साहित्य दहीभातासाठी:
१ वाटी तांदुळ
१ चमचा दही
३-४ चमचे दुध (आपल्या अंदाजानुसार कमी-जास्त)
चवीप्रमाणे मीठ
१ हिरवी मिरची चिरुन
फोडणीसाठी:
२-३ चमचे तेल
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून उडदाची डाळ
१/४ टीस्पून हिंग
७-८ कढीपत्ता
२-३ लाल सुक्या मिरच्या
पाकृ:
१ वाटी तांदुळ स्वच्छ धुवून त्यात तीप्प्ट पाणी घालून भात शिजवणे.
गार झाला की त्यात आपल्या अंदाजानुसार दुध घालणे (मऊ झाला पाहीजे)
त्यात १ चमचा दही, मीठ व चिरलेली हिरवी मिरची घालणे व झाकून रात्रभर बाहेर ठेवणे.
सकाळी पळीत फोडणी करून भातावर ओतणे व मिक्स करणे.
साहित्य सुरणाची सुकी भाजी:
२ वाट्या सालं काढून बारीक क्युब्स केलेला पांढरा सुरण धुवून, निथळून घेणे (पांढरा सुरण खाजरा नसतो)
३/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१-२ हिरव्या मिरच्या चिरून (आपल्याला हवे तर जास्त ही चालतील )
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग (जरा जास्त घातले तरी चालेल )
मीठ चवीनुसार
तेल
पाकृ:
कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, मिरची घालून फोडणी करणे.
त्यात चिरलेली कोथिंबीर व सुरण घालणे.
त्यावर हळद, मीठ घालून परतणे.
झाकण ठेवून गॅस मंद ठेवावा.
सुरण शिजले की दहीभाताबरोबर सर्व्ह करणे.
तयार पाकृ चा फोटो
वाचने
9919
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह खंग्री बेत आवडला.
सुरणाची भाजीकृती छान.
अगदी बरोबर
In reply to सुरणाची भाजीकृती छान. by चिंतामणी
सुंदर...फोटो.... मी अजुन सुरण
+१ टु निवेदिता ताई, मी पण आज
+१
In reply to +१ टु निवेदिता ताई, मी पण आज by ५० फक्त
फोटो मस्त!!!
वाह! मस्त फोटो! सुरण अजून कधी
दूरुस्ती
In reply to वाह! मस्त फोटो! सुरण अजून कधी by प्राजु
व्वा.....