आमच्या त्सेंटा आजीची खासियत म्हणजे हा प्लम केक-
साहित्य-
१. बेस करिता:
१०० ग्राम बटर, १०० ग्राम साखर, २०० ग्राम मैदा, १ अंडे, १ च. चमचा बेकिंग पावडर, १ चिमूट मीठ,
२ चमचे रम/कोनिऍक किवा १ चमचा वॅनिला अर्क
२.सरफेस करिता:
५०० ग्राम प्लम्स, ७५ ग्राम बदाम तुकडे, ३ च. चमचे साखर, १ च.चमचा दालचिनी पावडर
३. टॉपिंगकरिता:
१०० ग्राम मैदा, ६० ग्राम बटर, ६० ग्राम साखर, १ चमचा दालचिनी पावडर, १ चिमूट मीठ
कृती-
बेससाठीचे सर्व साहित्य एकत्र करणे व चांगले मळणे, हा गोळा प्लास्टिकमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ३० ते ४० मिनिटे ठेवणे.
टिन्ड प्लम असतील तर चाळणीवर घालून पाक निथळू देणे. जर फ्रेश प्लम्स असतील तर बिया काढून टाकणे.
प्लममध्ये बदाम तुकडे,दालचिनी पूड आणि साखर मिसळणे.
फ्रेश प्लम्स असतील तर ३ ते ४ चमचे साखर जास्त घालणे.
टॉपिंगसाठीचे सर्व साहित्य एकत्र करणे व मळून गोळा तयार करणे.
केकमोल्डला बटर लावून घेणे.
बेससाठीचा गोळा फ्रिजमधून बाहेर काढणे व केक मोल्डवर पसरणे, फक्त मोल्डच्या तळाशी न पसरता कडांपर्यंत वर नेणे.
आता मोल्डच्या आत मैद्याच्या मिश्रणाचा एक मोल्ड तयार होईल.
यावर प्लमचे मिश्रण पसरणे.
टॉपिंगसाठीच्या गोळ्याचे लहान गोळे, गुठळ्या करुन (streusel) त्या प्लम्सच्या मिश्रणावर पसरुन सर्व मिश्रण झाकून टाकणे.
प्रिहिटेड अवन मध्ये ५० ते ५५ मिनिटे १८० अंश से वर बेक करणे.


वाचने
7569
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणेच झ का स ! मस्त ग
टोंडाला पाणी सुटले.
ह्म्म
व्वा !
मस्त!!!
आहाहा.....
अरे कसला जबरी दिसतोय केक
फोटू पाहून निशब्द झाले. मी
(No subject)
छान
ए'केक'
खल्लास....
मोरोपंतांच्या केकावली प्रमाणे
रंगाशेठ..
In reply to मोरोपंतांच्या केकावली प्रमाणे by चतुरंग
आता वाटतं एक तर अंडी खायला
हॅप्पी बड्डे टू मी. चला केक
झक्कास !!!!!
व्वा
स्वाती, या केकच्या प्रकाराला
प्लम केक
In reply to स्वाती, या केकच्या प्रकाराला by ललिता
स्वातीताई, हा केक बराचसा