साहित्यः
मेथीचे पिठ १ वाटी (१०० ग्रॅम)
५ वाट्या गव्हाचे पिठ
२ वाट्या रवा
१०० ग्रॅम डिंक
५० ग्रॅम हालिम (अळीव)
२ वाट्या सुके खोबरे
५ १/२ वाट्या गुळ
१ चमचा सुंठपावडर
अडीच ते ३ वाट्या साजुक तुप
खारीक बदामचे बारीक तुकडे
पाककृती:
मेथिचे पिठ आदल्या दिवशी तुपात भिजवत ठेवा. त्यामुळे कडूपणा कमी होतो.
सुके खोबरे किसुन मंद आचेवर खरपुस भाजुन घ्या.
खारीक व बदाम बारीक करुन घ्या.
तुपात थोडा थोडा डिंक घालुन तळा व थंड झाल्यावर तो कुस्करुन बारीक करा.
चमचाभर तुपात हालिम (अळीव) तळून घ्या.
भांड्यात दिड वाटी तुप घालुन रवा व गव्हाचे पिठ मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्या व भाजल्यावर एका परातीत काढा.
त्या पिठात तुपात भिजत घातलेले मेथीचे पिठ घाला व हाताने चांगले फेसुन पिठाच्या गुठळ्या मोडा.
आता त्यात भाजलेले खोबरे जरा कुस्करुन घाला. बारीक केलेले बदाम व खारीक घाला. सुंठपावडर व डिंक घाला व चांगले मिसळा.
आता एका मोठ्या भांड्यात १ चमचा तुप टाकुन गुळ चिरुन टाका. आता गॅस एकदम मंद ठेवा व गुळ विरघळेपर्यंत ढवळा. गुळ विरघळला की लगेच गॅस बंद करा.
भांडे गॅसवरुन काढून त्यात लगेच पिठाचे मिश्रण घाला व चांगले ढवळा.
आता पटापट लाडू वळून घ्या.
झाले लाडू तयार.
अधिक टिपा:
हे लाडू पौष्टीक असतात.
हे लाडू थंडीत खातात.
बाळंतीणीसाठी हे लाडू खुपच उपयुक्त ठरतात.
पाक करताना गॅस मोठा मुळीच ठेउ नका. एकदम मंद ठेवा नाहीतर पाक पक्का तयार होइल इ लाडू कडक होतील.
लाडू वळताना मिश्रण थंड झाले आणि भांड्याला चिकटले किंवा लाडू वळता येत नसतील तर पुन्हा मंद गॅसवर २-३ मिनिटे ठेवावेत म्हणजे मिश्रण ओले होउन लाडू वळता येतील.
चमचाभर तुपात हालिम (अळीव) तळून घ्या.
भांड्यात दिड वाटी तुप घालुन रवा व गव्हाचे पिठ मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्या व भाजल्यावर एका परातीत काढा.
त्या पिठात तुपात भिजत घातलेले मेथीचे पिठ घाला व हाताने चांगले फेसुन पिठाच्या गुठळ्या मोडा.
आता त्यात भाजलेले खोबरे जरा कुस्करुन घाला. बारीक केलेले बदाम व खारीक घाला. सुंठपावडर व डिंक घाला व चांगले मिसळा.
आता एका मोठ्या भांड्यात १ चमचा तुप टाकुन गुळ चिरुन टाका. आता गॅस एकदम मंद ठेवा व गुळ विरघळेपर्यंत ढवळा. गुळ विरघळला की लगेच गॅस बंद करा.
![]() |
| From Methi ladu |
आता पटापट लाडू वळून घ्या.
झाले लाडू तयार.
अधिक टिपा:
हे लाडू पौष्टीक असतात.
हे लाडू थंडीत खातात.
बाळंतीणीसाठी हे लाडू खुपच उपयुक्त ठरतात.
पाक करताना गॅस मोठा मुळीच ठेउ नका. एकदम मंद ठेवा नाहीतर पाक पक्का तयार होइल इ लाडू कडक होतील.
लाडू वळताना मिश्रण थंड झाले आणि भांड्याला चिकटले किंवा लाडू वळता येत नसतील तर पुन्हा मंद गॅसवर २-३ मिनिटे ठेवावेत म्हणजे मिश्रण ओले होउन लाडू वळता येतील.
वाचने
14469
प्रतिक्रिया
27
मिसळपाव

प्रतिक्रिया
मस्त
मस्त आहेत लाडू जागुताय.. बोल
मला एक डबाभर लाडू पुरे हा..
वाह! मस्तच!! जागु.. काय विशेष
अग प्राजु सगळ ठिक आहे म्हणुनच
मस्त!!!
मस्त
हे लाडू मस्त स्वादिष्ट असतात
राघवदासाचे लाडू- नुसतेच ऐकले
धन्स..
In reply to राघवदासाचे लाडू- नुसतेच ऐकले by अब् क
गुळपापडी, मेथीचे लाडू आज्जीची
In reply to धन्स.. by गवि
आजी गेली ती सगळे आवडते लाडू
In reply to गुळपापडी, मेथीचे लाडू आज्जीची by गणपा
राघवदास आणि गूळपापडी असे लाडू
In reply to आजी गेली ती सगळे आवडते लाडू by गवि
लाडूऊऊऊऊऊऊऊ
मस्तच!
मस्त. खुपच छान .
मेथीचे लाडू आवडत नाय. सबब काय
मस्त..
खल्लास !
वा... (अळीवाच्या लाडूंचा
अळिवाचे लाडू
In reply to वा... (अळीवाच्या लाडूंचा by मदनबाण
फोटू छान आलेत. स्वातीताई
मला उद्या सुद्धा चालतील.
In reply to फोटू छान आलेत. स्वातीताई by रेवती
गगनविहारी तंबीटाचे लाडू
तंबिटाचे लाडू हे तांदळाच्या
रेवती नक्की टाक रेसिपी. मी
मधुरा मस्तच नारळाची आयडीया.