Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 08/10/2011 - 13:49
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा
विरंगुळा
रात्रीचे १२ वाजायला आले असतील, बाहेर पावसाची रिपरिप चालू होतीच. आज बाहेर पाऊस असून देखील मला खिन्न खिन्न वाटत होते. खरेतर पावसाळा म्हणजे माझा आवडता ऋतू. आज नेहमीप्रमाणे कॅफे बंद झाल्यावर कावेरी मातेचे यथासांग दर्शन देखील झाले होते, त्यामुळे हा पाऊस आणि अंगावर येणारी मस्त हवा आवडायला काहीच हरकत नव्हती. पण का कोणास ठावुक आज मन लागत नव्हते येवढे खरे. अचानक रात्री १२ च्या सुमारास फोन वाजला. येवढ्या रात्री मला सहसा कोणाचा फोन येणे अशक्यच. त्यात जागा असल्याने दुसर्‍या रिंगलाच फोन उचलला. पलीकडून काही क्षण फक्त श्वासोच्छ्वासांचे आवाज ऐकू येत होते. "पप्पी?" मला पप्पी म्हणणारे आणि संपर्कात असणारे आता फार कमी उरले आहेत, अगदी बोटावर मोजण्याइतके. पप्पी अर्थात पॅपिलॉन हे नाव, ते नाव जिथे धुडगूस घालायचे ते विश्व आणि ते सोबती सोडून आत जमांना उलटला आहे. पॅपिलॉनचा परा होऊन आणि सरळ मार्गावर चालायला लागून बराच काळ लोटला आहे. "बोलतोय..." "पप्पी यार अपना गुमराह अल्लाह को प्यारा हो गया" पलीकडून अजून काही शब्द उच्चारले देखील असतील नसतील मी मात्र योग्य त्या शब्दांचा अर्थ लागताच सुन्न झालो होतो. टोटल ब्लॅंक ! गुमराह गेला ? कसे शक्य आहे ? "साला वो तुम्हारे पंडित लोगोंका चित्रगुप्त हमारे कौम का भी हिसाब लिखता है क्या ? उसको बोल ना के साले कंप्युटर यूज करना शुरु कर दे, तो मै उसके कंम्प्युटर मे भी घुसके अपना अकाउंट क्लिअर करू" म्हणणारा गुमराह गेला ? "सुन बे पंडित, मै मरुंगा तो इधर किधर कंम्प्युटर के पास बिजली का झटका लग के, या फीर किसी सरकार की गोली से" म्हणणारा गुमराह गेला.. "अबे तेरो को पढाई करके चष्मा लगा है या औरतो को घुरके?" विचारणारा गुमराह गेला.. अक्षरश: बातमी ऐकून बाहेरच्या पावसाला लाजवेल असा आठवणींचा पाऊस माझ्या अंगावर कोसळायला लागला. गुमराहची आणि माझी पहिली भेट झाली ती इंडोपाक चॅट चॅनेल मध्ये. मी नवीनं नवीनं कॅफे सुरू केला होता आणि दिवसभर टायपिंग, डेटा एंट्रीची किरकोळ कामे संपली की आम्ही एकलव्याच्या निष्ठेने वेगवेगळे फोरम पालथे घालत हॅकिंगचा अभ्यास करत होतो. थोड्याफार दिवसात माझ्या सारख्याच किंवा थोड्यास सीनिअर अशा अजून दोन चार हॅकर मित्रांशी ओळख झाली आणि मी खर्‍या अर्थाने ह्या हॅ़किंग विश्वाच्या एका कोपर्‍यात आत पाऊल टाकले. 'अमन की आशा' वगैरेचे फॅड निघाले देखील नव्हते तेव्हा काही भारतीय व पाकिस्तानी चाटर्सनी एकत्र येऊन इंडोपाक चाट चॅनेलचा घाट घातला. इतरांबरोबर मग मी देखील ह्या चॅनेलमध्ये दिवसभर पडीक राहू लागलो. चॅनेल सुरू झाला, चांगला प्रतिसाद देखील मिळायला लागला आणि अचानक एके शुक्रवारी चॅनेल हॅक झाला. कोणालाच चॅनेल मध्ये प्रवेश करता येईना, चॅनेल सांभाळायला ठेवलेले बॉट सुद्धा लाथ मारून चॅनेल बाहेर काढले गेले होते. चॅनेलचे ओनर आणि ऑपरेटर अथक प्रयत्न करत होते पण काही उपयोग होत नव्हता. आश्चर्य म्हणजे शनिवारी पुन्हा सर्व सुरळीत चालू झाले. पण हा आनंद फक्त पुढील गुरुवार पर्यंतच टिकला. शुक्रवारी पुन्हा चॅनेल हॅक....शनिवारी पुन्हा सर्व सुरळीत. शुक्रवारच्या निवडीवरून आपोआपच सर्व नजरा पाकिस्तानी चाटर्सकडे संशयाने वळल्या, मात्र आपलेही काही महाभाग शुक्रवारच्या आडून हे करत असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था झाली होती. आता चॅनेलचे सिक्युरिटी गार्डस जोमाने कामाला लागले होते, बॉटसची नव्याने बांधणी सुरू झाली होती, नव्या दमाच्या हॅकर्सना भरती करण्यात येत होते आणि त्यात आमचा नंबर पण लागला. काम असे विशेष काही नव्हते, बॉटच्या निकनेममधून लॉगईन करायचे आणि चॅनेलवरती नजर ठेवायची. पण आपल्या कामात काम ठेवणार्‍यातला मी थोडाच होतो ? बॉट मागे बसल्याने लोकांचे आयपी, त्यांचे जुने बॅन सगळे मला अगदी तपशीलवार दिसायचे. काही संशयितांच्या संगणकात परस्पर शिरून काही माहिती मिळते का बघण्याचा प्रयत्न मी सुरू केला, पण पहिल्याच प्रयत्नात तोंडावर पडलो. माझीच OS क्रॅश झाली आणि सर्वरचीच OS क्रॅश झाल्याने कॅफे दिवसभर बंद ठेवावा लागला तो वेगळाच. ह्यातून पहिला धडा मिळाला म्हणजे कुठलेही किडे करण्यासाठी सर्व्हरचा उपयोग करायचा नाही. आता प्रतीक्षा होती ती ह्या शुक्रवारी काय होते त्याची. चॅनेल अ‍ॅडमिन्सनी घेतलेल्या कष्टाला काही फळ मिळते का नाही ते ह्या शुक्रवारीच कळणार होते. शेवटी एकदाचा शुक्रवार उजाडला.. आणि गंमत म्हणजे काहीही न घडताच सुरळीत पार देखील पडला. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शनिवारी सकाळी चॅनेल अ‍ॅडमिन मध्ये एका नवीनं नावाची भर पडली होती 'गुमराह'. मला हे नाव तसे नवीनं होते पण रुळलेल्या लोकांना मात्र चांगलाच धक्का देणारे होते. सर्व ऑपरेटर्सना नवीनं नेमलेल्या अ‍ॅडमिनचा परिचय करून देणारा मेसेज पाठवण्यात आला होता. गेले काही शुक्रवार नियमितपणे चॅनेल हॅक करणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा गुमराहच होता आणि तो फक्त चॅनेल अ‍ॅडमिन्सना चॅनेलच्या सिक्युरिटी विषयी अजून सतर्क करत होता. चेन मेसेज मध्ये हा 'गुमराह' बर्‍याच जणांच्या ओळखीचा होता हे कळून आले. गंमत म्हणजे मेसेज मध्ये नाहीच पण त्यानंतर देखील कधीही मी कोणाला गुमारह बद्दल वाईट बोलताना कधीच पाहिले नाही. 'गुमराह' मुसलमान आहे ही सगळ्यांची खात्री होती, मात्र तो कुठला आहे काय करतो ह्या विषयी भल्या भल्यांना खबर नव्हती. सर्वांनी त्या मेसेज मध्ये 'गुमराह' चे अभिनंदन करून झाल्यावर सगळ्यात शेवटी सगळ्यांचे आभार मानणारा गुमराहचा मेसेज आला. त्यात सगळ्यांचे आभार मानून सर्वात शेवटी 'पप्पी लूं' ( हे माझ्या पॅपिलॉन नावाचे त्याने शेवटपर्यंत काढलेले वाभाडे) माझ्या संगणकात शिरल्याने मी घाबरून गुन्हा कबूल केला आणि प्रायश्चित्त म्हणून अ‍ॅडमिन झालो असे लिहिले होते. च्यायला ! म्हणजे माझ्या पहिल्याच प्रयत्नात मी शार्कलाच जाळ्यात पकडायला गेलो होतो तर. मला तो मेसेज वाचून भयानक लाजल्यासारखे झाले. माझ्या मेसेज मध्ये मी सगळ्यांसमोर गुमराहची माफी मागून मीच कसा तोंडावर पडलो हे अनिच्छेने कबूल करून मोकळा झालो. पुढचे दोन दिवस मी चॅनेल मध्ये फिरकलोच नाही. एक तर मला वाटत असलेली लाज आणि दुसरे म्हणजे बॉट मधून मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग केल्याने ऑपरेटर वरून लाथ तर मिळणार होतीच कदाचित चॅनेल मधून बॅन केले जाण्याची देखील भिती होतीच. पण व्यसने अशी सहजी सुटली तर काय हो... दोन दिवसांनी प्रॉक्सी वापरून दुसर्‍या निकनी आम्ही हळूच आजूबाजूचा माहौल चेक करायला चॅनेल मध्ये शिरलो. चॅनेल मध्ये शिरलो आणि "आजा पप्पी लूं" असा पहिलाच स्वागत मेसेज समोर आला आणि मी डोक्याला हात लावला. च्यायला हा गुमराह काय भूत आहे का काय ? का ह्याला कोणी कर्णपिशाच्च वगैरे वश आहे ? मनांतल्या मनात स्वतः ला चार शिव्या घातल्या आणि पुन्हा नेहमीच्या पॅपिलॉन निक मध्ये आलो. आश्चर्य म्हणजे ताबडतोब बॉटने मला ऑपरेटरचे साइन देऊन वर नेऊन बसवले. चला म्हणजे बॅन देखील झालेलो नाहीये आणि अजून ऑपरेटरदेखील आहे तर. थोड्यावेळाने प्रायव्हेट विंडो मध्ये गुमराहचा मेसेज दिसला आणि आमच्या हातपायाला पुन्हा घाम फुटला. काय करतो आता हा खवीस ? कुठून दुर्बुद्धी झाली आणि ह्याच्या शेपटीवर पाय दिला असे झाले. भितभितच मेसेज उघडला. "हॅलो पप्पी लूं , कैसा है पंडित ?" येवढाच मेसेज होता. "फाईन सर" येवढे लिहिले आणि मी पहिल्यांना तिथून पळ काढला. चाट करणारे सगळे हिंदू मग ते मद्रासी, मराठी, भय्ये कोणी असोत, ते ह्याच्यासाठी कायम पंडितच असायचे आणि इंडियातून चाट करणारे मुस्लिम म्हणजे 'कनिझ'. त्याचा भारतीय मुसलमानांवर का राग होता ते अल्लालाच माहिती पण तो कायम असा आवेशाने आणि तुच्छतेनेच त्यांच्याविषयी बोलायचा. दुसर्‍या दिवशी पुन्हा मी गेल्या गेल्या हा खवीस माझ्या मानगुटीवर बसलाच. त्याला माझ्याशी व्हॉईस चाट करायचे होते. आता आली पंचाईत ? पण शेवटी काय होईल ते होईल ठरवून मी त्याला माझ्या याहू आयडी दिला. याहूवर तर २४ तास पडीक असायचोच दूसर्‍या मिनिटाला गुमराह आयडीनेच फ़्रेंड रीक्वेस्ट आली आणि मी ती स्वीकारली. कॉल रिसिव्ह केला आणि एक गंभीर पण अतिशय शांत असा आवाज कानावर पडला 'सलाम पंडितजी.' मी खरेतर त्या आवाजाचे आज इतक्या वर्षांनी आणि इतक्या वेळा ऐकून देखील वर्णन करायला कायम कमीच पडत आलोय. काय असेल ते असेल पण त्याच्या आवाजात एक वेगळेपणा होता, ऐकत राहावे असा हुकुमी आवाज असायचा. थोड्या फार इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि खविसाने मुद्द्याला हात घातला. "पप्पी लूं तू मेरे डब्बे मे (डब्बा हा संगणकासाठीचा त्याचा आवडता शब्द) घुसने के लिये कौनसा फंडा ट्राय मारा?" इकडे आमच्या बोटांना कापरे आणी कपाळावरती घाम. "ऐवे ही कुछ कुछ ट्राय मारा. पुराना ट्रिगर मिला था हॅकर्स पॅरेडाइ़ज की वेबसाइटपे उसको ट्राय मारा थोडा मॉडिफाय करके." "दिखा जरा मेरे को उसका कोड." मी निमूटपणे कोड कॉपी पेस्ट केला. ५/१० मिनिटे गेली आणि तोच कोड पुन्हा त्याने मला पेस्ट केला. "सुनो पंडित अब ट्राय मारो." मी सगळी तयारी करून भितभितच पुन्हा ट्राय मारला आणि स्क्रीनवरती वेगळाच डेस्कटॉप समोर आला. येस येस ! मला जमले.. मी गुमराहच्या संगणकात शिरलो होतो. हा आनंद काही सेकंदच टिकला कारण पुढच्या क्षणी माझा संगणकच शट डाउन झाला. पुन्हा संगणक चालू करून याहू वरती आलो आणि गुमान गुमराहला कॉल लावला. "पंडित तेरे कोड मे गडबड थी मैने सुधार दी. लेकीन साला तेरा ट्रिगर डबल वे है. तू यहा घुसा तो उसी रास्तेसे मै भी वहा घुस सकता हूं" "तो आब ?" "ह्म्म्म्म चल कोइ नही, मै सिखा देता तुझे. सिखेगा दिल लगा के ?" गुमराहनी विचारले आणि मला स्वर्ग दोन बोटेच उरला. गुमराह कोण आहे, काय करतो कशाकशाचे भान उरले नाही आणि मी अक्षरश वाहवलो गेलो. मी क्षणार्धात "हो" म्हणालो आणि त्या क्षणापासून गुमराहनी माझा हात हातात धरून माझ्याकडून हॅकींगची ABCD गिरवून घ्यायला सुरुवात केली. हॅकींगचे एक अद्भुत विश्वच गुमराहनी माझ्यासाठी उघडे केले. मी देखील मन लावून शिकलो. ह्या काळात गुमराहची आणि माझी अगदी घट्ट मैत्री जमली, मात्र माझ्याजवळ आला तो जालावरचा गुमराहच. त्याचे खरे नाव, त्याचे काम, त्याचे कुटुंब कशाकशाचा त्याने मला कधी थांगपत्ता लागू दिला नाही. अर्थात त्याने देखील कधी माझी खाजगी चौकशी करण्याचा प्रयत्न केला नाही. कधी कधी तो माझ्याशी फोनवर देखील बोलायचा, मात्र कायम फोन करताना कटाक्षाने कॉलिंग कार्डचा वापर करायचा. गुमराहकडून मी त्याच्या भात्यात होती नव्हती ती सगळी अस्त्रे शिकत गेलो आणि हळूहळू गुमराह काय चीज आहे हे माझ्या लक्षात येत गेले. गुमराह म्हणजे अक्षरशः हॅकिंगचे विद्यापीठ होते. कुठल्याही मोठ्या कंपनीने त्याला हसत हसत डोळे झाकून आयटी चा सिक्युरिटी हेड म्हणून सहज नेमले असते. हा मात्र कायम जालावरच पडीक दिसायचा आणि नोकरी करणार्‍यांना 'क्या बे गधे? आज तेरा धोबी मॅनेजर ऑफिस मे नही है क्या?" असे चिडवताना दिसायचा. ह्याचा अर्थ हा नमुना नक्की नोकरी करत नसावा असा आपला माझा अंदाज होता. एका विशिष्ट टप्प्यावर गुमराहनी मला त्याच्या आंतरजालीय प्रॉपर्टीची ओळख करून दिली आणि मी बेशुद्धच पडायचा बाकी राहिलो. २ FTP, ३ वेबसाइट आणि २ ब्लॉगच्या साहाय्याने हा माणूस जगभरच्या संगणक वापरणार्‍यांवर अक्षरशः आपल्याकडचा खजिना रिकामा करत होता. संगणकात काही प्रॉब्लेम आहे ? , कुठले सॉफ्टवेअर हवे आहे? , कुठला कोड गंडला आहे?, हॅकिंग शिकायचे आहे? , व्हायरस हवे आहेत? सब मिलेगा... जिनी गुमराह के पास सब मिलेगा. HTML कोडस पासून ते त्सुनामी व्हायरस कोड पर्यंत आणि विनअँप पासून कटिया पर्यंत सर्व काही एका छताखाली ह्या अवलियाने उपलब्ध करून दिले होते. क्रॅक्स, सिरियल्स, मोर्स कोड, किजेन काय मिळत नव्हते ते विचारा. आणि हा पंटर हे सगळे एक हाती सांभाळत होता. गुमराहला प्रवासाचे, भटकंती करण्याचे फार आकर्षण होते. कार्स बाइक मधले त्याचे ज्ञान तर तोंडात बोटे घालायला लावणारे असायचे. दर दोन महिन्यांनी तो पॅरिस, अबुधाबी, चायना सारख्या कुठल्या ना कुठल्या सहलीला निघालेला असायचा आणि दर आठेक महिन्यांनी जुनी बाइक किंवा गाडी बदलून नवी दिमतीला हजर झालेली असायची. मग पुढचे १५ दिवस ह्या बाइकचे किंवा सहलीचे वर्णन ऐकवण्यात त्याचे खर्ची व्हायचे. गुमराहचे आणि माझे सूर कसे काय जुळले काय माहिती पण तो माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवायचा हे मात्र खरे. मी देखील त्याच्या विषयी प्रचंड आदर बाळगून होतो आणि अजूनही आहे. आज मी जे काय ज्ञान मिळवले आहे त्यात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर गुमराहचा. गुमराहच्या तालमीत मी आता चांगलाच तयार झालो होतो. 'ह्या गुमराहला काही तरी मस्त गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे राव' असे मनातल्या मनात म्हणत असतानाच गुमराहने माझ्यावरती बाँब टाकला. एकेदिवशी सकाळी सकाळी गुमराहचा फोन आला. "पंडित तेरे मेरे जॉइंट याहू अकाउंटपे मैने मेरे सारे खजाने के पासवर्डस TXT मे लीख के रखे है, उसको लिट फाँट मे कन्व्हर्ट कर और फीर साले सारी जायदाद तेरी. और सून तय्यब को पेहचानता है ना? किसी को बोल मत लेकीन मेरा भांजा है वो. कोई भी मुसिबत हो तो उसके पास बोल दे." "क्यूं ? सरकार आ गयी क्या आपको गोली मारने?" मी गमतीने विचारले. "अल्ला हाफिज" बस्स येवढेच बोलून काही न बोलता गुमराहनी फोन ठेवून दिला. मला कल्पना पण नव्हती की हे माझे आणि गुमराहचे शेवटचे संभाषण असेल. त्या फोन कॉल नंतर गुमराह जो गायब झाला तो झालाच, पुन्हा कधी न दिसण्यासाठी. कोणी म्हणायचे त्याला पाकिस्तान सरकाराने अमेरिकेसाठी हेरगिरी करताना पकडले, कोणी म्हणायचे त्याला अमेरिकेने पकडून नेले तर कोणी म्हणायचे तो अल-कायदाला जोडला गेलाय. खरे खोटे कधी कळलेच नाही पण गुमराह नाहीसा झाला किंवा केला गेला हे सत्य मात्र उरलेच. खरे सांगायचे तर ह्या अफवा होत्या का सत्यकथा माहिती नाही पण मला तय्यबला काँटेक्ट करण्याचे धाडस झाले नाही हे मात्र खरे. अनेकदा मी त्याला मेसेज करायचा ठरवायचो आणि ऐनवेळी कच खायचो. काही महिन्यात तैय्यब देखील ऑनलाईन येईनासा झाला आणि गुमराहशी जोडणारा अदृश्य धागा देखील तुटला. आणि आज इतक्या वर्षांनी हा तय्यब मला फोन करून सांगतो आहे की गुमराह गेला. तो मेल्याचे ज्या बाहेरच्यांचा कळवले जावे असे त्याची इच्छा होती त्यातला मी एकमेव होतो म्हणे. रात्र अक्षरशः सरता सरली नाही. सकाळी पुन्हा नंबर चेक केला तर तय्यबनी आपल्या मोबाईलवरूनच फोन केला होता. मी ताबडतोब त्याचा नंबर डायल केला, मला काय झाले कसे झाले सगळे सगळे जाणून घ्यायचे होते. रात्री जे बोलता आले नाही ते सगळे बोलायचे होते. पण खरे सांगू, मी तय्यबला कॉल करायला नको होता. निदान माझ्या मनात मी ज्या मनमौजी गुमराहचे चित्र रंगवले होते तो जन्मापासून दोन्ही पायांनी पांगळा होता आणि शेवटी कॅन्सरचा घास होऊन मेला हे तरी मला कळाले नसते आणि माझ्या चित्रातले रंग उडून गेले नसते.
  • Log in or register to post comments
  • 11410 views

प्रतिक्रिया

Submitted by स्वाती दिनेश on Wed, 08/10/2011 - 13:59

Permalink

मस्त..

शेवटी एकदम वेगळे वळण... ही गोष्ट आवडलीच पण भन्नाट ७ कधी? स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 08/10/2011 - 14:08

In reply to मस्त.. by स्वाती दिनेश

Permalink

येस्स. हे चांगले होते. पण

येस्स. हे चांगले होते. पण भन्नाट ७ कधी?
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 08/10/2011 - 13:59

Permalink

अत्यंत संयत असे

अत्यंत संयत असे व्यक्तीचित्रण.... आवडले...
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 08/10/2011 - 14:03

Permalink

.

................ अप्रतिम ...................
  • Log in or register to post comments

Submitted by नन्दादीप on Wed, 08/10/2011 - 15:25

In reply to . by स्पा

Permalink

.

+१
  • Log in or register to post comments

Submitted by Mrunalini on Wed, 08/10/2011 - 14:04

Permalink

खुप छान लिहले आहे... आवडले.

खुप छान लिहले आहे... आवडले. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on Wed, 08/10/2011 - 14:06

Permalink

पराशेठ,

"___/\___" मस्त लिखाण! आवल्डे. अवांतर - ते या विषयीचे (हॅकिंग) शिल्लक लिखाणही पूर्ण करा हो! तुमचा फ्याण -
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Wed, 08/10/2011 - 14:06

Permalink

ज ब रा - एक्दम सुन्न !!!

ज ब रा - एक्दम सुन्न !!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 08/10/2011 - 14:31

In reply to ज ब रा - एक्दम सुन्न !!! by माझीही शॅम्पेन

Permalink

शॅम्पेनशी सहमत

+१
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 08/10/2011 - 14:06

Permalink

मस्त ...

नेहमीसारखेच ... मस्त ! - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by शाहिर on Wed, 08/10/2011 - 14:14

Permalink

छान !!

मस्त जमुन आला आहे !! कला आहे भौ च्या हातामन्दी !!
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 08/10/2011 - 14:17

Permalink

लई भारी रे परा, मजा आली. एकदा

लई भारी रे परा, मजा आली. एकदा भेटायला पाहिजे या पॅपिलॉनला,
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीराम गावडे on Wed, 08/10/2011 - 14:25

Permalink

वाचताना एकदम गुंगलो रे. छान.

वाचताना एकदम गुंगलो रे. छान.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 08/10/2011 - 14:27

Permalink

:)

तरी म्हटल इतकी धुळवड चालु असताना हा गप्प कसा? हे लिखाण चालु होत होय. :) आवडेल हे वेगळ सांगायला नकोच. :)
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Wed, 08/10/2011 - 14:36

Permalink

बेष्ट व्यक्तीचित्र

उभे केले आहे परासाहेब! आवडले. गुमराहसारखी भली माणसे आतून जळत असतात हा एक नेहमीचा अनुभव. समीर
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 08/10/2011 - 14:43

Permalink

हलकटा,

कोणी गेल्यावरच लिहायचं असता का? तांत्रीक काही कळत नाही. पण हा प्रकार आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 08/10/2011 - 14:43

Permalink

लई भारी रे परा, मजा आली. एकदा

लई भारी रे परा, मजा आली. एकदा भेटायला पाहिजे या पॅपिलॉनला,
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 08/10/2011 - 14:44

Permalink

मस्त!

मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 08/10/2011 - 19:27

In reply to मस्त! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

+१

मस्त!!
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 08/10/2011 - 14:47

Permalink

सुंदर आणि प्रवाही लेखन !!!

सुंदर आणि प्रवाही लेखन !!! एकदा वाचायला सुरुवात केली ते संपवूनच थांबलो. शेवटचा परिच्छेद तर भारीच आहे. पुलेशु.
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Wed, 08/10/2011 - 14:51

Permalink

मस्त

छान लिहिले आहेस. पण शेवट चटका लावून गेला. हॅकिंग वरही लेख/लेखमाला येवू दे.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Wed, 08/10/2011 - 15:03

Permalink

बेचैन करणारे लेखन !

बेचैन करणारे लेखन !
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Wed, 08/10/2011 - 15:15

Permalink

सुंदर लिहिलय. आवडले.

सुंदर लिहिलय. आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Wed, 08/10/2011 - 15:27

Permalink

दंडवत!

कमालीचं लिहिलंस परा!
  • Log in or register to post comments

Submitted by इष्टुर फाकडा on Wed, 08/10/2011 - 15:30

Permalink

अप्रतिम !!!!

अप्रतिम !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Wed, 08/10/2011 - 15:32

Permalink

परास्त्र सुटले

परास्त्र सुटले एकदाचे. आवडले.हा वाचकाला नेहमीच त्याच्या लिखाणात गुंतवून ठेवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Wed, 08/10/2011 - 15:49

Permalink

निदान माझ्या मनात मी ज्या

निदान माझ्या मनात मी ज्या मनमौजी गुमराहचे चित्र रंगवले होते तो जन्मापासून दोन्ही पायांनी पांगळा होता आणि शेवटी कॅन्सरचा घास होऊन मेला हे तरी मला कळाले नसते आणि माझ्या चित्रातले रंग उडून गेले नसते.
टाळ्या!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Wed, 08/10/2011 - 15:56

Permalink

जबरदस्त व्यक्तीचित्रण..!!

जबरदस्त व्यक्तीचित्रण..!! शेवटच्या पॅरामध्ये एकदम कलाटणीच.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 08/10/2011 - 16:15

Permalink

सुंदर !!! शेवट वाचून सुन्न

सुंदर !!! शेवट वाचून सुन्न झालं मन...
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Wed, 08/10/2011 - 16:17

Permalink

खुप छान.. गुंगवुन ठेवणारे

खुप छान.. गुंगवुन ठेवणारे लेखण..
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 08/10/2011 - 16:22

Permalink

भारी

तेवढा आय टी स्पेशलिस्ट फॉर्च्युन टेलर कडून पत्रिका बघत असता तर असा खपला नसता 'ल्युनॅटिक'! तू पण एकदा भ्रमणध्वनी कुठल्या वेळी वापरायचे याचे अमेरिकन सॉफ्टवेअर मधुन कोष्टक बनवुन घे. वेळ सांगून येत नाही. अर्थात फोन कॉल्स मधे सात दिवसांची एरर येउ शकते. सह्जोपंत बघुत्सु!
  • Log in or register to post comments

Submitted by dev on Wed, 08/10/2011 - 16:24

Permalink

एक नंबर रे परा..

एक नंबर रे परा.. वाचताना मागे मॅनेजर उभा होता. समजल पण नाही....इतका गुंगलो होता...
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजक्ता पवार on Wed, 08/10/2011 - 16:50

Permalink

मस्तं ...

लिखाण आवडले .
  • Log in or register to post comments

Submitted by चिर्कुट on Wed, 08/10/2011 - 17:07

Permalink

बापरे..

जबरा शेवट आहे.. ओ परासाहेब, ही सत्यकथा आहे का? आपण खरं काय लिहिता आणि काल्पनिक काय लिहिता काही कळत नाही.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 08/10/2011 - 17:10

Permalink

आवडल्या गेले आहे, शेवट मात्र

आवडल्या गेले आहे, शेवट मात्र सुन्न करणारा होता.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Wed, 08/10/2011 - 17:11

Permalink

झकास

.
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on Wed, 08/10/2011 - 17:17

Permalink

हि सत्यकथा आहे?

हो ...म्हणा प्लीझ...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Wed, 08/10/2011 - 17:59

Permalink

परा मस्तच होत हे...

परा मस्तच होत हे... भन्नाटच्या प्रतिक्शेत
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 08/10/2011 - 17:59

Permalink

जबरा

जबरा रे परा. ओघवते लिखाण.
  • Log in or register to post comments

Submitted by आचारी on Wed, 08/10/2011 - 18:02

Permalink

कथा १ नम्बर

कथा १ नम्बर आहे.............!!
  • Log in or register to post comments

Submitted by आचारी on Wed, 08/10/2011 - 18:03

Permalink

कथा १ नम्बर

कथा १ नम्बर आहे.............!!
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Wed, 08/10/2011 - 18:07

Permalink

नेहमीप्रमाणे उत्तम जमलीये

नेहमीप्रमाणे उत्तम जमलीये कथा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुमो on Wed, 08/10/2011 - 18:15

Permalink

सुरेख लेखन.

अतिशय आवडलं व्यक्तिचित्रण.
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Wed, 08/10/2011 - 18:28

Permalink

.

सुपरलाईक केले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Wed, 08/10/2011 - 20:56

In reply to . by आदिजोशी

Permalink

+१

सुपर लाईक केले आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Wed, 08/10/2011 - 19:18

Permalink

छान

छान लेख. आवडला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चेन्गट बबन्या on Wed, 08/10/2011 - 20:32

Permalink

नेहमी प्रमाणे सुन्दर

आतिशय छान चित्रण....
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Wed, 08/10/2011 - 20:34

Permalink

खूपच छान.. शेवटचा परिच्छेद

खूपच छान.. शेवटचा परिच्छेद चटका लाऊन गेला.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Wed, 08/10/2011 - 20:36

Permalink

हृदयस्पर्शी....

हृदयस्पर्शी लेखन.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Wed, 08/10/2011 - 21:05

Permalink

लिखाण

लिखाण आवडले. "ट्विस्ट इन द टेल" रोचक आहेच; परंतु त्यापेक्षा हॅकर्स च्या दुनियेत घडवून आणलेली चक्कर विशेष आवडली.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com