा अभिनय करत, आजूबाजूचं संभाषण ऐकायची, निरीक्षण करण्याची कला अवगत करावी लागते. तुम्ही लक्ष देताय असं वाटलं लगेच मंडळी कॉन्शस होतात. सहज नजर फिरवली तरी असंख्य नमुने बघायला मिळतात. काळाकरडा कोट घालून इंग्रजी वृत्तपत्र वाचत बसलेले आखडू लोकं. सराईत नजरेला यांच्यातले नवखे कोण आणि मुरलेले कोण हे झटक्यात ओळखू येतं. सफारी घातलेले हातात चॉकलेटी ब्रीफकेस घेतलेले म्हातारे, इन्फोसिस, विप्रो इत्यादी कंपन्यांच्या सॅक पाठीवर टाकून ब्लॅकबेरी शी चाळा करत, हळूच इकडेतिकडे बघणारे तरुण. सोळा ते तीस वर्षे वयोगटातल्या, तंग आणि अपुरे कपडे घालून नाक फेंदारत चालणाऱ्या ललना. वय वर्षे दोन ते आठ मधली विमानातळ डोक्यावर घेणारी बच्चेकंपनी, पांढरे कपडे घातलेले आणि प्रंचंड घाईत असल्याचं दाखवणारे पुढारी, कडेवरचं मुल सांभाळत भांबावलेल्या चेहेर्‍यानं इकडेतिकडे पाहणाऱ्या लेकुरवाळ्या बायाबापे, ह्या लोकांना आपापल्यापरीने मदत करणारा लालनिळ्या कपड्यातला ग्राउंड स्टाफ, ह्या सगळ्या धांदलीकडे अत्यंत तुच्छतेने पहाणाऱ्या हवाईसुंदऱ्या, क्वचित कडक इस्त्रीचे कपडे घातलेले आपल्याच गप्पात गुंगलेले पायलट लोक. पाहावं तितकं कमीच. सुरवातीच्या दिवसांमध्ये, ह्या हवाईसुंदऱ्या, त्यांची टापटीप, तंग कपडे, सतत सावरला जाणारा मेकप, आपल्याच तोऱ्यात चालण्याची ऐट हे पाहून एकतर असूया तरी वाटत असे किंवा राग तरी येत असे. पूर्वी मित्रांच्या बरोबर चेष्टामस्करी करताना माझा रोजचा विमानप्रवास आणि हवाईसुंदऱ्या यावरून काही कॉमेंट्सही होत असत.. पण जितकं त्यांचं काम जवळून पहात गेलो, तितका आदर वाढत गेला, आता कधीच असा वावगा उल्लेख होत नाही. उलट कधी नामोल्लेख झालाच तर आदरानेच होतो. सी.आय.एस.एफ. अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे जवान आणि अधिकारी, हे या खेळातले असेच दुर्लक्षीलेले शिलेदार. आता इतक्या दिवसाच्या सान्निध्यानंतर हवाई सुंदऱ्या, एअरलाईन स्टाफ, सीआयएसएफ चे जवान यांच्याशी एक नातं नकळतच तयार झालंय. बरेच जण ओळखीचेही झालेत. एवढ्या वर्षांच्या प्रवासात, एअरपोर्टवर, विमानात, लाउंजमधे, सिक्युरिटीचेकमधे, आतापर्यंत अनेक किस्से घडलेत. अनेक माणसं मनात घर करून बसलीयेत. अनेक चित्रविचित्र प्रसंग आहेत. सहप्रवाशांच्या कानगोष्टी आहेत. अशा खूप हवेतल्या गोष्टी मनात आहेत. त्या आठवतील तशा आणि वेळ मिळेल तशा सांगणार आहेच.. सध्या इतकंच..
  • हवेतल्या गोष्टी - २ : ती
  • हवेतल्या गोष्टी - ३ - पिंजर्‍याचे दार उघडावे..
  • हवेतल्या गोष्टी - ४ - उरले ते मोती

Book traversal links for हवेतल्या गोष्टी - १

  • हवेतल्या गोष्टी - २ : ती ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
मुक्तक
विनोद
समाज
जीवनमान
राहणी
प्रवास
देशांतर
लेखनप्रकार (Writing Type)
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
8238 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

वाचतिये. आनेदो औरभी पुलेशु

प्रीत-मोहर
Tue, 08/16/2011 - 09:59 नवीन
वाचतिये. आनेदो औरभी पुलेशु
  • Log in or register to post comments

हवाईसुंद-यांचे फोटु टाकता आले

५० फक्त
Tue, 08/16/2011 - 10:09 नवीन
हवाईसुंद-यांचे फोटु टाकता आले तर बघा.. बाकी वाचतो आहेच..
  • Log in or register to post comments

मस्त.. या विषयावर खरच खुप

शैलेन्द्र
Tue, 08/16/2011 - 10:13 नवीन
मस्त.. या विषयावर खरच खुप बोलण्यासारख, लिहिन्यासारख आहे.. तुम दुध डालो.. हम पाणी डालेंगे..
  • Log in or register to post comments

वाचतोय..

योगी९००
Tue, 08/16/2011 - 10:19 नवीन
वाचतोय..लवकर तुमचे हवेतले अनुभव टाका.. ह्या कटकटीच्या कार्यक्रमात एकमेव आसरा म्हणजे हातात एखादं जाडसं पुस्तक, आणि लाउंजमधली आरामखुर्ची. त्यातही कवितासंग्रह असेल तर क्या केहने... पुस्तक नसेल तर आयपॉडवर कुमारजी किंवा अभिषेकीबुवा. काय तंद्री लागते म्हणून सांगू. आयपॅड असताना हातात जाडसर पुस्तकाची काय गरज? आयपॅड वरच पुस्तक टाकत नाही का?
  • Log in or register to post comments

अर्धवटराव,

प्रास
Tue, 08/16/2011 - 10:22 नवीन
अगदी विरळा विषय! आम्ही घर-कोंबडे, तेव्हा तुमचा अनुभव वाचायला नक्की आवडेल. :-)
  • Log in or register to post comments

प्रतीक्षा

निमिष ध.
Tue, 08/16/2011 - 10:35 नवीन
आता प्रतीक्षा तुमच्या अनुभवांची .. तुमचे वर्णन वाचत असताना माझे पूर्वीचे रेल्वे आणि एस टी चे प्रवास आठवले. आता ही संयुक्त राज्यातील विमानतळांवर असेच विविध नमुने बघायला मिळतात. मज्जा वाटेल तुमचे वर्णन वाचायला.
  • Log in or register to post comments

चांगली सुरवात

सहज
Tue, 08/16/2011 - 10:45 नवीन
वाचायला उत्सुक. जास्त वाट पहायला लावू नका.
  • Log in or register to post comments

+१

नगरीनिरंजन
Tue, 08/16/2011 - 12:09 नवीन
वाचायला उत्सुक. जास्त वाट पहायला लावू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

वातावरणनिर्मिती ..

बद्दु
Tue, 08/16/2011 - 11:59 नवीन
वातावरणनिर्मिती चांगली केली ..आता पुढले भाग पण असेच येउद्या..जरा लवकर लवकर टाका..अधुन मधुन फोडणिला / तडका म्हणुन हवाई फटाकड्यांचा ( राग मानु नका) फोटु डकवायला हरकत नाही..
  • Log in or register to post comments

प्रस्तावना झकास रे.

गणपा
Tue, 08/16/2011 - 13:04 नवीन
प्रस्तावना झकास रे. आता येउदेत पुढले किस्से. :)
  • Log in or register to post comments

पुढील लेखनाची वाट पाहिली

यकु
Tue, 08/16/2011 - 16:18 नवीन
पुढील लेखनाची वाट पाहिली जाईल याची नोंद घेणेत यावी :)
  • Log in or register to post comments

वाट पाहतोय...

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/16/2011 - 16:22 नवीन
हा लेख मात्र वाचायला सुरु केला आणि संपून गेला येवढा कमी वाटला. जरा भरपूर किस्से टाकुन एक मोठा लेख यु द्या :)
  • Log in or register to post comments

+ १

मेघवेडा
Tue, 08/16/2011 - 18:04 नवीन
ऐसाच बोल्ताय.. नमनाला घडाभर तेल न वाहिल्यामुळे खंत वाटायला लावणार्‍या मोजक्याच गोष्टींपैकी एक! ;) लौकर फुडं लिवा मालक.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छान

समीरसूर
Tue, 08/16/2011 - 17:38 नवीन
सुरुवात आणि विषय! बाकी पुस्तक असेल तर प्रवास सुखकर होतो हे नक्की. पण एअरपोर्टवर माणसांची लगबग बघण्यातही एक मजा आहे हे खरे. विविध रंगांची, भाषांची, देशांची, सस्कृतींची, मातींची माणसे पाहण्यात विलक्षण गंमत आहे. मागे एकदा एका एअरपोर्टवर एक बहुधा स्पॅनिश असलेली तरुणी आपल्या ३-४ वर्षांच्या मुलीला सांभाळत असलेली मी पाहिली. ती मुलगी इतकी मस्ती करत होती की तिच्या आईची तिला जागेवर आणून बसवता-बसवता दमछाक होत होती. दर वेळेस मुलगी पळून गेली की ही आई सगळ्यांकडे बघून एक छानसं स्मित देत लाडाने तिच्या मुलीला हाक मारायची. त्या लहान मुलीचं नाव 'बरानजेलीस' की असंच काहीसं होतं. फार गंमत वाटत होती त्यांच्यातली ती उबदार माया बघतांना.... अर्धवटराव, येऊ द्या अजून. मजा येतेय... :-)
  • Log in or register to post comments

दंगल

श्रावण मोडक
Tue, 08/16/2011 - 17:41 नवीन
शीर्षक वाचून एका जुन्या आंतरजालीय दंगलीची आठवण झाली. थोडा घाबरतच लेख उघडला. वाचला, तर ही केवळ प्रस्तावनाच निघाली. सुटकेचा निःश्वास सोडला, पण तात्पुरताच. पुढं काय वाढून ठेवलं आहे? पण हरकत नाही. सध्या तशी शांतता आहे. ;)
  • Log in or register to post comments

उत्सुक

विसुनाना
Tue, 08/16/2011 - 17:41 नवीन
वाचनोत्सुक. पुढचे भाग लवकर यावेत.
  • Log in or register to post comments

लेखन आवडले. पु. भा. प्र.

रेवती
Tue, 08/16/2011 - 17:59 नवीन
लेखन आवडले. पु. भा. प्र.
  • Log in or register to post comments

+१

शुचि
Tue, 08/16/2011 - 19:22 नवीन
सुरेख लेखन. उत्सुकता चाळविणारे. पुढे काय? पुढे काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+१

प्राजु
Wed, 08/17/2011 - 05:48 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मस्त रे अर्ध्या!!!! लवकर

प्रभो
Tue, 08/16/2011 - 19:32 नवीन
मस्त रे अर्ध्या!!!! लवकर लिही बे पुढचा भाग लाउंज मधे बसल्या बसल्या. ;)
  • Log in or register to post comments

छान

स्मिता.
Tue, 08/16/2011 - 19:37 नवीन
सुरूवात छान झालीये. पुढिल भागही लवकर टाका.
  • Log in or register to post comments

"अप इन द एअर" चित्रपटाची आठवण

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 08/16/2011 - 23:01 नवीन
"अप इन द एअर" चित्रपटाची आठवण झाली. येऊ दे अजून.
  • Log in or register to post comments

पुढल्या

चतुरंग
Tue, 08/16/2011 - 23:35 नवीन
हवेतल्या गोष्टी जालावर येऊंदेत! ;) -(वाचनोत्सुक)हवाईरंगा
  • Log in or register to post comments

सुरूवात छान झाली आहे..

बहुगुणी
Wed, 08/17/2011 - 05:55 नवीन
अपेक्षा वाढल्या आहेत, पुढच्या भागात आधिक खंड नको, लवकर येऊ द्या.
  • Log in or register to post comments

चला एकूण नमुने वाचायला मिळणार

स्पंदना
Wed, 08/17/2011 - 07:11 नवीन
चला एकूण नमुने वाचायला मिळणार तर. येउ दे लवकर्!
  • Log in or register to post comments

मस्तच

जातीवंत भटका
गुरुवार, 08/18/2011 - 17:05 नवीन
मस्तच -- जातीवंत भटका...
  • Log in or register to post comments

सुंदर लेखाची सुंदर सुरवात !

वाहीदा
Sat, 08/20/2011 - 22:59 नवीन
वातावरण निर्मिती साजेशी ! तुमच्या हवेतल्या गोष्टी मनातच ठेवू नका ! पटापट संगणकावर उतरवा अन आम्हालाही परत एकदा छोटीशी सफर घडवा :-)
  • Log in or register to post comments

द टर्मिनल

बेभान
Mon, 09/05/2011 - 20:32 नवीन
टॉम हँक्स चा 'द टर्मिनल' डोळ्यासमोर उभारला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा