लाख चांदण्या लखलख करीती
आणि तारका दळे उतरती
आज पोर्णिमा उतरुन आलि
कालिंदीच्या तटी
खेळतो रास सखा श्रीहरी
भरल्या मेघा परि सावळा
मोरमुकुट शिरी मदनची दुसरा
श्रृंगाराला स्वरात भिजवी
अधरी धरुनी बासरी
खेळतो रास सखा श्रीहरी
गोप गोपिका जमले सारे
टिपरी वरती टिपरी गाजे
त्या नादाला भूलूनी आले
शिवही यमुनातिरी
खेळतो रास सखा श्रीहरी
वाळ्वंटी त्या यमुनाकाठी
रास रंगता हरी संगती
तनमन अवघे विसरुन जावे
प्रेम भरूनिया उरी
खेळतो रास सखा श्रीहरी
विषय नव्हे हा ही तर भक्ती
विसरूनी रमणे देहासक्ती
देवांनाही वेड लावते
अशी रासमाधुरी
खेळतो रास सखा श्रीहरी
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3347
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा! सुंदर कविता..
कविता
In reply to अरे वा! सुंदर कविता.. by llपुण्याचे पेशवेll
वा क्या बात है
कविता आवडली.
सुंदर कविता
सहमत..
In reply to सुंदर कविता by मिसळपाव
सहमत..
In reply to सुंदर कविता by मिसळपाव
सहमत..
In reply to सुंदर कविता by मिसळपाव
कविता
In reply to सुंदर कविता by मिसळपाव
छान