किती सजवू मी माझं मला
किती सजवू मी माझं मला
मन रिंगण घाली तूला ||धृ||
आरसा समोर उभी राहून
वेणी घातली गजरा माळून
फुले सुगंधी डोई शोभती
भुलली मी त्या गंधाला ||१||
नयनांची दोन दले हालती
हाती कांकणे किणकिणती
कर्णभुषणे शोभती कानी
रत्नमाळा हलती गळा ||२||
सुवर्णकांचन सुगंधदर्वळ
आनंदाचे फुलले परिमळ
उंची वस्त्रे रेशीम स्पर्शी
पांघरले शुभ्र शरीरा ||३||
शृंगारूनी शरीरा मन प्रसन्न झाले
मजसमीप हर्षाचे वारे वाहीले
लवकरी येवूनी मिठीत घेवून
साजरे कर धुंद क्षणांना ||४||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२१/०७/२०११
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2185
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!!
सुंदर लिहिले आहे पा भे. खूप
खुप दिवसानी अगदी मनापासुन
तरीही संपुर्ण कवितेत " कपाळी
In reply to खुप दिवसानी अगदी मनापासुन by गणेशा
परा छान लिहिले आहे.. पण शाहिर
In reply to तरीही संपुर्ण कवितेत " कपाळी by परिकथेतील राजकुमार
भारीच....
आरसा समोर उभी राहूनवेणी
मस्त -
@ गणेशा अन परा: उचीत बदल केला