मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पातोळ्या.

ज्योति प्रकाश · · पाककृती
आज नागपंचमी.श्रावणातील पहिला सण.नागोबाची पूजा झाली. नैवेद्याला अळुची भाजी व पातोळ्या महत्वाच्या. मागे मी पातोळ्याची कृती दिली होती.पण बर्‍याच जणांनी फोटो न टाकल्यामुळे प्रतिसाद दिला नव्हता. तेव्हा आज पातोळ्याचा फोटो. गणपाभौना एक विनंती.मला या पाककृतीचा 'दुवा' द्यायला येत नाही.तेव्हडा द्याल कां?.

वाचने 7618 वाचनखूण प्रतिक्रिया 18

गणपा गुरुवार, 08/04/2011 - 16:24
ज्योति ताईंची पातोळ्यांचीपाककृती. साहित्यः-१)हळदीची पाने ७ ते ८. २)२ वाट्या तान्दुळाची पिठी . ३)३ वाट्या ओले किसलेले खोबरे. ४)१ ते दीड वाटीकिसलेला गुळ. ५)चिमुटभर वेलचीपुड. ६)मिठ चविनुसार. ७)थोडे तेल. कृती:-१)प्रथम किसलेले खोबरे व गुळ एकत्र करुन त्यात थोडे मिठ घालुन शिजवुन घ्यावे. गुळ विरघळला व थोडे सुकले कि सारण झाले म्हणुन समजावे. २)एका भान्ड्यात २ वाट्या पाणी घेवुन त्यात थोडे मिठ व एक चमचा तेल घालुन उकळत ठेवावे. पाणी उकळले की त्यात तान्दुळाची पिठी घालवी.आच बारिक ठेवावी.व ढवळुन झाकण ठेवावे. २ मिनिटानी आच बन्द करावी्. ह्याला उकड काढणे म्हणतात. ३)५ मिनिटानी एका परातीत उकड काढुन घेणे.त्यातील थोडी उकड घेउन त्यावर पाण्याचा हबका मारावा व चान्गले मळुन घ्यावे.तेलाचा हात लाउन परत मळुन घ्यावे. ४)हळदीचे एक पान घेउन त्याला तेल लावणे.व त्यावर मळलेल्या पिठाचा गोळा घेउन पानभर पातळ थापावा. ५)नन्तर त्यावर तयार केलेले सारण पसरावे.व पान दुमडून निट बन्द करावे. सगळया पातोळ्या तयार झाल्यावर कुकरमध्ये जाळीच्या चाळणीत शिट्टी काढून २० मिनिटे शिजत ठेवावे. खाताना हळदीचे पान काढ्ण्याचे भान ठेवावे.छान तुपाची धार घालुन ताव मारायला सुरुवात करायची. आमच्याकडे हा प्रकार हरितालिका व नागपन्चमीला करतात.

Mrunalini गुरुवार, 08/04/2011 - 16:30
मस्तच.... तोंडाला पाणी सुटले... :) ह्याची पण चव मोदकांसारखीच लागत असेल ना??? कारण फक्त आकार आणि हळदीचे पान एवढाच फरक आहे... कि अजुन काही वेगळे आहे???

In reply to by Mrunalini

पल्लवी गुरुवार, 08/04/2011 - 16:40
पातोल्यांना हळ्दीच्या पानांचा स्वाद येतो मस्तपैकी. फारा दिवसांपुर्वी खाल्लेले आणि ते आवडलेले आठवते. पाकृ छान.

In reply to by Mrunalini

मेघवेडा गुरुवार, 08/04/2011 - 17:41
मोदकांनाही हळदीची पानं असतात की! यांना उकडीच्या करंज्या म्हणा हवं तर! झकास पाकृ! टिपिकल कोकणी..! :) पातोळ्यांच्या आणि त्याला लागून मोदकांच्या आठवणीनं कधी एकदा घरी पोहोचतोय असं झालं!

विनायक प्रभू गुरुवार, 08/04/2011 - 16:34
पातोळ्या म्हणजे कोकनी एथिनीक डिश. सकाळी नागपुजा झाल्यावर नाश्त्याला खायला मिळते.