Skip to main content

आंबा बर्फी

लेखक दिपाली पाटिल यांनी गुरुवार, 21/07/2011 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
नम्स्कार लोकहो, बर्‍याच दिवसांनी आले इथे पण म्हटलं काहीतरी चांगलं बनवल्या शिवाय काय जाणार आणि बनवलं तरी फोटो पण काढल्याशिवाय कसं टंकणार म्हणून फार वेळ लागला? आंबा बर्फी साहीत्यः ४ वाट्या आंब्याचा रस २ छोटे चमचे साखर (आंब्याच्या रसावर अवलंबून) मी मेक्सिकन आंबे घेतले होते ते बरेच गोड असल्याने साखर नाही घातली. १/२ वाटी खवा १ छोटा चमचा तूप वेळ तसा बराच लागतो पण कष्ट कमी आहेत. मी खवा घरीच बनवल्याने माझ्या वड्या थोड्या मऊ लागत होत्या पण दुधाच्या किंवा काजूच्या पावडरीने छान जमतील. तसा एकदा आंब्याचा गोळा बनवला तर कसाही वापरता येतो. कृती: एका जाड बुडाच्या पसरट पॅन मध्ये आंब्याचा रस आणि साखर मिक्स करून घ्यावी आणि ते मंद आंचेवर ठेवून द्यावे. याला अख्खा दिवस लागला तरी फार लक्ष द्यावे लागत नाही. एकीकडे हा रस ठेवून दुसरीकडे स्वतः ची कामं करावीत. अधनं-मधनं हलवत रहावे. आंब्याचा रस अगदी घट्ट झाला की त्यात खवा किंवा दूधाची पावडर टाकावी आणि मग सतत हलवत रहावे. हे खवा टाकण्याचे काम दुसर्‍या दिवशीही करता येते. मग तुप टाकून हा गोळा घट्ट होइपर्यंत हलवावे, हे मिश्रण घट्ट झालंय हे हातांना बरोबर जाणवतं. नंतर हे मिश्रण थोडा वेळ थंड करून मग वड्या थापाव्या. एव्ढ्या प्रमाणात २०-२५ वड्या होतात. बाकी काही वेलची-जायफळ टाकू नये, आंब्याचीच चव छान लागते. करून बघा आणि सांगा दिपाली

वाचने 14499
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

माझ्या मुलाला ही बर्फी फार आवडते. मी करणारच. फोटू आणि पाकृ आवडले. खवा करायला किती वेळ लागला? विकतच्या खव्याचे काही अनुभव कोणाला आहेत काय? माझ्याकडे नॉन फॅट ड्राय मिल्कचा बॉक्स आहे तो वापरला तर?

In reply to by रेवती

रेवतीताई, विकतच्या खव्याने आणि फॅट फ्रि मिल्क पावडरने छान बनेल बर्फी. मी २%, १/४ गॅलन दुधाचा खवा बनवला त्याला २-३ तास लागले असतील.

In reply to by रेवती

स्वतःला अनुभव नाही, आणि खात्रीही नाही, पण अनेक भगिनी खव्याऐवजी रिकोत्ता चीज़ वापरतात, अशी उडतउडत कानांवर आलेली ऐकीव बातमी आहे. (चूभूद्याघ्या.) आंबाबर्फीत रिकोत्ता कसे लागेल याची कल्पना नाही. (पाहायचा झाल्यास) स्वतःच्या जबाबदारीवर प्रयोग करून पहावा.

In reply to by प्रचेतस

त्यादिवशी मोदकाच्या सारणात दशहर्‍याचा रस घातला होता, कळतच नव्हतं की त्यात रस घातलाय. तोतापूरी म्हणशील तर साखरेत शिजवून साठवून ठेवायला बरा, बर्फीला नको.

In reply to by सूड

आंबा बर्फीत घालायला आता हापूस आंबे नाही मिळाले तरी Alfanso mango pulp मिळतो त्याची करून बघा.

मस्तच ग.. आंबा बर्फी.......... अम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म... स्वाती

झ क्क्क्क्क्क्क्का स ! स्टेप बय स्टेप फटू टाकुन काळजात अजून सुरे न भोसकल्याबद्दल धन्यवाद. चला आता ह्या विकांताला चांगला खवा शोधत फिरणे आले. इकडे काही ठिकाणी मिळतो खवा पण भारतातल्या सारखा खमंग नसतो आणि त्याला थोडासा खराब वास देखील असतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

चला आता ह्या विकांताला चांगला खवा शोधत फिरणे आले. इकडे काही ठिकाणी मिळतो खवा पण भारतातल्या सारखा खमंग नसतो आणि त्याला थोडासा खराब वास देखील असतो.
;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

नामदेव ढसाळांनी म्हटल्याप्रमाणे, खरे चित्पावन ग्येले सिलिकॉन व्हॅलीत....... आपण नक्की कुठे असता? इफ नॉट रॉन्ग यु इन 'सॅडॅशिपिथ' ? विच्च लेन सSSSर?

In reply to by परिकथेतील राजकुमार

इकडे काही ठिकाणी मिळतो खवा पण भारतातल्या सारखा खमंग नसतो आणि त्याला थोडासा खराब वास देखील असतो. अस्सं का? अग्गबै! होणार्‍या बायकोची स्वयंपाकाची अटच असेल म्हणून करतोय हे सगळं.

मस्त आहे आंबा बर्फी..!! मे महिन्यात टकली असतिस तर बरा झाला असता !! आ ता आम्बे शोधावे लगतिल इतर : आमची कोकणा मधील आजी ..बर्फी मधे खोबरा बारिक खिसुन घालायची ...छान असते ती वडी !!

दिपाली, आंबा बर्फी माझा वीक पॉईंट आहे. फोटु पाहून तर उचलूनच घ्याविशी वाटली. खवा घरी कसा करायचा? कोणीतरी पाकृ टाका ना. आपल्याकडे खव्यात भेसळ असते त्यामुळे घरीच बनवलेला बरा.