मिक्स व्हेज फ्रित्ताता | Mix di verdure Frittata
नमस्कार मंडळी.
आज बर्याच (मोठ्या) कालावधीनंतर पाकृ टाकत आहे. लिहण्याची प्रेरणा - सहज, गणपा, धमाल शेठ :)
आज आपल्या समोर पेश आहे इटालियन ऑम्लेट - मिक्स व्हेज फ्रीत्ताता - Mix di verdure Frittata. मस्त रविवार सकाळ असावी. एकदम निवांतपणा असावा. सावकाश पेपर वाचत वाचत फ्रित्ताता चा आनंद घ्यावा. मग एखादा कप कॉफीचा. थोडा वेळ टि.व्ही. पुढे. दुपारची झोप. क्या बात है!
चला तर मग....
फ्रित्ताता ह्या प्रकारात अंड्याबरोबर भाज्या (मश्रुम्स, सिमला मिरची, ब्रोकोली, अस्पॅरॅगस, टोमॅटो, कांदा, बटाटा ई.ई.) , मांस (सॉसेजेस, बेकन, हॅम, कोळंबी ई.ई.) , चीझ (रीकोटा, पामेजन ई.ई.), हर्ब्स (ओरेगॅनो, सेज ई.ई.) अश्या विवीध सामग्री वापरुन ऑम्लेट बनवले जाते. ह्या प्रकारात अंड्याचा तळ व्यवस्थित जमु दिला जातो. आणी ऑम्लेट पलटण्याऐवजी ओव्हन मधे थोड्या वेळ बेक केले जाते. मी बेक करण्याची कृती वगळली आहे.
साहित्यः
अंडी - ३ मध्यम आकाराची
बटाटा - १ मध्यम आकाराचा
टोमॅटो - १ मध्यम आकाराचा
कांदा - १ मध्यम आकाराचा
शेपु - २ टेबल स्पुन (चिरुन)
मिरची - १ लाल मिरची (आवडीप्रमाणे)
लसुण - ४/५ पाकळ्या
पार्मेजान चीझ - २/३ टेबल स्पुन (आवडीप्रमाणे)
मीठ - चवीपुरते
ऑलिव्ह ऑईल - १-२ टेबल स्पुन
कुकिंग बटर - १-२ टेबल स्पुन
कृती:
१. बटाट्याचे चार काप करुन घ्यावेत,
२. मीठ टाकलेल्या पाण्यात बटाट्याचे काप थोडे उकडुन घ्यावेत (१०-१५ मिनीटे)
३. मश्रुम्स, टोमॅटो, कांदा ह्यांचे बारीक काप करुन घ्यावेत.
४. लाल मिरचीचे एकदम पातळ काप करुन घ्यावेत (कात्रीने सोपे पडतात)
५. शेपु बारीक चिरुन घ्यावा.
६. उकडलेल्या बटाट्याचे बारीक काप करुन घ्यावेत (शक्यतो सालासकट)
७.एका पॅन मधे ऑलीव्ह ऑईल गरम करुन त्यात १ टेबल् स्पुन कुकींग बटर घालावे.
८. बटाट्याचे काप सोनेरी होउ पर्यंत परतुन घ्यावेत
९. बटाटे बाजुला काढुन कांदा परतायला ठेवावा
१०. कांदा परतला गेल्यावर मश्रुम्सचे काप टाकावेत.
११. मश्रुम्स मऊ झाल्यावर टोमॅटो टाकावा.
१२. टोमॅटो परतला गेल्यावर परतलेला बटाटा, बारीक चिरलेला लसुन, मिरची, शेपु टाकावेत आणी चवीपुरते मीठ घालावे
१३. सगळे मिश्रण एका पातळीत पसरुन घ्यावे
१४. अंडी फोडुन अगदी हलकेच मिक्स करुन घ्यावीत आणी पॅन मधील मिश्रणावर हळुवार ओतावे
१५. वरुन थोडा शेपु, मिरचीवे तुकडे आणी किसलेले चीझ भुरकावे
१६. अंडे थोडे व्यवस्थित बसले आणी चीझ थोडे विरघळले की पॅन झाकुन घ्यावी
१७. साधारणपणे ५-६ मिनीटात ऑम्लेट तयार होते.
फोटू काढत असतांना कन्यारत्नांने ताव मारायला सुरुवात केली :)
बघता बघता संपले देखील!
मंडळी तेव्हा तयारीला लागा. आपण काही बदल केले तर नक्की कळवा!
चाओ!

वाचने
12582
वाचनखूण
प्रतिक्रिया
45
सही
** %%%% $$ @
पांथस्ता छानच रे.
य्म्म्म्मी !!
जबरदस्त
झँ ट्यॅ मॅ टि क !!!!!
In reply to झँ ट्यॅ मॅ टि क !!!!! by गणपा
बास का!
खल्लास.. खपलो !!! असेच फोटो
फोटो मस्तच..
_/\__/\__/\_
जबरदस्त एकदम.
भूक लागली.
In reply to भूक लागली. by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१ सहमत
In reply to +१ सहमत by वेताळ
धन्यवाद!
!
अहाहा !!
वा!
In reply to वा! by बहुगुणी
ती ४थ्या फोटोतली कात्री कसली
In reply to वा! by बहुगुणी
किचन सिझरच म्हणतात तिलाही.
In reply to किचन सिझरच म्हणतात तिलाही. by मस्त कलंदर
ओपनर ? बर बर आम्ही अक्रोड
In reply to किचन सिझरच म्हणतात तिलाही. by मस्त कलंदर
ओपनऽऽर???
In reply to ओपनऽऽर??? by धमाल मुलगा
अरे ढ लोकांनो, हे सॉस,
In reply to अरे ढ लोकांनो, हे सॉस, by मस्त कलंदर
?
मस्त रेसिपी श्रावणानंतर ट्राय
जबरी १ नम्बर !
In reply to जबरी १ नम्बर ! by पियुशा
आयला.... काय जळवतात हे
In reply to आयला.... काय जळवतात हे by स्पा
आधी एकतर एकेकटे करून खाणार..
स्वागत
है शाब्बास!!!!
In reply to है शाब्बास!!!! by धमाल मुलगा
नेकी और पुछ पुछ...
In reply to नेकी और पुछ पुछ... by सोत्रि
आमेऽऽन!
द्विरुक्तीमुळे..
व्वा !!!!!
कूल
छान !!
भारी हो (गणपा)गुरु के गुरु!!
धन्यवाद!
दाद्या, तुच जिंकलायस !
वेलकम ब्यॅक!! पांथस्थ इज
जबरदस्त आता चातुर्मास संपायचि
वा !
करून पाहिला
मस्तच कि ओ... तोंपासु..
जबरी आहेत फोटो आणि पाककृती!
जबरी आहेत फोटो आणि पाककृती...