Skip to main content

अवास्तव अवास्तव

अवास्तव अवास्तव

Published on बुधवार, 27/07/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं नाव वास्तव आणि आडनाव श्रीवास्तव असेल तर ती व्यक्ती स्वत:चं नाव कसं लिहील? श्री. वास्तव श्रीवास्तव. असंच काहीसं गंमतीशीर वाटतंय ना या पोस्टचं शीर्षक? पण काय करणार परिस्थितीच तशी आहे. म्हणजे त्याचं असं आहे पाहा, समजा एखादी गोष्ट प्रत्यक्षात घडणे अशक्य असेल तर आपण काय म्हणतो? अवास्तव. त्याचप्रमाणे आपल्या स्वप्नांना आपण काय म्हणतो? अवास्तव. आणि आता जर का एखादी गोष्ट स्वप्नात देखील अशक्य असेल तर तिला काय म्हणणार? अवास्तव अवास्तव असंच ना? आता तुम्ही म्हणणार स्वप्नात देखील अशक्य असं काय असू शकतं? तुमच्याकरिता नसेल कदाचित पण निदान माझ्याकरिता तर हे स्वप्नातदेखील अशक्यच आहे. मी आहे जरा जुन्या काळात रमणारा माणूस. (जरा अशाकरिता म्हंटलं की फार जुन्या, राजे महाराजांच्या काळात नाही. अगदीच गेला बाजार स्वातंत्र्यपूर्व काळात देखील नाही. तर सत्तर, एंशी व नव्वदच्या दशकाचा पूर्वार्ध या काळात रमणारा). तर या काळातल्या लोकप्रिय जिंगल्सचा खजिना उपलब्ध करून देणारं एक संकेतस्थळ अस्मादिकांच्या पाहण्यात आलं (फक्त स्थळंच पाहण्याच्या लायकीची असतात असं नव्हे तर संकेतस्थळं देखील तशी असतात. असो.). तर त्या संकेतस्थळावरून मनसोक्त जुन्या दूरदर्शनवरील जाहिराती उतरवून घेतल्या आणि मग त्या एक एक करून निवांत ऐकत बसलो. हमारा कल हमारा आज ... हमारा बजाज ओल्ड स्पाईस कुछ खास है हम सभी में ... कॅडबरी जब घर की रौनक बढानी हो .... नॅरोलॅक अचानक काहीतरी चूकल्या चूकल्यासारखे वाटले. पुन्हा ऐकले जब घर की रौनक बढानी हो, दिवारोंको जब सजाना हो नेरोलॅक, नेरोलॅक रंगोंकी दुनियामें आओ, रंगीन सपने सजाओ नेरोलॅक, नेरोलॅक. यात काही तरी खटकल्यासारखे वाटले, पण नेमके काय ते ध्यानात येईना. बराच वेळ विचार करून अजूनच अस्वस्थ झालो. शेवटी एक एक शब्द कागदावर उतरवून घेतला आणि नेमका कुठे आपल्याला त्रास होतोय याचा शोध घेतला आणि लक्षात आले आपण अडखळतोय ते रंगीन सपनें या शब्दांवरच. हो. कारण आजतागायत मला इतकी स्वप्ने पडलीयत (रोज रात्री किमान एक तरी आणि कधी कधी चार किंवा पाच सुद्धा) पण एकाही स्वप्नात मला कुठलीच गोष्ट रंगीत दिसली नाहीय. वास्तवात आपण जे काही पाहतो ते आपल्या बाह्य डोळ्यांनी (Physical Eyes), याउलट कल्पनेत किंवा स्वप्नात आपण जे काही पाहतो ते आपल्या अंत:चक्षूंनी (Logical Eyes). त्यामुळे कल्पनेत देखील जेव्हा आपण एखादी गोष्ट समोर आणायचा प्रयत्न करतो तेव्हा तिचे रंग आपल्यासमोर सहज येत नाही. रंगांची कल्पना करण्याकरिता तसा मुद्दाम प्रयत्न करावा लागतो. स्वप्नांवर तर आपलं काहीच नियंत्रण नसतं त्यामुळे तिथे आपल्याला सार्‍या गोष्टी बिनरंगाच्याच (Grayscale) दिसतात. त्यामूळे रंगीन सपने सजाओ ही बाब माझ्यासाठी स्वप्नात सुद्धा अशक्य म्हणजेच अवास्तव अवास्तव आहे.
लेखनप्रकार

याद्या 5853
प्रतिक्रिया 26

आपल्या लेखन शैलीला नम्र प्रणाम. साधाच विषय. पण किती छान त-हेनी आपण विषय मांडला आहे. आता बाकीचे सुद्धा लिखाण वाचत आहे. स्वप्न - मला स्वप्न खूप आणि रोज पडतात. मजा येते (आता पर्यन्त एक पण नाईटमेअर नाही - सगळी छान) पण आपल्या सांगतो (मी इतका रमून जात असेन कदाचीत) मी कधी हा विचारच केला नव्हता की इतकी वर्ष आपण ब्लॅकव्हाइट स्वप्न बघत आलो आहोत. आता आज मी तसा मुद्दाम प्रयत्न करणार आहे. इनफॅक्ट मला तर वाटायचे स्वप्न छान रंगीतच असतात. कमाल झाली चाळीस वर्ष स्वप्न म्हणजे मी काय ब्लॅकव्हाइट स्वप्न बघत आलो आहे. छे विश्वास नाही बसत.

In reply to by रणजित चितळे

@रणजीत चितळे आपल्या लेखन शैलीला नम्र प्रणाम. साधाच विषय. पण किती छान त-हेनी आपण विषय मांडला आहे. आता बाकीचे सुद्धा लिखाण वाचत आहे. >> इतक्या उत्स्फुर्त शब्दांत प्रशंसा केल्याबद्दल धन्यवाद. आता आपण माझे बाकीचे लिखाण वाचत आहात तेव्हा हा लेख आणि इतर लेख यांत मोठा फरक आपणास जाणवला असेलच. आपण नमूद केल्याप्रमाणे साधाच विषय >> हेच माझ्या या लेखाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून तर इतकी वाचने आणि इतक्या प्रतिक्रिया मिळाल्या. माझ्या इतर लेखांकरिता मी बरीच मेहनत घेतली होती. तरीही काही सन्माननीय अपवाद वगळता त्यांना इतक्या जलद प्रतिक्रिया मिळाल्या नव्हत्या. एका गंभीर विषयावर केलेल्या लेखाला तर टारझन या नावाने कुणीतरी वात्रट प्रतिक्रियाही दिली होती. त्याला समज देणारी एक प्रतिक्रिया मी खाली मांडली तर इथल्या असमंजस संपादकाने टारझनची प्रतिक्रिया काढून टाकण्याऐवजी माझीच प्रतिक्रिया उडवून टाकली. त्यानंतर मी निरीक्षण केले असता मला जाणवले - १. गंभीर व अभ्यासू लिखाण असले तरी अनेकदा त्यावर कुजकट शेरे पडतात किंवा मग तो लेख प्रतिसादाविना दुर्लक्षितच राहतो. २. मोठे लेख वाचण्यापेक्षा लहानसे लेखच जास्त वाचले जातात व त्यावर प्रतिक्रियाही जास्त पडतात. ३. एक ओळीचे लिखाणही बरीच वाचने व प्रतिक्रिया खेचते. ४. एकदा तर कुणीतरी फक्त एकच शब्द लिहून (मोदीच) प्रचंड प्रतिसाद व वाचने मिळविणारा धागा उघडला होता. सबब मी यावेळी कमी शब्दांचा व फारसा गंभीर विषय न घेता लिहीलेला लेख इथे मांडला. ज्यावर पंडित गागाभट्ट, मुलखावेगळी, सविता यांनी काहीसा जुगलबंदी स्वरूपाचा प्रतिसाद दिला. असो. आपण इथे आपला स्वप्नांविषयीचा अनुभव मांडलात व दु:स्वप्ने पडत नाहीत असे नमूद केलेत ते वाचून आनंद झाला. माझे इतर लेखन आपणांस कसे वाटले हेदेखील जरूर कळविणे. त्याचप्रमाणे अनेक गंभीर विषयांवरील लेखन मी अजून मिपावर मांडलेले नाहीय. ते आपण माझ्या ब्लॉगवर वाचू शकता.

In reply to by मुलूखावेगळी

मी लोकांच्या स्वप्नाबिप्नात जाऊ लागलो तर लोक त्याला दु:स्वप्न म्हणायचे, दचकून जागेबिगे व्हायचे लोक.

In reply to by पंगा

मी लोकांच्या स्वप्नाबिप्नात जाऊ लागलो तर लोक त्याला दु:स्वप्न म्हणायचे, दचकून जागेबिगे व्हायचे लोक.
ते तर तुम्ही मिपावर येउन पण करता ना :P तसेही मिपाकर निडर आहेत :) पळा पळा आता .

In reply to by पंगा

मी लोकांच्या स्वप्नाबिप्नात जाऊ लागलो तर लोक त्याला दु:स्वप्न म्हणायचे, दचकून जागेबिगे व्हायचे लोक. ते तर तुम्ही मिपावर येउन पण करता ना Tongue
दु:स्वप्न काय आहे ते तुम्हीच सान्गितलेय ना दुसर्‍यांना दचकवन्यासाठी स्वप्नातच कशाला जायला हवे हे कार्य मिपावर ही येउन तुम्ही हे साध्य पुर्ण करु शकता एवढेच मला असे सुचवायचे आहे. :)

In reply to by सविता

लवकर पाठवा. नाहीतर स्वप्नात येईन. (इथून पन्नास कोसांवर जेव्हा बाळ झोपत नाही, तेव्हा त्याची आई त्याला सांगते, की बाळा झोप! नाहीतर गब्बर येईल! नाहीतर आम्ही इथे आहोत की जे लोकांना सांगतो, की झोपलात, तर आम्ही येऊ!)

इंटरेस्टिंग विषय्..लिहिलंयही मस्त. रंग हे निव्वळ परसेप्शन आहे. जागेपणी किंवा झोपेतही शेवटी प्रत्यक्ष दृश्य आपल्या मनाला दिसत नसतंच. त्याचं इंटरप्रिटेशन फक्त मनापर्यंत पोचतं. स्वप्न इंटर्नली जनरेटेड सिग्नल्सनी बनल्यामुळे थेट इंटरप्रिटेशनच्या रूपातच येत असल्याने रंग ही कल्पना तिथे अ‍ॅप्लिकेबल नाही. जागेपणी बाहेरच्या दृश्यांनी दिलेले चित्र डोळ्यावाटे आत येऊन रंग इंटरप्रीट करुन अर्थ प्रोसेस होऊन मग मनाला फायनल रिपोर्ट (!) दिला जातो. तिथेही रंग असे नसतातच. मेंदू हासुद्धा एक अवयवच आहे आणि आपण (मन) त्याहूनही वेगळेच आहोत हे सिद्ध करणारं हे मजेशीर उदाहरण आहे. लिहीत रहा.

मला पण रंगीत स्वप्ने पडतात ... अगदी ईस्टमन कलरमधेच मी स्वप्ने पाह्तो :) >> वास्तवात आपण जे काही पाहतो ते आपल्या बाह्य डोळ्यांनी (Physical Eyes), याउलट कल्पनेत किंवा स्वप्नात आपण जे काही पाहतो ते आपल्या अंत:चक्षूंनी (Logical Eyes). त्यामुळे कल्पनेत देखील जेव्हा आपण एखादी गोष्ट समोर आणायचा प्रयत्न करतो तेव्हा तिचे रंग आपल्यासमोर सहज येत नाही. रंगांची कल्पना करण्याकरिता तसा मुद्दाम प्रयत्न करावा लागतो. स्वप्नांवर तर आपलं काहीच नियंत्रण नसतं त्यामुळे तिथे आपल्याला सार्‍या गोष्टी बिनरंगाच्याच (Grayscale) दिसतात. हे काही तितकंसं पटलं नाही ... कारण स्वप्नांमधे रंग भरायला अंतःचक्षू तर जास्तच 'पॉवरफुल' असतील .... मला कॉलेजमधे असतानापासून स्वप्नांमधे 'लव्हेण्डर' कलर दिसायला लागला कारण ..... जाऊ दे इथे सांगण्यात काही अर्थ नाही. .... :( पण मला तर अगदी नाईटमेअर्स सुद्धा रंगीत दिसतात, त्यातल्या भीतीदायक गोष्टींचा रंग मात्र निरनिराळा असतो .... काळाच असेल असं नाही.

ह्म्म्म रातांधळेपणाचा असाही प्रकार असतो होय.

छान लिहिलय.

स्वप्ने रंगीत असू शकतात. तुमच्या मेंदूची स्थिती काय आहे त्यावर हे बरेचद अवलंबून असते. अवांतरः स्वप्नात कोणी स्वतःला पाहिले आहे का?

In reply to by विजुभाऊ

हो ... मी तर स्वतःचे मरण स्वप्नात पहिले आहे ! माझी मुलगी एक्-दीड वर्षांची असताना एकदा असं स्वप्न पडलं होतं. त्यात मी प्रत्यक्षात जिथे झोपलो होतो तिथे माझे शव दिसत होते आणि 'मी' हलकेच त्यातून बाहेर पडून हळू हळू हवेत तरंगत वर वर जात होतो. तेवढ्यात माझी मुलगी अचनकच पण प्रत्यक्षात रडायला लागली आणि लगेच जाग येवून ते स्वप्न भंग पावलं. पण तो अनुभव खूपच आवडला .... मुक्ती म्हणजे काय असेल त्याचं क्षणभर का होईना पण प्रत्यंतर आलं .... :)

वाह ! काय छान लिहिले आहे. आजकाल रोज मिपा उघडले की तुमचा एक नविन लेख स्वागताला हजरच असतो, मस्त वाटते एकदम. कसे सुचते हो येवढे छान छान रोजच्या रोज लिहायला ? नाहीतर मेले आम्ही, चार वाक्य सलग लिहायची मारामार.

मलाही पूर्वमाणूसरंग स्वप्नं पडतात. १. तुम्हाला स्वप्नात कितीही जोरात ओरडायचे असेल तरीही तुम्ही ओरडू शकत नाहीत. २.स्वप्नात तुम्हाला कितीही जोरात पाळायची इच्छा/जबरदस्ती झाली तरी तुम्ही जोरात पळू शकत नाहीत. ३.जागेपणी न चालवू शकणारे वाहन तुम्ही स्वप्नात अगदी आरामात चालवता. ४. अजाणतेपणे झोपण्या अगोदर जर तुम्हाला पाणी प्यायची इच्छा झाली आणि तुम्ही काही कारणास्तव पाणी प्यायचे विसरलात तर रात्री प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचे स्वप्नं नक्की.

मस्त !!! लेख वाचल्यावर.............मागच्या वर्षी अलेला 'Inception' नावाचा शिनेमा आठिवला...........त्यात तर स्वप्नामधे पण स्वप्न अस चार लेवल वर गेला होता तो भाऊ................. त्याला अवास्तव अवास्तव अवास्तव अवास्तव असं कहिस म्हणावं लागेल........ :)

उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. @मनराव इन्सेप्शन चित्रपट मी पाहिला नाही. पण त्यातल्या ४ टप्प्यांत स्वप्नांच्या कल्पनेचा उल्लेख आपण केल्यामुळे बघायची उत्सुकता निर्माण झालीय. माहितीबद्दल धन्यवाद. @राकेश महाजन आपण लिहीलेले चारही मुद्दे अगदी मनापासून पटले. व्यक्तिश: प्रत्यय घेतला आहेच. इथे मांडल्याबद्दल धन्यवाद. @प्रसाद मला सतत काही ना काही कल्पना सूचतच असतात. आळशीपणामुळे नियमित लिखाण होत नाही. मनातच राहून जाते. सध्या मिपावर टाकत असलेले हे लेख जुनेच आहेत. नव्याने काही लिखाण सध्या केलेले नाही. प्रशंसे बद्दल धन्यवाद. @प्रितम / पियुषा, सविता / निशा महिलांना रंगीत स्वप्ने पडतात. पुरूषांना कृष्णध्वल असे एका पाहणी अहवालात आढळून आले आहे. तेव्हा आपला अनुभव या अहवालाला सार्थ ठरवित असल्याची माहिती इथे नमूद केल्याबद्दल धन्यवाद. @सागर पराडकर आपण नमूद केलाय तसा अनुभव एका व्यक्तिने घेतला असल्याचे वर्णन करणारी pdf file मला कालच electronic mail ने मिळाली. @विजय शाह, गगनविहारी शास्त्रीय माहिती इथे नमूद केल्याबद्दल धन्यवाद. @सुनील प्रशंसे बद्दल धन्यवाद. @मनिष वेगळा अनुभव मांडल्याबद्दल धन्यवाद.