मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जालस्थ

विकास · · काथ्याकूट
नमस्कार मंडळी! येनार येनार येनार! असे अनेक दिवस ऐकत असलेले "गुगल प्लस" जालावर अवतरले. काय मस्त आहे म्हणून सांगू त्या फेसबुकापेक्षा! कारण काय म्हणता? अहो, असे बघा, त्याफेसबुकावर फक्त मित्र करू शकतो आणि मग त्या मित्रांच्या (आणि आपल्या) भिंती रंगवत बसू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यात एकच गोष्ट सगळ्याच कनेक्शन्सना समजू शकते. मात्र, आमच्या गुगल प्लसचे तसे नाही बरंका! त्यात तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे वेगवेगळी वर्तुळे अथवा मराठी जालीय भाषेत कट्टे करू शकता. मग अ, ब, क, ला पार्टीस बोलावलेले ड, इ, फ, ला समजत नाही! वगैरे वगैरे. आता मी असे माझ्या नवीन कोर्‍या गुगल प्लसच्या वर्तुळात आनंदाने लिहीले. तर तात्काळ मला प्रतिसाद (जीप्लसच्या भाषेत "कॉमेंट") आला. "कधीकाळी तू देखील फेसबुकचा भाग होतास. आता जीप्लसमधे गेलास त्यामुळे फेसबुकमध्ये काय कमी आहे हे सांगण्याचा तुला हक्क नाही!" क्षणभर मला देखील ते पटले. पण नंतर लक्षात आले की माझा मित्र देखील माझ्या सारखाच जीप्लस वापरत होता आणि फेसबुकवरही होता. पण ते जाउंदेत. मुद्दा तो नाही. यामुळे माझ्या डोक्यात विचार घोळायला लागले. की या सतत बदलणार्‍या जालीय दुनियेत, "हम बंजारोंकी बात मत पुछो जी, जो प्यार कीया तो प्यार किया, जो नफरत की तो नफरत की..." असे गाणे म्हणत आपण एका संस्थळाकडून (सोशल नेटवर्ककडून) दुसरीकडे प्रवास करत असतो. त्यात प्रत्येक जालस्थ हा एखाद्या संस्थळाशी अधिक संलग्न होतो. तसे ते कुणी कुठे व्हावे हा त्या त्या जालस्थाचा व्यक्तीगत निर्णय आहे. त्यात आपण काही बोलूच नये. पण असे जालस्थ जेंव्हा इतर संस्थळाना वेगळ्याच नजरेतून बघू लागतात; त्या संस्थळाला, त्यातील सभासदांना (स्वतः घेतलेले अनेक आयडींची सोडून) नावे ठेवू लागतात, तेंव्हा त्याला काय म्हणायचे? हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते?

वाचने 4033 वाचनखूण प्रतिक्रिया 22

मला असं वाटतं की मेनियाच्या भरात अशा प्रकारचे उद्गार अनेक जण काढतात. "सर्व सोशल नेटवर्कींग साईट्स बंद केल्या पाहिजेत" , "फेसबुक वगैरे सगळं बेरोजगार लोकांसाठी आहे" अशा स्वरूपाचे, फारसा कसलाच अर्थ नसलेले अभिप्राय आपण ऐकतोच. या मागे फार विचार केला आहे असं वाटत नाही. बाकी, कुणीसं म्हण्टल्याप्रमाणे, "फेसबुकाबाबत जोपर्यंत आपुलकी आहे आणि मित्र जोडल्याचा जालीय अनुभव आहे, तोपर्यंत कुठेही अकाऊंट असलेले लोक पोटतिडकेने बोलतील. हे अपेक्षित आहे"; हे अर्थातच मान्य आहे. नाहीतर या न्यायाने फेसबुकावरील व्यक्तीला गुगल+/माय स्पेस या विषयांबद्दल बोलणे/वाचणे/विचार करणे/चर्चा करणे/कृती करणे या कशाचा हक्क नाही असे म्हणावे लागेल. असो.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास Mon, 07/25/2011 - 21:30
असं बोलून तुमचा हा धागा निष्फळ करण्याचा डाव मला समजला आहे! तरी देखील यावर Alt+Ctrl+Del अर्थात संपूर्ण विनाश आणि पुनरोत्पत्ती हा मार्ग मला तरी योग्य वाटणार नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मराठे Sat, 07/23/2011 - 05:38
हे इथे येऊन आवर्जुन सांगितल्याबद्दल आभारी आहे. 'शिळ्या कढीला उत कसा आणावा' ह्यासारख्या विषयावर ही चर्चा नसल्याने तुमचा सहभाग नसणार जे गृहित धरले होतेच.

In reply to by मराठे

हॅ हॅ हॅ .. धागा खरंच उकळत्या तेलात टाकण्याच्या लायकीचा आहे, म्हणून प्रतिसाद देत नाही. बाकी मराठे जनू जगदाळ्याची गोष्ट फार छान होती रे, त्या दिवशीच वाचून पाहिली. इथे अमेरिकेत भुताखेतांवर विश्वास फारच उशीरा बसतो त्यामुळे गोष्ट थोडी गंडली पण टाईमपास बेष्ट झाल्ता. बाकी तुझं नाव पाहून आयत्यावेळी कलाटणी मिळणार हे माहित होतं, त्यामुळे गोष्टीत पाणी मिसळल्यासारखं झालं नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पैसा Sat, 07/23/2011 - 16:28
अमेरिकेत भुताखेतांवर विश्वास फारच उशीरा बसतो त्यामुळे गोष्ट थोडी गंडली अमेरिकेत राहून भुताखेतांवर विश्वास न ठेवणे ही गोष्ट आम्ही सहन करणार नाही. बाकी चर्चा चालू द्या....... ज्योति

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विजुभाऊ Mon, 07/25/2011 - 14:56
हॅ हॅ हॅ .. धागा खरंच उकळत्या तेलात टाकण्याच्या लायकीचा आहे, म्हणून प्रतिसाद देत नाही. अरेव्वा हे दुसरा प्रतिसाद देवुन सांगताय..... याला काकतालीय म्हणायचे की वदतोव्याघात म्हणायचे

राजेश घासकडवी Sat, 07/23/2011 - 04:49
फेसबुकाच्या गुणधर्मांच्या मर्यादांना अगदी टोकाचा दोष देऊ नये हे मान्य, पण तो चर्चेचा मुद्दा नाही. कारण तसे फेसबुकावर वावर असलेल्या बहुतेक लोकांनीही करू नये. (साइटच्या अॅडमिननीच बॅन केलेला निरपराध वगैरे कोणी असेल, त्याने असे काही म्हटले तर समजून घेता येईल.) फेसबुकबाबत जोपर्यंत आपुलकी आहे आणि नेटवर्कला नाळ जोडल्याचा भावनिक अनुभव आहे, तोपर्यंत कुठेही वावरणारे झालेले लोक पोटतिडकेने बोलतील. हे अपेक्षित आहे. त्यांना भावुक होण्याचा हक्कही आहे. आणि भावुक होऊन काहीबाही म्हणणे (तात्पुरते) आक्षेपार्हही नाही. अर्थात फेसबुकवरच नेटवर्किंग करत असलेल्या लोकांनी सुद्धा भावुक होऊन काहीबाही म्हणणे तात्पुरतेच आक्षेपार्ह नाही. -------- "मेरे पास भारत का पासपोर्ट है, युएसका ग्रीन कार्ड है. तुम्हारे पास क्या है?" "मेरे पास चर्चा करनेकी खुमखुमी हय!"

In reply to by राजेश घासकडवी

विकास Mon, 07/25/2011 - 21:12
आपल्या प्रतिसादाशी आणि त्याहूनही अधिक आपल्या स्वाक्षरीतील मजकुराशी पूर्ण सहमत! म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की जालावरील एका डॉटने तयार होणारी कृत्रिम बंधने तुटणे गरजेचे आहे, नव्हे ते होणारच आहे. मला देखील म्हणूनच असे विषय सुरू झाले की अमिताभचे हे (रफीने आळवून म्हणलेले) गाणे आठवते.... एकमेकांविषयी आस्था* दाखवणार्‍या प्रतिसादांची जेंव्हा त्सुनामी या जालावर पसरेल तेंव्हा आप-पर असा भाव रहाणार नाही. पण जेंव्हा प्रतिसादातून साद दिसण्याऐवजी वाद दिसतात, तेंव्हा ही लिंक जास्त उपयोगी पडेल असे वाटते. :( असो. *आस्था चॅनेल अथवा त्यावरील प्राणायम नाही.

Nile Sat, 07/23/2011 - 05:12
अहो, असे बघा, त्याफेसबुकावर फक्त मित्र करू शकतो आणि मग त्या मित्रांच्या (आणि आपल्या) भिंती रंगवत बसू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यात एकच गोष्ट सगळ्याच कनेक्शन्सना समजू शकते. मात्र, आमच्या गुगल प्लसचे तसे नाही बरंका! त्यात तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे वेगवेगळी वर्तुळे अथवा मराठी जालीय भाषेत कट्टे करू शकता. मग अ, ब, क, ला पार्टीस बोलावलेले ड, इ, फ, ला समजत नाही! वगैरे वगैरे.
हे संपूर्णपणे खरे नाही. गूगल+ येण्याअगोदर पासूनच फेसबूकावर फ्रेंड्स लिस्ट बनवता येत होती आणि तूम्ही जे शेअर कराल ते सिलेक्टीव्हली शेअर करता येत होतं आणि अजूनही येतं. पण ते असो, मुख्य मूद्दा वेगळा आहे.
त्यात प्रत्येक जालस्थ हा एखाद्या संस्थळाशी अधिक संलग्न होतो. तसे ते कुणी कुठे व्हावे हा त्या त्या जालस्थाचा व्यक्तीगत निर्णय आहे. त्यात आपण काही बोलूच नये. पण असे जालस्थ जेंव्हा इतर संस्थळाना वेगळ्याच नजरेतून बघू लागतात; त्या संस्थळाला, त्यातील सभासदांना (स्वतः घेतलेले अनेक आयडींची सोडून) नावे ठेवू लागतात, तेंव्हा त्याला काय म्हणायचे? हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते?
कोणी कोठे संलग्न होणे हे आवडीनिवडीवर अवलंबून आहे. एखाद्या संस्थळाची आणी तूमची वेव्हलेंथ जर जमत नसेल (आणि म्हणून तूम्ही ते सोडले वा बॅन झालात), तर अशा वेळी सतत दूसरीकडे जाऊन त्या संस्थळाला कमी लेखणे माझ्या मते 'चाईल्डिश' आहे. (कधीतरी, काही कारणास्तव* वा अन्याय झाला म्हणून विरोधकरण्यासाठी, संस्थळावर टीका करणे, त्रूटी दाखवण्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.) *कारण स्वतःला जस्टिफाय करता येत असेल तर ठीक, कारणं शोधून काढणं अवघड नसेलही. पण स्वतःशी अप्रामाणिक कारणं आहेत का हे ज्याचेत्याने ठरवावे. जाता जाता, कोणाही संस्थळाशी कितपत संलग्न व्हावे हा ही महत्त्वाचा प्रश्न आहेच, संस्थळाची संलग्न होणे म्हणजे संस्थळाच्या चूका पदरात घालणे नव्हे की संस्थळाशी आजन्म निष्ठा पाळणे नव्हे.

रेवती Sat, 07/23/2011 - 05:27
फेसबुकावर राहाणार्‍यांइतकाच (किंबहूना कधी कधी जास्तच) संस्थळाभिमान फेसबुकाबाहेर राहणार्‍यांमधे दिसून येतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे. राहिला प्रश्न गुगल प्लसचा, त्याचे निर्माते जर फेसबुकावर हिंडत असते तरीही त्यांनी अशाच भिंती रंगवल्या असत्या असं वाटतं. >> माझ्यामते गुगल प्लसवर स्थायिक झालेल्या फेसबुकवासियांइतका असा नैतिक अधिकार नसावा. असं जर तुमचं ठाम मत असेल तर पुढे जास्त काही बोलण्याची इच्छा इथे तरी नाही. गुगलप्लसवरच बोलू.;) मी फेसबुकवर जाण्याच्या मताची नाही. रोज आपल्या घरी कोणत्या दुकानातून आणलेल्या गाजराची (येथे कधी कांदा, कधी टोमॅटो, काकडी तर कधी मिश्र असे समजावे) कोशिंबीर केलीये ते दुसर्‍यांना सांगण्यापेक्षा मी गुगलप्लसवर ए, बी, सी, डी यांचे वर्तूळ करून त्यांना सांगणे पसंत करीन.

प्रियाली Sat, 07/23/2011 - 06:21
गूगल+ची ओळख करून देण्यासाठी ही चर्चा आहे असा माझा गैरसमज झाला होता पण शेवटचा परिच्छेद वाचल्यावर तो फिटला. तसे वर नाइलने म्हटल्याप्रमाणे फेसबुकावर ग्रुप्स तयार करून तुमच्या पोस्ट्स, फोटो खाजगी ठेवून काहीनाच दाखवता येतात.
जालस्थ जेंव्हा इतर संस्थळाना वेगळ्याच नजरेतून बघू लागतात; त्या संस्थळाला, त्यातील सभासदांना (स्वतः घेतलेले अनेक आयडींची सोडून) नावे ठेवू लागतात, तेंव्हा त्याला काय म्हणायचे? हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते?
योग्य-अयोग्य हे सापेक्ष शब्द आहेत. भारतात बसून अमेरिकेला नावे ठेवणार्‍यांची आणि अमेरिकन देशस्थांना हसणार्‍यांची संख्या कमी नसावी. संकेतस्थळांचेही तसेच आहे. अशा गोष्टी आपल्या मनाला किती लावून घ्याव्यात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बाकी, मला असे वाटते की ही चर्चा म्हणजे मऊ माती खणण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. आपणही कठीण माती खणायला घ्यावी अशा माझ्या शुभेच्छा! ;)
की या सतत बदलणार्‍या जालीय दुनियेत, "हम बंजारोंकी बात मत पुछो जी, जो प्यार कीया तो प्यार किया, जो नफरत की तो नफरत की..." असे गाणे म्हणत आपण एका संस्थळाकडून (सोशल नेटवर्ककडून) दुसरीकडे प्रवास करत असतो.
सॉरी! तुम्ही फक्त तुमच्याबद्दल बोला. आपल्याबद्दल नको. :) माझ्या खरडवहीत सुमारे दोन-तीन वर्षे जुने शब्द आहेत. संकेतस्थळांच्या लढायांत मला रस नाही. मला सर्व संस्थळे आवडतात पण माझे कोणत्याही संकेतस्थळावर प्रेम नाही.

In reply to by प्रियाली

विकास Mon, 07/25/2011 - 21:24
तसे वर नाइलने म्हटल्याप्रमाणे फेसबुकावर ग्रुप्स तयार करून तुमच्या पोस्ट्स, फोटो खाजगी ठेवून काहीनाच दाखवता येतात. असेलही कदाचीत. असेल तसा माझा पूर्वदुषितग्रह... :( बाकी, मला असे वाटते की ही चर्चा म्हणजे मऊ माती खणण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. आपणही कठीण माती खणायला घ्यावी अशा माझ्या शुभेच्छा! अहो, आम्ही कोपर्‍याने दगडही खणू शकतो, पण सध्या गप्प रहायचे ठरवले आहे. ;) सॉरी! तुम्ही फक्त तुमच्याबद्दल बोला. आपल्याबद्दल नको. माझ्या खरडवहीत सुमारे दोन-तीन वर्षे जुने शब्द आहेत. "आपण" हा मराठीतील असा एक प्रश्न आहे की, तो बहुवचनी, आदरार्थी बहुवचनी अथवा प्रथमपुरूष बहुवचनी (का असेच काहीतरी) कसाही घेता येऊ शकतो. आता कोणी कसा घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य आहे. ;) तेंव्हा गैरसमज नको.

खूप लोक एकाच ठिकाणी जोडल्या गेले आहेत विचारांची आदान प्रदान, माहितीची देवाण-घेवाण होत आहे, अशा विविध सायट्यांवर मला जोडलेले राहणे आवडते. [अपवाद फक्त एकाच माणसाने अनेक मराठी सायटी काढून वेगवेगळ्या आयड्यांनी लिहिणार्‍या सायटींबद्दलचा आहे] बाकी, मला गुगल प्लसला जोडले जाणे आवडेल. बाकी, विकासरावांनी गुगल प्लस ही सेवा काय आहे, ती कशी वापरली पाहिजे, त्याचे संभाव्य धोके,फायदे अशी चर्चा केली असती तर अधिक आनंद वाटला असता तेवढीच 'माहितीपूर्ण' चर्चा झाली असती असे वाटले. :) अजून एक : जो पर्यंत मला गुगल प्लस सेवा नीट कळत नाही तोपर्यंत मित्रांनी मला गुगल प्लसच्या रिक्वेष्ट्या पाठवू नये ही लम्र विनंती. -दिलीप बिरुटे

मदनबाण Sat, 07/23/2011 - 10:04
जालस्थ जेंव्हा इतर संस्थळाना वेगळ्याच नजरेतून बघू लागतात; त्या संस्थळाला, त्यातील सभासदांना (स्वतः घेतलेले अनेक आयडींची सोडून) नावे ठेवू लागतात, तेंव्हा त्याला काय म्हणायचे? हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते? === आयडी मागची व्यक्ती ही नेहमी त्या आयडी द्वारे स्वतःला प्रकट करत असते,त्या आयडी द्वारे त्याचे विचार, स्वभाव आणि व्यक्तीमत्व प्रतित होत असते...त्यामुळे त्यांना एकदा आपण ओळखले की मग त्यातल्या फडतुस आणि वाय झेड आयडींकडे बघु नये किंवा त्यांना नावे ठेवण्यात आपला अमुल्य वेळ वाया घालवु नये... ;) वाय झेड आयडींमुळे फुकटचा स्वतःच्या डोक्याला शॉट कशाला लावुन घ्या ? त्यांना रमु दे त्यांच्या वायझेड विश्वात !!! ;) ( मी तर हाच फंडा वापरतो ;) ) बाकी माझ्या टाळक्यातले इतर विचार :--- फेसबुक वापराव असं कधी वाटल नाही, वाटत नाही.उगाच टिपी म्हणुन अकाउंट बनवुन ठेवले आहे. गुगलचं बझ बरेच दिवस वापरत आहे,त्यामुळे अनेक चांगले मित्र झाले, जबरदस्त गप्पा झाल्या व अजुनही होतात.अजुनही बझ वापरतोय्,त्यात आता + ची भर पडल्याने फायदा झाला आहे. ;) बाकी नेटकरी मंडळी जिकडे काही नविन दिसत तिथे धावतात आणि काही वेळ रमतात... ज्या क्षणी त्यातला रस संपतो किंवा तोच तोच पणा वाटायला लागतो त्यावेळी ही मंडळी नवीन मार्ग चोखाळायला लागतात... जे ऑरकुटच्या बाबतीत झाले तेच आता फेसबुकच्या बाबतीत घडतय इतकच... ;) बाकी मिपा सारख संकेस्थळ मला जास्त आवडत्,ते तुम्हालाही आवडत आणि म्हणुनच सतत निरनिराळी टाळकी इथे डोकावत असतात. ;) आज गुगल प्लस आहे उद्या अजुन काही नविन येईल... नेटकरी मंडळींना जो पर्यंत एकमेकांशी संवाद साधावा वाटतोय तो पर्यंत अशा गोष्टी येतच राहणार !!! जाता जाता :--- मार्क झुकरर्बग (सीईओ फेसबुक) ने गुगल प्लस अकाउंट पुन्हा अ‍ॅक्टीवेट केले आहे म्हणे !!! ;)

गुगल प्लसचा देखील सदस्य असेल तर प्रतिक्रियेत आक्षेपार्ह वाटू नये. नसेल तर आक्षेपार्ह आहे. फेसबुकविषयी 'जिव्हाळा' असणार्‍या पण लिंकडीनचे सदस्यत्व असणार्‍या एखाद्याने अशी विधाने केली तर आपण ऐकून घेवू का?

In reply to by ऋषिकेश

विकास Mon, 07/25/2011 - 21:26
आम्ही बिघडलो तुम्ही बिघडना... असेच काहीसे माझे झाले असावे. (वास्तवीक "आम्हीबी घडलो, तुम्हीबी घडना" असे होयला हवे होते. ;) )