आजी
आजी म्हणजे मैत्रीण असते
सगळ्या घराची वीण असते,
मेणबत्तीला उभारण्यासाठीचे
खाली वितळवलेले मेण असते.
आजी ज्ञानाचे भांडार असते
अंधारात प्रकाशाचे दार असते,
कधी मायेची हळुवार फुंकर
कधी छडीचा कडवा वार असते.
आजी आमचे होकायंत्र आहे
तीचे शब्द आम्हाला मंत्र आहे
विचारात नेहमी गुरफटतो आम्ही
ती मात्र अजुनही स्वतंत्र आहे.
आजी म्हणजे दरारा असतो
आजी म्हणजे शहारा असतो
कुठलही पाऊल चुकत नाही
नजरेचा खडा पहारा असतो.
आजी म्हणजे दडपण आहे
आजी म्हणजे प्रेम पण आहे
पाहता क्षणी डोळ्यात भरणारे
घराचे भारदस्त घरपण आहे.
स्वराज्य घडविले शिवबाने
पण लढविले बाजीने आहे
जन्म आई-वडिलांनी दिला
संस्कार दिले आजीने आहे
घरटे साजिरे बनविले तिने जे
ते आम्ही वाढवणार आहे
नसानसात वावरणारा हा
तिचाच आत्मविश्वास आहे
लेखनविषय:
याद्या
4931
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
आधीच इथे लाडू, पानग्या,
मेणबत्तीला
+१
In reply to मेणबत्तीला by गणेशा
छान कविता
अगदी बरोबर....
In reply to छान कविता by जाई.
सर्वांचे खुप खुप आभार!!!
काल कविता वाचायची टाळलीच
खुप खुप आभार रेवति!!!
मला आजी लाभली नाही, माझ्या