✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं -

अ — अमोल केळकर, Wed, 08/10/2011 - 10:25
( मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं ) चाल : माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं, गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं मुंबैच्या दर्यामंदी साचले काळं पानी खुपते दृश्य सारं, किनारा पाहुनी कोळंबी,बांगडा धोक्यात जीवं येतं कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं बुडली फुटली, बुडली फुटली बुडली गं ! नावेची सागरात, जोरात धडक होई एमेसी चित्रा हंसा, बुडूनी त्यात जाई 'रेसक्यू ऑप्रेशन' नेहमीच फेल होतं कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं बुडली फुटली, बुडली फुटली बुडली गं ! फसतो कोळीराया, नियम आड येतं वल्हवू नौका कशी, सागरी पिक जातं पुनवेचा सण येतो, उदास मनं होतं कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मुळ गाणे - माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं दादाच्या मळ्यामंदी, मोटंचं मोटं पानी पाजिते रान सारं, मायेची वयनी हसत डुलत, मोत्याचं पीक येतं गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी गं सावळा बंधूराया, साजिरी वयनी बाई गोजिरी शिरपा हंसा, माहेरी माज्या हाई वाटेनं माहेराच्या धावत मन जातं गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी गं राबतो भाऊराया, मातीचं झालं सोनं नजर काढू कशी, जीवाचं लिंबलोनं मायेला पूर येतो, पारुचं मन गातं गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं

प्रतिक्रिया द्या
1579 वाचन

💬 प्रतिसाद (3)

छान! छान!

प्रास
Wed, 08/10/2011 - 15:26 नवीन
.
  • Log in or register to post comments

मस्त च रे....

कुंदन
Wed, 08/10/2011 - 16:00 नवीन
जहाजे बुडण्यामागे पौर्णिमा-अमावस्येला येणारी भरती/ओहोटी कारणीभुत असावी का?
  • Log in or register to post comments

जुजुत्सू

प्रास
Wed, 08/10/2011 - 16:05 नवीन
कॉलिंग जुजुत्सू..... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा