Skip to main content

दहीभात व सुरणाची सुकी भाजी

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 24/07/2011 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य दहीभातासाठी: १ वाटी तांदुळ १ चमचा दही ३-४ चमचे दुध (आपल्या अंदाजानुसार कमी-जास्त) चवीप्रमाणे मीठ १ हिरवी मिरची चिरुन फोडणीसाठी: २-३ चमचे तेल १/२ टीस्पून मोहरी १/२ टीस्पून उडदाची डाळ १/४ टीस्पून हिंग ७-८ कढीपत्ता २-३ लाल सुक्या मिरच्या . पाकृ: १ वाटी तांदुळ स्वच्छ धुवून त्यात तीप्प्ट पाणी घालून भात शिजवणे. गार झाला की त्यात आपल्या अंदाजानुसार दुध घालणे (मऊ झाला पाहीजे) त्यात १ चमचा दही, मीठ व चिरलेली हिरवी मिरची घालणे व झाकून रात्रभर बाहेर ठेवणे. . सकाळी पळीत फोडणी करून भातावर ओतणे व मिक्स करणे. . साहित्य सुरणाची सुकी भाजी: २ वाट्या सालं काढून बारीक क्युब्स केलेला पांढरा सुरण धुवून, निथळून घेणे (पांढरा सुरण खाजरा नसतो) ३/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर १-२ हिरव्या मिरच्या चिरून (आपल्याला हवे तर जास्त ही चालतील ) १/२ टीस्पून हळद १/२ टीस्पून मोहरी १/४ टीस्पून हिंग (जरा जास्त घातले तरी चालेल ) मीठ चवीनुसार तेल . पाकृ: कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, मिरची घालून फोडणी करणे. त्यात चिरलेली कोथिंबीर व सुरण घालणे. त्यावर हळद, मीठ घालून परतणे. झाकण ठेवून गॅस मंद ठेवावा. सुरण शिजले की दहीभाताबरोबर सर्व्ह करणे. . तयार पाकृ चा फोटो .

वाचने 9919
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

पण सुरणसुद्धा (आळुप्रमाणे) खाजू शकतो. त्यासाठी सुरणाची भाजी करताना त्यात चिंच अथवा अमसूल वापरावे. खाजत नाही आणि चवसुद्धा छान येते.

In reply to by चिंतामणी

अगदी बरोबर आहे पण पांढरा सुरण शक्यतो खाजरा नसतो , असला तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे चिंच अथवा अमसूल वापरावे...किंवा सुरणाच्या तुकड्यांना मिठाच्या पाण्यात काही वेळ घालून ठेवणे.

+१ टु निवेदिता ताई, मी पण आज पर्यंत सुरण खाल्लेला नाही आणि वर फोटोत तर ते पनीरचे तुकडे आहेत असं वाटतंय. @सस्व - तुम्ही आणि गुरुवर्य गणपा मिळून रेसिपि प्रेझेंटेशन यावर धागा का नाही काढत हो ?

वाह! मस्त फोटो! सुरण अजून कधी खाल्ला नहीये. सुरणावरून आठवलं. राजेश खन्नाच्या बावर्ची मध्ये त्याने सुरणा सोबत कच्ची केळी वापरून भाजी केलेली दाखवली आहे. ती भाजी मटनासारखी लागते... असे ए के हंगल म्हणतो. :)

In reply to by प्राजु

सुरणावरून आठवलं. राजेश खन्नाच्या बावर्ची मध्ये त्याने सुरणा सोबत कच्ची केळी वापरून भाजी केलेली दाखवली आहे. ती भाजी मटनासारखी लागते... असे ए के हंगल म्हणतो. मटण कबाब वाटतात. (अवांतर- हृषीदांचे "छुपके छुपके", "बार्वची", "गुड्डी" इत्यादी चित्रपटांचे पारायणे झाली आहेत. विषय स्मीत हास्याचा असल्याने "आनंद", "मिली", "अनुपमा", "अनुराधा"इत्यादी क्लासीक चित्रपटांचा उल्लेख टाळलेला आहे.)

विरजण लावून केलेला दही-भात आणि त्यावर फोडणी.....लाजवाब. (फक्त मला ह्या फोडणीत मोहरी ऐवजी जीरं जास्त आवडतं) सुरण पौष्टीक आहे. सुरणाने मेंदूतील स्मरणशक्तीचे कार्य सुधारते असे वाचले आहे. मांसाहारात त्यासाठी 'लिव्हर' खावे.