जालस्थ
नमस्कार मंडळी!
येनार येनार येनार! असे अनेक दिवस ऐकत असलेले "गुगल प्लस" जालावर अवतरले. काय मस्त आहे म्हणून सांगू त्या फेसबुकापेक्षा! कारण काय म्हणता? अहो, असे बघा, त्याफेसबुकावर फक्त मित्र करू शकतो आणि मग त्या मित्रांच्या (आणि आपल्या) भिंती रंगवत बसू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यात एकच गोष्ट सगळ्याच कनेक्शन्सना समजू शकते. मात्र, आमच्या गुगल प्लसचे तसे नाही बरंका! त्यात तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे वेगवेगळी वर्तुळे अथवा मराठी जालीय भाषेत कट्टे करू शकता. मग अ, ब, क, ला पार्टीस बोलावलेले ड, इ, फ, ला समजत नाही! वगैरे वगैरे.
आता मी असे माझ्या नवीन कोर्या गुगल प्लसच्या वर्तुळात आनंदाने लिहीले. तर तात्काळ मला प्रतिसाद (जीप्लसच्या भाषेत "कॉमेंट") आला. "कधीकाळी तू देखील फेसबुकचा भाग होतास. आता जीप्लसमधे गेलास त्यामुळे फेसबुकमध्ये काय कमी आहे हे सांगण्याचा तुला हक्क नाही!" क्षणभर मला देखील ते पटले. पण नंतर लक्षात आले की माझा मित्र देखील माझ्या सारखाच जीप्लस वापरत होता आणि फेसबुकवरही होता. पण ते जाउंदेत. मुद्दा तो नाही.
यामुळे माझ्या डोक्यात विचार घोळायला लागले. की या सतत बदलणार्या जालीय दुनियेत, "हम बंजारोंकी बात मत पुछो जी, जो प्यार कीया तो प्यार किया, जो नफरत की तो नफरत की..." असे गाणे म्हणत आपण एका संस्थळाकडून (सोशल नेटवर्ककडून) दुसरीकडे प्रवास करत असतो. त्यात प्रत्येक जालस्थ हा एखाद्या संस्थळाशी अधिक संलग्न होतो. तसे ते कुणी कुठे व्हावे हा त्या त्या जालस्थाचा व्यक्तीगत निर्णय आहे. त्यात आपण काही बोलूच नये. पण असे जालस्थ जेंव्हा इतर संस्थळाना वेगळ्याच नजरेतून बघू लागतात; त्या संस्थळाला, त्यातील सभासदांना (स्वतः घेतलेले अनेक आयडींची सोडून) नावे ठेवू लागतात, तेंव्हा त्याला काय म्हणायचे? हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते?
वाचने
4033
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
"ऑफ द हेड रिमार्क"
In reply to "ऑफ द हेड रिमार्क" by ३_१४ विक्षिप्त अदिती
असं बोलून
हॅ हॅ हॅ.. सदर धाग्याला
In reply to हॅ हॅ हॅ.. सदर धाग्याला by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे इथे येऊन आवर्जुन
In reply to हे इथे येऊन आवर्जुन by मराठे
हॅ हॅ हॅ .. धागा खरंच उकळत्या
In reply to हॅ हॅ हॅ .. धागा खरंच उकळत्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
अमेरिकेत भुताखेतांवर विश्वास फारच उशीरा बसतो
In reply to हॅ हॅ हॅ .. धागा खरंच उकळत्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ .. धागा खरंच उकळत्या
नाळ
In reply to नाळ by राजेश घासकडवी
म्हणूनच असे वाटते...
अहो, असे बघा, त्याफेसबुकावर
संस्थळाभिमान!
खणा, खणा, मऊ माती खणा
In reply to खणा, खणा, मऊ माती खणा by प्रियाली
सध्या
छान
जालस्थ जेंव्हा इतर संस्थळाना
गुगल प्लसचा देखील सदस्य असेल
In reply to गुगल प्लसचा देखील सदस्य असेल by परिकथेतील राजकुमार
ख्या ख्या
=))
वेल्कम
ऐकुन बरे वतले झालया मोकलया
यु टु?
In reply to यु टु? by ऋषिकेश
आम्ही..