नम्स्कार लोकहो,
बर्याच दिवसांनी आले इथे पण म्हटलं काहीतरी चांगलं बनवल्या शिवाय काय जाणार आणि बनवलं तरी फोटो पण काढल्याशिवाय कसं टंकणार म्हणून फार वेळ लागला?
आंबा बर्फी
साहीत्यः
४ वाट्या आंब्याचा रस
२ छोटे चमचे साखर (आंब्याच्या रसावर अवलंबून) मी मेक्सिकन आंबे घेतले होते ते बरेच गोड असल्याने साखर नाही घातली.
१/२ वाटी खवा
१ छोटा चमचा तूप
वेळ तसा बराच लागतो पण कष्ट कमी आहेत. मी खवा घरीच बनवल्याने माझ्या वड्या थोड्या मऊ लागत होत्या पण दुधाच्या किंवा काजूच्या पावडरीने छान जमतील. तसा एकदा आंब्याचा गोळा बनवला तर कसाही वापरता येतो.
कृती:
एका जाड बुडाच्या पसरट पॅन मध्ये आंब्याचा रस आणि साखर मिक्स करून घ्यावी आणि ते मंद आंचेवर ठेवून द्यावे. याला अख्खा दिवस लागला तरी फार लक्ष द्यावे लागत नाही. एकीकडे हा रस ठेवून दुसरीकडे स्वतः ची कामं करावीत. अधनं-मधनं हलवत रहावे.
आंब्याचा रस अगदी घट्ट झाला की त्यात खवा किंवा दूधाची पावडर टाकावी आणि मग सतत हलवत रहावे.
हे खवा टाकण्याचे काम दुसर्या दिवशीही करता येते.
मग तुप टाकून हा गोळा घट्ट होइपर्यंत हलवावे, हे मिश्रण घट्ट झालंय हे हातांना बरोबर जाणवतं. नंतर हे मिश्रण थोडा वेळ थंड करून मग वड्या थापाव्या. एव्ढ्या प्रमाणात २०-२५ वड्या होतात. बाकी काही वेलची-जायफळ टाकू नये, आंब्याचीच चव छान लागते.
करून बघा आणि सांगा
दिपाली
वाचने
14476
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय सुंदर
?
In reply to अतिशय सुंदर by निवेदिता-ताई
माझ्या मुलाला ही बर्फी फार
रेवतीताई, विकतच्या खव्याने
In reply to माझ्या मुलाला ही बर्फी फार by रेवती
ऐकीव माहिती
In reply to माझ्या मुलाला ही बर्फी फार by रेवती
भयंकर आवडल्या गेले आहे.
इकडे आहेत रे
In reply to भयंकर आवडल्या गेले आहे. by सूड
ठीकै,
In reply to इकडे आहेत रे by प्रचेतस
नाय रे
In reply to ठीकै, by सूड
ह्म्म.
In reply to नाय रे by प्रचेतस
आंबा बर्फीत घालायला आता हापूस
In reply to भयंकर आवडल्या गेले आहे. by सूड
बघेन, केलीच तर फटू टाकेन.
In reply to आंबा बर्फीत घालायला आता हापूस by ज्योति प्रकाश
मस्त!!
शॉलिट्ट... ए दिप्स ताय इकडे
झ क्क्क्क्क्क्क्का स ! स्टेप
आता बास!
In reply to झ क्क्क्क्क्क्क्का स ! स्टेप by परिकथेतील राजकुमार
नामदेव ढसाळांनी
In reply to झ क्क्क्क्क्क्क्का स ! स्टेप by परिकथेतील राजकुमार
इकडे काही ठिकाणी मिळतो खवा पण
In reply to झ क्क्क्क्क्क्क्का स ! स्टेप by परिकथेतील राजकुमार
.....!!!!!!!!!!!!!!!
वेल्कम ब्यॅक. बर्फी बद्दल
छान !!
लई झाक
खवा
In reply to लई झाक by स्मिता.
धन्यवाद
In reply to खवा by बहुगुणी
(No subject)
भारी!!
नक्की करून बघणार
लंगडा आंबा चालेल काय ? बाकी
अरेरे! असो.
दूष्ट!!