Skip to main content

प्रॉमिस

प्रॉमिस

Published on 10/08/2011 - 17:35 प्रकाशित मुखपृष्ठ
कर्रर्र जोसेफविलामधिल घराची बेल वाजली. "शेखर आजगावकर" अशी पाटी लावल्येल्या घराचा दरवाजा उघडला. ''काय आज उशीर?" अंजलीने शेखरच्या हातातील बॅग घेत विचारले. ''हो, अग त्या स्मिथ अ‍ॅन्ड असोसिएट्च्या अ‍ॅनालिसिसच काम आलं.ड्योक्याचा पार पिट्टा पडला.संपता संपतच नव्ह्त. त्यात या पावसाने वैताग आणलाय.लींक रोडवरुन यायच म्ह्नजे आणखि ताप. "बरं! तू फ्रेश हो तेवढ्यात मी पानं घेतेच" "ठिक आहे. यश कुठय?" "उद्या ओबेरौयला जायचय ना? होमवर्क करतोय" "एरवी कंटाळा अभ्यासाचा. पण आता ओबेरौय म्ह्ट्ल की लगेच तयार!" "हो ना सगळ्या मित्राना सांगूनसुधा झालय" "छान. पण आता उदयाच्या वेळेच काय?" "का? '' ''अगं मघाशीच म्ह्ट्लना त्या स्मिथच काम आलय'' ''मग आता उद्याचा प्लान कॅन्सल? '' ''छे ग! कॅन्सल कशाला जमवतो कसतरि'' ''बघ तु आणि तो काय ते. ही मुलं कशाचा पण हट्ट धरतात.तो मोहित जाउन आला तर ह्याला पण जायला हवं.'' ''जाउ दे आता त्याला सांगितलय तर जाउन येउ.तसही ओबेरौय पाच मिनिटावर आहे जयप्रकाशपासून.'' ''तुझ्या या लाडानेच यश शेफारत चाललय.'' ''बाबा अभ्यास झाला.उद्याच पक्कं ना?'' घाईघाईने हातातल काम संपवुन यश हॉलमधे आला. आई ऊद्याचा प्लान कॅन्सल करेल या भीतीने ''येस माय सन टुमॉरो वी विल हॅव ग्रेट फन!'' ''याहु! ''यशने जागीच उडी मारली ''चला आता जेवायाला'' अंजलीने यशच्या उत्साहाला आवर घातला. जेवण झाल्यानंतर अंजली आवराआवर करु लागली. शेखरने लॅपटॉप ओपन केला. ''यश तो टीव्हीचा आवाज कमी कर. फोन वाजतोय. बाबाना नेउन दे.'' अंजली किचनमधुन ओरडली. ''हं मग कुणाचा फोन होता?'' टॉवेलला हात पुसत अंजलीने विचारले. ''मेघाताईचा.दिल्लीवरुन.'' शेखरने उत्तर दिले 'मेघाच नाव एकताच अंजलीच्या कपाळावर आठया उमटल्या.शेखरच्य्रा नजरेतून ते सुटलं नाही. ''जाउ दे गं. आपण प्रॉमिस केलय तिला.'' ''काय प्रॉमिस केलय? हे सगल तुझ्या भीड्स्त स्वभावामूळे होतय'' ''कसला भीडस्त स्वभाव? अग मी सोनलकडे बघुन बोललो.'' ''हे बघ मला सोनलचा काहीच प्रॉब्लेम नाही.तिचा काय संबंध? प्रश्न आहे तो मेघाताईचा. येता जात आपल्या श्रीमंतीचा तोरा मिरवायचा.समोरच्याला लागेलस बोलायच.'' ''हे बघ सोनलला आयआयटीत अ‍ॅडमिशन मिळालीय ईकडच्या. मेघाताईला आपण सांगितलयना तिची सोय करणार म्हणून. आणि त्यातून सोनलची आणि यशच चागल जमतं. हॉस्टेलपेक्षा घर सोयीच म्हणून मेघाताईने आपल्याकडे शब्द टाकला.'' ''सोनलला ईजिनीअरिंग करायच म्हणून आता आपली आठवण. नाहीतर आपण कसे हायक्लास आणि बाकी सगळे मिडलक्लास.'' अंजली फणकार्याने म्हणाली. ''जाउ दे. आता तिला प्रॉमिस केल्यावर नाही म्हणणं योग्य नाही. तीनचार वर्षाचाच प्रश्न आहे.त्यातुन मेघाताई सोनलचा राहण्याचा खर्च देणारेय.'' ''हेच ते मला त्यांच आवडत नाही.पैसे दिले कि झाल,फार मोठं काम केल अस वागतात. शोबाजी नुसती.'' ''हं! मेघाताई, सोनल, सुधीरराव उदद्या दुपारच्या फ्लाईट्ने मुंबईत येतायेत. फ्लाईट ईथे तीनपर्यत पोचेल. घरी यायला चार वाजतील्.तू आठल्यांकडे चावी देउन ठेव. तु उदद्या किती वाजता फ्री होशील?'' ''उद्या शेवटच प्रक्टीकल पावणेतीनपर्यत संपेल. माटुगा ते गोरेगाव अर्धातास जाईल ट्रेनने.पावणेचार होतील यायला.'' ''ठीक आहे.'' ''तुझ्या आणि यशच्या प्लानच काय? उद्या कस जाणार तुम्ही दोघं? मला काही जमणार नाही.'' ''यशचा क्लास सुटेल पाचला. मी ऑफिसमधुन लवकरच निघेन्.त्याला क्लासवरुन घेईन मग तसच डायरेक्ट ओबेरौयला जाउ.'' ''अम्म्म ठीक तसच करा'' ''ए मम्मी तो स्पायडरमॅनचा टीशर्ट काढून ठेव्.उद्या घालयचाय मला.'' ''अजून झोपला नाहीस का? उद्या शाळेत जायचना.''अंजलीने यशला दटावले. घड्याळ्याने चारचे टोले दिले.शट डाउनवर क्लिक करुन शेखरने लॅपटॉप बंद केला. मघाशीच अंजलीचा फोन आलाय. ताई पोचली घरी. आता निघु.विक्रोळी ते गोरेगाव अर्धापाउण तास लागेल्.यशचा क्लास सुटण्याआधी पोचायला हव. शेखरने विचार केला. थोड्याच वेळात त्याने लिंकरोडला गाडी घेतली. ट्रॅफिक होतच नेहमीप्रमाणे. त्यात जागोजागी असणारे खड्डे. वैताग नुसता. पावसाची रिपरिप जोडीला. आयाआयटी मागे पडताच ट्रॅफिक थोड कमी झालं. शेखरने सुटकेचा निश्वास टाकला.चला आता गाडीला स्पीड घ्यायला हरकत नाही. पोहोचू आता. "होशवालोको खबर क्या" जगजीतसिंगची गझल लावून त्याने गाडीचा स्पीड वाढवला.लिंकरोडवर गाड्या सटासट जात होत्या. स्विफ्ट, ओम्नी, सॅन्र्टो, रिक्षा, ट्रक, रॉकेल वाहणार्या बैलगाड्यासुधा.खरच या मुबईत प्रत्येकाला जागा आहे.मुंबई नगरी बडी बांका... तेवढ्यात लेफ्टसाईड्ने आलेल्या ट्रकला चुकवण्यासाठी त्याने जोरात ब्रेक मारला. क्षणभर त्याला गरगरायाला झालं.डोळ्यासमोर अंधार पसरला... पाचच मिनिटात शेखरने स्वतला सावरले.ट्र्कवाल्याला एक शिवी हासडून तो पुढे नीघाला.गाडीचा वेग वाढ्वून तो वीस मिनिटात क्लाससमोर आलासुधा. ''बाबा! याहू'' शेखर दिसताच यशने आनंदाने ऊडी मारली. "आताच सोड्ल सरानी. मोहितला सांगितलय मी आपाण जाणार ते.खुप शाईनीग मारतो. शोबाजी नुसती." लेकाच्या तोडची ही मुक्ताफळे ऐकुन शेखरला हसु आवरेना. "ठीक आहे. बस आता गाडीत नाहीतर उशीर होईल" एक सफाईदार वळण घेउन त्याने गाडी हायवेला घेतली.पाच मिनिटात ते ओबेरौयला पोचले. ''आलो आपण! बाबा चलना लवकर"" ''अरे हो हो गाडी पार्क करायला नको का ? मग प्रॉब्लेम होतो.'' गाडि पार्क केल्यावर यश धावतच गेम्स सेक्शनकडे गेला. ''बाबा येताना ते कॉईन्स घेउन या '' स्कुटीवर बसता बसता यश ओरडला भरपुर गेम्स खेळल्यानंतर यशलापोटात कावळे ओरडत असल्याची जाणीव झाली.पिझ्झा,सॉफ्टी,कोकवर त्याने यथेछ ताव मारला. ''चला आता घरी. झालंना समाधान.उशीर होतोय्. आई रागावेल. सोनलताई वाट बघत असेल.'' ''काय मग! आज अगदी जीवाची मुंबई केलीसना. दोन तास मज्जा केलीस. .'' गाडीत बसताना शेखरने विचारलं ''येस आता मोहितला सांगेन कि मी किती मज्जा केली ते.जास्तच हुशारी दाखवतो'' . ''हो हो.आता जरा व्यवस्थित बस. आणि ती चॉ़कलेट सांभाळ नीट. अर्धी सोनलला दे,'' ''थॅक्स बाबा.'' ''कशाबद्द्ल?'' ''फॉर कीपिग प्रॉमिस'' '''वेल माय सन आय ऑलवेज कीप माय प्रॉमिसेस''' . ''काय रे प्रसाद कुठेय?'' धावतधावत जीने चढण्यार्या यशला आठल्यांनी विचारले. ''प्रसाददादा मला काय माहीत?'' ''अरे प्रसाद गेला होता ना तुला क्लासवरुन आणयला?'' ''प्रसाददादा कुठे! मी आणि बाबा गेलेलो ओबेरौयला. बाबा आले होते मला घ्यायला.'' ''काय?'' ''हो ना आम्हीना खुप मजा केलिय. सोनलताई आलीय ना आमच्याकडे? तिला पण सांगायचिय गंमत'' ''ठीक ठीक जा जा घरी.'' आठ्ले अडखळ्त म्हणाले ''च्च च्च फार वाईट झाल नाही.!'' ''हो ना ऐकुन धक्काच बसला अगदी'' ''पण मी म्हणते अस कस झाल एकदम?'' ''अहो ट्रकने उड्वलय लिंकरोडवर. या ट्रकवाल्याना तर शिस्तच नाहीये.कसेही चालवतात. गाडी सरळ चेपलीच गेली ट्रकखाली.गॅसकटर बोलवावा लागला.गाडी कापून काढली तेव्हाच बॉडी बाहेर काढता आली.पूर्ण चेंदामेदा झालाय बॉडीचा.त्यात पाउस आणाखी. आयकार्ड्वरुन ओळ्ख पट्ली.दोन तास लागले या सगळ्याला.कसा वाचणार जीव? आपल्याकड्चा कारभार हा असलाच भोंगळ.'' ''मग अंजूला कस कळल?'' ''फोन आला होता पोलिसांचा पंधरा मिनिटापूर्वी. अंजूतर बेशुध पड्ली होती.मेघा आलीये म्हणून बरं. नाहितर कोणालाच कळल नसत्. तिनेच पाठवलय प्रसाद्ला यशला आणायला.सुधीर, शिंदे, डिसोजा हॉस्पिटलला गेलेत'' ''पण फार वाईट झाल नाही.! किती छान मुलगा होता.सगळ्याना मदत करायला पुढे!'' ''हो ना फार वाईट झाल''

याद्या 5468
प्रतिक्रिया 36

चांगली जमलीय कथा. वेगवान घडामोडी घडत जातात आणि त्या वाचकासमोर तितक्याच इफेक्टीव्हली उभ्या करण्याचे सामर्थ्य तुझ्या लेखणीत आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! :)

अगदी असेच म्हणतो.... मला वाटले सोनल किंवा मेघाताइची वाट लागेल.... ऑर देर विल बि एनि ऑदर ट्विस्ट.... पण न्यु कॅरॅक्टर अन झप्पकन द एन्ड.... संवाद छान (अत्यंत प्रभावी) जमल्येत.... अजुन वेगळा शेवट केला असता छान वाटले असते.... (मॄत्यु सोडुन इतर काही)

अगदि अगदि ह्याच पॅटर्नच्याच्या कथा(विशेषतः शेवटाची कलाटणी) जालावरच्या आणि इतर लघुलेखनात, कथांत पुनः पुन्हा दिसते. एक व्यक्ती आपल्या अगदि जवळच्या व्यक्तिला भेटुन जाते आणि लगेच कळते ज्यांची भेट झाली त्यातील एक जण मागेच मृत झालेला/ली आहे. दिवाळी मासिक, छोटे मोठे नियतकालिक आणि आहट सारख्या मालिका ह्यअसतोहाच पंच असणार्‍या गोष्टी आहेत. नक्की संदर्भ द्यायचा तर एकच सुप्रसिद्ध उदाहरण आहे:- "लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई...." हे फेमस गाणं असणारा विक्रम गोखल्यांचा पिक्चर "बाळा गाउ कशी अंगाई " आठवतोय? त्या सिनेमात शेवटचा सीन हाच तर आहे:- आशा काळे, बाळावर पुत्रवत प्रेम करणारी,जिवापाड जपणारी नायिका मेल्यावरही बाळाला अन् बाळाच्या बाबांना शेवटचं भेटुन जाते. इथे प्रियाली का कुणातरी नियमित भयकथा लेखकांच्या लिखाणातही हा मुद्दा जशाला तसा आलाय. रसभंग होत असेल तर माफ करा, शक्य तितकं मनातलं बोलत राहतो मी, जशाला तसं. पहिलाच प्रयत्न आहे, मांडणी चांगली जमली आहे. त्याबद्दल कौतुक आहेच. अजुनही लिहित रहावे हीच इच्छा. (मिपावरच एक स्किझोफ्रेनिया संबंधित कथा अगदि जशाला तशी कॉपी-पेष्टवली होती कुणीतरी मीम वरुन ५-७ महिन्यांखाली. कथेमधल्या नायकाचा फक्त पेशा बदललेला,तपशील काहिसा बदललेला. बाकी संकल्प्ना तीच.) अर्थात एकाच एकापाठोपाठ दोन रेल्वे चालाव्यात तशात दोन मानवी मनात एकाच धरतीवरच्या संकल्पना रुजाव्यात हे होणे शक्य आहे असे वाटते. पण तरीही त्यामुळेच मला कथेत पंच्/धक्का जाणवला नाही हे ही खरेच.

In reply to by रामपुरी

आपणास या संकल्पनेचा कंटाळा आला हे लिहीण्यात कंटाळा न केल्याबद्दल धन्यवाद

In reply to by मन१

मिपावरच एक स्किझोफ्रेनिया संबंधित कथा अगदि जशाला तशी कॉपी-पेष्टवली होती कुणीतरी मीम वरुन ५-७ महिन्यांखाली. कथेमधल्या नायकाचा फक्त पेशा बदललेला,तपशील काहिसा बदललेला. बाकी संकल्प्ना तीच.) तुम्ही बहुधा एअरपोर्ट या कथेविषयी बोलत असावेत.. :(

तेवढ्यात लेफ्टसाईड्ने आलेल्या ट्रकला चुकवण्यासाठी त्याने जोरात ब्रेक मारला. क्षणभर त्याला गरगरायाला झालं.डोळ्यासमोर अंधार पसरला...
हे वाचलं आणि पुढे काय घडणार आहे याची कल्पना आली. आणि तसच झाल अ‍ॅज एक्स्पेक्टेड.

कथानक बर्‍यापैकी वेगवान, आणि पूर्णपणे संवादातून कथा सांगण्याची पद्धत आवडली. मिपा वर भविष्यात जाईकडून आणखी चांगलं वाचायला मिळेल याची खात्री वाटते. मोजकं लिही, पण असंच चांगलं लिही. शुभेच्छा!

गोष्ट गंडली आहे (की मीच गंडलो आहे!)

इंटरनेटस्नेही ,मुलुखावेगळी वपाडाव ,पैसातैचे प्रतिकियेबद्दल आभार

In reply to by गणपा

निरुत्साही करणारा वाटु शकतो. म्हणुन व्यनि मधुन मी खेद प्रकट केलाय. मुळात प्रतिसाद दिल्यावर काही वेळाने जाणवलं की, कथेबद्दल जाणवलेले दोन मुद्दे आहेत. १. भाषा ओघवती आहे, रचना,मांडणी व्यवस्थित आहे. २.कथाविषय हे repeatation आहे. ह्यापैकी पहिला मुद्दा हा जाहिर व दुसरा खाजगीत (व्यनि, खरड ह्याद्वारे) सांगणं उचित ठरलं असत. प्रोत्साहन्पर ठरलं असतं. असो. हे मी त्यांना सध्या व्यनि केलय.

या कथेचा ओघ खूप छान जमलाय. संवादांतून कथानक व व्यक्तिरेखा उभ्या करण्याचा प्रयत्न चांगला आहे. संवाद खूप नैसर्गिक झालेले आहेत. शेखरची दिलेलं वचन पाळण्याची प्रवृत्ती होती असं विधान करण्याऐवजी ते दुसऱ्या प्रसंगातून सहजपणे ठसवलेलं आहे, हेही आवडलं. कथावस्तू जुनी आहे हे इतरांनी म्हटलेलं आहेच. पण तशी कुठचीच कथा पूर्णपणे नवीन नसते. काही फॉर्म्युले फार घीसेपिटे झालेले असतात इतकंच. या कथेचा पुढचा भाग लिहिलात (या घटनेचा यशच्या आयुष्यावर झालेला परिणाम) तर त्यात काहीतरी नवीन वाचायला मिळेल. लेखन करत रहा, तुम्हाला चांगलं जमतं.

साँरी हं गणपा काका तुमचे आभार मानण्याचे राहुनच गेले. त्याच काय आहेना आपण म्हणता तशी मला फक्त गोग्गोङ प्रतिसादाची मुळीच अपेक्षा नाहीये आणि हो रामपुरीना मी प्रतिसाद दिलाय यांची नोंद घेणे

In reply to by जाई.

तुमचे आभार मानण्याचे राहुनच गेले.
त्याची अपेक्षा मुळिच नव्ह्ती/नाही. पण एकंदर वरील सगळे प्रतिसाद पहाता ज्यांनी फक्त छान छान अस म्हटल यांचेच आभार प्रदर्शन झालं होत म्हणुन मी फक्त एक निरिक्षण नोंदवल बास. बाकी तुम्ही लिहिता छान यात वाद नाहीच. या पुढे ही वाचनाचा आनंद तुम्ही आम्हाला द्यालच अशी आशा बाळगतो. पण तरी सुद्धा माझ्या प्रतिसादाने ठसका लागल्या असल्यास मंडळ दिलगीर आहे. :)

In reply to by गणपा

बल्लवाचार्य गणपाजी, अहो माझा कमेंट नीट वाचला तर तुम्हाला कळेल की मी काही मुद्दे अधोरेखित केलेले आहेत.... कथेचा ओघ, संवाद छान आहेत असे म्हटलेले आहे.. पण शेवट काहीतरी वेगळा हवा होता असेही नमुद केल्या गेले होते... आणी हो जाईबै.... घासकडवींनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पुढचा भाग लिहिला तर वुत्तमच... पुलेशु...

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

गविसरांकडून अशी दाद मिळाली, आणि काय पाहिजे?
हे घ्या.... बी-टेक्स लोशन
आज दाद दिलिये उग्या खाज-खरुजही देतील... तयार रहायला नको का मान्सानं (बैनं) !!!

In reply to by वपाडाव

त्यांनी दोघांनी मला इच्छेविरुद्ध आणि वजनाविरुद्ध (हरभर्‍याच्या) झाडावर चढवले.. आणि तुम्ही मला झाडावर बघून एकदम जाहिरातीतच काम दिलेत की वपाराव.. आठवा: "ये मजबूर है.. लेकिन आप नही..".. हे राम..

In reply to by गवि

>>रे व्याडेश्वरा..आता काय करावे?? काका वरुन सर पदावर प्रमोशन झाल्याबद्दल प्यार्टी द्यावी (आम्हाला, व्याडेश्वराला नव्हे!)! ;)

In reply to by अन्या दातार

महागडा प्रकार नको. त्यापेक्षा गुहागरास व्याडेश्वराला ५१/- (अक्षरी रु. एक्कावन्न मात्र/-) ची पावती फाडतो.

आपल्या प्रतिसाद मला मुळीच निरुत्साही करणारा वाटला नाही. उलट मला अनेक नवीन गोष्टी कळल्या जस की Repeatative theme, विक्रम गोखले, आशा काळे ,वैग्रे खर सांगते की लिँबोण्याच्या झाडाखाली हे गाणे त्या चित्रपटमधल आहे हेच मला माहित नव्हतं. त्यातून तो पिक्चरही मी पाहिलेला नाही. खरतर मला वरती शेखरची वचनपुर्तता हाच मुद्दा ठळक मांडायचा होता वरती घासकडवीनी म्हटल्याप्रमाणे. bt i think i missed the bus. असो मी खरतर तुम्हाला खरड करणार होते की अजून काय सुधारणा करता येईल म्हणून.पण मध्येच कामानिमित्त ब्रेक घ्यावा लागला. त्यामुळे राहुन गेलं. तसही काँलेज सोडून 2/3 वषैच झाल्याने मला आपणाइतका अनुभव नाही. आशा आहे की आपण समजून घ्याल प्रतिकियेबद्दल धन्यवाद

श्री राजेश घासकडवी, आनंदयात्री ,जानम ,बिका तसेच वाचकांचे आभार

जाई पहिल्याच प्रयत्नात इतकी छान कथा लिहिलीत मला तर आवडली ब्वा... विषय तसा जुनाच होता, काय झालंय याचा अंदाज आलेला, बट नेवर माइंड पुढच्या वेळी काहीतरी नवीन लिहा , शुभेच्छा

जाई अग छान जमली आहे कथा आणि शेवट पण छानच आहे अगदी अनपेक्षित. खूपच छान !! आता लवकर दुसरी कथा प्रकाशित कर तुझ्या पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा.