साहित्यः
२ वाटया बासमती तांदुळ स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवावे.
३ वाटया चिरलेला गुळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे)
३ वाटया खवलेले ओले खोबरे
५-६ लवंगा
४-५ दालचिनीच्या काड्या
३-४ टेस्पून साजूक तुप
२ टीस्पून वेलचीपूड
सुकामेवा आपल्या आवडीप्रमाणे.
पाकृ:
भांड्यात १ टेस्पून तुप गरम करुन लवंगा व दालचिनी परतून घेणे.

मग त्यात निथळत ठेवलेले तांदुळ घालून चांगले परतणे व पाणी घालून भात शिजवून घेणे.

शिजवलेला भात ताटात काढून गार होऊ दयावा.
गुळ व ओले खोबरे एकत्र करुन घेणे.

जाड बुडाच्या भांड्यात २ टेस्पून तुप गरम करुन शिजवलेला भात व गुळ-खोबरे थोडे-थोडे करुन घालावे व हल़क्या हाताने एकत्र करावे.

एक- दोन वाफा आणाव्यात. त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड घालून, झाकून गुळ वितळेपर्यंत शिजवावे.

आवडत असल्यास वरून एक चमचा साजूक तुप सोडावे.
गरमा-गरम खायला सुरुवात करावी.
प्रतिक्रिया
एकदम कातील दिसतोय असा सुरेख
वा! सुरेख!
सहमत
In reply to वा! सुरेख! by शुचि
केशरेी रंग हवा
आम्ही नारळीभातात केशरी रंग घालत नाही
In reply to केशरेी रंग हवा by अविनाशकुलकर्णी
आमचा ही नारळी भात
अरे वाह !
In reply to आमचा ही नारळी भात by निमिष ध.
अहाहा......................सु
मीही आज केला होता. फोटो मस्त
मस्त
मस्तच. शेवटचा कधी चाखला होता
मीही केला होता. यावेळी तुझ्या
+ १ अगदी अगदी!
In reply to मीही केला होता. यावेळी तुझ्या by रेवती