आसूड
नाही भय लाज
सारे सत्तातूर
देशाचा विचार
कवडीमोल
लोभालोभ सारा
सत्तेचिये पायी
आपापल्या सोयी
लाघव भावे
आज वाटे त्यांसी
ब्रम्हांड ठेंगणे
टेकीता ढुंगणे
खुर्चीवरी
सुखाचिया राशी
त्यांच्यांच पायाशी
मग जनतेशी
काय पुसावे?
मतीमंद झाला
आज बुद्धीवंत
नाही बलवंत
कोणीच येथे
उठ माझ्या लेका
आता नको चुका
नाहीतर भिका
मागशील
हातामध्ये घेरे
सत्तेचा आसुड
भडव्यांच्या ओढ
पाठीवरी
हिच माझी इच्छा
पुरी कर बाबा
देशाचा या ताबा
तुझे हाती ..!!!
चांगला आसुड आहे
सुंदर!!
आसूड -
अचूक वार
मला पन एक कविता स्फुरली