✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Fri, 08/05/2011 - 08:12
हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका ऊठ मर्दा ऊठ आवळून घे मूठ हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट सत्तेपुढे शहाणपण जेव्हा व्यर्थ जाते माणुसकीचे लचके तोडून लाचखोर खाते पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट अन् हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट अन्यायाची सीमा जेव्हा मर्यादेला लांघते तुझे हक्क तुडवून तिरडीवर बांधते शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ अन् हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट पोशिंद्याच्या छाताडावर हरामींच्या मौजा तेव्हा राज्य करतात लुटारूंच्या फौजा सत्ता आणि दलालांची, कर ताटातूट अन् हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट माय तुझी बैलावाणी राबराबून मेली गल्लीमध्ये मुळं अन् दिल्लीमध्ये वेली अभयाने शोध घे, कोणी केली लूट अन् हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट                                                 गंगाधर मुटे -------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
4580 वाचन

💬 प्रतिसाद (21)

वाहवा... बरेच दिवसांनी

अर्धवट
Fri, 08/05/2011 - 08:59 नवीन
वाहवा... बरेच दिवसांनी नागपुरी तडका आला
  • Log in or register to post comments

वाहव्वा मुटे साहेब

अत्रुप्त आत्मा
Fri, 08/05/2011 - 09:37 नवीन
एकदम ए के ४७ काढल्यासारखी वाटतीये.समरगीत /युद्धगीत काय म्हणाल ते म्हणा...पण अतिशय प्रभावी आहे. शब्दाशब्दातून भावना प्रकट झालीये.शेवटच्या कडव्यात तर या मागची आख्खी भावना/वेदना टाहो फोडून बाहेर आलेली आहे.वाहव्वा अतिशय मर्मग्राही व परीणामकारक काव्य.
  • Log in or register to post comments

सह्ही!

मी ऋचा
Fri, 08/05/2011 - 10:09 नवीन
सह्ही!
  • Log in or register to post comments

मस्त जमलय हो

पियुशा
Fri, 08/05/2011 - 12:02 नवीन
मस्त जमलय हो :)
  • Log in or register to post comments

हाण्ण तिच्या ****!!!

यकु
Fri, 08/05/2011 - 17:22 नवीन
हाण्ण तिच्या ****!!!
  • Log in or register to post comments

लय भारी!! एकेक कडवं ठासून

नगरीनिरंजन
Fri, 08/05/2011 - 22:13 नवीन
लय भारी!! एकेक कडवं ठासून भरलेल्या दारूच्या स्फोटात उडालेल्या तप्त तोफगोळ्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments

आक्रमक विचार मांडण्यासाठी लय

राजेश घासकडवी
Fri, 08/05/2011 - 23:02 नवीन
आक्रमक विचार मांडण्यासाठी लय चांगली निवडली आहे. कविता वाचताना पार्श्वभूमीला उखळीत दोन मुसळींनी धान्य कांडण्याचा ठेका मनात येतो. ही लय या कवितेचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र अनेक ठिकाणी ती तुटते. मग तडक्यातली मोहरी कच्ची राहून दाताखाली येते. शब्दयोजनेच्या थोड्या फरकांनी कविता अतिशय प्रभावी होऊ शकेल.
  • Log in or register to post comments

लय

गंगाधर मुटे
Sat, 08/06/2011 - 15:01 नवीन
तुम्हाला हवी ती लय मला माहित नाही. त्यामुळे शब्दयोजनेत बदल करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

वीररसपूर्ण छान आहे तडका.

शुचि
Sat, 08/06/2011 - 05:00 नवीन
वीररसपूर्ण छान आहे तडका.
  • Log in or register to post comments

खणखणीत

अभिजीत राजवाडे
Sat, 08/06/2011 - 05:17 नवीन
हल्ली वीररसातील कवितांचा अभाव दिसुन येतो. हि कविता वाचुन मनाला खात्री होते कि अजुन वीररस संपला नाही. कविता प्रकाशित केल्याबद्द्ल खुप खुप आभार.
  • Log in or register to post comments

तडका उत्तम आहे... आवडेश...

मदनबाण
Sat, 08/06/2011 - 10:31 नवीन
तडका उत्तम आहे... :)
  • Log in or register to post comments

तुमच्या कवितेतिल 'अन' शब्दाने

सौन्दर्य
Sat, 08/06/2011 - 10:48 नवीन
तुमच्या कवितेतिल 'अन' शब्दाने फार परीणाम साधलाय, जस एखाद्याने घोषणा द्यावी अन अनुयायांनि त्याला साथ द्यावि तसे वाटते. तुम्ही 'अन' पर्यंत कविता म्हणावी आणि आम्ही तुमच्या 'अन' नंतर अन्यायाच्या माथी बुटाचा तडाखा द्यावा असे काहीसे वाटले. खूप दिवसांनी अशी विरश्रीपुर्ण कविता वाचायला मिळाली. सौन्दर्य
  • Log in or register to post comments

अन शब्दाचा परीणाम

गंगाधर मुटे
गुरुवार, 08/11/2011 - 10:42 नवीन
श्री प्रमोद देव यांनी चाल लावली, ती ऐकतांना तुमच्या म्हणण्याला स्पष्टपणे दुजोरा मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

दिवास्वप्न!!!

पिवळा डांबिस
Sat, 08/06/2011 - 11:43 नवीन
काव्यनायकाच्या पायात कुठला आलाय बूट? फाटकी चप्पल असली तरी संपत्तीची लयलूट!! खोट स्वतःमधली लपव आणि चल उठ हाण जगाच्या टाळक्यात, स्वप्नातला बूट!!!!!!
  • Log in or register to post comments

चप्पल

गंगाधर मुटे
Sat, 08/06/2011 - 12:59 नवीन
पायात चप्पल असेल तर बुटाऐवजी चप्पल मारायला हरकत नाही. पण चप्पल मारली म्हणून चारचौघात सांगणे पुरुषांना जमणार नाही. "जोडा मारला" असेच सांगावे लागेल. "चप्पल मारणे" या शब्दांवर महिलावर्गाची मोनोपली आहे ना? :) ------------------------------------------------------------------------------ इतरांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये असलेली खोट सुधारावी, ही थिअरी या कवितेतील आशयासंदर्भात अत्यंत निरुपयोगी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

आभार

गंगाधर मुटे
Sat, 08/06/2011 - 12:51 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे. :)
  • Log in or register to post comments

खुप छान!! मस्त

श्रीवेद
Sat, 08/06/2011 - 14:21 नवीन
खुप छान!! मस्त
  • Log in or register to post comments

नागपुरी तडका...

चित्रगुप्त
Sat, 08/06/2011 - 14:30 नवीन
हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका... आवडला.
  • Log in or register to post comments

श्री प्रमोद देव, मुंबई यांनी

गंगाधर मुटे
Mon, 08/08/2011 - 09:47 नवीन
श्री प्रमोद देव, मुंबई यांनी या गीताला जोशपूर्ण चाल लावली आहे. येथे ऐकता येईल.
  • Log in or register to post comments

मस्तं कविता आहे. जनतेनेच आता

llपुण्याचे पेशवेll
Mon, 08/08/2011 - 10:08 नवीन
मस्तं कविता आहे. जनतेनेच आता जाब विचारायची वेळ आली आहे. मग भले भारतात यादवी का माजेना. (अर्थात आता माजलेली नाही असे थोडीच आहे)
  • Log in or register to post comments

नेत्यांना इथल्या आता देउ नका

वपाडाव
गुरुवार, 08/11/2011 - 17:33 नवीन
नेत्यांना इथल्या आता देउ नका सुट.... पाडा आता त्यांच्यात दरीएवढी फुट.... संचारु दे अंगात क्रांतीचे भुत.... अन (हे फक्त आणी फक्त ठेक्यासाठी) हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट.... ------- वपाडाव (११-ऑगस्ट-२०११) ओतप्रोत वीररसाने भरलेली कविता..... मानगये..... सलाम...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा