Skip to main content

4 GB पेनड्राइव आणि रक्तदान

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 23/07/2011 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
इतक्यातच काही संस्था संघटनांनी एका राजकीय नेत्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून रक्तदान शिबीर आयोजित केले होते. सहभागी झालेल्या रक्तदात्यांना 4GB पेनड्राइव देखील भेट देण्यात आला. 4 GB पेनड्राइव देऊन रक्तदात्यांप्रती आयोजकांनी जी कॄतज्ञता दाखवली आहे तिचे खरोखरच करावे तितके कौतुक कमी आहे. आपल्याही अशाच भावना असतील असे वाटते. धन्यवाद !

वाचने 4061
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

रक्त तर काय शरीरात रोजच तयार होत असते परंतु 4 GB पेनड्राइव रोज रोज मिळत नाही त्यामुळे रक्तापेक्षा 4 GB पेनड्राइवचे अप्रूप अधिक आहे

४० ग्ब चा का दिला नसावा ?

ईतक्यातच म्हणजे काय? आधिची स्टोरी? तूम मुझे खून दो मै तुम्हे हार्ड डिस्क दूंगा.

दान हा शब्द कशाला वापरायचा मग? तुम मुझे खून दो मे तुम्हे युएसबी दूंगा असच लिहायच ना :(

In reply to by नगरीनिरंजन

सहमत आहे. चार ग्लुकोज बिस्किटे आणि कॉफीच्या बदल्यात मी पण चार पाच वेळा माझे रक्त विकले आहे. अवांतरः बाजारवर्चस्वाच्या जमान्यात लोकांनी अशा गोष्टी मनाला लावून घेऊ नयेत. शेवटी काय आहे, रक्ताची गरज आहे आणि पेनड्राइव्हच्या बदल्यात (ज्याची किंमत बहुधा १०० रुपये असेल) रक्त मिळत असेल तर काय हरकत आहे ?

In reply to by नितिन थत्ते

पण, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे म्हणत असतांना त्याला १०० रु. किंमत देणे हे कितपत बरोबर? -सूर्यपुत्र.

In reply to by मी-सौरभ

ज्या मूळ विधानावर आपले वरील प्रस्तावित घोषवाक्य आधारलेले आहे, ते 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा' हे घोषवाक्य ही स्वातंत्र्याची विक्री अथवा सौदेबाजी होती, आणि संबंधित वाक्य उच्चारणारे सद्गृहस्थ हे स्वातंत्र्याच्या विक्रेत्याच्या, दलालाच्या अथवा लिलावकर्त्याच्या* भूमिकेत उभे ठाकले होते, असे काही आपल्याला सूचित करायचे आहे काय? असेच काहीसे आपल्या विधानांतून अप्रत्यक्षपणे प्रतीत होत आहे. ते अनवधानाने आहे, की त्यामागे आपला तसा उद्देश होता, हे दुर्दैवाने समजू शकत नाही. (अर्थात, कसेही असले तरी मला व्यक्तिशः काहीच फरक पडत नाही. केवळ एक निरीक्षण नोंदवले, इतकेच.)
* 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूँगा| बोलो, लगाओ बोली - एक बोतल खून एक बार, एक बोतल खून दो बार, एक बोतल खून तीन बार... बोलो है क्या कोई दो बोतल की बोली लगाने वाला? पीछे से कौन आवाज़ दे रहा है, भाई? क्या बोली? चलो, ढ़ाई बोतल एक बार, ढ़ाई बोतल दो बार, ढ़ाई बोतल तीन बार...' असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. (घोषणा पूर्णपणे कल्पित.)

४ जीबी चा पेन ड्राव्ह जवळ जवळ ३५० ला पडतो. व ४२० मिली रक्त ७५० ला विकत देतात. रक्तपेढी चालवणे आजकालचा खुप फायदेशीर धंदा आहे.

In reply to by वेताळ

आणि ते सगळ्या टेस्ट सकट हवे असेल तर किंमत १२००-१४०० पर्यंत जाते एका बाटलीला !

In reply to by तिमा

शिवाय महापालिकेच्या निवडणूका आल्या आहेत त्या वेगळ्याच. गर्दी खेचायला सलमान खान पण आला होता म्हणे.

कुलींग चार्ज असतो तो वेताळा.

५०/५१ च्या साली N C C मध्ये असताना -सैनीकान्साठी रक्तदान असे आव्हान दिले गेले. तरूण वय- घरी न सान्गता गेलो-रक्त दिले. बाहेर पडताना हातात ५ रुपयाची नोट ठेवली- अनपेक्षीतपणे. घरी आल्यावर आईला सान्गीतले - तीला भोवळच आली! ५ रुपये घेतले- समोरच्या केमिस्ट्कडुन ovaltin आणुन ३/४ आठ्वडे घ्यायला लावले! त्या वेळेस ovaltin म्हणजे चैनच. इतर भावन्डासमोर औषध म्ह्णुन! ५० मधिल ५ रुपये म्हणजे आता किती? by the way, चार ग्लुकोज बीस्किटे म्हनजे ४ GB च ना

राजा उदार झालाय यंदा ८ जीबी पेनड्राइव्ह मिळणार आहे. गेल्या वेळी सल्लुमिया आले होते यावेळी माधुरी दिक्षित नेने येणार आहेत

फुकट रे आम्ही, फुकट.. आतापर्यंत २०-२५ जीबी गमावले.. ;-)