Skip to main content

नारळीभात

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 13/08/2011 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः २ वाटया बासमती तांदुळ स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवावे. ३ वाटया चिरलेला गुळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे) ३ वाटया खवलेले ओले खोबरे ५-६ लवंगा ४-५ दालचिनीच्या काड्या ३-४ टेस्पून साजूक तुप २ टीस्पून वेलचीपूड सुकामेवा आपल्या आवडीप्रमाणे. . पाकृ: भांड्यात १ टेस्पून तुप गरम करुन लवंगा व दालचिनी परतून घेणे. . मग त्यात निथळत ठेवलेले तांदुळ घालून चांगले परतणे व पाणी घालून भात शिजवून घेणे. . शिजवलेला भात ताटात काढून गार होऊ दयावा. गुळ व ओले खोबरे एकत्र करुन घेणे. . जाड बुडाच्या भांड्यात २ टेस्पून तुप गरम करुन शिजवलेला भात व गुळ-खोबरे थोडे-थोडे करुन घालावे व हल़क्या हाताने एकत्र करावे. . एक- दोन वाफा आणाव्यात. त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड घालून, झाकून गुळ वितळेपर्यंत शिजवावे. . आवडत असल्यास वरून एक चमचा साजूक तुप सोडावे. गरमा-गरम खायला सुरुवात करावी. .

वाचने 7349
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

एकदम कातील दिसतोय असा सुरेख भात चापून दुपारी वामकुक्शी म्हणजे नारळी पोर्णिमा अगादी अंगावर येते :)

केशरेी रंग हवा भाताचा.....त्या शिवाय मजा नाहि...............

In reply to by अविनाशकुलकर्णी

आम्ही नारळीभातात केशरी रंग घालत नाही...केशरीभात किंवा साखरभात बनवताना त्यात केशर किंवा केशरी रंग घालतो.

ऑफिस मध्ये गेलो आणि तुमची पाककृती वाचली .. संध्याकाळी मित्राला फोन केला म्हणालो आज करूच नारळी भात. मग काय मारली एशियन स्टोर ची चक्कर आणि समान आणले आणि हा पहा ...
From pics

In reply to by निमिष ध.

तुम्ही तर लगेच करुन बघीतला नारळीभात, क्या बात आहे छानच दिसत आहे :) धन्यवाद :)

रेसेपी तर छानच !!पण फोटो तर अत्यंत सुरेख !!

मीही केला होता. यावेळी तुझ्या पाकृत लिहिल्याप्रमाणे दालचिनी घातली होती. थोड्या लवंगा तुपात तळून पूड करून घातल्या आणि थोड्या तशाच ठेवल्या. बाकी कृती सेम आहे. रंग बरोबर आलाय. पराने हा भात कसा केला हे वाचायला आवडेल. फारच गुणी आणि बल्लव मुलगा आहे हा!;)