Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शरदिनी on Sun, 07/31/2011 - 14:01
बावळे बुडाले धामी //एक // धडक उजागर पत्र अर्पणी गर्भवतीचे प्राक्तन चरणी माजघरातील संथ कीर्तनी हंबरले बावळेच सदनी //दोन// सप्त चरदरी भर्जर घाता चंदनरजनी विशिल्पवस्त्रा सर्जनशोधा मोडीत काढा त्रिकोणमुक्रर मृदंगढोला //तीन// भंगअपेक्षा भाळशेंदरी उपेक्षितांची उकल हावरी गोंदणनक्षी पत्तनसाक्षी निर्मितक्रीडा घायलवक्षी कोडीकलेजी प्रयासबोटा फसगत निबिडा हिरवीपर्वा अन्वयव्यर्था कशास शोधा कविताजखमी अलभ्यबाधा //चार// स्वीकृततारण पिंजणपाशी आकंठलसलस निर्मितदेशी अवतरणातून आत्ममैथुनी भोगभोगितो अनुभवकवनी बावळे बुडाले धामी शरदिनी ३१ जुलै २०११ पुणे

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 07/31/2011 - 14:03

Permalink

प्रतिक्रिया येतीलच... आमची ही

प्रतिक्रिया येतीलच... आमची ही नुसतीच पोच!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 07/31/2011 - 14:15

In reply to प्रतिक्रिया येतीलच... आमची ही by बिपिन कार्यकर्ते

Permalink

आमचीही पोच.

भंगअपेक्षा भाळशेंदरी उपेक्षितांची उकल हावरी गोंदणनक्षी पत्तनसाक्षी निर्मितक्रीडा घायलवक्षी या ओळी वाचून डोळ्यात पाणी आले. बाकी, काव्याचे जाणकार रसग्रहण करतीलच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by शरदिनी on Sun, 07/31/2011 - 14:19

Permalink

http://maharashtratimes.india

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9425428.cms
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on Sun, 07/31/2011 - 14:37

In reply to http://maharashtratimes.india by शरदिनी

Permalink

शरदिनी तै,

साष्टांग ___/\___ स्विकारावा....
  • Log in or register to post comments

Submitted by मी_ओंकार on Mon, 08/01/2011 - 00:41

In reply to http://maharashtratimes.india by शरदिनी

Permalink

जबरदस्त

एकदम शीघ्र काव्य. चहा पिताना हा लेख वाचला तेव्हा त्यातला जो शब्द वाचून मिसळपाव आठवले तो शब्द अखेरच्या कडव्यात पाहून डोळे पाणावले. बादवे तुम्ही केव्हा वाचलात? - ओंकार.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sat, 08/06/2011 - 08:02

In reply to http://maharashtratimes.india by शरदिनी

Permalink

_/\_ अशीच इतर कवितांचीही उकल

_/\_ अशीच इतर कवितांचीही उकल करावी अशी शरदिनींच्या चरणी नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sun, 07/31/2011 - 16:19

Permalink

प्रसंग

ह्या कवितेतील व्यक्ती आणि प्रसंग कोणते?
  • Log in or register to post comments
Profile picture for user वसईचे किल्लेदार

Submitted by वसईचे किल्लेदार on Sun, 07/31/2011 - 17:01

Permalink

डोळे पाणावले ... आतापर्यन्त

डोळे पाणावले ... आतापर्यन्त मी स्वताला (ऊगाचच) आपला तो हा समजत होतो ... काव्याचा जाणकार हो
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sun, 07/31/2011 - 19:56

Permalink

शेवटी

गटारीने शरदिनीचाही घात केला तर! ;) -रंगशरद
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 08/01/2011 - 13:18

Permalink

लेखाच्या नोट्स

ही चंदफुलांची नक्षी वक्षी उजागरघात ग्रेस. गर्भवान, मनाच्या माजघरातच या काव्य उदयाच्या प्राक्तन ;.... हंबरतो :........ कावळे उडाले स्वामी. . कारण धुके पडलेल्या चांदणरात्री जंगलाच्या मधोमध असलेल्या पटांगणात असावे एखादे विवस्त्र शिल्प,खोल उरातले सगळे सगळे विवस्त्र होत फक्त आपल्या भर्जरी शब्दांच्या अन् प्रतिमांच्या सातपदरी मखमली पडद्याचे अडसर मध्ये घालतो. सर्जनाचे सर्ग, आत्मशोधाचे अध्याय किंवा निमिर्तीव्यवस्थेचे नादव्यूह ग्रेसच्या शब्दाआड, त्या सातपदरी मखमली पडद्याआड . आत्मशोधाचे अध्याय, सर्जनाचे सर्ग आणि निमिर्तीव्यवस्थेचे नादव्यूह अर्थनिश्चिती संस्कृतीच्या अस्तित्वाच्याच घटना होतात. प्रातिभ आकलनाची आणि संभवाची कथानके होतात. सर्जनशोधाचे मैलाचे दगड होतात. , ग्रेस भाषा आकांतबावरा सृजनपवित्रा' किंवा 'आकांतविभोर सृजनपेच' बेचैनीची अस्वस्थता कपाळशूळ मुक्रर त्रिकोणातला मृदंगतोल.' सर्जनाने सर्जनाशी केलेल्या संवादाचे साक्षीदार कोडी सोडवणे ग्रेसच्या 'कावळे उडाले स्वामी'मधल्या ललितलेखांमध्ये अंगभर बिंदी, मेखला लावण्यवतीच्या वक्षावरील गोंदणे अन् नक्षी तसेच रेतीतील पाऊलखुणांसारखे. निमिर्तीप्रक्रियेशी केलेली क्रीडा उपोद्घातही नव्हेत आणि उपसंहारही काळिजकोडी ग्रेसचे बोट प्रयासहीनिबिडात शिरलेला हिरवा अंधारही ., फसगत ' निमिर्तीच्या अनुभूतींचा मूलाकार पिंजणीच्या पाशात पिंजणीतून ढगपिंजणीसारख्या प्रतिमांचे मायावी गुंजन ' निर्माणाच्या सुखदु:खाचे पेच निमिर्तीप्रक्रियेसंबंधीच्या सलसत तारणस्वीकार पेच प्रदेशातल्या अनुभूतींचा मूलाकार. पिंजण . त्या लसलसणाऱ्या जीवनानुभवांची गद्यसदृश, पण निखळ गद्य नसलेली मनस्वी पुनर्मांडणीच उपभोक्ता या प्रक्रियेचा, या आत्ममैथुनाचे... आणि आत्ममैथुन म्हणजे काही स्वमैथुन नव्हे. भोगायची असते ग्रेसची कविता. सौंदर्यानुभवाचे अवतरण? कावळे उडाले स्वामी
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 08/01/2011 - 13:26

Permalink

आ हा हा हा निशब्द.... शरदिनी

आ हा हा हा निशब्द.... शरदिनी अग पुण्यात आल्यावर भेटणार होतीस ना? काय झाले त्याचे ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 08/01/2011 - 13:41

In reply to आ हा हा हा निशब्द.... शरदिनी by परिकथेतील राजकुमार

Permalink

हाहाहाहा

हाहाहाहा... आजूबाजूला पाहून घे अशी चौकशी करण्यापूर्वी. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 08/01/2011 - 21:12

In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक

Permalink

हा हा हा!

अहो श्रामो, आजूबाजूला पाहून शेवटी त्याने चौकशी केली असणार आहे! होय की नै रे परा? ;) -दाये बाये रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 08/01/2011 - 13:32

Permalink

ग्रेस........ची ग्रेस आठवली.

ग्रेस........ची ग्रेस आठवली. हम्म.कालेज्यात आस्ताना आपल्या ग्रेस कळ्तोय असे भासवायला मज्जा यैची. आता ग्रेस कळ्ळा असे कोणी म्हणाला की त्याची दया येते.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Mon, 08/01/2011 - 21:07

In reply to ग्रेस........ची ग्रेस आठवली. by विजुभाऊ

Permalink

वा

हम्म.कालेज्यात आस्ताना आपल्या ग्रेस कळ्तोय असे भासवायला मज्जा यैची. अच्छा, म्हणजे ही सवय तेव्हापासून आहे तर. ;) आता ग्रेस कळ्ळा असे कोणी म्हणाला की त्याची दया येते. तुम्हाला समजला नसेल पण इतर कोणाला खरंच कळलाही असेल अशी शक्यता नाही का? आम्हाला ग्रेसच्या कविता समजल्या नाहीत (त्या फक्त हृदयनाथांना समजतात म्हणे, किंवा जिवंत असती तर एमिली डिकिन्सनला समजल्या असत्या कदाचित) पण त्याच्या ललित लिखाणातील काही विचारांना आमचा सलाम आहे. जमल्यास त्याचे प्राजक्तावरचे (प्राजक्त वृक्ष, नाहीतर कोण प्राजक्ता असे विचाराल), थॉर्न बर्ड वरचे मुक्तक वाचून पहा. (इच्छा असल्यास).
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 08/02/2011 - 20:17

Permalink

शरदिनी जी,कविता अगदी मनात घर

शरदिनी जी, कविता अगदी मनात घर करुन गेली, ही तुमची पहिली कविता आहे जी मला समजली ( करण तुम्ही दिलेली लिंक) लिंक मधील सर्व गद्य वाचुन पुन्हा कविता वाचली खुपच छान वाटले
धडक उजागर पत्र अर्पणी गर्भवतीचे प्राक्तन चरणी
काय सुंदर अर्थ आहे या ओळीत , खुप आवडले. असेच लिहित रहा (अर्थासहित)... वाचत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत राजवाडे on Sat, 08/06/2011 - 05:22

Permalink

आकर्षक

मधमाशीच्या पोळ्यात हात घालुन मध प्यायची काय मजा असते ते आज कळले. हाताच्या अंतरावर तोडता येण्यासारखी बरीच फळे असतात. पण मधाची गोडी काही औरच.. खुप खुप आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 08/06/2011 - 11:57

Permalink

छोड दिया जाय...

याखेपेस तूच एक विडंबन केल्याने तुझ्या कवितेचे (त्यात' नृत्य' आणि 'भयानक शृंगार' असल्याने) आणखी विंडंबन करत नाही यात खैर समज शरदिने!!!! -खडसावू पिडांकाका (बाकी तू मूळ कविता करण्यापेक्षा विडंबनंच पाडत जा ना!!! चार फुटकळ अनिवासी विड्म्बनकर्ते तरी बेकार होतील!!!! हा हा हा!!!!) :)
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sun, 08/07/2011 - 10:46

In reply to छोड दिया जाय... by पिवळा डांबिस

Permalink

आक्षेप, आक्षेप, आक्षेप...

याखेपेस तूच एक विडंबन केल्याने
विडंबन या शब्दाला तांत्रिक आक्षेप. मूळ लेख ही कविता नव्हती. याखेपेस या शब्दाला तात्विक आक्षेप. आधीच्या कविता या विडंबनं नव्हती असं गृहित धरणं बरोबर नाही. (दोन्ही आक्षेपातून 'मी तसं म्हटलंच नव्हतं' असा पळपुटेपणा करण्याची तुम्ही सोय करून ठेवली आहे म्हणा)
चार फुटकळ अनिवासी विड्म्बनकर्ते तरी बेकार होतील!!!!
यावर व्यावसायिक आक्षेप. जागतिक आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अमेरिकेचं तर क्रेडिट रेटिंग गडगडायला लागलं आहे. अशा परिस्थितीत सॉफ्टवेअर जॉब्स तर आउटसोर्स होतातच. तुम्ही वर विडंबनही आउटसोर्स करायला सांगत आहात. हे वागणं बरं नव्हं.. फुटकळ या शब्दाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Mon, 08/08/2011 - 21:32

In reply to आक्षेप, आक्षेप, आक्षेप... by राजेश घासकडवी

Permalink

हम्म!

सॉफ्टवेअर जॉब्स तर आउटसोर्स होतातच. तुम्ही वर विडंबनही आउटसोर्स करायला सांगत आहात. हे वागणं बरं नव्हं.. फुटकळ अनिवासी विडंबनकारांची युनियन आमच्या घरावर मोर्चा आणणारसं दिसतंय!!!! (पांड्या, जरा माझी गन घेऊन ये रे!!!!) :)
  • Log in or register to post comments

Submitted by सांजसंध्या on Tue, 03/27/2012 - 10:32

Permalink

शब्दकळांचं सौंदर्य जाणवलं.

शब्दकळांचं सौंदर्य जाणवलं. मात्र ग्रेस वाचताना कविता कळाली नाही तरी एक शब्दात न सांगता येणारी अनुभूति मिळते ती इथं नाही जाणवली. कदाचित माझ्या अज्ञानाचा परिणाम असावा..
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 8180 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com